“बस हस्तांतरण सोहळा “

दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रशाले साठी मा.सतीश कुलकर्णी (दानशूर व्यक्तिमत्व ) व कुटुंबीय मा.मुकूंद कुलकर्णी मा.श्रीरंग कुलकर्णी मा.सौ सविता कुलकर्णी मा. सौ माधुरी कुलकर्णी यांनी पन्नास आसनक्षमता असलेली ‘बस’ प्रशालेसाठी दिली. सैनिकी शाळा निवासी असल्याने शाळेला बसची नितांत गरज होती. याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.प्रदीपजी नाईक, म.ए.सो नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्त्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य मा.बाबासाहेब शिंदे, शाला समिती महामात्र डॉ.मानसी भाटे, म.ए.सो.संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सचिन आंबर्डेकर, संस्थेचे सहसचिव मा.सुधीर गाडे, अभिनेते रवींद्र खरे हे उपस्थित होते.

 

 

झाँसी अभ्यास दौरा  दिनांक 16 जानेवारी 2020 ते 21 जानेवारी 2020 यादरम्यान झाॅंसी अभ्यासदौरा आयोजित केला होता. प्रशालेतील 10 कॅडेट्स व तीन शिक्षक हे राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र अभ्यासण्यासाठी झाँसी या ठिकाणी गेले होते. झाँसी येथे या टीमने झाँसी फोर्ट, राणी महल, ओरचा, राम राजा मंदिर या स्थळांचा अभ्यास केला. ऐतिहासिक वास्तू,ठिकाणे यांची माहिती घेतली. झाँसी संग्रहालय येथे भेट दिली. राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावरील आधारित “क्या खूब लडी मर्दानी,वो तो  झाँसीवाली रानी थी| ” ही   कविता झाँसी किल्ल्यावर लोकांसमोर सादर केली. सदर टीमचा निवास ३१आर्मड डिव्हीजन झाँसी येथे होता. दौर्‍यात विविध प्रकारचे टॅंक, गन यांचा अभ्यास केला. टँक वर बसून ऐतिहासिक सफरचा अनुभवही या टीमने घेतला. अनेक सैन्य अधिकारी विशेषत: महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हा दौरा यशस्वी करण्यासाठी मा.सतीश कुलकर्णी ( मुख्य प्रायोजक ),म.ए.सो.संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.राजीवजी सहस्त्रबुद्धे,प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ.माधवी मेहेंदळे,शाला समिती सदस्य व प्रशालेने विशेष मेहनत घेतली होती.

 

 

 

 

 

स्वा.विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी दिनांक 26 फेब्रुवारी 2020 रोजी प्रशालेत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासार आंबोली गावचे उपसरपंच मा.सचिन धुमाळ हे होते. याप्रसंगी इयत्ता आठवीतील मुलींनी स्वा.सावरकर यांच्या जीवनावरील प्रसंग सादर केले. स्वा.सावरकर लिखित ‘ जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे ‘हे काव्य गायले. स्वा. सावरकर लिखित कविता म्हटल्या. श्रीमती मालतीताई आठवले यांच्या तर्फे स्वा.सावरकर पुण्यतिथी ला इयत्ता आठवीतून प्रथम व द्वितीय क्रमांकांना रोख रक्कम रुपये 1000/- प्रत्येकी व सावरकर ग्रंथ भेट दिले जातात. ते पुरस्कार यावर्षी प्रथम क्रमांक  कु.आश्विनी धुमाळ व द्वितीय क्रमांक कु.ईश्वरी लेकुरवाळे यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमासाठी इतिहास विभागाने तयारी करून घेतली होती.

 

 

 

 

 

 

प्रतिवर्षीप्रमाणे प्रशालेत   दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी मोठ्या  दिमाखात पार पडला. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना याप्रसंगी शिवप्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढली. याप्रसंगी इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी पोवाडा गायन,शिवचरित्रातील स्फूर्तिदायक प्रसंग कथन करणे, शिवरायांवरील काव्ये गायन करणे,कथाकथन इ. कार्यक्रम सादर केले.शिवचरित्रावरील उत्तम देखावा हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. उत्तम रंगावली,  फलक लेखन व भगव्या फेट्यांसह विद्यार्थिनींनी केलेली वेशभूषा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. इयत्ता नववीचे दोन्ही वर्गशिक्षक व इतिहास विभागाच्या मदतीने हा सोहळा उत्साहवर्धक ठरला.

 

 

 

 

 

 

 

        यावर्षी स्नेहसंमेलनाचा विषय ‘स्वच्छ – स्वयंभू’ भारत असा होता. सर्व विद्यार्थिनींना संधी मिळावी व पालकांना देखील कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने स्नेहसंमेलन दोन भागात झाले. इ.५ वी ते इ.८ वी चे दिनांक २३ डिसेंबर व इ.९ वी ते इ. १२ वी चे दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी १० ते  या वेळेत शालेय सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी अनुक्रमे मा. भाग्यश्री न्हालवे (अभिनेत्री मालिका व सिनेसृष्टी) आणि मा. सुरभी भावे (अभिनेत्री मालिका व सिनेसृष्टी) या लाभल्या होत्या.

 

भाग 1 – इ.५ वी ते इ.८ वी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा विषय ‘स्वच्छता’ होता. या कार्यक्रमाची सुरूवात गणेशवंदनेने स्वच्छतेचा विविध गीतांवर नृत्य, गाडगे महाराजांवर किर्तन, मन की स्वच्छता हे हिंदी व ग्रामस्वच्छतेशी संबंधित स्वच्छतेचा जागर हे मराठी नाटक यांचा समावेश होता. प्लास्टिक मुक्ती संदर्भातील गीत देखील सादर करण्यात आले. विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. तनया रानवडे व कु. पायल जासुद यांनी केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात गुणवंत विद्यार्थिनी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. वर्गश: इ.५ वी ते इ.८ वी उत्कृष्ट विद्यार्थिनी आणि देणगीदारांची पारितोषिके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन श्री साईनाथ जगदाळे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या भाग्यश्री न्हालवे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
    संपूर्ण स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलन कार्यवाह सौ सावित्री पाटील व सूत्रसंचालन उपकार्यवाह महेश कोतकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे  आणि उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक श्री संदीप पवार यांनी मानले.

भाग 2 – इ.९ वी ते इ. १२ वी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा विषय ‘स्वयंभू’ भारत असा होता. सुरुवातीला नटराज पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्या मा. सुरभी भावे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रशालेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरूवात गणेश वंदनेने झाली. देशातील चालू घडामोडींची माहिती व्हावी व आपला देश स्वयंभू बनवण्याकडे वाटचाल करत आहे याची जाणीव व्हावी म्हणून उरी हल्ला, काश्मीरचे 370 कलम, खेळातून देशभक्ती, देशभक्तीपर गीतांवर नृत्य – देखावे यातून मांडण्यात आले. चांद्रयान-2 चे प्रक्षेपण नाटकाच्या स्वरूपात सादर केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापक आद्य – क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनप्रसंगावर आधारित नाटिका सादर केली. इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींनी मातृभूमीच्या मानवाकडून असलेल्या अपेक्षा पत्र रूपात मांडणी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. मृणाल कदम व कु. श्रुती डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात पारितोषिक वितरण झाले त्याचे सूत्रसंचालन श्री. महेश कोतकर यांनी केले. इ.९ वी ते इ. १२ वी वर्गश: उत्कृष्ट विद्यार्थिनी व देणगीदारांची पारितोषिके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. डॉ. म. वि. गोखले फिरता चषक इ.१० वी ची उत्कृष्ट कु. अनुष्काराजे निंबाळकर आणि डॉ. कॅप्टन सि. म. चितळे फिरता चषक इ.१२ वी ची उत्कृष्ट विद्यार्थिनी कु. संस्कृती जाधव यांना डॉ. मानसी भाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, कार्यालयीन लिपिक श्री.मारणे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, शिक्षिका सौ. मंजिरी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी केले तसेच सूत्रसंचालन कार्यवाह सौ. सावित्री पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत उपप्राचार्य श्री अनंत कुलकर्णी आणि उपस्थितांचे आभार श्री. अद्वैत जगधने यांनी मानले.

       दोन्ही प्रमुख पाहुण्या माजी विद्यार्थिनी मा. भाग्यश्री न्हालवे व मा. सुरभी भावे यांनी मार्गदर्शन पर मनोगतात प्रशालेतील अनुभव कथन केले. या शाळेने “स्वाभिमान, निर्भीडपणे जगाला तोंड दयायची वृत्ती, पेशन्स, सामाजिक भान, चूक सुद्धा स्वीकारण्याची वृत्ती, मानसिक आत्मबळ अशी आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल इतकी शिदोरी दिली आहे. उत्तम शिक्षक, शिक्षण, प्रेम, आपुलकी, घरासारखी हक्काची जागा या मोठया जगात दिली.” तसेच सैनिकी शाळेत मिळणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणाचा वक्तशीरपणा, संयम, शिस्त यांचा आपल्या पुढील आयुष्यात खूप फायदा होतो. त्यामुळे येथील प्रत्येक मुलीने, प्रत्येक गोष्ट मनापासून करावी शिक्षक – प्रशिक्षक यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन मुलींना केले.
    याप्रसंगी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, डॉ. मानसी भाटे यांनी विद्यार्थीनीनचे मार्गदर्शनपर भाषणात कौतुक केले.
     कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. सुलभा विधाते, कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, स्नेहसंमेलन समिती ( सौ. सावित्री पाटील, श्री. कोतकर, श्री. जगधने, सौ. मारणे, श्री. जगदाळे,
सौ. वैशाली शिंदे, सौ. सोळंके, सौ. सुषमा पाटील ), पारितोषिक वितरण समिती (श्री. कोतकर, सौ. मारणे, श्री. जगदाळे, सौ. आंग्रे ) यांनी विशेष योगदान दिले. प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर ,माऊली, मेस विभाग, अश्वशाळा ते पाकशाळा सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.

 

Scroll to Top
Skip to content