दिनांक १४ जुलै २०२३ रोजी इयत्ता नववीच्या मुलींना मनाली येथे झालेल्या ऍडव्हेंचर कोर्स चे सर्टिफिकेट सकाळी परिपाठा दरम्यान देण्यात आले. सदर कोर्स २० एप्रिल २०२३ ते ३ मे २०२३ या कालावधीत अटल बिहारी वाजपेयी माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट अँड अलाईट स्पोर्ट्स, मनाली येथे ७० कॅडेट्सनी पूर्ण केला, यामध्ये मुलींनी रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, जुमारिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, दहा हजार फूट हाईट गेनिंग इत्यादी ऍक्टिव्हिटी केल्या. या हा ट्रेक सर्व मुलींनी ‘ए’ ग्रेड मध्ये पूर्ण केला. ट्रेकचे नेतृत्व सैन्य विभाग प्रमुख एक्स हवालदार गजानन माळी यांनी केले. कॅम्पस डायरेक्टर श्रीमती गीतांजली बोधनकर, प्राचार्या सौ. सुवर्णा कांबळे, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी आणि पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ट्रेकचे आयोजन केले होते. ट्रेक मध्ये एक्स हवालदार बाळासाहेब चव्हाण वर्गशिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड सौ. सुनीता शिंदे व मेट्रन मेघा मावशी व अंजनाताई यांची महत्त्वाची कामगिरी होती.

