63 वी राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप…कॅडेट मोक्षदा विजयकुमार बाबर हिची Inline hockey 🏑 या क्रीडा प्रकारात निवड…

RSFI (Roller Skating Federation of India) ने नुकत्याच विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे 63 वी राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आयोजित केली होती (डिसेंबर 5 ते 15, 2025). जिथे अनेक राज्ये आणि जिल्ह्यांतील स्केटर्सनी भाग घेतला. ज्यात महाराष्ट्रातील स्केटर्सनीही रौप्य पदके जिंकली. या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी भाग घेतला आणि त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील इ. 7 वी अ ची कॅडेट मोक्षदा विजयकुमार बाबर हिची Inline hockey 🏑 या क्रीडा प्रकारात निवड झाली. संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त 7 मुलीची निवड नाशिक येथे झाली होती,
तसेच निवडलेल्या खेळाडूंचा नागपुर येथे राष्ट्रीय सराव कॅंप 10 दिवस घेतला गेला.

या स्पर्धेत कॅडेट मोक्षदा तसेच टीम ने खूप चांगली कामगिरी केली. तिची माहे फेब्रुवारी~मार्च मध्ये उत्तराखंड येथे होणाऱ्या Ice hockey Maharashtra team मध्ये निवड झाली आहे.
कॅडेट मोक्षदा बाबर, तिचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा… 💐💐🙏🙏

Scroll to Top
Skip to content