एन डी ए पासिंग आऊट परेडला इ. १२ वीच्या कॅडेट्सची उपस्थिती…

एन डी ए पासिंग आऊट परेडला इ. १२ वीच्या कॅडेट्सची उपस्थिती
३० नोव्हेंबर २०२४ शनिवार रोजी एन डी ए च्या ७३ व्या बॅचची पासिंग आऊट परेड पाहण्याची संधी इयत्ता १२ वीच्या कॅडेट्सना मिळाली. इयत्ता १२ वीच्या ५० कॅडेट्स आणि ६ स्टाफ सकाळी ५:३० वा एन डी ए खडकवासला येथे उपस्थित राहिल्या. सदर कार्यक्रमात एन डी ए कॅडेट्सनी उत्तमप्रकारे संचलन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून १. एअर चिफ मार्शल अमरप्रित सिंग (CAS) AVSM, PVSM, २. एन डी ए चे कमांडंट वाईस ऍडमिरल गुरचरन सिंग AVSM, NM तसेच ३. साऊथ वेस्टर्न कमांड चे कमांडिंग इन चिफ लेफ्टनंट जनरल धिरज सेठ AVSM हे उपस्थित होते. मान्यवरांनी सर्व कॅडेट्सचे निरीक्षण केले. त्यानंतर संचलनाला सुरवात झाली. निशाण टोलीला मानवंदना देण्यासाठी ३ चेतक हेलिकॉप्टर्सनी आकाशामध्ये फ्लायपस्ट केले. तसेच ग्लायडर, सुखोई SU-३० या एयरक्राफ्ट्सचे आकाशातील मनमोहक उड्डाण बघण्याची संधी मिळाली.
आपल्या शाळेच्या कॅडेट्सना मिळालेल्या ह्या संधीतून प्रेरित होऊन त्यांच्या भावी आयुष्यामध्ये ह्याचा नक्कीच उपयोग करतील.

Scroll to Top
Skip to content