jaya rAmakruShNa hari…
RLMSS
AShADhi EkAdaShi celebrations – 05 Jul 25
This Annual ‘vAri’ Celebrations has been revived after a gap and was held in MP Auditorium…
Class VI Cadets undertook the traditional procession, followed by AhvAhan, Arati and Inter-House Abhang Recital Competition ably judged by
~ Shri Advait Jagdhane
~ Shri Bhausaheb Martand
~ Ms Priyanka Rajhans &
~ Ms Shreya Dighe
Cadets of Ahilya House bagged the ‘First Position’
Planning and conduct of this memorable event was executed by
Sou Vaishali Shinde
Sou Sunita Shinde &
Sou Dipali Ambekar, who also enriched the audience with an insight of ‘AShADhA EkAdaShi’ and sant Shri Mukund Maharaj…
Class XII Cadets enthusiastically contributed toward the Adm arrangements.
Memorable an event it turned out to be.
Best of our wishes…
~ The MES RLMSS Family
आषाढी एकादशी पालखी सोहळा व अभंग स्पर्धा…
आषाढी एकादशी निमित्त प्रशालेत पालखी सोहळा व अभंग स्पर्धा घेण्यात आली.
शनिवार दिनांक 5 जुलै 2025 रोजी इयत्ता सहावी अ आणि ब या विद्यार्थिनींची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे पालखी व दिंडीचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा जतन करत, विद्यार्थिनींनी विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पायी दिंडी काढली. त्याचप्रमाणे आपली संस्कृती, परंपरा जपत फुगडी, रिंगण, अभंग, भक्तिगीते याचा आस्वाद घेतला. विठ्ठलाची आरती करून इयत्ता सहावीच्या कॅडेट्स यांनी अभंग सादर केला. तसेच प्रशालेतील सौ. दिपाली आंबेकर मॅडम यांनी वारीचे महत्त्व सांगून कॅडेट्सला मार्गदर्शन केले. यानंतर कुलश: अभंग स्पर्धा संपन्न झाली. अभंग स्पर्धा लहान गट व मोठा गट अशी घेण्यात आली. स्पर्धेचे मूल्यमापन सूर, ताल, लय, शब्दांचे उच्चार, आवाजातील चढ-उतार, वाद्यांचा प्रभावी वापर व एकत्रित सादरीकरण असे एकूण 25 गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. सदर स्पर्धेचे परीक्षण श्री. अद्वैत जगधने, श्री. भाऊसाहेब मार्तंड, सौ. श्रेया दिघे, सौ. प्रियांका राजहंस कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक -अहिल्या
द्वितीय क्रमांक -लक्ष्मी
तृतीय क्रमांक- दुर्गावती
उत्तेजनार्थ क्रमांक -जिजामाता
सदर कार्यक्रमासाठी माननीय विंग कमांडर यज्ञरमण सर, माननीय प्राचार्या श्रीमती पूजा जोग, सीनियर मास्टर श्री. श्याम नांगरे व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. अश्वशाळा ते पाकशाळा सर्वांनीच स्पर्धा व पालखी सोहळा उत्तम पद्धतीने पार पाडण्यात आपला मोलाचा हातभार लावला. या कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धा विभाग प्रमुख सौ. वैशाली शिंदे तसेच सहावी अ व ब वर्गाच्या वर्गशिक्षक सौ. सुनिता शिंदे मॅडम आणि सौ. दिपाली आंबेकर मॅडम व यांनी केली.










