प्रशालेतील ग्रीन क्लबसाठी भात लागवडीचा अनोखा अनुभव…

बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी प्रशालेतील ग्रीन क्लबच्या मुलींनी भात लागवडीचा अनोखा अनुभव घेतला.
प्रशाले जवळ असणाऱ्या गडदावणे वस्ती वरती श्री शशिकांत ओंबासे यांच्या शेतामध्ये भात लागवड केली. या उपक्रमामध्ये सुमारे 40 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या लागवडीमध्ये प्रशालेचे ड्रायव्हर काका श्री राम धाईत, श्री रविराज थोरात, श्री भाऊसाहेब मार्तंड, श्री अद्वैत जगधने व मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थिनींनी आनंद लुटला. या अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी दिली. शेतकऱ्यांचे कष्ट किती अमूल्य असतात याची जाणीव विद्यार्थिनींना आज झाली.
सदर उपक्रमाचे नियोजन श्री राम धाईत व ग्रीन क्लब विभागाचे प्रमुख श्री भाऊसाहेब मार्तंड यांनी केले होते.

Scroll to Top
Skip to content