सैनिकी शाळेत वृक्षारोपण…..
कम्युनिटी ब्रॅंड कंपनी व रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन यांच्या वतीने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत वृक्षारोपण समारंभ उत्साहात पार पडला, शालेय परिसरात विविध फुल व फळझाडे लावण्यात आली याप्रसंगी कम्युनिटी ब्रॅंड चे प्रमुख श्री. अमोल हेडा, रोटरी क्लबचे सेक्रेटरी श्री. शशांक टिळक, प्रोजेक्ट डायरेक्टर श्री. सुनिल बर्वे, रोटरी सदस्य व समन्वयक सौ. संगिता जोशी, सैनिकी शाळेचे कमांडंट विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर, प्राचार्या श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार व कम्युनिटी ब्रॅंड चे कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे नियोजन इस्टेट मॅनेजर श्री. समीर जाधव व ज्येष्ठ शिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड यांनी केले होते.




