दिनांक १५/९/२०६ रोजी इयत्ता ५ वी – बॅच २००३ ते २००९ (१० वी) २०११) १२ वी पास च्या माजी कॅडेट्सकडून शाळेला २० घड्याळांची भेट देण्यात आली. शाळेविषयी असणारे प्रेम, आपुलकी आणि पुन्हा शाळेला समाजाला देण्याची भावना यातून प्रेरित होऊन. प्रत्येक वर्गात उत्तम दर्जाची घड्याळे शाळेला दिली गेली.
कॅडेट ने त्यांच्या जीवनात वेळेला महत्त्व द्यावे अशी यामागील भावना आहे. २००३ रोजी शाळेत अनेक स्वप्न घेऊन आलेल्या आणि आता जीवनात यशस्वी झालेल्या आपल्या ह्या कॅडेटचा शाळेला नेहमीच अभिमान वाटतो.
शाळेला आपण दिलेली ही भेट अनेक कॅडेटच्या जीवनात मोठा बदल घडविण्यास कारणीभूत ठरेल यात शंका नाही.
आपले बहुमूल्य योगदान असेच आपल्या शाला मातेस मिळत राहो.
या बॅचचे प्रतिनिधित्व करत, माजी कॅडेट श्रीमती प्रियांका लाड-होले यांनी आपल्या पतीसह ही घड्याळे अधिकृतपणे शाळेकडे सुपूर्द केली.
जय हिंद…🙏🏻

