सैनिकी प्रशालेत भारत स्काऊट गाईड या युनिटचा उद्घाटन सोहळा…

RLMSS Bharat Scouts & Guides Unit – Inaugural Ceremony – 10 Jul 25

In a first. marking the auspicious occasion of ‘Guru Pournima‘ RLMSS had the proud privilege of starting RLMSS Bharat Scouts & Guides Unit, to be functioning under Military Training Wing.

Sou Dipali Suhas Ambekar, the Guide Leader Designate as guided by Shri Sandeep Pawar, IC Mil Trg & PRO coordinated the launch of this memorable event to become part of RLMSS’s History.

Sou Dipali Bhavsar, Sou Priyanka Ghodke and Sou Priyanka Kulkarni would be other Teachers who would be trained and inducted to be part of the Unit and the facility is extended to Cadets of Class VI to IX.

Shri Digambar Karande, District Scout Organiser – Chief Guest

Shri Dilip Nevase – District Scout Training Commiissioner – Guest of Honour

Ms Usha Hirvale – District Guide Organiser

Ms Malan Vavle – District Trainer Guide

graced the occasion and the commissioned the most awaited training sesssion.

Sub Shri Navnath Pawar, Shri Mahadev Magar and Shri Vinayak Patil of MTW RLMSS and Smt Priyanka Gurav were on presence and of great support toward successful conduct of the launch.

We are on a Mission…..and our Mission Statement is ‘Atleast 30 by 2030’.

With best of our wishes,

~ The MES RLMSS Family

🇮🇳⚜️⚜️महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा या प्रशालेच्या इतिहासात प्रथमच भारत स्काऊट गाईड या युनिटचा उद्घाटन सोहळा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी पुणे जिल्हा स्काऊट संघटक दिगंबर करंडे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट, दिलीप नेवसे, पुणे जिल्हा संघटक गाईड उषा हिवराळे, जिल्हा प्रशिक्षण समुपदेशक गाईड मालन ववले, जिल्हा ट्रेनिंग कौन्सिलर काशिनाथ जगताप व प्रा. भगवान कोकणे उपस्थित होते. सर्वप्रथम स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांचे प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनानंतर स्काऊट गाईड प्रार्थना ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व संघनायक यांना स्कार्फ प्रदान करून वचनविधी देण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांनी स्काऊट गाईडच्या अभ्यासक्रमाबाबत सखोल माहिती दिली. जिल्हा प्रशिक्षण आयुक्त दिलीप नेवसे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे विद्यार्थिनींना स्काऊट गाईड चळवळी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मान्यवरांनी विविध प्रकारच्या टाळ्या कशा वाजवू शकतो असे बरेच उपक्रम घेतले. विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचा खूप उत्साहाने आणि आनंदाने आस्वाद घेतला. सैन्य प्रशिक्षक सुभेदार नवनाथ पवार, क्रीडा शिक्षक महादेव मगर, श्री. विनायक पाटील, स्काऊट गाईड प्रमुख दिपाली आंबेकर, प्रियांका हजारे-घोडके, प्रियांका राजहंस-कुलकर्णी, दिपाली भावसार व प्रियांका गुरव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. पाहुण्यांचा परिचय सौ. दिपाली आंबेकर यांनी केला. संपूर्ण कार्यक्रमास प्रशालेचे कमांडंट एविएन एअर विंगकमांडर यज्ञ रमण, प्राचार्या पूजा जोग, सीनियर मास्टर श्याम नांगरे, पर्यवेक्षक संदीप पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता इ. 12 वीच्या विद्यार्थिनी कॅडेट भक्ती आणि कॅडेट पद्मश्री यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सैनिकी परिवाराने केले होते.

Scroll to Top
Skip to content