म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतिल इयत्ता सहावी ब च्या एकूण 48 विद्यार्थिनी प्रतिवर्षा प्रमाणे ह्या वर्षी देखील सामाजिक रक्षाबंधन साठी अंबडवेट येथील कातकरी आदिवासी वस्तीमध्ये दाखल झाल्या. वस्तीत गेल्यावर विद्यार्थीनींचे स्वागत शिक्षक श्री. सुदाम पवार व सौ. मारणे मॅडम यांनी केले. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्या ज्योती खिरीड मॅडम व शिक्षकांचे स्वागत केले. वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर असा परिपाठ सादर केला. त्यानंतर श्री सुदाम पवार यांनी वस्ती शाळेची माहिती सांगितली. प्रशालेतील श्री मंगेश पाटील सर यांनी
रक्षाबंधना विषयी माहिती सांगितली. माननीय प्राचार्या मॅडम यांनी वस्तीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी वस्ती शाळेत विद्यार्थ्यांना व वस्तीत घरोघरी जाऊन राख्या बांधल्या.
पुढे अमराळेवाडी येथे विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना राख्या बांधल्या.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन तसेच प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम यांनी मार्गदर्शन केले. श्री. मार्तंड सर, श्री. मंगेश पाटील सर तसेच राम काका, जयश्री ताई यांनी या सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रमात सहभाग घेतला. या निमित्त वस्तीतील विद्यार्थ्यांना प्रशालेकडून खाऊ वाटप करण्यात आला.

















