आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी, इंदापूर येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील वयोगट 17 मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला, वयोगट 19 वर्ष मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावल्याने या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व कॅडेटचे, मार्गदर्शक क्रीडाशिक्षक श्री. महादेव मगर सर, क्रीडा प्रशिक्षक रागिनी गंगावणे, व ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

