A world of science’ revealed through experiments at MES Rani Lakshmibai Mulinchi Sainiki School

Kasar Amboli, 14 October 2022.

A ball floating in the air without any support, and watching the collision of the same ball with another ball next to each other, were some of the experiments amazed the audience present in the multipurpose hall of the school. Bernali’s principle of air velocity, the reflection of light in different mediums through the thyroscope and the law of momentum conservation when the oscillating Newton’s cradle collides with each other, Electromagnetic induction by means of Various concepts such as magnetic attraction were explained to the children through interesting experiments.
‘Atal Tinkering’ laboratory of M. E. S Rani Lakshmibai Mulinchi Sainiki Shala had organized a workshop on ‘The Joy Learning Science Through Experiments’ before the ‘Science Vachan Prerna Divas’.
Along with 378 girls cadets from Sainiki school, more than 150 students from various schools like Vidya Bhavan English Medium School, Sanskar School, Heritage International School, Elite International School and Sudarshan Vidyamandir participated in the workshop. Former Professor Shri. Bhagwan Chakradev who dedicated his life for the science exploration was the main guide and Mr. Keshavrao Deshpande along with Mr. Vijay Patil assisted him in the experiments.
Through this programme, the complex concepts of science were presented to the students in a very interesting manner and connected with their daily life. Sainiki School implemented an innovative concept of ‘Science Vachan Prerna Divas’ on Saturday 15th October by reading the various concepts presented in the programme. Sainiki School always organizes such programmes for the overall development of the rural students in its surrounding areas. On this occasion, the Sainiki School intends to bring all these schools together using the concept of ‘Cluster School’.
Mr. Ravindra Chaudhary, Cluster Head of Urawade Cluster , Mrs. Suvarna Kamble, Principal of Sainiki School, Commandant Mr. M. Yagyaraman were present for this programme. The programme was organized by ATL Head of the Department Mr. Anant Kulkarni and Head of Science Department Mrs. Manjiri Patil under the mentorship of Campus Director Mrs. Geetanjali Bodhankar . Mr. Anant Kulkarni, Vice Principal of the school thanked everyone and concluded the programme.

विजयादशमी संचलन ……. @ कासार अंबोली by RLMSS

शारदीय नवरात्रौत्सवाने आपणा सर्वांच्या जीवनात एकप्रकारचा आनंदोत्सव ओसांडून वाहतो असतो. या निमित्ताने, मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारअंबोली, येथे सोमवार दि.०३ ॲाक्टोबर २०२२ रोजी दु.३.०० ते ५.०० या वेळात सामाजिक भोंडला प्रशालेत आयोजित करण्यात आला. कौटुंबिक स्नेहमेळावा, मैदानावर गरबा, भेटीगाठी व चहापान असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते. बऱ्याच मैत्रिणींच्या या कार्यक्रमामुळे भेटीगाठी झाल्यात.

गुरुवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली ता. मुळशी, जि. पुणे,
संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ‘हर घर झेंडा’ या उपक्रमांतर्गत कासार आंबोली गावामध्ये ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांसमवेत प्रभात फेरी काढून जनजागृतीपर पत्रके वाटून आणि घोषणा देत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींच्या घोष पथकाने लोकांना जागृत करण्यासाठी वातावरण निर्मिती केली आणि विद्यार्थिनिंनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला…
हातात घेतलेले फलक लोकं उत्साहाने वाचत होते आणि उपक्रमाविषयी माहिती घेत होते.
प्रभात फेरीची सुरुवात प्रशालेच्या परिसरातून सुरू होऊन ग्रामपंचायत कासार आंबोली गावाच्या प्रांगणात सांगता झाली.
सदर कार्यक्रमास गावाचे सरपंच कुमार रणजित गायकवाड, उपसरपंच स्वप्नील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, उपस्थित होते.
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक अद्वैत जगधने, सुनीता शिंदे, भाऊसाहेब मार्तंड, रविराज थोरात, महादेव मगर तसेच प्रशालेतील हॉस्टेल विभागाच्या प्रियंका गुरव, शितल मार्तंड आणि प्रशालेचे सेवक पोपट कणगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतर्फे
क्रांतीदिनी हुतात्म्यांना मानवंदना

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे क्रांतीदिनानिमित्त आज (मंगळवार, दि. ९ ऑगस्ट २०२२) सकाळी हुतात्मा चौकातील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी सैनिकी वेशात हुतात्म्यांना मानवंदना दिली. इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी यावेळी हुतात्मा कर्णिक यांच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली.

या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य मा. प्रल्हाद राठी, सैनिकी शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे आणि सौ. चित्रा नगरकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कमांडंट विंग कमांडर यज्ञरमण आदी मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

या प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला अनुलक्षून संस्थेने तयार केलेल्या पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींच्या मानवंदनेने वातावरण भारावून गेले होते. वर्दळीच्या ठिकाणी आणि कामाच्या गडबडीत असतानादेखील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

इतिहास अभ्यासक मोहन शेटे यावेळी बोलताना म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्यासारख्या असंख्य क्रांतिकारकांप्रती आजच्या क्रांतीदिनी कृतज्ञता व्यक्त करतानाच या स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करण्याची प्रतिज्ञा करू या! देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात निकराचा संघर्ष करण्यासाठी महात्मा गांधीजींनी १९४२ साली मुंबईत गवालिया टँक येथील सभेत ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा केली आणि “करेंगे या मरेंगे” चा नारा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध मार्गांनी आंदोलने केल्यानंतर आता जुलमी ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकण्यासाठी जोरदार धमाका केला पाहिजे या भावनेतून भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या साथीदारांनी पुण्यातील कँप परिसरात असलेल्या कॅपिटॉल आणि वेस्ट एन्ड या दोन चित्रपटगृहात दि. २४ जानेवारी १९४३ रोजी चित्रपटाचा खेळ चालू असताना रात्री ९.३० वाजता भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या पाच साथीदारांनी ६ बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ३ ब्रिटिश अधिकारी ठार झाले तर १८ जण जखमी झाले. या घटनेने ब्रिटिश सरकारला मोठा हादरा बसला. स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब देहूरोड येथील दारुगोळा कारखान्यात तयार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि पोलीसांनी भास्कर कर्णिक व त्यांच्या काही साथीदारांना अटक करून फरासखाना पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यावेळी लघुशंकेचे निमित्त करून भास्कर कर्णिक बाजूला गेले आणि तेथे खिशातली सायनाईडची पूड खाऊन आत्मार्पण केले, तो दिवस होता ३१ जानेवारी १९४३. अशाप्रकारे कॅपिटॉल बॉम्ब खटल्यातील मुख्य दुवा नाहीसा झाल्यामुळे इतर क्रांतिकारकांची नावे पोलीसांना समजू शकली नाहीत. हुतात्मा भास्कर कर्णिक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण देशाशी प्रतारणा केली नाही.”

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकात स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याची महती विशद केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.

सैनिकी शाळेत दीप अमावस्या उत्साहात साजरी….

प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा जपत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत आज गुरुवार दिनांक २८/०७/२०२२ रोजी दीप अमावस्या निमित्त शेकडो दिवे प्रज्वलित करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रशालेच्या बोधचिन्हाच्या भोवती विविध प्रकारच्या समई, शेकडो दिवे प्रज्वलित करून विद्यार्थिनींनी अंधारावर मात करण्याचा संदेश दिला. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर मॅडम व प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी सर यांनी दीप प्रज्वलित करून केली. प्रशालेतील हिंदी व संस्कृत विभाग प्रमुख श्री भाऊसाहेब मार्तंड सर यांनी विविध प्राचीन कथांच्या सहाय्याने विद्यार्थिनींना दीप अमावस्येचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी प्रशालेतील स्कूल कॅप्टन, स्पोर्ट्स कॅप्टन तसेच काही शिक्षक प्रतिनिधी यांचे औक्षण करण्यात आले.आजच्या दिनाचे महत्त्व सांगताना कॅम्पस डायरेक्टर सौ.गीतांजली बोधनकर मॅडम यांनी दक्षिण भारतीय संस्कृती व महाराष्ट्रीयन संस्कृती यांचा मिलाफ करत दीप ‘ तिमिराकडून तेजाकडे’ जाण्याची प्रतिज्ञा सर्वांनी करावी अशी इच्छा व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे पर्यवेक्षक श्री श्याम नांगरे सर यांनी केले तर आयोजन परिपाठ विभागाने केले.

Kargil Vijay Divas celebrated in Rani Laxmibai Girls Military School

The Senior Cadets of Maharashtra Education Society’s Rani Laxmi Bai Girls Military School enthusiastically organised and celebrated ‘Kargil Vijay Divas’ in the MP Auditorium of the School under the guidance of Military Training Wing of RLMSS.

The entire programme was planned and organised by Cadets of Class XII. A nice skit was presented by the Cadets on the tough life and Tour of Duty of an Indian Soldier while remembering the act of exemplary courage of our braveheart soldiers.

Cdt Pratiksha Lamjane and
Cdt Tanvi Nimbrate presented patriotic songs and poems.

Relevant information on ‘Operation Vijay’, ‘Operations Safed Sagar’ ‘Operation Badr’ was given by Cdt Bhumika and Cdt Sharon Susan along with the help of a beautiful PowerPoint presentation.

Cdt Prajakta Navale, Cdt Anagha Bahekar compered the event while Cdt Vedashree presented vote of thanks.


शनिवार, दिनांक 9 जुलै 2022 रोजी, म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय कासार आंबोली ता. मुळशी येथे आषाढी एकादशी निमित्त वर्गश: अभंग गायन स्पर्धा पालखी व वृक्ष दिंडीचे चे आयोजन केले होते, इयत्ता सहावीच्या मुलींनी पांडुरंग, रूक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत जनाबाई यांची वेशभूषा केली होती, अभंग गायन स्पर्धेत लहान गटांमध्ये इयत्ता 8 वी अ व मोठ्या गटात इयत्ता 10 वी अ ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचे परीक्षण उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे व श्री. संदीप पवार, सौ. अश्विनी मारणे यांनी केले , श्री. अद्वैत जगधने, श्री. भाऊसाहेब मार्तंड, श्री. अनंत कुलकर्णी, श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार, श्रीमती श्रेया देशपांडे, श्रीमती प्रियंका हजारे, श्रीम. प्रियंका गुरव व सौ. शितल मार्तंड यांनी ही अभंग म्हटले त्यानंतर अध्यक्षीय मनोगतात सौ. गीतांजली बोधनकर यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करुन आषाढी एकादशीचे व पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले.
वृक्षारोपणाचे फायदे सांगणारी घोषवाक्यांच्या पाट्या हातात घेत वसतिगृह ते शाळा अश्वासहित पालखी काढण्यात आली होती, शाळेसमोर घोड्याने रिंगण पूर्ण केले त्यानंतर पर्यावरण व वृक्ष गीत गात भर पावसात वृक्ष दिंडी निघाली, कॅंपस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, श्री. भाऊसाहेब मार्तंड, श्री. गजानन माळी, श्री. श्रीपाल चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, या कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धा प्रमुख सौ. वैशाली शिंदे, श्री. रविराज थोरात, श्री. भाऊसाहेब मार्तंड यांनी केले तर सौ. शीतल मार्तंड, श्रीम. प्रियांका गुरव व श्री. समीर जाधव यांनी विशेष कल्पना मांडून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या प्रसंगी सैनिकी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

7 July – रौप्य महोत्सवी वर्ष – सांगता समारंभ ….

 

म. ए. सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा  व उच्च माध्यमिक विद्यालय कासार आंबोली येथे शाळेचा वर्धापनदिन व  रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना व नृत्य दिग्दर्शिका  मा. सुचेता भिडे -चापेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी तथा उपसंचालक (अतिरिक्त कार्यभार)  श्री. महादेव कसगावडे, नाट्य कलाकार श्री. सुयोग कुंडलकर, सौ. आरती कुंडलकर, म. ए. सो संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, म. ए. सो. नियामक मंडळ अध्यक्ष आर्किटेक्ट श्री. राजीव सहस्रबुद्धे, शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सचिव डॉ. श्री. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, शाला समिती महामात्रा डॉ. मानसी भाटे  व प्रा. चित्रा नगरकर, श्री. सुधीर भोसले, डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, कॅंपस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार हे उपस्थित होते, याप्रसंगी इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते झाले, प्रमुख अतिथी सुचेता भिडे- चापेकर यांनी जीवनात कलेचे महत्व खूप असल्याचे सांगितले तर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महादेव कसगावडे यांनी या शाळेत अभ्यासाबरोबरच खेळाला खूप महत्त्व दिले जाते याविषयी अभिनंदन केले व जीवनात एका तरी खेळात प्राविण्य मिळवून यशस्वी होण्याचा सल्ला दिला, अध्यक्षीय मनोगतात एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी सशस्त्र सेनेमध्ये आज महिलांना खूप संधी असल्याचे सांगितले, रौप्यमहोत्सवी सांगता समारंभाच्या निमित्ताने म. ए. सो परफार्मिंग आर्ट्स च्या कलाकारांनी  ‘अनामवीरा’ हा क्रांतिकारकांना मानवंदना देण्याचा देशभक्ती पर कार्यक्रम सादर केला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय  प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी करून दिला. पारितोषिक वाचन सौ. रेखा रायपूरकर व सौ. सावित्री पाटील यांनी केले, सूत्रसंचालन उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी केले, शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे कामकाज पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, श्री. गजानन पाटील व समितीने केले तर वर्षभरात विविध कार्यक्रमांचे नियोजन समन्वयक श्री. अद्वैत जगधने व सौ. रेखा रायपूरकर यांनी केले होते.

दिनांक : २१ जून २०२२ रोजी जागतिक योगदिन प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  रोप मल्लखांब व कुस्तीची राष्ट्रीय खेळाडू कु. जान्हवी डिंबळे यांनी विद्यार्थिंनींना योग दिनाचे महत्व सांगितले  व  योगासनाचे प्रात्याक्षिक  करून दाखविले. या प्रसंगी राज्यस्तरीय योगासन खेळाडू कु. अक्षता धर्मे हिचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम व योगासने  करावीत असा संदेश दिला. या कार्यक्रमात प्रशालेतील सर्व विद्यार्थिंनी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व सैनिकी परिवाराने उत्साहात सहभाग घेतला.

 

 

     

 

झॅांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेतील राणी लक्ष्मीबाई पुतळयाला हार घातला तसेच घोष पथकाच्या धून वर मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी प्रशालेतील शिक्षक श्री. प्रशांत जोशी सर यांनी राणी लक्ष्मीबाईचे चरित्र उलगडून दाखवले. या प्रसंगी सर्व सैनिकी परिवार मानवंदनेसाठी उपस्थित होता.

 

 

झॅांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालगंधर्व चौक येथील राणी लक्ष्मीबाई पुतळयाला महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेकडून मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या डॅा.सुलभा विधाते,सैन्य निदेशक श्री.गजानन माळीसर, प्रा.प्रमोद झुरमुरे सर, शाळेचा स्टाफ तसेच सैनिकी शाळेच्या कॅडेट्सचा प्लाटून व बॅंडपथक उपस्थित होते. राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळयाला प्राचार्या डॅा.सुलभा विधाते,सैन्य निदेशक गजानन माळीसर व स्कूल कॅप्टन सई धोंड यांनी हार घातला. शाळेच्या प्लाटूनने बॅंडच्या तालावर शानदार सलामी दिली. बॅंडपथकाने यावेळी वेगवेगळ्या धून सादर केल्या व उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी कॅडेटसनी राणी लक्ष्मीबाईंच्या नावाचा जयजयकार करत परिसर दणाणून सोडला.

                 

झॅांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालगंधर्व चौक येथील राणी लक्ष्मीबाई पुतळयाला महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेकडून मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या डॅा. सुलभा विधाते, सैन्य निदेशक श्री.गजानन माळी सर, प्रा. प्रमोद झुरमुरे सर, शाळेचा स्टाफ तसेच सैनिकी शाळेच्या कॅडेट्सचा प्लाटून व बॅंडपथक उपस्थित होते. राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळयाला प्राचार्या डॅा. सुलभा विधाते, सैन्य निदेशक गजानन माळीसर व स्कूल कॅप्टन सई धोंड यांनी हार घातला. शाळेच्या प्लाटूनने बॅंडच्या तालावर शानदार सलामी दिली. बॅंडपथकाने यावेळी वेगवेगळ्या धून सादर केल्या व उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी कॅडेटसनी राणी लक्ष्मीबाईंच्या नावाचा जयजयकार करत परिसर दणाणून सोडला.

आनंद वार्ता,

*कॅडेट गीता गणपत धनवडे, इयत्ता :- आठवी (ब)* हिचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठे *राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक* पटकावून विजेता झाला आहे. सन्मानचिन्ह, सर्टिफिकेट, पाच हजार रुपये रोख आणि एक वर्षासाठी सायन्स सेंटर, बारामती येथील मेंबरशिप कार्ड, असे बक्षीस या प्रोजेक्टसाठी देण्यात आले. तसेच पद्मविभूषण थोर शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या सह प्रख्यात शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यात आला.
कॅडेट गीता गणपत धनवडे हिचा सत्कार, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पवार सर यांनी केला आणि पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजक :-
1. महाराष्ट्र शासनाचे – राजीव गांधी सायन्स अँड इंनोवेशन ऍक्टिव्हिटी सेंटर, बारामती.
2. नेहरू सायन्स सेंटर, मुंबई.
3. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती.
4. टाटा ट्रस्ट, मुंबई

आयोजन दिनांक :- 15 ते 17 जून 2022.

ठिकाण :- कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर, बारामती

नेहरू सायन्स सेंटरचे चेअरमन श्री. अरविंद परांजपे सर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

हिमाचल प्रदेश मनाली येथील अटलबिहारी वाजपेयी माऊंटेनेरिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सैनिकी शाळेतील इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थिनींनी दिनांक 19 मे ते 5 जून 2022 या कालावधीत अॅडव्हेंचर कोर्स पूर्ण केला,यात राॅक क्लाइंबिंग,जुमारिंग,रॅपलिंग , रिव्हर क्रॉसिंग,वाॅल क्लाइंबिंग,हाइट गेनिंग व एकाच दिवशी सल़ग 14 किलो मीटर चालणे हे उपक्रम केले ,रोहतांग पास व अटल टनेल या ऐतिहासिक क्षेत्राला भेट दिली, 95 पैकी 95 मुलींना ” A ” ग्रेड मिळाली हे विशेष होय.संघ व्यवस्थापक म्हणून आॅनररी कॅप्टन ( निवृत्त) श्री.चंद्रकांत बनसोडे , पर्यवेक्षक व हिंदी व क्रीडा विभाग प्रमुख श्री.संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली सौ.अश्विनी पवार , श्री.महादेव मगर , कु. प्रियांका हजारे , कु.श्रेया देशपांडे , श्रीमती प्रियांका हजारे व श्रीमती मनाली लाडे यांनी कामकाज पाहिले.

म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, ता. मुळशी येथे पासिंग आऊट परेड व चित्तथरारक सैनिकी प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला . या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुहास दिवसे ,आयुक्त , महानगर विकास प्राधिकरण , सी.ए.श्री.योगेश दीक्षित कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषणजी गोखले ( निवृत्त) संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्री राजीवजी सहस्त्रबुद्धे ,नियामक मंडळ सदस्या व शालासमिती अध्यक्षा डॉ.माधवी मेहेंदळे , सदस्य श्री.बाबासाहेब शिंदे , अॅड. श्री.सागर नेवसे ,संस्थेचे सचिव श्री भरत व्हनकटे ,सहाय्यक सचिव श्री सुधीर गाडे,शालासमिती महामात्रा ,प्रा.चित्रा नगरकर ,प्रा.सुधीर भोसले ,प्रा.शैलेश आपटे , शाळेच्या प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांच्या उपस्थितीत झाला , शानदार संचलनानंतर इयत्ता १२ वी ची पासिंग आऊट परेड झाली ,त्यानंतर प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला ,यात लेझिम,योगासन, मर्दानी खेळ,रोप मल्लखांब, धनुर्विद्या ,रायफल शुटिंग,हाॅर्स रायडिंग व कराटे यांचा समावेश होता, याप्रसंगी” टाकाऊतून टिकाऊ “या संकल्पनेनुसार विमान शिल्प ,एन.सी.सी कक्ष व आर्ट वाॅल चे उद्घघाटन ही प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाले, Sword Of Honour हा पुरस्कार कु.वृंदा पवार व उत्कृष्ट विद्यार्थिनी हा पुरस्कार साक्षी टेकवडे हिला मिळाला , उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादरीकरणाचा पुरस्कार रायफल शुटिंग ला मिळाला मार्गदर्शन आॅनररी कॅप्टन (निवृत्त) श्री.चंद्रकांत बनसोडे यांनी केले राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी कु.देवयानी चव्हाण,गीता धनवडे व गिरिजा जोगळेकर तसेच शाळेला मदत करणारे चित्रकार श्री.विक्रम कुलकर्णी, शिल्पकार श्री.रोहन चंद्रचूड, वेल्डर श्री.सुनिल लोहार तसेच शैक्षणिक योगदानाबद्दल शाळेचे उप मुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी ,सौ.मंजिरी पाटील , श्री.रविंद्र उराडे ,सौ.वैशाली शिंदे या शिक्षकांना ही सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.सुहास दिवसे यांनी पासिंग आऊट परेड व मुलींची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून भारावून गेल्याचे सांगितले तर अध्यक्षीय मनोगतात एअर मार्शल श्री.भूषणजी गोखले (निवृत्त ) यांनी कोरोनाच्या आपत्तीनंतर प्रात्यक्षिकांचे सुंदर सादरीकरण केल्याबद्दल सर्व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे ही कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.माधवी मेहेंदळे , सूत्रसंचालन श्री.अद्वैत जगधने यांनी केले तर उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा विभाग प्रमुख व पर्यवेक्षक श्री.संदीप पवार व सैन्यप्रशिक्षण विभागप्रमुख हवालदार श्री.गजानन माळी व सर्व सैनिकी परिवार यांनी केले.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई  मुलींची सौनिकी शाळेतील राष्ट्रीय छात्र सेनेच्या म्हणजेच एन.सी.सी. – एअर विंगच्या ५ छात्रांनी शनिवार, दि. १२ मार्च २०२२ रोजी मायक्रोलाईट – एसडब्ल्यू ८० या आकाश भरारीचा चित्तथरारक अनुभव घेतला.
देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी आणि मएसो राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षात या पंचाकन्यांना मिळालेली आकाश भरारीची संधी ही लक्षणीय बाब आहे.
शाळेत इ. ९ वी मध्ये शिकणाऱ्या वैष्णवी जयराम धावडे, विजेता विशाल दुर्गे,  समृध्दी बालाजी रायबन, इरा जयंत खाडिलकर आणि भार्गवी आनंद शिंदे या छात्रांची पुणेस्थित ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनतर्फे एन.सी.सी. – एअर विंगच्या फ्लाईंग अॅक्टिव्हिटीसाठी निवड करण्यात आली होती. प्रत्येक छात्राला मायक्रोलाईट – एसडब्ल्यू ८० या विमानाच्या सह-वैमानिकाच्या भूमिकेतून १० ते १५ मिनिटे हवाई उड्डाणाची संधी मिळाली. त्यासाठी ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन रमेश जाधव यांनी प्रशिक्षण व विशेष सहकार्य केले.
शाळेतील एनसीसीच्या सी.टी.ओ. राजश्री गोफणे यांनी या छात्रांना मार्गदर्शन केले.
मायक्रोलाईट – एसडब्ल्यू ८० या विमानाला एकच इंजिन असून त्यात वैमानिक आणि सह-वैमानिकांसाठी आसन व्यवस्था आहे. कोणत्याही मोठ्या विमानाच्या उड्डाणापूर्वी धावपट्टीच्या आसपास उडणाऱ्या पक्षांना बाजूला करण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो.

प्रशालेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाप्रित्यर्थ राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन सैनिकी शाळेतर्फे करण्यात आले.
१) दि.१० ते १७ फेब्रुवारी दरम्यान विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्यातर्फे आयोजित ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत इ.६ वी ते ९ वी च्या ३८ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी विद्यार्थिनींना विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांचेतर्फे E certificate मिळाले.
२) दि.२५,२६,२८ फेब्रुवारी दरम्यान शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित इ.६ वी ते ९ वी व ११ वी च्या विद्यार्थिनींसाठी निबंध, वैज्ञानिक रांगोळी, वक्तृत्व – व्हिडीओ स्पर्धा घेण्यात आल्या. निवडक स्पर्धकांचे व्हिडिओ SCERT website वर upload करण्यात येतील.प्रत्येक स्पर्धेत तीन क्रमांक काढण्यात आले.
३) दि.२६ फेब्रुवारी रोजी म.ए.सो.मधील सर्व प्राथमिक व माध्यमिक विभागातील विज्ञान अध्यापकांसाठी Creative learning in Science या ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.ही कार्यशाळा IIT Gandhinagar centre for creative learning मधील तज्ञ मार्गदर्शक श्री.जय ठक्कर यांनी घेतली.
४) दि.२ मार्च रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. Geology विषयाचे शास्त्रज्ञ मा.डॉ. विद्याधर बोरकर प्रमुख अतिथी होते. जीवाश्म (Fossils) या विषयावर त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.IUCAA Science outreach program चे.श्री.रुपेश लबडे यांनी *खेळणी* *द्वारे विज्ञान शिक्षण याविषयी* सत्र घेतले.या सत्रात विविध सहज उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थिनींनी गटामध्ये उपकरणे, मॉडेल्स  देखील तयार केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.दत्तात्रय नाईक – प्रकल्प समन्वयक, म.ए.सो.यांनी देखील विज्ञानातील संशोधन याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचे कौतुक अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आले.

म.ए.सो. च्या १६० वर्षाच्या ‘ध्यासपंथे चालता’ या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मा. उपराष्ट्रपती यांनी मंगळवार दि. ८ फेब्रुवारी २०२२,  सायंकाळी ४ वा.  फेसबुक आणि यू ट्यूब या ऑनलाईन माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

 

प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, प्रजासत्ताक दिनी प्रशालेतील पदाधिकारी, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे देशभक्तीपर गीत गायन….

Zee .T.V हिंदी ‘ सा रे ग म पा’ या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिके सादर केली , सदर कार्यक्रमाचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक श्री. शंकर महादेवन, श्री.हिमेश रेशमिया व सुप्रसिद्ध सिनेअभिनेते श्री. विवेक ओबेराॅय होते. कार्यक्रम बघून सर्व सहभागी स्पर्धक व प्रेक्षक ही भारावून गेले होते. शनिवार दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी हा संपूर्ण कार्यक्रम रात्री 9.00 वाजता ZEE (Hindi) T.V वर दाखविण्यात आला.🙏🙏🙏

https://youtu.be/ste8pGAau-o

                             

संवाद वीरांगनेशी- भाग 4
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, 15 दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत,आपल्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी फ्लाइंग ऑफिसर दामिनी देशमुख यांनी सोमवार दि.13.12.21 रोजी दुपारी 12.00 वाजता प्रशालेतील विद्यार्थिनींशी संवाद साधला.
एअर फोर्स मधील संधी, SSB Interview, medical test, national merit list याविषयी माहिती सांगितली.
एअर फोर्स मध्ये निवड होताना आलेले अपयश आणि त्यावर मात करून मिळवलेले यश याविषयी अनुभव सांगितले.
विद्यार्थिनींना ‘स्वतःला ओळखा आणि स्वतःशी प्रामाणिक राहून आपले करिअर निवडा, तसेच आर्मी, नेव्ही, एअर फोर्स मधील करिअर ज्ञानाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाशी जास्त निगडीत आहे. प्रशालेतील जास्तीत जास्त उपक्रमात सहभागी होऊन व्यक्तिमत्व घडवा.’ असा मोलाचा सल्ला दिला. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
याप्रसंगी फ्लाइंग ऑफिसर दामिनी देशमुख व सौ. संस्कृती खैरनार-पाटील आणि त्यांच्या बॅचमधील विद्यार्थिनी यांनी प्रशालेतील रसायनशास्त्राच्या शिक्षिका रुपाली लडकत यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशालेस 105 पुस्तके भेट दिली.
हा कार्यक्रम इ. 12 वी च्या विद्यार्थिनींनी सादर केला. अध्यक्षीय मनोगत प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी केले. अशा अनेक दामिनी या प्रशालेत घडाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सर्व शिक्षकवृंद, सैनिकी परिवार सर्वांनाच अशा विद्यार्थिनी आपल्या शाळेतून घडत आहेत याचा आनंद झाला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सौ. सावित्री पाटील यांनी केले.

मा. राष्ट्रपतींबरोबर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट

भारताचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांची त्यांच्या पुणे भेटीदरम्यान सोमवार, दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी राजभवन येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय प्र. क्षीरसागर, सचिव प्रा. डॉ. भरत सि. व्हनकटे उपस्थित होते. या प्रसंगी मा. राष्ट्रपतींना म.ए.सो. चे माहितीपत्रक, माहितीपटाची सीडी आणि स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.

या भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. राष्ट्रपतींना म. ए. सो. च्या कार्याबद्दल आणि विस्ताराबद्दल माहिती दिली. संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्य लढ्याबरोबरच देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि आत्मभान जागृत करण्यासाठी असलेली राष्ट्रीय शिक्षणाची गरज लक्षात घेऊन संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले. म.ए.सो. च्या कार्याचा विस्तार आता बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण आणि त्यापुढे जाऊन संशोधन केंद्रापर्यंत झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. ‘मएसो’तर्फे मुला-मुलींसाठी सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांबद्दल मा. राष्ट्रपतींनी यावेळी समाधान व्यक्त केले.

‘मएसो’ने महिला सक्षणीकरणाच्या हेतूने मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा सुरू केली असून मुलींसाठी असलेली राज्यातील ही पहिली निवासी सैनिकी शाळा असल्याचे सांगितले. या शाळेच्या गेल्या २५ वर्षांतील वाटचालीबद्दल मा. राष्ट्रपतींना माहिती देण्यात आली. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सैनिकी शाळेतील मुलींना आता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये थेट प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे, सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींच्या भवितव्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल मा. भूषणजी गोखले यांनी आभार व्यक्त केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात संस्थेने केलेल्या योगदानाची माहिती मा. राष्ट्रपतींना या वेळी देण्यात आली.

सन २०१८ साली पुणे भेटीदरम्यान एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात मा. राष्ट्रपतींनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीबद्दल प्रशंसोद्गार काढल्याचे स्मरण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे यांनी करून दिले, तेव्हा मा. राष्ट्रपतींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० वर्षांच्या वाटचालीचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या ‘ध्यासपंथे चालता…’ या ग्रंथांबद्दल जाणून घेतल्यानंतर मा. राष्ट्रपतींनी, हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्याची प्रत भेट देण्यासाठी राष्ट्रपती भवनात येण्याची सूचना यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना केली.

     

 

15 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात वर्गशः घेण्यात आलेले कार्यक्रम खालील प्रमाणे

वर्गश: कार्यक्रम
1) इ. 12 वी – Debate – समन्वयक – सौ. सावित्री पाटील
विषय – Social media does more harm than good
वेळ – शनिवार दि. 27 – 11 – 2021 दु 12 ते 1
2) इ. 10 वी – चर्चासत्र – समन्वयक- श्री. महेश कोतकर
विषय – सैन्यदलातीत भविष्यातील महिलांचे योगदान
वेळ – सोमवार दि. 29 – 11 – 2021 दु. 12 ते 1
3) इ. 7 वी- वेशभूषा- समन्वयक – सौ. वैशाली शिंदे
वेळ – शुक्रवार दि. 3 – 12 – 2021 दु. 12 ते 1.
परीक्षक – श्री. श्याम नांगरे, श्री. अद्वैत जगधने, सौ. रसिका लिमये, सौ. रेखा रायपूरकर
4) इ. 6 वी – Poem recitation- समन्वयक- सौ. वैशाली शिंदे
परीक्षक- श्री. गजानन पाटील, श्री. महेश कोतकर, श्रीमती अंबिका मोलकर
वेळ – शनिवार दि. 4 – 12 – 2021 दु. 12 ते 1
श्री महेश कोतकर आणि सौ वैशाली शिंदे यांनी मुलींशी संवाद साधून कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

         

       

आज म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार आंबोली ,तालुका – मुळशी येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चा १६१ वा वर्धापनदिन व राणी लक्ष्मीबाई १९३ वी जयंती चा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या प्राचार्या डॉ सुलभा विधाते ,शाळेचे पदाधिकारी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन , सरस्वती पूजन , सरस्वती स्तवन व संस्थापक प्रतिमा पूजनाने झाली.तसेच राणी लक्ष्मीबाई च्या पुतळ्याला हार घालून झाली यानंतर म.ए.सो.गीताची ध्वनिमुद्रिका लावण्यात आली होती , झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त शाळेचे पर्यवेक्षक श्री.श्याम नांगरे यांनी राणी लक्ष्मीबाई चा जीवनपट उलगडून दाखविला,, अध्यक्षीय भाषणात शाळेच्या प्राचार्या डॉ सुलभा विधाते यांनी म.ए.सो.च्या १६१ वर्षांचा इतिहास उलगडताना संस्थापकां ची माहिती,संस्थेची ध्येय धोरणे व भविष्यात सैनिकी परिवाराकडून असणा-या अपेक्षा व्यक्त केल्या व सर्वांना शुभेच्छा दिल्या,आभार शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक श्री.संदीप पवार यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

                   

                 

 

                        

 

                          

                    प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त , १५ दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत, बुधवार दिनांक  १४ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ४.३०  ते ५.३० या वेळात वाचू आंनदे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. १५ ऑक्टोबर रोजी डॉ.ए. पी. जे.कलाम  यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शाळेत वाचू आंनदे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
                                             *’वाचू आनंदे‘*
या ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात कु. ईरा खाडीलकर हिच्या सरस्वती स्तवनाने झाली. मा. प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमांचा हेतू स्पष्ट केला. सौ. रेखा रायपूरकर यांनी  पाहुण्यांचा परिचय करून दिला.
                  वाचनाचा हातखंडा असण्याऱ्या श्रीमती गौरी लागू  मॅडम यांनी वाचनाची मुलींना ओळख व्हावी, मुलींना चांगल्या साहित्याच्या वाचनाची गोडी लागावी आणि त्याच बरोबर शाळेत अभ्यासासाठी असलेल्या विविध विषयांचे त्यांचे आकलन अधिक वाढावे या दृष्टीकोनातून  ‘वाचू आनंदे’* या पुस्तकातील काही संवाद वाचून दाखवले.  सुरुवातील त्यांनी वाचू आंनदे या पुस्तकाविषयी माहिती सांगितली. या पुस्तकाचे संपादक माधुरी पुरंदरे नंदिता वागळे यांनी केले आहे. या पुस्तकातील काही लेखकांचे संवाद त्यांनी मुलींना वाचून दाखवले .
श्रीपाद माटे यांची गणू हलवाईची गोष्ट, प्रल्हाद अत्रे यांची ठोकळ्याच्या चित्राची कथा, द. मा. मिराजदार यांची विनोदी कथा – बाबाचा अभ्यास, जयंत नारळीकर यांची चंद्राची सफर असे अनेक संवाद लागू मॅडम यांनी त्यांच्या शैलीत वाचून दाखवले .वाचताना आवाजातील चढउतार कसा  असावा, हे त्यांनी त्यांच्या वाचनातून सांगितले.  या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या महामात्रा सौ.चित्रा नगरकर मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अद्वैत जगधने यांनी केले.
       

आविष्कार – घरगुती विज्ञान प्रयोग उपक्रम

 

रौप्य महोत्सवी वर्ष ( २०२१ – २२ ) निमित्ताने……

प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाप्रित्यर्थ दि.१३ ऑगस्ट पासून या उपक्रमाची सुरुवात इ.६ वी ते ९ वी च्या विद्यार्थिनींसाठी करण्यात आली. अनुभव व कृतीतून आनंददायी विज्ञान शिक्षण, दैनंदिन जीवन व विज्ञान संकल्पना यांची सांगड घालून मुलभूत कौशल्य विकसन करण्याच्या हेतूने या उपक्रमाची सुरुवात विज्ञान विभागातर्फे करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत इ.६ वी ते ९ वी च्या विज्ञान पाठ्यपुस्तकावर आधारित महत्त्वाच्या संकल्पना विचारात घेऊन विविध आॅनलाइन तज्ञ मार्गदर्शनपर कृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.या कृतीकार्यशाळांमध्ये घरातील सहज उपलब्ध साहित्याचा वापर करून विविध प्रयोग तज्ञ मार्गदर्शकांनी दाखवले व विद्यार्थिनींनी देखील स्वत: करून पाहिले. तसेच रोजच्या जीवनातील वापर करीत असलेल्या विविध वस्तू, पदार्थ कृती यामध्ये असलेल्या विज्ञान संकल्पना देखील सांगण्यात आल्या. वर्गश: विज्ञान अध्यापकांनी काही संकल्पनांवर आधारित घरगुती प्रयोग विद्यार्थिनींना स्वत: करून दाखवले.

उपक्रमाच्या कार्यवाहीसाठी विविध संकल्पनांच्या  विभाजनानुसार विद्यार्थिनींचे गट 1 – ६वी ,७ वी ( Aspirants) व गट २

८ वी,९वी(Creative minds)  याप्रमाणे करण्यात आले होते.

  • तज्ञ मार्गदर्शनपर कार्यशाळांचे नियोजन पुढीलप्रमाणे :
अनु.क्र.दिनांकसंकल्पनातज्ञ मार्गदर्शक
1.13 ऑगस्टइ.6 वी, 7वी – ध्वनी – Soundश्री.दीपक आडगावकर- मराठी विज्ञान परिषद , पुणे.
2.13 ऑगस्ट 21इ.8 वी, 9 वी  – बल,दाब

Force & Pressure

दीपक आडगावकर- मराठी विज्ञान परिषद , पुणे.
3.25 ऑगस्ट 21इ.6 वी, 7वी – चुंबकत्वअपेक्षा वैद्य – अगस्त्य फाउंडेशन
26 ऑगस्ट 21इ.8 वी, 9 वी   – प्रकाशअपेक्षा वैद्य – अगस्त्य फाउंडेशन
4.5 सप्टेंबर 21Digital kids zone – घरगुती विज्ञान प्रयोग राष्ट्रीय स्तर कार्यशाळा इ.6 वी ते 9 वीIndian institute of Science, Bengaluru
5.दि.6 सप्टेंबरKitchen Chemistry

इ.6 वी ते 9 वी

Science innovation centre बारामती येथील project coordinator श्री.अमित जाधव व सौ.शितल तावरे
6दि.14 सप्टेंबरइ.6 वी, 7वी -स्थितिक विद्युत – Static electricityIUCAA पुणे  येथील Science outreach programme coordinator  श्रीमती सोनल थोरवे
7.दि.15 सप्टेंबरइ.8 वी, 9 वी  विद्युत चुंबकत्व – ElectromagnetismIUCAA पुणे  येथील Science outreach programme coordinator श्री.रुपेश लबडे
8.दि.24 सप्टेंबरआॅनलाइन विज्ञान प्रदर्शन मार्गदर्शनपर कार्यशाळाअपेक्षा वैद्य – अगस्त्य फाउंडेशन

  • वि
    ज्ञान अध्यापकांनी घेतलेल्या कृतीकार्यशाळा :

गट 1 – प्रकाश , घनता , बल ,दाब, भौतिक व रासायनिक बदल

गट  2 – उष्णता , ध्वनी , आम्ल व आम्लारी ,रासायनिक अभिक्रिया

 

  • उपक्रमाचे स्वरूप व केलेली कार्यवाही :
  • दर आठवड्याला दोन सत्रांचे आयोजन – ठरवलेल्या संकल्पनेवर आधारित घरगुती साहित्य वापरून प्रयोग दाखवण्यात आले.
  • एका आठवड्यात पूर्ण झालेल्या संकल्पनेवर विद्यार्थिनींना स्वत: प्रयोग करण्यासाठी वर्गाच्या ग्रुपवर IISER पुणे सायन्स activity सेंटर च्या व्हिडिओ लिंक्स पाठवण्यात आल्या .
  • या व्हिडिओ मधील प्रत्येक संकल्पनेवर आधारित ३ ते ५ कृती स्वत: करून निरीक्षणे विद्यार्थिनींनी नोंदविली व निष्कर्ष काढले.
  • या प्रयोंगाव्यतिरिक्त अन्य साहित्य वापरून समान संकल्पना स्पष्ट करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग व कृती काही विद्यार्थिनींनी केले. नवीन प्रयोगांची निर्मिती केली.
  • विद्यार्थिनींनी केलेल्या कृतीच्या नोंदी नोंदवहीत केल्या, प्रयोगांचे व्हिडिओ तयार केले.
  • या माहितीचे संकलन करण्यासाठी प्रत्येक संकल्पनेवर आधारित गूगल फॉर्म मध्ये व्हिडिओ व फोटो अपलोड करून अभिप्राय नोंदवला.

 

  • उपक्रमाचे अंतिम टप्प्यातील नियोजन :
  • अगस्त्य फाउंडेशन च्या सहकार्याने गुरुवार दि३० सप्टेंबर २०२१ रोजी विद्यार्थिनींनी केलेल्या निवडक घरगुती विज्ञान प्रयोगांचे online विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
  • उपक्रमात सर्व सहभागी विद्यार्थिनींना इ – सहभाग प्रमाणपत्र दिले.

 

                                 

प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाअंतर्गत,
बुधवार दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ४.00 ते ५.00 या वेळात एक आगळावेगळा , निर्सगाच्या सानिध्यात नेणारा, मनोरंजनपर, विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘ पक्ष्यांची रंगीबेरंगी दुनिया’ या ऑनलाईन कार्यक्रमात पक्षीतज्ञ, निसर्ग संवर्धक माननीय श्री. किरण पुरंदरे
यांनी सर्वांना पक्षांविषयी माहिती सांगून विविध पक्षांचे आवाज देखील काढून दाखविले.

सदर यु ट्युब कार्यक्रमाची लिंक खाली दिली आहे.

 

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय कासार आंबोली, ता. मुळशी, येथे आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस अत्यंत उत्साहात पार पडला. आभासी पद्धतीने हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी स्काय डायव्हर, पॅराशूट जंम्पर पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्रीमती शीतल महाजन या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ईशस्तवन कु. स्वरा गवस व स्वागत गीत कु. इरा खाडिलकर यांनी म्हटले, कार्यक्रमाचे प्रास्ताविकात क्रीडा विभाग प्रमुख व पर्यवेक्षक श्री संदीप पवार यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट उलगडून दाखविला , अतिथींचा परिचय व स्वागत शाळेचे पर्यवेक्षक श्री श्‍याम नागरे यांनी केले. आर्चरी ची राज्यस्तरीय खेळाडू कु. पूजा पाटील हिने सर्वांना प्रतिज्ञा दिली, प्रमुख अतिथी म्हणून आपल्या मनोगतात श्रीमती शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग (पॅराशूट जंम्पर) या क्षेत्रात महिलांसमोर खूपच आव्हान असून, अनेक अडचणींवर मात करून आपण हे यश मिळाल्याचं त्यांनी सांगितले उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवावर आपण उडी मारणारी पहिली भारतीय महिला असल्याचा अभिमान वाटतो असे सांगितले आणि स्काय डायव्हिंग या क्षेत्रामध्ये देखील आपण करिअर करू शकतो फक्त मनातील भीती घालवून आपल्यामध्ये साहसी वृत्ती भिनली तरच हे यश मिळू शकते असे त्यांनी आवर्जून सांगितले, आज या क्षेत्रामध्ये मुलींची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे, या साहसी खेळासाठी कुटुंबांचा समाजाचा व शासनाचा सक्रीय पाठींबा अत्यंत गरजेचा आहे असे त्या म्हणाल्या व येत्या दोन वर्षांमध्ये आपल्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांचा संघ जागतिक स्पर्धेमध्ये उतरणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अध्यक्षीय मनोगतात शाळेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी देखील श्रीमती शीतल महाजन यांचा प्रवास उलगडून दाखवला आणि आमची शाळा सैनिकी असल्याने या शाळेमध्ये खेळाला प्राधान्य दिले जाते असे सांगितले, आभार ज्येष्ठ शिक्षक श्री महेश कोतकर यांनी मानले. विद्यार्थिनी, पालक व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग या कार्यक्रमाला लाभला.

 

                      

म.ए.सो.

         राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारआंबोली            

                                                                                       रौप्य महोत्सवी वर्ष –२०२१–२०२२

                                                                               विद्यार्थीनींनी स्वपरिसरात केलेले वृक्षारोपण  

 

रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त  ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थीनींनी साठी  ५ वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला .

१ . यात प्रामुख्याने स्वदेशी वृक्ष लावणे आहे .

२. विद्यार्थीनींनी साठी एक सूचना काढून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले .

३ . विद्यार्थीनींनी त्या वृक्षाचे नाव, तसेच शास्त्रीय नाव व त्याचा उपयोग अभ्यासणे हे काम दिले.

४. ह्या वृक्षारोपणचा कालावधी ठरविण्यात आला. ७ जुलै ते ३१ जुलै वृक्षारोपण व्हावे .

५. ह्या साठी शिक्षक व विद्यार्थीनिंनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लावून दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम वर्गाश: राबविण्यात आला. ह्यासाठी वर्ग शिक्षकांनी मेहनत घेतली.

वर्ग एकूण वर्ग संख्या वृक्ष लागवड सहभागी विधार्थिनी संख्या प्रत्यक्ष किती वृक्ष लावले  वर्ग शिक्षक
६वी- new6748440श्रीम.सुनिता शिंदे
७वी-अ5031251श्रीम.वैशाली शिंदे
७वी-ब5527126श्री.रवींद्र उराडे .
८वी-अ4938261श्रीम.रसिका लिमये
८वी-ब5322135श्री.प्रशांत जोशी.
९वी-अ5027120श्री.अद्वैत जगधने
९वी-ब301972श्रीम.मंजिरी पाटील
१०वी-अ411170श्री.गजानन पाटील
१०वी-ब3519117श्रीम.रेखा रायपूरकर
११वी new––––
१२वी-अ481556श्रीम.सावित्री पाटील
१२वी-ब491050श्री.प्रमोद झुरमुरे
एकूण वृक्ष1698 

   विद्यार्थीनींनी स्वपरिसरात केलेले वृक्षारोपण – Video       

https://youtu.be/emvPsTSAxwk

दिनांक 15 ऑगस्ट 2021 – 75 वा  स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा………
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत 75  वा  स्वातंत्र्यदिन अत्यंत  उत्साहात पार पडला. गणवेशात मानवंदना देणाऱ्या मुलींची कमतरता जाणवत असली तरी सन्माननीय अतिथी श्री मुकुंदजी सहसरकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या उपस्थितीमुळे एकूणच वातावरणत उत्साह आला. श्री मुकुंदजी यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. त्यांनी आपल्या मौलिक मार्गदर्शनात  15 ऑगस्ट रोजी मिळालेले स्वातंत्र्य हे या प्राचीन देशाच्या इतिहासातील एक टर्निंग पॉइंट असल्याचे सांगितले.  या देशाची संस्कृती परंपरा जपण्यासाठी आपण स्वतंत्र झालो असे सांगितले.
याप्रसंगी प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळा समिती सदस्य व नियामक मंडळ सदस्य श्री. बाबासाहेब शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सचिनजी अंबर्डेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेच्या शाला  समिती सदस्य श्री बाबासाहेब शिंदे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सचिन अंबर्डेकर,  माननीय प्राचार्या  डॉ. सौ सुलभा विधाते  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीउपस्थित होते.

 

 

                                                           

 

आपल्या प्रशालेतील इ.७ वी ब ची विद्यार्थिनी कु.गीता गणपत धनवडे हिने ATL Tinkering Marathon मध्ये सादर केलेल्या प्रकल्पाची निवड राष्ट्रीयस्तरावर सहभागी 7000 प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील Top 10 प्रकल्पात  करण्यात आली आहे. गीताचे प्रशालेतर्फे खूप खूप अभिनंदन !👍🏻👍🏻💐

विद्यार्थिनीचे नाव : कुमारी गीता गणपत धनवडे, इयत्ता :- सातवी (ब)

Project Name :-  Police Whistle with Safety Enclosure protection from COVID – 19 virus.

प्रोजेक्ट नंबर – 1 ची माहिती खालील प्रमाणे आहे :

कोरोना महामारीमध्ये कोरोना फ्रन्टलाइन वॉरियर्स पोलिसांचा मृत्यू झाला. यामध्ये मुख्य कारण पोलिसांची शिट्टी असू शकते. म्हणून कुमारी गीता गणपत धनवडे हिने या गोष्टीचा अभ्यास करून एक प्रोजेक्ट बनविला. पोलिसांच्या शिट्टीला क्लोजर (स्टील मटेरियलचे संरक्षक कवच /कव्हर)  बसविले आणि संपूर्ण संरक्षण दिले.

यामुळे पोलिसांचा हात शिट्टीच्या थेट संपर्कात येत नाही. तसेच वातावरणातील धुळ आणि इतर विषाणू हे शिट्टीच्या संपर्कात येत नाहीत.

या प्रोजेक्टचा फायदा पोलीस दलातील अधिकारी, शारीरिक शिक्षक शिकविणारे शिक्षक, क्रीडा शिक्षक, सैन्य अधिकारी, ज्यांच्याकडून शेट्टीचा वापर होतो, या सर्वांचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत या प्रोजेक्टचा वापर होईल.

     

 

 

 

प्रोजेक्ट नंबर – 2 ची माहिती खालील प्रमाणे आहे :

Project Name :-  Eco friendly, Natural Gaint Wheel, Balanced on Single Point for Divyang or Ordinary Students, which will be reduce Carbon Footprint.

प्लास्टिक कचऱ्याचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.

प्लास्टिक कचरा वाढण्याचे अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे प्लास्टिक पासून बनवलेली खेळणी, जी सर्वात जास्त चीन या देशातून आयात केली जातात.

प्लास्टिक पासून बनवलेल्या खेळण्यापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी, नैसर्गिक संसाधनाचा वापर करून दिव्यांग मुलासाठी खेळणे बनवणे आवश्यक आहे. म्हणून कुमारी गीता गणपत धनवडे हिने या गोष्टीचा अभ्यास करून एक प्रोजेक्ट बनविला.

यामध्ये तिने बाभळीच्या काट्यांचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला. काटे मुलांना टोचू नयेत म्हणून, काट्याच्या प्रत्येक टोकाला शेळीच्या सुकलेल्या लेंड्यांचा उपयोग केला. ज्यामुळे काट्यांचे टोक सुरक्षित झाले. एकूण बत्तीस काटे आणि 64 शेळीच्या लेंड्या यांचा वापर करण्यात आला. सेंटरला एक लाकडी दांडी उभा केली. खाली बेसला पिठाचे बेस करण्यात आला. या सेंटरच्या काठी वरती एक काटा लावण्यात आला आणि त्यावरती सर्व सांगाडा बसवण्यात आला.

आणखी एक काठी घेऊन, या काठीच्या साह्याने हा संपूर्ण सांगाडा एका पॉईंट वरती फिरविला जातो. त्यावेळेस मुलांना हा प्रोजेक्ट करत असताना वेगळा आनंद मिळतो.

यामध्ये प्लास्टिकचा बिलकुल वापर केलेला नाही. सदरील प्रोजेक्ट हा संपूर्णतः निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंनी बनविलेला आहे. त्यामुळे कार्बन फूटप्रिंट खूप कमी प्रमाणात तयार होतात. वातावरण प्रदूषित होत नाही आणि स्वच्छ वातावरण तयार करण्यास मदत होते.

या प्रोजेक्टमुळे दिव्यांग मुलांना दोन्ही हाताचा वापर करून, डावा आणि उजवा मेंदू विकसित करण्यात मदत होते.

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत या प्रोजेक्टचा वापर होईल.

                     

भारतीय जवानांनी 26 जुलै 1999 कारगिल मध्ये अतुलनीय शौर्य दाखवत ऑपरेशन विजय साकार करत पाकिस्तानला भारत भूमीवरून पिटाळून लावले होते.त्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या प्रशालेत विजय दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी ऑपरेशन विजय मध्ये प्रत्यक्ष सहभाग असणारे ब्रिगेडियर हेमंत महाजन (युद्ध सेवा मेडल) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी कारगील युद्धाच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या आठवणी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च्या साह्याने ठिकाणांची व घटनांची माहिती दिली, तसेच भारत व पाकिस्तानातील तत्कालीन नेतृत्वाविषयी ही माहिती दिली. ब्रिगेडियर हेमंत महाजन (युद्ध सेवा मेडल) यांनी आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट पद्धतीने करून देशाची सेवा करू शकतो, असे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या शाला समिती अध्यक्ष डॉ.माधवीताई मेहेंदळे, शाला समिती महामात्रा डॉ.मानसी भाटे, शाला समिती महामात्रा श्रीमती चित्रा नगरकर, शाला समिती सदस्य श्री बाबासाहेब शिंदे, प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व पदाधिकारी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग झूम मीटिंग द्वारे उपस्थित होते तर प्रशालेतील विद्यार्थिनी, माजी विद्यार्थिनी, पालक व हितचिंतक सुद्धा युट्युब लाईव्ह द्वारे कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मा. प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य श्री.अनंत कुलकर्णी, हवालदार गजानन माळी (निवृत्त) व ऑनररी कॅप्टन चंद्रकांत बनसोडे ( निवृत्त ) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या सर्व सैन्य प्रशिक्षण विभागाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या ऑनलाइन प्रक्षेपणाची व्यवस्था गरवारे महाविद्यालयातील श्रीमती रसिका देशमुख यांनी पाहिली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवालदार गजानन माळी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका सौ सावित्री पाटील यांनी तर आभार श्री अद्वैत जगधने यांनी मानले.

 

https://youtu.be/uNNvUlQpOg0

You tube लिंक वर आपल्या विद्यार्थिनी, माजी विद्यार्थिनी ,पालक इ. जॉईन व्हावे.

Ex- Principal – M. E. S. Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala and Jr. College, Kasar amboli, Tal- Mulshi, Dist- Pune

Giving her Wishes to RLMSS…

https://youtu.be/rnGY42bmzNY    –  Sau. Shraddha Sanjay Walimbe, Ex- Principal, RLMSS.

 

Ex- Students- M. E. S. Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala and Jr. College, Kasar amboli, Tal- Mulshi, Dist- Pune

Giving their Wishes to RLMSS…

https://youtu.be/wzO8eYTZZ5g    Cadet  Maitreyee Dandekar

https://youtu.be/b3m3V8QqleE  Cadet Yashashree Birje

https://youtu.be/zj6vkPYpESU     Cadet  Apurva Kulkarni

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयातील विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात उपलब्ध करून देत जबाबदार, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी घडवण्याचे काम संस्था करत आहे. या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थिनी आज देशाच्या सैन्यदलात सेवा बजावत आहेत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये देखील अशाच पद्धतीने शाळेच्या माजी विद्यार्थिनी लक्षणीय कामगिरी बजावत आहेत, हे शाळेसाठी खरोखरच अभिमानास्पद आहे,” अशा शब्दात देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शाळेच्या कामगिरीचे कौतुक केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित समारंभात शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि पुण्यातल्या NCC ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या महामात्र डॉ. मानसी भाटे आणि चित्रा नगरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या की, मुलींसाठी सैनिकी शाळा चालवत असल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानायला हवेत. संस्थेने अतिशय सुंदर शाळा उभी केली आहे. यापूर्वीदेखील या शाळेच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आले होते. शाळेला असलेले राणी लक्ष्मीबाई यांचे नावच प्रेरणादायी आहे. सैनिकांचा गणवेश आणि त्यांची शिस्त बघूनच मी वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी आपण एक मुलगी आहोत असा विचार न करता आपल्यातील स्त्री शक्ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्ये कणखरपणा आणि एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थिनींनी आपल्याला एखादी गोष्ट जमेल का? असा विचार करण्याची गरज नाही. कठीण परिस्थितीवर आपल्या अनुभवाच्या आधारे मात करायला शिकता आले पाहिजे. प्रश्न निर्माण होतील तेव्हा खचून न जाता शाळेने दिलेले संस्कार आठवा आणि अडचणींचे संधी रुपांतर करा.”

राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC च्या वायूदलाचे युनिट शाळेत नव्याने सुरू झाले आहे. पुण्यातल्या NCC ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या हस्ते यावेळी शाळेला NCC चा ध्वज प्रदान करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी तो स्वीकारला. ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन आर.एस. जाधव यावेळी उपस्थित होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या स्थापनेमागील महिला सक्षमीकरणाची भूमिका विशद केली.
डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन तर अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मएसो ऑटोरीअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलद्वारे करण्यात आले होते.

पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची आणखी एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने दि. ७ जुलै २०२१ रोजी २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण करण्याचा कार्यक्रम मंगळवार, दि. १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मयूर कॉलनीमधील मएसो ऑडिटोरीअम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC हे आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्धाटन व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर AVSM, VSM (Deputy Chief of Integrated Defence Staff (Medical)) व ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) हे या समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभाचे प्रक्षेपण फेसबुक आणि ‘मएसो’च्या युट्यूब चॅनेलद्वारे करण्यात येणार आहे.

त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आभासी पद्धतीने या समारंभात सहभागी होता येणार आहे …

https://www.youtube.com/watch?v=2taN2FqpvEM

https://www.facebook.com/100973985597451/posts/101884895506360/

ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच NCC चा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी होणार आह.

छायाचित्रात (डावीकडून) शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते, सैनिकी शाळेच्या शाला समिती अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’ चे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आणि शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या समारंभाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे आणि सैनिकी शाळेच्या शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे यांनी ही माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते उपस्थित होते.

“सभ्य आणि समर्थ समाजनिर्मितीसाठी महिलांचे सक्षमीकरण अतिशय महत्वाचे ठरते, म्हणूनच महिलांचे शिक्षण व सक्षमीकरणासाठी ‘मएसो’ सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे. आजमितीस सुमारे २० हजार विद्यार्थिनी संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आज देशाच्या सशस्त्र सेनादलांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थिनींनी जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे,” अशी माहिती आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली.

“शाळेतील स्वावलंबी जीवनशैली, नियमितपणा, शिस्त, संस्कार, विविध उपक्रमांमुळी विस्तारणारा दृष्टिकोन या सर्वांचा अतिशय सकारात्मक परिणाम विद्यार्थिनींवर होतो. त्यामुळे त्यांच्यात अन्य शाळांमधील विद्यार्थिनींच्या तुलनेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. शाळेत मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि प्रशिक्षणाच्या जोरावर आमच्या सैनिकी शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींनी सशस्त्र सेनादलांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अन्य क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थिनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे,” असे डॉ. मेहेंदळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

“शाळेतील शिक्षण व प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींची बौद्धिक, मानसिक आणि शारिरीक जडणघडण अतिशय उत्तमरितीने होते. त्यामुळेच त्या सशस्त्र सैन्यदलांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या परिक्षांप्रमाणे अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. शाळेतील विद्यार्थिनींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमधील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले तर त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल,” असे शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने इ. स. १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. गेल्या १६० वर्षात संस्थेने शिशु शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत व त्यापुढे जाऊन संशोधनापर्यंत आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षणापासून कौशल्यविकास अभ्यासक्रमांपर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७० शाखांमधून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्रमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील अनेक उपक्रम हे समाजातील विविध घटकांच्या गरजा आणि काळानुरूप निर्माण झालेल्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आले आहेत.

 

संवाद विरांगने सोबत – भाग तिसरा – स्कॉ. लीडर वैष्णवी टोकेकर, प्रशालेची माजी विद्यार्थिनी. इंडियन एअर फोर्स मध्ये सेवा बजावत असलेल्या स्क्वॉड्रन लीडर वैष्णवी टोकेकर हिची ऑनलाईन मुलाखत प्रशालेच्या सर्व विद्यार्थिनी व पालकांसाठी आयोजित करण्यात आली होती. यशाचे उंच शिखर एखादी विद्यार्थीनी कसे गाठू शकते हे अनुभवणे म्हणजे स्क्वॉड्रन लीडर वैष्णवी सोबत झालेला संवाद होय. सैन्य दलात जाण्यासाठी आवश्यक तयारी कशी करावी तसेच तेथील कामाचे स्वरूप व महिलांना खुली झालेली अनेक दालने हे आपण तिच्याशी झालेल्या संवादातून अनुभवू शकतो.

 

Scroll to Top
Skip to content