ग्रामस्वच्छता अभियान
दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा’ येथील सर्व कॅडेट्स, कर्मचारी यांनी कासार आंबोली येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविले. गावातून घोषणा देत, हातात घोषवाक्य फलक घेऊन रॅली काढली. सर्वांनी कासार आंबोली ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, पद्मावती देवी मंदिर आणि विठ्ठल मंदिर या ठिकाणी स्वच्छता केली. स्वच्छते संदर्भात विविध घोषणा देऊन जनजागृती केली. स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. कासार आंबोली या गावातील मान्यवरांनी कॅडेटचे तसेच शिक्षक वृंदांचे स्वागत केले.
या कार्यक्रमांमध्ये शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री. संदीप पवार, स्वच्छ शाळा समिती प्रमुख सौ. सावित्री पाटील, गाईड कॅप्टन दिपाली आंबेकर, सर्व शिक्षक वृंद यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.⚜️⚜️

शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी नवरात्रीनिमित्त कासार आंबोली गावामध्ये म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या कॅडेटसनी अश्वासहित बॅंडच्या तालावर शानदार संचलन केले गावामध्ये जागोजागी रांगोळी काढून, तसेच अश्वांचे औक्षण करून महिलांनी स्वागत केले. याप्रसंगी पद्मावती मातेच्या मंदिरात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रशालेच्या प्रथेप्रमाणे गावचे प्रथम नागरिक म्हणून माजी सरपंच श्री. उमेश सुतार यांचा सन्मान करण्यात आला. मा. मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांनी सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्व सैनिकी परिवाराचा सत्कार करण्यात आला. या संचलनाचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार सिनियर मास्टर श्री. संदीप पवार व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश भिलारे यांनी केले.

मुळशी तालुकास्तर शालेय मैदानी स्पर्धा 2025
स्थळ -बालेवाडी स्टेडियम
दिनांक – 20/09/2025 व 23/09/25

💐💐 Gold medal 🏅 💐💐

वयोगट- 14

1) कॅडेट आर्या रसाळ 7th A (गोळा फेक)

वयोगट – 17

1) कॅडेट अनिता महतो 9th B (400 मी)
2) कॅडेट अनिता महतो 9th B (1500 मी)
3) कॅडेट सई भगत 9th A (800 मी)
4) कॅडेट वंशिका सुर्वे 10 th A (High jump )
5) कॅडेट दक्षिता डुंबरे 10 th A (Hurdles 100m)
6) कॅडेट प्रियंजना लहाने 10th A (Hammer Throw)
7) कॅडेट सायली पवार 9th B (Walking 3km)
8)4*400 m रिले team
– कॅडेट स्वरा दुधाळे 9th B
– कॅडेट दुर्वा भोईटे 9th A
– कॅडेट सई भगत 9th A
– कॅडेट वंशिका सुर्वे 10th A
– कॅडेट तन्वी शिंदे 10th B.

वयोगट 19

1) कॅडेट शौर्या उदावंत 11 th A (400 मी)
2) कॅडेट गायत्री पाटील 9th B (थाळीफेक)
3) कॅडेट भक्ती मुंगसे 12th A ( गोळा फेक)
4) शर्वरी सुर्वे 12 th (Triple jump)
5) राधा आखाडे 12 th (Walking 3 km)
6) राधिका चव्हाण 10 th A
Hammer Throw
7) अनन्या हरपाळे 9th B (High jump)
8) आदिती देवकाते 12th (400 m hurdles)

*Silver Medal* 🥈

वयोगट —14

1) कॅडेट श्रावणी शेडगे 7th B (थाळी फेक)

वयोगट —17

1) कॅडेट तनिष्का बांदल 10th B (थाळीफेक)
2) कॅडेट स्वरा दुधाळे 9th B
(400 m hurdles)
3) कॅडेट आदिती माने 9th A
(100 m Hurdles)
4) कॅडेट तन्वी शिंदे 10th B (High jump)
5) कॅडेट तन्वी गोळे 10 th B
(Triple jump)
6) कॅडेट गिरिजा पटेकर 9th B
(Walking)

वयोगट —- 19

1) कॅडेट अपूर्वा केंजळे 11th A (3000 मीटर)
2) कॅडेट श्रुती मोरे 10 th B
(400 मीटर)
3) कॅडेट दिव्या सोनवणे 12th A (थाळीफेक)
4) कॅडेट शौर्या उदावंत 11th A (100 मीटर)
5) कॅडेट आदिती वणकोर 11 th (400 मी hurdles)
6) कॅडेट आर्या गोडांबे 12 th ( High jump)
7) कॅडेट अनन्या हरपळे 9th B
(Triple jump)
8) कॅडेट भक्ती मुंगसे 12 th A
(Walking)
9) कॅडेट नीरजा निकम 10 B
(Hammer Throw)
10) कॅडेट स्वराली देशमुख 9 th A(Javellin Throw)

Bronze medal 🥉

वयोगट —14

1) कॅडेट दिया मेहत्रे 6th A (400 मीटर)
2) कॅडेट अवंती ढमाले 8th A
( गोळा फेक)

वयोगट —17

1) कॅडेट देविका ताड 9th A ( थाळीफेक)
2) कॅडेट वंशिका सुर्वे 10th A (800 मीटर)

4*100 रिले

1) कॅडेट दक्षिता डुंबरे 10 th A
2) कॅडेट तन्वी गोळे 10 th B
3) कॅडेट रूपाली ढोरे 10 th A
4) कॅडेट सरिषा थोरात 9 th B
5) कॅडेट लावण्या मुंडासे 9th A

वयोगट —-19

1) कॅडेट श्रेया चव्हाण 11th A (गोळा फेक)
2) कॅडेट धनश्री हंगिरकर 12 th A (800 मीटर)
3) कॅडेट शौर्या उदावंत 11th A (200 मीटर)
4) कॅडेट साची भंगाळे 10 th A
(Javellin Throw)
5) शर्वरी सुर्वे 12 th
(Long jump)

6)4*100 रिले

1) कॅडेट आदिती देवकाते 12th
2) कॅडेट श्रुतिका संकपाळ 12th
3) कॅडेट भक्ती मुंगसे 12th
4) कॅडेट दिव्या सोनवणे 12th
5) कॅडेट राधा आखाडे 12 th

7)4*400 रिले

* कॅडेट शौर्या उदावंत 11 th
* कॅडेट धनश्री हंगीरकर 12th
* कॅडेट श्रुतिका संकपाळ 12
* कॅडेट श्रद्धा राजुरकर 12 th
* कॅडेट आर्या गोडांबे 12th

CROSS COUNTRY
(UNDER – 19)
SELECTED STUDENTS FOR DISTRICT

1) कॅडेट प्रतीक्षा शिंदे 11th
2) कॅडेट जिजा मोहिते 11th

सर्व यशस्वी खेळाडू, ॲथलेटिक्स प्रशिक्षक श्री. ऋतुराज गुरव सर, मार्गदर्शक कु. तेजश्री दिघे, श्री. गौरव जाधव, श्री. रोहित कोठावळे, श्रीमती प्रतिक्षा सुतार, श्रीमती जयश्रीताई खरात, श्री. गजानन माळी, श्री. महादेव मगर, श्रीमती प्रियांका ताई जोडमोटे, श्री. राम काका दाहित यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन …
या यशाबद्दल सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे, शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड व सिनियर मास्टर श्री. संदीप पवार यांनी अभिनंदन केले…. 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

World literacy Day was celebrated on 08 Sep 25, Mon at MP Auditorium, RLMSS with zest as organised by Pune Institute of Business Management (PIMB), Lawasa Road, Pirangut, Pune

Prof Ms Smriti Bhowmick, President, Literacy Club, PIBM along with her 40 members contingent Student Volunteers conducted the Campaign interspersed with ice-breakers, various activities, competitions and fun games for
Class X, XI ,& XII Cadets while introducing Strategic Management and financial literacy to the participants.

The Workshop was conducted under the aegis of RLMSS ATL Club as coordinated by
Sou Manjiri Patil the ATL Manager (Welcome Speech), Sou Savitri Patil, PGT Physics & Mr Mahesh Kothar, PGT English (Inaugural Speech)

Professor Mayuresh Shendurnikar of PIBM described the initiative and purpose of such collaborative activities.

PIBM PGD students conducted a general Q&A Session based on the strategy.

Cdts Priyanjana Lahane, Siddhi Wadekar and Tanvi Daundkar’s group secured first, second and third ranks respectively while Cdts Sharvari Surve and Yashika Kadam’s team were deeply appreciated for their efforts.

The event was well received and turned out to be memorable with Mr Mahesh Kotkar professing the vote of thanks and concluded with a high-tea with the Delegates.

A few more such events are in the pipe-line.

Thanks, Prof Ms Smriti Bhowmick, Prof Mr Mayuresh Shendurnikar and Team PIBM.

~ The MES RLMSS Family

आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शिक्षक दिनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी परिपाठात आयोजित करण्यात आला. छात्रशाळे अंतर्गत कॅडेट श्रावणी गायकवाड ही आज प्राचार्य तर कॅडेट कादंबरी साळुंखे ही कमांडंट बनली होती.

सर्वप्रथम शिक्षक दिनाचे औचित्य, त्याचे महत्त्व कॅडेट प्रतीक्षा सलामपूरे हिने विषद केले, नंतर कॅडेट सिद्धी वाडेकर हिने सैनिकी प्रशाला म्हणजे जणू एक गुरुकुल असून तिथला प्रत्येक घटक हा शिक्षका इतकाच महत्त्वाचा आहे हे सांगितले. सर्व शिक्षक, मेट्रन्स यांना विद्यार्थिनींनी या निमित्ताने बुक मार्क्स दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट स्वराली ठेलकर हिने केले पार्मिता हडोळतीकर, कॅडेट श्रद्धा राजुरकर, कॅडेट ऋतुजा देवकाते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वाचा हातभार लावला.

आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सैनिकी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, माजी सिनिअर मास्टर श्री. श्याम नांगरे, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा प्रमुख सौ. मंजिरी पाटील, कॅडेट अश्विनी देवकर, कॅडेट द्राक्षायणी शिंगे यांनी किन्हई स्मार्ट व्हिलेज जिल्हा सातारा येथे सदिच्छा भेट दिली.
निसर्गाच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपलेले किन्हई गाव आहे.
गावातील पुरातन शिवमंदिर, राममंदिर, एकविरा माता मंदिर पाहताना तिथे जतन केलेल्या इतिहासकालीन पाऊलखुणा
पाहण्याची संधी मिळाली.
तसेच UNESCO तर्फे Asia Pacific Award for Cultural Heritage Conservation for Award of Merit या सन्मानाने मानांकित असलेल्या साखरगडनिवासिनी रामवरदायिनी यमाई माता मंदिराला भेट देऊन तेथील पुरातन वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना पाहता आला.
प्रशालेचे हितचिंतक मा. डॉ. सतीशजी कुलकर्णी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार प्रशालेतील इयत्ता 10 वी अ ची cadet अश्विनी देवकर हिने प्रशालेतील विज्ञान अध्यापिका व मार्गदर्शक सौ. मंजिरी पाटील यांच्या सहकार्याने तयार केलेल्या आचार्य जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनावर आधारित Inventor of Wireless communication “Acharya sir Jagdish Chandra Bose”- A Tribute या पुस्तिकेचे वितरण याप्रसंगी गावातील ISO मानांकन प्राप्त असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात मा. मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांनी थोर भारतीय शास्त्रज्ञ आचार्य सर जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधन विषयक कार्याने प्रेरित व्हावे, स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय शास्त्रज्ञ यांनी विज्ञान संशोधन क्षेत्रात केलेली बहुमोल कामगिरी याची ओळख होणे व यातून प्रेरणा घेऊन संशोधन क्षेत्रात भावी पिढीने योगदान द्यावे या उद्देशाने या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे.
या पुस्तक वितरण कार्यक्रम प्रसंगी कॅडेट द्राक्षायणी शिंगे हिने सैनिकी प्रशालेविषयी माहिती व स्व अनुभव विशद केला तर कॅडेट अश्विनी देवकर हिने पुस्तकाविषयी माहिती दिली. सौ. मंजिरी पाटील यांनी पुस्तकातील सर्व अंतर्भूत घटक, भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय शास्त्रज्ञांची संशोधन क्षेत्रातील कामगिरी व आधुनिक काळातील तंत्रज्ञानविषयक भारताची यशस्वी वाटचाल याविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली व भावी पिढीचे भारताला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी संशोधन क्षेत्रातील योगदान याविषयी संवाद साधला.
पुस्तकनिर्मिती साठी म ए सो आजीव मंडळ सदस्या डॉ. नेहा देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रशालेचे माजी पर्यवेक्षक व सिनिअर मास्टर श्री श्याम नांगरे यांनी सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रिया कशी असते व शौर्य शिबिर याविषयी माहिती व्हिडीओ क्लिप व प्रेझेंटेशन द्वारे दिली.
गावाचे सुपुत्र मा. डॉ. सतिशजी कुलकर्णी व कुटुंबिय यांच्या योगदानामुळे व आर्थिक सहाय्याने गावाचा विकास स्मार्ट व्हिलेज च्या दिशेने उत्तरोत्तर होत आहे.
एकूणच सदिच्छा भेट अतिशय आनंददायी, प्रेरक, फलद्रुप ठरली नवीन घटकांशी सैनिकी शाळेचे ऋणानुबंध जोडले गेले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. श्याम नांगरे यांनी केले. हा दिवस अविस्मरणीय करणाऱ्या घटकांमध्ये उत्तम व्यवस्था करणारे श्री. गजानन भोसले, यमाई मंदिराचे मुख्य डॉ. अयाचित, प्रशालेचे संयोजक श्री. एन. डी. गायकवाड सर व प्रशालेतील सर्व स्टाफ यांचा मोलाचा वाटा होता.

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद रोल बॉल स्पर्धेसाठी मुलींना अनुभव मिळावा व येणाऱ्या स्पर्धेत आत्मविश्वासाने खेळण्यास मदत व्हावी, या उद्देशाने Speed Skating स्पर्धा झाल्यानंतर पालकांशी चर्चा करून जवळच बालेवाडी, बाणेर येथे झालेल्या “नारीशक्ती जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धेत” सहभाग घेण्यात आला.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथील कॅडेट्स –

🏅 कॅडेट काव्या पाटे
🏅 कॅडेट मोक्षदा बाबर
🏅 कॅडेट सायली शिंदे

यांनी National Sports Day 2025 निमित्त (आयोजक – District Roll Ball Association, Pune) आयोजित स्पर्धेत सहभाग घेतला व उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medals) जिंकले. 🏆🥇✨

सर्व खेळाडू, स्केटिंग व रोलबाॅल प्रशिक्षक श्री. विशाल मालपोटे सर, पालक यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित
ग्रामीण जिल्हास्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा (रिंक रेस व रोड रेस) – २०२५

रिंक रेस ठिकाण – विमाननगर स्केटिंग रिंक, विमाननगर, पुणे.
रोड रेस ठिकाण – शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, सायकलिंग ट्रॅक जवळ, पुणे.

📅 ३० ऑगस्ट – रिंक रेस निकाल.

🏁 ५०० मीटर स्पर्धा

🥇 कॅडेट काव्या सतीश पाटे (इ. ८वी ‘ब’) – सुवर्णपदक (Quads)
🥈 कॅडेट सायली सुशील शिंदे (इ. १०वी ‘ब’) –रौप्यपदक (Quads)
🥈 कॅडेट मोक्षदा विजयकुमार बाबर (इ. ७वी ‘अ’) – रौप्यपदक (Inline).

🏁 १००० मीटर स्पर्धा

🥈 कॅडेट काव्या सतीश पाटे (इ. ८वी ‘ब’) – रौप्यपदक (Quads)
🥈 कॅडेट मोक्षदा विजयकुमार बाबर (इ. ७वी ‘अ’) – रौप्यपदक (Inline)

📅 ३१ ऑगस्ट – रोड रेस निकाल.

🏁 ३००० मीटर स्पर्धा

🥇 कॅडेट सायली सुशील शिंदे (इ. १०वी ‘ब’) – सुवर्णपदक (Quads)
🥈 कॅडेट मोक्षदा विजयकुमार बाबर (इ. ७वी ‘अ’) – रौप्यपदक (Inline)
🥈 कॅडेट काव्या सतीश पाटे (इ. ८वी ‘ब’) – रौप्यपदक (Quads)

🏁 १ LAP स्पर्धा

🥈 कॅडेट मोक्षदा विजयकुमार बाबर (इ. ७वी ‘अ’) – रौप्यपदक (Inline)

✨ एकूण पदके : ९ ✨

🥇 सुवर्णपदक : २
🥈 रौप्यपदक : ७
🥉 कांस्यपदक : ०

👑 खेळाडूनिहाय कामगिरी (टॉप):

🥈🥈🥈🥈कॅडेट मोक्षदा विजयकुमार बाबर – ४ रौप्यपदके (Inline)
🥇🥈🥈कॅडेट काव्या सतीश पाटे – १ सुवर्ण + २ रौप्यपदके (Quads)
🥇🥈कॅडेट सायली सुशील शिंदे – १ सुवर्ण + १ रौप्यपदक (Quads)

🌟 अभिमानाची गोष्ट! 🌟

🏅 कॅडेट मोक्षदा बाबर
🏅 कॅडेट काव्या पाटे
🏅 कॅडेट सायली शिंदे

या तिघींची ही शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. 🎊

✨ सर्व विजयी व सहभागी खेळाडू, स्केटिंग प्रशिक्षक श्री. विशाल मालपोटे सर, पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!… 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित
ग्रामीण जिल्हास्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा (रिंक रेस) – २०२५
ठिकाण – विमाननगर स्केटिंग रिंक, विमाननगर, पुणे

रिंक रेस निकाल

🏁 ५०० मीटर स्पर्धा
🥇 कॅडेट काव्या सतीश पाटे (इ. ८वी ‘ब’) – सुवर्णपदक (Quad)
🥈 कॅडेट सायली सुशील शिंदे (इ. १०वी ‘ब’) – रौप्यपदक (Quad)
🥈 कॅडेट मोक्षदा विजयकुमार बाबर (इ. ७वी ‘अ’) – रौप्यपदक (Inline)

🏁 १००० मीटर स्पर्धा
🥈 कॅडेट काव्या सतीश पाटे (इ. ८वी ‘ब’) – रौप्यपदक (Quad)
🥈 कॅडेट मोक्षदा विजयकुमार बाबर (इ. ७वी ‘अ’) – रौप्यपदक (Inline)

✨ सर्व कॅडेट्सचे व स्केटिंग प्रशिक्षक श्री. विशाल मालपोटे सर, पालक यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन… 💐💐🙏🙏

29 Aug 25 / Fri

Marking the birth anniversary of Hockey Legend & Olympian Maj Shri Dhyan Chand ji being celebrated as National Sports Day, RLMSS held the Inaugural Ceremony of the Championship organised by Shri Sandeep Pawar & Team of Instructors.

Sports Cadet Captain Cdt Bhakti Nitin Mungase of Class XII administered the Govt of Maharashtra & RLMSS Championship Oath.

Followed the Inaugural Kabaddi Match organised by Shri Mahadev Magar & Officials drew a great response and Cadets participated wirh all happiness and enthusiasm. Jijamata House emerged as Winners…

Parallelly, Dr Sneha Divekar, the Founder Director of National Sports Dentistry Committee, along with her able Team of Dentists conducted a Sports Dental Screening Camp for Cadets and Staff in the most desirable manner and made the Cadets aware of Sports Dentistry and connected topics.

Memorable and usefully gained a day.

With best wishes,

~ The MES RLMSS Family, Pune

दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नॅशनल स्पोर्ट्स डेंटिस्ट्री कमिटी डायरेक्टर डॉक्टर स्नेहा दिवेकर ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भारताचे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंदजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट असे संचलनाचे प्रात्यक्षिक केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शाळेमध्ये अंतर कुल कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. आपल्या शाळेतील स्पोर्ट्स कॅप्टन कॅडेट भक्ती मुंगसे, स्पोर्ट्स वाईस कॅप्टन कॅडेट रिद्धी पासलकर यांनी सर्व विद्यार्थिनींना क्रीडा शपथ दिली. क्रीडा स्पर्धा चालू असतानाच दुसरीकडे सर्व विद्यार्थिनींचे डेंटल चेकअप आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर स्नेहा दिवेकर आणि त्यांच्या सर्व टीमच्या मदतीने करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे व संदीप पवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशिक्षक, अश्वशाळा ते पाकशाळा या सर्वांच्या मदतीने कार्यक्रम उत्कृष्ट पार पडला.

15 to 17 Aug 25

Marking the ongoing and continued efforts by Pune based Maharashtra Education Society to spread goodwill laced with humanitarian acts among the society and stakeholders.

Sou Ananditai Mahesh Patil, Vice Chairman, Governing Body, MES, who is also the Chairman, RLMSS, accompanied by Ananda Sangha Devotees of Pune Centre
made a
Goodwill Visit to Brindavan, Mathura (UP) and interacted with the Inmates and woman Volunteers of the Ashram which is run by
Pujyashri Paramhansa Yogananda charitable trust being managed presently by Madam Jayita, the Manager.

The Group of devotees from Pune centre of Ananda Sangha visited the old age home. Ananda Sangha is a spiritual organization based on the teachings of the great saint of kriya yog Paramhans Yogananda.

Devotees from Pune spent time with matas, did seva & celebrated Janmashtami with them in the land of Bhagwan ShriKrishna.

The Goodwill Ambassadors from MES exchanged compliments and goodies and joined hands to add some more happiness and positivity in the lives of the Senior inmates and discussed the way ahead…

~ In the service of human kind and for holistic excellence,

For,
~ The Maharashtra Education Society, Pune

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उत्साहात साजरा…

शालेय प्रथेप्रमाणे यंदाही शाळेमध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता दहावीचा वर्ग व वर्ग शिक्षक यांनी उत्कृष्ट पद्धतीने गणेशोत्सवाचे नियोजन केले. पारंपारिक टाळाच्या नादात व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून पारंपारिक पद्धतीने गणेशाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. सैनिकी शाळेच्या परंपरेला साजेसा ऑपरेशन सिंदूर या विषयावर देखावा सादर करण्यात आला. पहेलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा निषेध आणि ऑपरेशन सिंदूर ची माहिती आणि जनजागृती व्हावी या उद्देशाने ऑपरेशन सिंदूर हा देखावा यावेळी सादर करण्यात आला. भारतीय सशस्त्र दलांनी केलेला हल्ला, युद्धात वापरलेली ब्रह्मोस मिसाइल आणि विमाने यांची प्रतिकृती ही तयार करण्यात आली होती. पाकिस्तानच्या ज्या भागांमध्ये हल्ला करण्यात आला त्या भागांना नकाशामध्ये दाखवून त्याची माहिती दाखवण्यात आली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॅडेटसनी गणेश पंचाक्षर स्तोत्र, अथर्वशीर्ष याचे पठण केले. सांस्कृतिक कार्यक्रमात आमच्या काळातील गणपती ही नाटिका, गणेश वंदना, नृत्य आणि गणेशाचे कीर्ती असणारे कीर्तन सादर करण्यात आले.
कॅडेटसमध्ये आपल्या भारतमातेच्या प्रति देशभक्ती राष्ट्राभिमान निर्माण व्हावा या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता. दहावी अ व ब वर्गशिक्षक श्री अद्वैत जगधने व भाऊसाहेब मार्तंड यांनी केले होते.
उत्सवाच्या मागील प्रेरणास्थान प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडंर श्री. यज्ञरामन सर, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम, सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे, पीआरओ श्री. संदीप पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सैनिकी परिवाराने विशेष परिश्रम घेतले.
शाला समिती च्या अध्यक्षा सौ. आनंदी पाटील मॅडम, महामात्रा सौ. चित्रा नगरकर मॅडम, महामात्र डॉ. श्री. उमेश बिबवे सर यांनी सर्व सैनिकी परिवाराचे कौतुक करुन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.


आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या प्रशालेतील इयत्ता आठवी ब या वर्गातील कॅडेट रिद्धी गिरीश सुपेकर हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींमध्ये पर्यावरणाविषयी रुची निर्माण व्हावी या उच्च हेतूने प्रशालेस श्री व सौ प्रणाली गिरीश सुपेकर यांनी 25 औषधी वनस्पती व बागकाम साहित्य भेट म्हणून दिले.
साहित्य स्वीकारण्यासाठी प्रशालेच्या इयत्ता आठवी ब वर्गातील कॅडेट्स, मा मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री श्याम नांगरे, ज्येष्ठ शिक्षक श्री अद्वैत जगधने, सौ मंजिरी पाटील, श्री भाऊसाहेब मार्तंड, श्री रविराज थोरात व श्री मंगेश पाटील हे उपस्थित होते.

Topic :
Ethical leadership in Innovation

25 Aug 25 / Mon
Session conducted by Commandant Avn Wg Cdr M Yagnaraman, Commandant RLMSS
for the cadets of classes VI to XI.

AIM –
Atal Innovation Mission, NITI Aayog in partnership with The Global Education & Leadership Foundation (tGELF), had curated and launched a module on Ethical Leadership in
Tinkering and Innovation for the Atal Tinkering Labs initiative.

This module primarily focusses on educating and enabling students about four keys concepts –

Leadership Skills, Ethics, Altruism and Decisive Action and their relevance in pursuit of technological innovation.

The talk emphasised on holistic development of Cadets, through integration of value-based components into academic curriculum using an experiential approach, aimed towards creating mindful, strong, ethical citizens, leaders and change makers, thereby enabling them to contribute to a better future for the country and the world. Core values for an ideal leadership like Trust, Care, Sharing, Communication etc were explained with real life scenarios which is sure to help the participants in charting their vision for themselves. The goal is to empower students to embrace and practice ethical leadership.

ATL Cadet Reps of class XI and IX shared their opinions and ATL Incharge Mrs Manjiri Patil concluded the session with valuable insights into the speech.

The event was well coordinated by Mrs.Vaishali Shinde, Science Dept, RLMSS.

मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार अंबोली पुणे येथे रोटरी क्लब गांधीनगर पुणे यांच्यातर्फे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 संपन्न झाले. प्रशालेच्या वसतिगृह विभागातील मेडिकल रूम येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. रोटरी क्लब गांधीनगर पुणे यांच्या मा. सौ. अश्विनी शिलेदार प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब गांधीनगर पुणे, सौ. संगीता जोशी समन्वयक या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सध्याच्या काळात महिलांच्या आरोग्यविषयक अनेक समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यातीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. बऱ्याच वेळा महिलांचे याकडे दुर्लक्ष होते व काही महिला याविषयी मोकळेपणाने बोलायला, तपासणी करायला घाबरतात. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून प्रशालेने रोटरी क्लबच्या मदतीने या शिबिराचे आयोजन केले. प्रशालेतील तसेच कासार अंबोली गावातील महिलांना ब्रेस्ट कॅन्सर विषयी माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येक महिलेची तज्ञ डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी देखील करण्यात आली. कासार आंबोली गावातील तसेच सैनिकी परिवारातील एकूण 110 महिलांची तपासणी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम, वसतीगृह विभाग प्रमुख सौ. रेखा रायपूरकर, सौ वैशाली शिंदे, इस्टेट सुपरवायजर श्री. समीर जाधव, मेस मॅनेजर श्री. नवनाथ पवार व मेट्रन इन्चार्ज श्रीमती प्रियांका गुरव उपस्थित होत्या. प्रशालेतील महिला शिक्षिका, मेस मधील सर्व महिला कामगार, साफसफाई करणाऱ्या महिला कामगार, सैनिकी परिवारातील सर्व महिला, कासार आंबोली गावातील महिला, हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल येथील महिला शिक्षिका यांनी शिबिराचा लाभ घेतला.
सदर शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत संपन्न झाले.
प्रशालेचे कमांडर विंग कमांडर यज्ञरमण सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री संदीप पवार व प्रशालेतील सर्व वसतिगृह विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर संपन्न झाले.

🌳🌳🌳
आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी इयत्ता 8वी ब..
कॅडेट स्वरा ढोबळे च्या पालकांनी झेंडू, शेवंती व तुळशी ची रोपे दिली. त्यांच्या शेतातील वेगवेगळ्या रंगाची ढोबळी मिर्ची मेस मध्ये विद्यार्थिनीसाठी आणली. यासाठी वसतिगृह विभागातील प्रमुख श्रीमती. प्रियंका गुरव मॅडम यांनी विशेष प्रयत्न केला.
तसेच पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, श्री. भाऊसाहेब मार्तंड, श्री. समीर जाधव, कु. तेजश्री दिघे आणि काही विद्यार्थिनी तसेच, माळी कामगार श्री. दादा कंधारे, श्री. महाले काका व पर्यावरण क्लब मधील विद्यार्थिनी यांनी रोपे स्विकारली.

धन्यवाद… 👏🌳🌳🌳

दिनांक २३ ऑगस्ट २०२५ शनिवार रोजी इयत्ता ६ वी ते ८ वी च्या कॅडेट्ससाठी सकाळी ११ वा. ‘स्वच्छता, सुरक्षा आणि कचरा नियोजन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर व्याख्यानासाठी उद्योजक श्री. अनिल लक्ष्मण चोंधे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले.
व्याख्यानाची सुरुवात आनंदी शनिवार पासून करून त्यांनी नागरी शिष्टाचार, ओला सुका कचरा नियोजन, प्लास्टिक बंदी, प्रदूषण तसेच वैयक्तिक, वस्तीगृह आणि शाळेतील स्वच्छता या सर्व विषयांवर कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
सौ. राजश्री गोफणे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी कॅडेट हिंदवी दांगट आणि कॅडेट आभा बाजड या कॅडेट्सनी वक्त्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले.
तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सौ. सावित्री पाटील आणि सौ. राजश्री गोफणे यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेचे मा. कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञ रामन सर आणि शिक्षक वृंद हजर होते.

Jai hind…

⚜️⚜️ एक पेड माॅं के नाम!⚜️⚜️

आज आनंदी शनिवार दिनांक 23/8/ 2025 रोजी इयत्ता सहावी ते आठवी वर्गातील कॅडेट्सनी पर्यावरणाचे महत्त्व आणि स्काऊट गाईड चा उपक्रम एक पेड माॅं के नाम या उपक्रमांतर्गत काही रोपे स्वतः लावली. त्याचप्रमाणे शालेय परिसराची स्वच्छता देखील केली. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये विद्यार्थिनींनी बागकाम केले व त्याचा आनंद घेतला. पर्यावरण संरक्षण करणे किती गरजेचे आहे, खरे तर ही काळाची गरज आहे. ही संकल्पना बालचमुंच्या मनामध्ये रुजवली गेली.🙏🙏
या उपक्रमाचे नियोजन प्रशालेतील पर्यावरण प्रमुख श्री. भाऊसाहेब मार्तंड व गाईड प्रमुख सौ. दिपाली आंबेकर यांनी केले. तरी या उपक्रमासाठी कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञरामन आणि प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांचे मार्गदर्शन लाभले.⚜️🙏

गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली ता. मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुळशी तालुकास्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन मुळशीचे आमदार मा. श्री शंकर भाऊ मांडेकर यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गटनेते श्री. शांतारामदादा इंगवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भाऊ मोरे, माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सुनील भाऊ वाडकर, मुख्याध्यापक श्री. संतोष बनकर, सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांच्या उपस्थितीत झाले. मुळशी तालुक्यातील एकूण 32 शाळांमधील मुले 193 व मुली 104 मिळून एकूण 297 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अतिशय उत्साहात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून श्री. पवन कातकडे व पंच म्हणून श्री. समीर इनामदार, श्री. गणेश आंटाट, श्री. सूरज साठे, श्री. विनायक पाटील, कु. तेजश्री दिघे यांनी कामकाज पाहिले. या स्पर्धेचे आयोजन पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर व सर्व सैनिकी परिवाराने केलेले होते.
या स्पर्धेत सैनिकी शाळेच्या कॅडेटसनी उल्लेखनीय कामगिरी केली.

वयोगट 19 मुली
1) सई पोरे (सैनिकी शाळा)
2) तन्वी दौंडकर (सैनिकी शाळा)
3) शर्वरी लोणकर (सैनिकी शाळा)
4) श्रेया चव्हाण (सैनिकी शाळा)
5) ऋतुजा कापरे (सैनिकी शाळा)
(सर्व सैनिकी शाळा)

वयोगट 19 वर्षांखालील मुले

1) अरहंत राठोरे (ब्ल्यू रिझ स्कूल)
2) अर्चिसमन वडांगेकर (ध्रुव ग्लोबल स्कूल)
3) आरुष पंडित (ध्रुव ग्लोबल स्कूल)
4) ईशान मंत्री (ध्रुव ग्लोबल स्कूल)
5) इकरा त्रिपाठी (ध्रुव ग्लोबल स्कूल)

वयोगट 17 वर्षांखालील मुली

1) प्रशंसा दिवेदी (ध्रुव ग्लोबल स्कूल)
2) सुरभी दुखंडे (पेरीविंकल स्कूल)
3) अन्वेषा नाईक (श्री. श्री. रविशंकर स्कूल)
4) कार्तिकी आल्हाट (पेरीविंकल स्कूल)
5) सलोनी घोंगे (सैनिकी शाळा)

वयोगट 17 वर्षाखालील मुले

1) परम जालान (संस्कृती स्कूल)
2) अलौकिक सिन्हा (ब्ल्यू रिझ स्कूल)
3) अन्वय झेंडे (संस्कृती स्कूल)
4) अंश नायर (पवार पब्लिक स्कूल)
5) ईशान झंडू (संस्कृती स्कूल)

वयोगट 14 वर्षाखालील मुली

1) सुकन्या भुतडा (श्री. श्री. रविशंकर स्कूल)
2) अक्षया चांडक (श्री. श्री. रविशंकर स्कूल)
3) आराध्या बेलवाल (कलर्स अकॅडमी)
4) धान्वी झालवाडिया (कलर्स अकॅडमी)
5) तुलिका गंगाल (अवसरा अकॅडमी)

वयोगट 14 वर्षाखालील मुले

1) ईशान पी. वाय (ब्ल्यू रिझ स्कूल)
2) विनय सारंगेन (ब्ल्यू रिझ स्कूल)
3) विहान देशमुख (श्री श्री रविशंकर स्कूल)
4) ओम खर्डीकर (कलर्स स्कूल)
5) दर्श वशिष्ट (संस्कृती स्कूल)

या सर्व खेळाडूंची जिल्हास्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मुळशी तालुकास्तर शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील एकूण 50 कॅडेट ने सहभाग घेतला होता त्यापैकी
1) सुवर्णपदक —–18
2) रौप्यपदक —–17
3) कांस्यपदक —–08

सर्व यशस्वी कॅडेट व मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक पै. प्रतिक्षा सुतार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, क्रीडा प्रशिक्षक कु. तेजश्री दिघे, मेट्रन जयश्रीताई खरात व श्री राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…

एकूण 18 कॅडेट ला जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी शुभेच्छा…
💐💐💐

21 Aug 25

The MES RLMSS extends heartiest congratulations to

Shri Advait Sitaram Jagadhane – AJ (PGT – Geography)

&

Sou Manjiri Mahesh Patil, PGT – Science & ATL incharge of RLMSS

in having been elected as Members of Board of study of Maharashtra Textbook & Curriculum for revising Geography & Science Textbooks respectively for Secondary School level curricula based
on the latest and revised guidelines issued by SCF-2024 and NEP – 2020.

These extensive research oriented textbooks will be brought into use from the Academic Year 2026 -27 onward.

You made us proud, dear Mr AJ & Ms MP…

Many more laurels to come…

With best of our wishes,

🙏
~ The MES RLMSS Family, Pune

आज दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशालेत शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त सर्व शिक्षकेत्तर बंधू भगिनींच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला. गोकुळाष्टमी निमित्त मुलींच्या सैनिकी शाळेत आंतरकुल इंग्रजी सुविचारांची दहीहंडी घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इ. सहावीचे पालक प्रतिनिधी ॲड. सौ. स्वप्नाली साळुंखे, उद्योजक श्री. प्रदीप साळुंखे, सिनियर मास्टर श्री. शाम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मंजिरी पाटील व सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णांचे पूजन झाल्यानंतर
संगीताच्या तालावर पावसाच्या सरी झेलत इ. सहावी ते बारावीच्या सर्व कॅडेटसने दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला. दहीहंडी फोडणे स्पर्धेत जिजामाता कुलाने एकावर एक तीन थर रचत दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर सर्व कॅडेटस व सैनिकी परिवाराला दहीकाल्याचा प्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा विभागाने केले होते. श्री महादेव मगर, सुभेदार श्री. नवनाथ पवार, हवालदार श्री. गजानन माळी, श्री. विनायक पाटील, कु. तेजश्री दिघे, रेक्टर श्रीमती प्रियांका गुरव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन केले होते.

🎓⚖️आज शनिवार, दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी स्काऊट गाईड व आनंदी शनिवार अंतर्गत प्रशालेमध्ये “करियर इन लॉ” यावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. सौ. स्वप्नाली साळुंखे पालक प्रतिनिधी 6 वी तसेच सामाजिक कार्यकर्ते व बिझनेस मॅन श्री. प्रदीप साळुंखे यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे कॅडेटसना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी वकिली पेशा, त्याच बरोबर वकील होण्यासाठी कोणती तयारी करावी. तसेच या व्यवसायामध्ये कशा संधी आहेत, याचे ही महत्त्व सांगितले. वकील होण्यासाठी कोणत्या प्रवेश परीक्षा असतात, तसेच वकिली संदर्भात सर्व माहिती व मार्गदर्शन केले. मुलींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

⚜️कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे आजच्या पाहुण्यांनी मुलींनी स्वतः तयार केलेल्या “बुके” चे खूप कौतुक केले. व प्रशालेस जास्वंदीची रोपे भेट म्हणून दिली. याचा उपयोग कॅडेट्स ना नक्की होईल असेही ते म्हणाले.⚜️

या कार्यक्रमासाठी शाळेचे कमांडंट एविएन एअर विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
पाहुण्यांचे स्वागत आणि आभार मा. पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे नियोजन व परिचय सौ. दिपाली आंबेकर यांनी केले. कार्यक्रमांमध्ये ए. एन. ओ. सौ. राजश्री गोफणे, दिपाली भावसार, रेक्टर प्रियांका गुरव व मेट्रन्स यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.⚖️🎓🙏

15 Aug 25 / Fri

Marking the 79th Indian Independence Day Celebrations, Times of India, a daily of National Repute featured 6 of the NCC Cadets of Pune Group (2 each of Army, Navy and Air Force) in which

Cadet Sgt Sarisha Thorat of Class IX, an appointment Cadet of RLMSS, Pune was selected to represent and She did well in the Interctive Interview as per the details seen in the clippings…

The event was coordinated at RLMSS level by
ANO Sou Rajashree Gophane, 3 Mah Air NCC Sqn.

Thanks to Gp Hq NCC, Pune and Wg Cdr Shailendra Marathe, Commanding Officer, 3 Mah Air NCC Sqn, Pune.

With best of our wishes,

~ The MES RLMSS Family

आज 15 ऑगस्ट 2025 रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय सैन्य दलातील माजी अधिकारी मेजर श्री. गौरव दुबे (निवृत्त) यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन झाले. याप्रसंगी सौ. टिनेबा दुबे, उद्योजक श्री. महेश पाटील, शाळेच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, स्काॅड्रन लीडर श्री. गोपालकृष्णन, श्री. श्रीरंग कुलकर्णी सौ. सविता कुलकर्णी, ॲड. श्री. हरिश्चंद्र खिरीड, शाळेचे कमांडंट विंग कमांडर एविएन श्री. एम. यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, शाळेचे सीनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सुभेदार श्री. नवनाथ पवार, मंजिरी पाटील, महेश कोतकर हे उपस्थित होते. सैनिकी शाळेच्या कॅडेटस नी बॅंडच्या तालावर शानदार संचलन करत राष्ट्रीय ध्वजाला व प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. या निमित्ताने शाळेत कॅडेट्सचा पदवीदान समारंभ पार पडला. सर्व रँक होल्डर्स ला त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत रँक देण्यात आली. त्यानंतर बँडच्या पथकाचे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण झाले. या वर्षी नव्यानेच दाखल झालेल्या 6 वी च्या स्काऊटच्या कॅडेटसचे ही शानदार संचलन झाले. आपल्या मनोगतात बोलताना अतिथी श्री. गौरव दुबे यांनी आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नसून सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या आपली वाटचाल करीत आहेत, सैन्य दलामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी या बजावत आहेत आणि याचे उदाहरण म्हणजे आता सिंदूर ऑपरेशन मध्ये महिलांचे असलेले प्रत्यक्ष योगदान, यामुळे तुम्हाला आणखी संधी असल्याचे सांगितले. परेडचे नेतृत्व परेड कमांडर कॅडेट शैजल पाटील हिने केले होते.
79 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रशालेतील इयत्ता 10 वी अ ची cadet अश्विनी देवकर हिने प्रशालेतील विज्ञान अध्यापिका व मार्गदर्शक सौ. मंजिरी पाटील यांच्या सहकार्याने तयार केलेल्या आचार्य जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनावर आधारित Inventor of Wireless communication “Acharya sir Jagdish Chandra Bose”- A Tribute या पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेचे हितचिंतक मा. श्री सतिशजी कुलकर्णी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार शालेय विद्यार्थ्यांनी थोर भारतीय शास्त्रज्ञ आचार्य सर जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधन विषयक कार्याने प्रेरित व्हावे तसेच संशोधन क्षेत्रात भावी पिढीने योगदान द्यावे या उद्देशाने या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे.
पुस्तकनिर्मिती साठी म.ए.सो. आजीव मंडळ सदस्या डॉ. नेहा देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे पर्यवेक्षक सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे यांनी संयोजन केले तर श्री. रविराज थोरात यांनी तांत्रिक सहकार्य केले.
या पुस्तिकेचे वितरण मएसो च्या विविध प्रशालेतील विद्यार्थी तसेच पुणे व ग्रामीण भागातील इ.9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रशालेतर्फे करण्यात येणार आहे.
शिवगर्जनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी ब्लू रिझ स्कूल हिंजवडी येथे झालेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सैनिकी शाळेच्या कॅडेटस नी वयोगट 19 मुलींच्या गटाचे उपविजेतेपद पटकाविले. सर्व कॅडेटस, मार्गदर्शक श्री. विनायक पाटील, मेट्रन दिव्या ताई आणि राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…

DATE 13/08/2025

The ATL Session of ‘SQL and Python Programming’ is taken by Students and Faculty members Prof. Rupa Kawchale,
Dr. Ketaki Kshirsagar of VIIT College of Engineering, Kondhwa campus.

This Session includes the Basics regarding SQL database generation and use of the Python Programming language which helps us in critical coding of Websites and digital applications.
After the sessions, the Certificate of Appreciation was given to the VIIT college of Engineering team in the presence of Sau. Savitri Patil mam and Shri. Shivdas Kapure sir
This Session was Coordinated and organised by Sau. Manjiri Patil mam (incharge ATL RLMSS) in association with VIIT IEEE outreach program team incharge Prof. Dipti Pandit.
Teacher Coordinators :
“Shri. Shivdas Kapure sir
Shri. Mangesh Patil

Participation of cadets of MES RLMSS in ATL Mega Tinkering Day : Atal Innovation Mission organized Mega Tinkering Day online on 12th August 2025 from 10.00 am to 11.00 am. This activity was implemented simultaneously in all schools across the country on the same day.Mega Tinkering Day was a one-day event where students from all 10,000
ATLs will build a DIY project together, with the goal of promoting an
innovative spirit among students and creating a national highlight event. 60 cadets from classes 6th to 11th from the ATL club of Rani Lakshmibai Girls Military School participated enthusiastically. They were guided to make a Vaccum Cleaner. The cadets made a Vaccum Cleaner using the materials provided.

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतिल इयत्ता सहावी ब च्या एकूण 48 विद्यार्थिनी प्रतिवर्षा प्रमाणे ह्या वर्षी देखील सामाजिक रक्षाबंधन साठी अंबडवेट येथील कातकरी आदिवासी वस्तीमध्ये दाखल झाल्या. वस्तीत गेल्यावर विद्यार्थीनींचे स्वागत शिक्षक श्री. सुदाम पवार व सौ. मारणे मॅडम यांनी केले. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्या ज्योती खिरीड मॅडम व शिक्षकांचे स्वागत केले. वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर असा परिपाठ सादर केला. त्यानंतर श्री सुदाम पवार यांनी वस्ती शाळेची माहिती सांगितली. प्रशालेतील श्री मंगेश पाटील सर यांनी
रक्षाबंधना विषयी माहिती सांगितली. माननीय प्राचार्या मॅडम यांनी वस्तीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी वस्ती शाळेत विद्यार्थ्यांना व वस्तीत घरोघरी जाऊन राख्या बांधल्या.
पुढे अमराळेवाडी येथे विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना राख्या बांधल्या.

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन तसेच प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम यांनी मार्गदर्शन केले. श्री. मार्तंड सर, श्री. मंगेश पाटील सर तसेच राम काका, जयश्री ताई यांनी या सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रमात सहभाग घेतला. या निमित्त वस्तीतील विद्यार्थ्यांना प्रशालेकडून खाऊ वाटप करण्यात आला.

‘नारळीपौर्णिमा’ हा दिवस ‘विश्व संस्कृत दिन’ म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील प्रशालेमध्ये ‘संस्कृत दिन’ दिनांक 9 ऑगस्ट २०२५ या दिवशी साजरा करण्यात आला. प्रशालेच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनींनी ‘संस्कृतरत्नावली’ हा कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेली ‘चित्रदर्शनी’. यामध्ये इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी वेगवेगळी चित्रे व त्यांची संस्कृत नावे यांचे प्रदर्शन भरवले होते. संस्कृतरत्नावली या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी नृत्य, नाट्य आणि स्तोत्रपठण यांची प्रस्तुती केली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड या आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ही इ.१०वी व इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी सरस्वती स्तवनावर नृत्य प्रस्तुती करून केली. संस्कृत शिक्षिका प्रियांका राजहंस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
अद्वैत वेदांताचे प्रवर्तक आदि शंकराचार्यांनी अनेक स्तोत्रांची रचना केली, त्यामधील ‘अर्धनारीनटेश्वर’ या स्तोत्रावर इ. १०वी च्या विद्यार्थिनींनी नृत्य प्रस्तुती केली. सर्व उपस्थितांना आदि शंकराचार्यांची माहिती इ. ९वी मधील कॅ. चैत्राली रोकडे ने सादर केली. इ. ८वी च्या विद्यार्थिनींनी नंतर लयबद्ध पद्धतीने सादर केलेल्या पांडुरंगाष्टकम् मुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. भावपूर्ण वातावरणाला हलकेफुलके करण्यासाठी इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी पुस्तकाचा संदेश विनोदी पद्धतीने अभिनयातून दाखवला. इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी नंतर ‘गुर्वाष्टकम्’ चे गायन केले. इ.१० वी च्या विद्यार्थिनींनी सनातन संस्कृतीच्या मुख्य प्रवाहातील अशा संवाद परंपरेमधील बहुश्रुत अशा ‘उमा बटुः संवादः’ यावर चार पात्री नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इ. १०वी च्या विद्यार्थिनींनी नंतर संस्कृत मध्ये भाषांतरित झालेल्या मनोरंजक गीतांचे गायन केले. अद्यतन काळात संस्कृतचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे म्हणून इ. ८वी च्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाच्या शेवटी संकल्पगीत गायन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड त्यांनी विद्यार्थिनींना संस्कृत भाषेचे महत्व व संस्कृत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे अतिथी कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ वी च्या कॅ तन्वी सराफ व कॅ सरिषा थोरात यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कॅ पूर्वजा खेडकर ने सर्वांचे आभार मानले. संस्कृत मध्ये संपूर्णपणे सादर केलेल्या या संस्मरणीय कार्यक्रमाचे नियोजन संस्कृत विभाग प्रमुख प्रियांका राजहंस यांनी केले होते.

Scroll to Top
Skip to content