आज शुक्रवार दिनांक 1 मे 2026 म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला.
प्रशालेचे ज्येष्ठ सेवक श्री. विजय चक्रवर्ती, सिनिअर मास्टर श्री. संदीप पवार, माळी कामगार श्री. शंकर ढमाले, श्री. वासुदेव महाले व श्री. संजय पडवळ यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन झाले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री. महेश कोतकर यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाविषयी माहिती सांगितली. सिनिअर मास्टर श्री. संदीप पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार परिपाठ विभाग प्रमुख श्री. महेश कोतकर, क्रीडाशिक्षक श्री. महादेव मगर, हवालदार श्री. गजानन माळी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.






