‘म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत ‘क्रांतिस्फूर्ती’ हस्तलिखित व आर्ट वॉलवरील नागरी शिष्टाचारासंबंधी पोस्टर्सचे अनावरण’ करण्यात आले.
स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग, संघर्ष, त्यांच्या धैर्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेऊ शकतो. त्यांचे कार्य, योगदान यांचे संकलन करून म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या कॅडेटसनी हस्तलिखित तयार केले आहे. एकूण 46 स्वातंत्र्य सैनिकांचा समावेश आहे. त्याचे नाव ‘क्रांतिस्फूर्ती’ असे आहे. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यावरील चित्र कॅडेट समृद्धी सावंत हिने काढलेले आहे. त्याचे अनावरण शाळेचे कमांडंट एविएन. विंग कमांडर एम. यज्ञरामन आणि मुख्याध्यापिका पूजा जोग यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्याम नांगरे, पर्यवेक्षक व पीआरओ संदीप पवार व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कॅडेट उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सावित्री पाटील व सहकारी यांनी केले होते.





