

आज 29 ऑगस्ट 2024, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेस सन 2022-23 व 2023-24 या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रोत्साहनात्मक अनुदान रक्कम रू. तीन लक्ष तेरा हजार दोनशे एकाहत्तर व सन्मानचिन्ह देऊन मा. जिल्हा क्रीडाधिकारी श्री. महादेव कसगावडे सर व मान्यवरांच्या हस्ते मा. प्राचार्या पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, श्रीमती आरती पांडे व इयत्ता 6 वी चे खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला.


