दिनांक २३ ऑगस्ट २०२५ शनिवार रोजी इयत्ता ६ वी ते ८ वी च्या कॅडेट्ससाठी सकाळी ११ वा. ‘स्वच्छता, सुरक्षा आणि कचरा नियोजन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर व्याख्यानासाठी उद्योजक श्री. अनिल लक्ष्मण चोंधे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले.
व्याख्यानाची सुरुवात आनंदी शनिवार पासून करून त्यांनी नागरी शिष्टाचार, ओला सुका कचरा नियोजन, प्लास्टिक बंदी, प्रदूषण तसेच वैयक्तिक, वस्तीगृह आणि शाळेतील स्वच्छता या सर्व विषयांवर कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
सौ. राजश्री गोफणे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी कॅडेट हिंदवी दांगट आणि कॅडेट आभा बाजड या कॅडेट्सनी वक्त्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले.
तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सौ. सावित्री पाटील आणि सौ. राजश्री गोफणे यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेचे मा. कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञ रामन सर आणि शिक्षक वृंद हजर होते.
Jai hind…






