आज बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी प्रशालेमध्ये परिपाठा दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला.
या उत्सवाचे नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी केले होते.
गुरु हा नेहमी योग्यच मार्गदर्शन करत असतो. गुरुवर श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे असे मत प्रशालेचे सीनियर मास्टर श्री अद्वैत जगधने यांनी मांडले. तर भारतीय संस्कृतीमध्ये आई, वडील, शिक्षक, गुरु आणि मार्गदर्शक हे गुरुच्या भूमिकेमध्ये असतात. असे मत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर एव्हीएन एम यज्ञरामन हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सर्व शिक्षक, हॉस्टेल स्टाफ यांना विद्यार्थिनींनी बुक मार्कर व पेन देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
या दरम्यान सर्व विद्यार्थिनींनी पर्यावरण रक्षणासंबंधी प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट समीक्षा डफळ व कॅडेट समृद्धी मांजरे यांनी केले. दरम्यान कॅडेट काश्वी निंबाळकर, कॅडेट अनन्या हरपळे व कॅडेट समृद्धी दौंडकर यांनी गुरुची महती सांगितली. तर कार्यक्रमाचे आभार कॅडेट स्वराली देशमुख हिने मानले.







For more photos please click 👇
https://drive.google.com/drive/folders/1Tgas2I9NX2I-b_9gKR7GQF7FEqY5InQc?usp=drive_link
