प्रशालेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा…

गुरुवार दिनांक:- १५ ऑक्टोबर २०२६

माजी राष्ट्रपती स्व. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे. तसेच वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. अशा या वाचनाचे महत्त्व सांगणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी प्रशालेमध्ये वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रशालेत सकाळी ७.४० वाजता आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. इयत्ता ७ वी अ तील कॅ. दूर्वा पाटील हिने माजी राष्ट्रपती स्व. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती सांगितली.इ. ७ वी ब तील कॅडेट्सने ‘टप टप पडती’ या कवितेचे काव्य गायन केले. इयत्ता नववीच्या कॅडेट्सने गवळण सादर केली. कॅ. तनिष्का घनवट ने ‘वाचनाचे महत्त्व’ सांगितले. इ. ६ वी च्या कॅडेट्सने ‘प्रकाशयात्री’ ही कविता सादर केली. प्रशालेचे सिनियर मास्टर श्री. अद्वैत जगधने सर यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले आणि वाचन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ वी तील कॅ. श्री निशा जाधवर आणि कॅ. स्वरांजली पोवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कॅ. स्वरांजली श्रीखंडे आणि कॅ. कृष्णा मेसवाल यांनी केले. यानंतर प्रशालेत ग्रंथदिंडी काढण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम, सिनियर मास्टर श्री. अद्वैत जगधने सर आणि सर्व सैनिकी परिवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभागाने केले होते.
अशा रीतीने कार्यक्रम संपन्न झाला.

Scroll to Top
Skip to content