सैनिकी शाळेत “करियर इन लॉ” यावरती व्याख्यान…

🎓⚖️आज शनिवार, दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी स्काऊट गाईड व आनंदी शनिवार अंतर्गत प्रशालेमध्ये “करियर इन लॉ” यावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. सौ. स्वप्नाली साळुंखे पालक प्रतिनिधी 6 वी तसेच सामाजिक कार्यकर्ते व बिझनेस मॅन श्री. प्रदीप साळुंखे यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे कॅडेटसना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी वकिली पेशा, त्याच बरोबर वकील होण्यासाठी कोणती तयारी करावी. तसेच या व्यवसायामध्ये कशा संधी आहेत, याचे ही महत्त्व सांगितले. वकील होण्यासाठी कोणत्या प्रवेश परीक्षा असतात, तसेच वकिली संदर्भात सर्व माहिती व मार्गदर्शन केले. मुलींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

⚜️कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे आजच्या पाहुण्यांनी मुलींनी स्वतः तयार केलेल्या “बुके” चे खूप कौतुक केले. व प्रशालेस जास्वंदीची रोपे भेट म्हणून दिली. याचा उपयोग कॅडेट्स ना नक्की होईल असेही ते म्हणाले.⚜️

या कार्यक्रमासाठी शाळेचे कमांडंट एविएन एअर विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
पाहुण्यांचे स्वागत आणि आभार मा. पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे नियोजन व परिचय सौ. दिपाली आंबेकर यांनी केले. कार्यक्रमांमध्ये ए. एन. ओ. सौ. राजश्री गोफणे, दिपाली भावसार, रेक्टर प्रियांका गुरव व मेट्रन्स यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.⚖️🎓🙏

Scroll to Top
Skip to content