पुणे भारत स्काऊट गाईड विभाग – सैनिकी शाळा तर्फे प्रशालेत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा…

पुणे भारत स्काऊट गाईड विभाग.
म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला
दिनांक : १२ सप्टेंबर २०२६

आज शाळेच्या स्काऊट गाईड विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्काऊट-गाईड विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

विद्यार्थिनींनी शाळेच्या व ग्रामपंचायत कासार आंबोली च्या परिसरात प्रभात फेरी काढून विविध प्रकारच्या रोपांची लागवड केली. तसेच वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण आणि झाडांचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. लावलेल्या रोपांची नियमित देखभाल व पाणी देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली. याप्रसंगी कासार आंबोली गावचे माजी सरपंच श्री. उमेश भाऊ सुतार, जि.प. शाळा कासार आंबोलीचे मुख्याध्यापक श्री. भुजबळ सर हे उपस्थित होते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि निसर्ग संवर्धनाची भावना निर्माण झाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन सर, मा. मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड मॅडम, सीनियर मास्टर श्री. अद्वैत जगधने सर यांच्या मार्गदर्शनानुसार स्काऊट गाईड विभाग प्रमुख गाईड कॅप्टन श्रीमती प्रियांका गुरव, ज्येष्ठ शिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड सर, श्रीमती कृष्णा जाधव मॅडम, श्रीमती दिव्या फाले व श्रीमती कार्तिकी भालेराव यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला…
🌱🌱🌱
– स्काऊट गाईड विभाग…🙏

Scroll to Top
Skip to content