“रोटरी क्लब पुणे मेट्रोच्या” वतीने स्मार्ट बोर्ट हस्तांतर समारांभ…..

शनिवार, दिनांक :  २७ फेब्रुवारी २०२१ रोजी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा या ठिकाणी “रोटरी क्लब पुणे मेट्रोच्या” वतीने स्मार्ट बोर्डचे हस्तांतरण करण्यात आले. रोटरी मेट्रो क्लब पुणे यांनी शाळेला दोन आधुनिक स्वरूपाचे स्मार्ट बोर्ड दिले. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञानदानाचे कार्य अधिक आधुनिक, सुसंगत व तंत्र स्नेही होईल अशी आशा आहे. या कार्यक्रमासाठी पुणे मेट्रो चे अध्यक्ष श्री. मकरंद फडके तसेच समन्वयक श्री. गिरीश जी रानडे व कार्यक्रमासाठी शाळा समितीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर माधवीताई मेहेंदळे या उपस्थित होत्या. प्रशालेच्या प्राचार्या डॉक्टर सुलभा विधाते यांनी रोटरी कडून हा स्मार्ट बोर्ड स्वीकारला या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री. अद्वैत जगधने सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सैनिकी परिवार तसेच पुणे मेट्रो रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

 

Scroll to Top
Skip to content