
शनिवार दिनांक 29 मार्च रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत इ.12 वी च्या कॅडेटस चा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल चे माजी कमांडंट व आठारे पब्लिक स्कूल चे प्राचार्य कर्नल एस. एस. जोशी (निवृत्त), श्रीमती कविता जोशी, शाला समितीच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्याम नांगरे व पालक उपस्थित होते. इ.6 वी ते इ.12 वी च्या कॅडेटस नी शानदार संचलन करीत प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. याप्रसंगी स्वॉर्ड ऑफ ऑनर चा बहुमान स्कूल कॅप्टन व परेड कमांडर कॅडेट प्रार्थी म्हात्रे हिला तर उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून स्कूल स्पोर्टस कॅप्टन कॅडेट ऋतुजा पाचपांडे ला मिळाला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना कर्नल एस. एस. जोशी यांनी देशाच्या संरक्षण दलात महिलांसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध होत आहेत, त्याचा फायदा या कॅडेटस ला होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी आतापासूनच सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगताना या दीक्षांत समारंभात सहभागी असणाऱ्या सर्व कॅडेटचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन व प्राचार्या पूजा जोग यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक संदीप पवार, सुभेदार नवनाथ पवार, हवालदार गजानन माळी, क्रीडा शिक्षक महादेव मगर, अक्षय मांडगे व सैनिकी परिवारातील सदस्यांनी केले होते.




















