म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेमध्ये योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. स्वस्थ आणि निरोगी शरीरासाठी केवळ एक दिवसांपुरती योगासने न करता दैनंदिन जीवनातही योगासने, प्राणायाम करण्याचा सल्ला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोजजी साळी सर यांनी यावेळी विद्यार्थिनींना दिला. तसेच विद्यार्थ्यांना शरीर व मनाच्या संतुलनासाठी योगाचे महत्त्व सांगून योगासनांची प्रात्यक्षिकेही करून दाखविली. यावेळी सैनिकी शाळचे कमांडंट एविएन. विंग कमांडर श्री यज्ञरामन, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग, शाळेचे पर्यवेक्षक श्री श्याम नांगरे, श्री संदीप पवार, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सैनिकी परिवार याप्रसंगी उपस्थित होते. शाळेचे क्रीडाशिक्षक श्री महादेव मगर, योग प्रशिक्षक प्रिती वाळके, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व सैनिकी परिवाराने केले होते. याप्रसंगी शाळेतील एकूण 484 विद्यार्थिनींनी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी योगासने घातली. सूत्रसंचालन कॅडेट आभाश्री शिंदीकर, कॅडेट अपूर्वा केंजळे यांनी केले. तर आभार कॅडेट तन्वी दौंडकर यांनी मानले.

Scroll to Top
Skip to content