आनंदवार्ता :

अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाची ही संक्षिप्त चित्रफित …
https://www.facebook.com/reel/1522887219600793

विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, नॅशनल इंनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ते 14 ऑक्टोबर 2026 रोजी भारतमंडपम, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या 12 व्या राष्ट्रीयस्तरीय INSPIRE Award MANAK विज्ञान प्रदर्शनासाठी देशभरातून सहभागी झालेल्या एकूण 790 प्रकल्पांपैकी आपल्या – म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी प्रशालेतील इयत्ता 10 वी अ मधील कॅडेट देविका ताड हिने सादर केलेल्या Automatic Document Stamping machine या प्रकल्पाची निवड top 60 प्रकल्पांमध्ये झाली असून केंद्रीय मंत्री विज्ञान व तंत्रज्ञान विभाग मा. डॉ. जितेंन्द्र सिंह यांच्या हस्ते तिचा National Inspire awardee म्हणून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी NIF चे संचालक डॉ. अरविंद रानडे तसेच चेअर पर्सन प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारचे विभागप्रमुख व डॉ. उमेश शर्मा व सेक्रेटरी प्रा. उमेश वाघमारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्यातर्फे सर्व अवार्डप्राप्त विद्यार्थ्यांना जपान येथे इंटर्नशिप, प्रकल्पाचे पेटंटिंग करण्यास मार्गदर्शन व सहाय्य केले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी प्रशालेतील ATL विभागप्रमुख व विज्ञान अध्यापिका सौ. मंजिरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
मएसो अटल समितीचे समन्वयक मा. डॉ. दत्तात्रय नाईक यांनीही प्रकल्प सादरीकरणा संदर्भात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा मा. सौ आनंदी पाटील, महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, महामात्र डॉ. उमेश बिबवे, व मा श्री विजय भालेराव शाला समिती सदस्य, शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम यज्ञरामन, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड व सिनिअर मास्टर व पर्यवेक्षक श्री. अद्वैत जगधने व सर्व सैनिकी परिवार यांनी कॅडेट्सचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://www.facebook.com/share/p/14sT7fJEgrd/

Scroll to Top
Skip to content