वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा…@ RLMSS

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रशालेमध्ये वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विज्ञानातील विविध संकल्पनांचे रंगीत खडूच्या साह्याने विद्यार्थिनींनी अतिशय उत्तम पद्धतीने रांगोळीचे रेखाटन केले. रांगोळी स्पर्धेचे मूल्यमापन पुढील मुद्द्यांच्या आधारे करण्यात आले. रचनात्मकता, विषयाची प्रासंगिकता, कलात्मक विवरण आणि स्पष्टता, रंगांचा योग्य वापर आणि एकूण परिणामकारकता असे एकूण 50 गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक: दुर्गावती
द्वितीय क्रमांक: लक्ष्मी
तृतीया क्रमांक: जिजामाता
चतुर्थ क्रमांक: अहिल्या

सदर स्पर्धेचे मूल्यमापन सौ. मंजिरी पाटील व सौ. जयश्री गरुड यांनी केले. स्पर्धेचे आयोजन विज्ञान विभाग प्रमुख व स्पर्धा विभाग प्रमुख सौ. वैशाली शिंदे यांनी केले होते.

Scroll to Top
Skip to content