आज मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी प्रशालेत आंतरकुल क्रीडा व सैन्य प्रशिक्षण अंतर्गत वर्षभरात विविध अशा एकूण 30 स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात शिवगर्जना होऊन झाली. कॅडेटसना मेडल्स व प्रमाणपत्र शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, प्राचार्या श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक व PRO श्री. संदीप पवार, सर्व ज्येष्ठ शिक्षक, सैन्य प्रशिक्षक, रेक्टर व मेडिकल इंचार्ज यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. आंतरकुल स्पर्धा ही चार कुलांमध्ये घेण्यात आली.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
1) प्रथम क्रमांक — दुर्गावती 149 गुण
2) द्वितीय क्रमांक — जिजामाता 143 गुण
3) तृतीय क्रमांक — अहिल्या 131 गुण
4) चतुर्थ क्रमांक — लक्ष्मी 111 गुण
कमांडंट ट्राॅफी व बॅनर पटकावण्याचा मान दुर्गावती कुलाने पटकावला. 💐💐
या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, एन.सी.सी. प्रशिक्षक ए.एन.ओ. सौ. राजश्री गोफणे, सुबेदार श्री. नवनाथ पवार, हवालदार श्री. गजानन माळी, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे, क्रीडा प्रशिक्षक श्रीमती आस्था हिरानी, स्कूल कॅप्टन कॅडेट प्रार्थी म्हात्रे यांनी केले होते. सूत्रसंचालन स्कूल स्पोर्ट्स कॅप्टन कॅडेट नम्रता राऊत व कॅडेट ऋतुजा पाचपांडे यांनी केले होते.


