⚜️⚜️ एक पेड माॅं के नाम!⚜️⚜️
आज आनंदी शनिवार दिनांक 23/8/ 2025 रोजी इयत्ता सहावी ते आठवी वर्गातील कॅडेट्सनी पर्यावरणाचे महत्त्व आणि स्काऊट गाईड चा उपक्रम एक पेड माॅं के नाम या उपक्रमांतर्गत काही रोपे स्वतः लावली. त्याचप्रमाणे शालेय परिसराची स्वच्छता देखील केली. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये विद्यार्थिनींनी बागकाम केले व त्याचा आनंद घेतला. पर्यावरण संरक्षण करणे किती गरजेचे आहे, खरे तर ही काळाची गरज आहे. ही संकल्पना बालचमुंच्या मनामध्ये रुजवली गेली.🙏🙏
या उपक्रमाचे नियोजन प्रशालेतील पर्यावरण प्रमुख श्री. भाऊसाहेब मार्तंड व गाईड प्रमुख सौ. दिपाली आंबेकर यांनी केले. तरी या उपक्रमासाठी कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञरामन आणि प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांचे मार्गदर्शन लाभले.⚜️🙏













