Kargil Vijay Divas – 2024 @ RLMSS

Kargil Vijay Divas – 2024 @ RLMSS
शुक्रवार, दि. २६ जुलै २०२४ रोजी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, पुणे व मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कारगिल विजय दिवस’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सन १९९९ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल येथे झालेल्या युद्धात भारताने विजय मिळविला होता. या घटनेला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारत सरकार देशभर ‘कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सव’ साजरा करीत आहे.
यानिमित्ताने प्रशालेत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गीत गायन व ग्रीटिंग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो, पुणे यांच्यामार्फत कलाकारांनी प्रशालेत गीत-संगीत व नृत्यांमार्फत देशभक्तीपर कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून `केंद्रीय संचार ब्युरो वरिष्ठ लेखा अधिकारी अशोक कुमार, फिल्ड पब्लिसिटी ऑफिसर हर्षल आकुडे, पुण्यातील पहिली फायर वूमन मेघना सकपाळ (अग्निक्षमन दल), फणीकुमार, मंदार गुप्ते, राहुल मोहड, प्राचार्या पूजा जोग व पर्यवेक्षक श्याम नांगरे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर यज्ञरामन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियुषा सामंत, श्रेया दिघे, कॅडेट अग्रता चौधरी व कॅडेट अक्षयिनी माने यांनी केले. आभार पर्यवेक्षक संदीप पवार यांनी मानले.

Scroll to Top
Skip to content