7 July – रौप्य महोत्सवी वर्ष – सांगता समारंभ ….

म. ए. सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय कासार आंबोली येथे शाळेचा वर्धापनदिन व रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना व नृत्य दिग्दर्शिका मा. सुचेता भिडे -चापेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी तथा उपसंचालक (अतिरिक्त कार्यभार) श्री. महादेव कसगावडे, नाट्य कलाकार श्री. सुयोग कुंडलकर, सौ. आरती कुंडलकर, म. ए. सो संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, म. ए. सो. नियामक मंडळ अध्यक्ष आर्किटेक्ट श्री. राजीव सहस्रबुद्धे, शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सचिव डॉ. श्री. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, शाला समिती महामात्रा डॉ. मानसी भाटे व प्रा. चित्रा नगरकर, श्री. सुधीर भोसले, डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, कॅंपस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार हे उपस्थित होते, याप्रसंगी इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते झाले, प्रमुख अतिथी सुचेता भिडे- चापेकर यांनी जीवनात कलेचे महत्व खूप असल्याचे सांगितले तर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महादेव कसगावडे यांनी या शाळेत अभ्यासाबरोबरच खेळाला खूप महत्त्व दिले जाते याविषयी अभिनंदन केले व जीवनात एका तरी खेळात प्राविण्य मिळवून यशस्वी होण्याचा सल्ला दिला, अध्यक्षीय मनोगतात एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी सशस्त्र सेनेमध्ये आज महिलांना खूप संधी असल्याचे सांगितले, रौप्यमहोत्सवी सांगता समारंभाच्या निमित्ताने म. ए. सो परफार्मिंग आर्ट्स च्या कलाकारांनी ‘अनामवीरा’ हा क्रांतिकारकांना मानवंदना देण्याचा देशभक्ती पर कार्यक्रम सादर केला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी करून दिला. पारितोषिक वाचन सौ. रेखा रायपूरकर व सौ. सावित्री पाटील यांनी केले, सूत्रसंचालन उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी केले, शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे कामकाज पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, श्री. गजानन पाटील व समितीने केले तर वर्षभरात विविध कार्यक्रमांचे नियोजन समन्वयक श्री. अद्वैत जगधने व सौ. रेखा रायपूरकर यांनी केले होते.



