प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा…

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।। आपल्या आयुष्यात गुरूंचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. दिनांक 10 जुलै राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे प्रशालेच्या कॅडेट्स नेच या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. इयत्ता 10 विच्या वर्गाकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.
सर्वप्रथम गुरवंदन आणि गुरुस्तवन करून कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली. यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी वैभवी परांदे हिने आपल्या भाषणातून गुरुचे महत्व सांगितले. प्रशालेच्या शिक्षिका सौ दिपाली भावसार मॅडम यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत गुरु शिष्य यांच्यातील ऋणानुबंध गोष्टीतून मांडले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांना स्वतः बनवलेले बुक मार्क्स देऊन सन्मानित केले. याच कार्यक्रमात ए. एन. ओ. थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे मॅडम यांनी 29 जून ते 8 जुलै 2025 दरम्यान झालेल्या एअर एनसीसी स्क्वाड्रन द्वितीय वर्षातील झालेल्या कंबाइनड ॲन्यूअल ट्रेनिंग कॅम्प अहवाल वाचला आणि त्यामध्ये पारितोषिक मिळवलेल्या कॅडेट्स चा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय पूजा जोग मॅडम आणि प्रशालेचे कमांडट विंग कमांडर यज्ञ रामन सर यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांजना अमोल लहाने आणि नीरजा उमेश निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सिनियर मास्टर श्री नांगरे सर व कॅडेट तेजल निखाडे हिने आभार प्रदर्शन केले.

Scroll to Top
Skip to content