आज दिनांक 24 oct. 2024 रोजी लांडेवाडी, आंबेगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील एकूण 6 कॅडेटने सहभाग घेतला, वयोगट 19 मध्ये इ. 11 वी च्या कॅडेट आदिष्टी काळे व इ. 12 वी च्या कॅडेट रोशनी सोळंकी यांनी सुवर्णपदक पटकावल्याने या दोघींची विभाग स्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच वयोगटात इ. 12 वी ची कॅडेट वैष्णवी धावडे हिला ब्राॅंझपदक मिळाले. या तिघींचे, मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक पूनम कनगरे, मॅडम वैष्णवी आडकर मॅडम, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे सर, ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏


