सैनिकी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…

शनिवार, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे तसेच त्याचे दृढीकरण करण्यासाठी, दैनंदिन जीवनातील विज्ञान यांच्याशी सांगड अशा अनेक उद्देशाने विज्ञान छंद मंडळातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सायन्स मॅरेथॉन आयोजित करण्यात आली.
सायन्स मॅरेथॉनचे स्वरूप पुढीलप्रमाणे
Round 1. Multiple choice questions.
Round 2. Buzzer round
Round 3. Concept explain
Round 4. Hands on activity
Round 5. Puzzle

सायन्स मॅरेथॉन सकाळी 9 ते 10 या वेळेत संपन्न झाली. सायन्स मॅरेथॉन स्पर्धा ही कुलश: घेण्यात आली. इयत्ता सहावी ते आठवीच्या अहिल्या, जिजामाता, लक्ष्मी व दुर्गावती अशा एकूण 12 विद्यार्थिनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या.
सायन्स मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे,
प्रथम क्रमांक : अहिल्या, जिजामाता
द्वितीय क्रमांक : दुर्गावती
तृतीय क्रमांक : लक्ष्मी
विज्ञान दिनानिमित्त इयत्ता सातवी व आठवी या वर्गातील विद्यार्थिनींनी विज्ञान विषयातील विविध संकल्पनांवर आधारित 3D प्रकल्प तयार केले होते या निमित्ताने या प्रकल्पांचे प्रदर्शन देखील करण्यात आले. सदर कार्यक्रम इयत्ता नववीतील विद्यार्थी उत्तम पद्धतीने पार पाडला.

कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. म. यज्ञरामन सर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड व सीनियर मास्टर श्री संदीप पवार यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विज्ञान शिक्षक सौ. मंजिरी पाटील, सौ. सावित्री पाटील, श्री. प्रमोद झुरमुरे, श्री. रविंद्र उराडे, सौ. वैशाली शिंदे, श्री. शिवदास कापुरे, श्री. मंगेश पाटील, कु. संस्कृती मंगावडे व सौ. वसुधा पाटील सर्व विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थिनींना उत्तम असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन विज्ञान विभागातर्फे करण्यात आले.

Scroll to Top
Skip to content