म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उत्साहात साजरा…

शालेय प्रथेप्रमाणे यंदाही शाळेमध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता दहावीचा वर्ग व वर्ग शिक्षक यांनी उत्कृष्ट पद्धतीने गणेशोत्सवाचे नियोजन केले. पारंपारिक टाळाच्या नादात व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून पारंपारिक पद्धतीने गणेशाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. सैनिकी शाळेच्या परंपरेला साजेसा ऑपरेशन सिंदूर या विषयावर देखावा सादर करण्यात आला. पहेलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा निषेध आणि ऑपरेशन सिंदूर ची माहिती आणि जनजागृती व्हावी या उद्देशाने ऑपरेशन सिंदूर हा देखावा यावेळी सादर करण्यात आला. भारतीय सशस्त्र दलांनी केलेला हल्ला, युद्धात वापरलेली ब्रह्मोस मिसाइल आणि विमाने यांची प्रतिकृती ही तयार करण्यात आली होती. पाकिस्तानच्या ज्या भागांमध्ये हल्ला करण्यात आला त्या भागांना नकाशामध्ये दाखवून त्याची माहिती दाखवण्यात आली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॅडेटसनी गणेश पंचाक्षर स्तोत्र, अथर्वशीर्ष याचे पठण केले. सांस्कृतिक कार्यक्रमात आमच्या काळातील गणपती ही नाटिका, गणेश वंदना, नृत्य आणि गणेशाचे कीर्ती असणारे कीर्तन सादर करण्यात आले.
कॅडेटसमध्ये आपल्या भारतमातेच्या प्रति देशभक्ती राष्ट्राभिमान निर्माण व्हावा या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता. दहावी अ व ब वर्गशिक्षक श्री अद्वैत जगधने व भाऊसाहेब मार्तंड यांनी केले होते.
उत्सवाच्या मागील प्रेरणास्थान प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडंर श्री. यज्ञरामन सर, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम, सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे, पीआरओ श्री. संदीप पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सैनिकी परिवाराने विशेष परिश्रम घेतले.
शाला समिती च्या अध्यक्षा सौ. आनंदी पाटील मॅडम, महामात्रा सौ. चित्रा नगरकर मॅडम, महामात्र डॉ. श्री. उमेश बिबवे सर यांनी सर्व सैनिकी परिवाराचे कौतुक करुन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.


आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या प्रशालेतील इयत्ता आठवी ब या वर्गातील कॅडेट रिद्धी गिरीश सुपेकर हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींमध्ये पर्यावरणाविषयी रुची निर्माण व्हावी या उच्च हेतूने प्रशालेस श्री व सौ प्रणाली गिरीश सुपेकर यांनी 25 औषधी वनस्पती व बागकाम साहित्य भेट म्हणून दिले.
साहित्य स्वीकारण्यासाठी प्रशालेच्या इयत्ता आठवी ब वर्गातील कॅडेट्स, मा मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री श्याम नांगरे, ज्येष्ठ शिक्षक श्री अद्वैत जगधने, सौ मंजिरी पाटील, श्री भाऊसाहेब मार्तंड, श्री रविराज थोरात व श्री मंगेश पाटील हे उपस्थित होते.

Topic :
Ethical leadership in Innovation

25 Aug 25 / Mon
Session conducted by Commandant Avn Wg Cdr M Yagnaraman, Commandant RLMSS
for the cadets of classes VI to XI.

AIM –
Atal Innovation Mission, NITI Aayog in partnership with The Global Education & Leadership Foundation (tGELF), had curated and launched a module on Ethical Leadership in
Tinkering and Innovation for the Atal Tinkering Labs initiative.

This module primarily focusses on educating and enabling students about four keys concepts –

Leadership Skills, Ethics, Altruism and Decisive Action and their relevance in pursuit of technological innovation.

The talk emphasised on holistic development of Cadets, through integration of value-based components into academic curriculum using an experiential approach, aimed towards creating mindful, strong, ethical citizens, leaders and change makers, thereby enabling them to contribute to a better future for the country and the world. Core values for an ideal leadership like Trust, Care, Sharing, Communication etc were explained with real life scenarios which is sure to help the participants in charting their vision for themselves. The goal is to empower students to embrace and practice ethical leadership.

ATL Cadet Reps of class XI and IX shared their opinions and ATL Incharge Mrs Manjiri Patil concluded the session with valuable insights into the speech.

The event was well coordinated by Mrs.Vaishali Shinde, Science Dept, RLMSS.

मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार अंबोली पुणे येथे रोटरी क्लब गांधीनगर पुणे यांच्यातर्फे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 संपन्न झाले. प्रशालेच्या वसतिगृह विभागातील मेडिकल रूम येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. रोटरी क्लब गांधीनगर पुणे यांच्या मा. सौ. अश्विनी शिलेदार प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब गांधीनगर पुणे, सौ. संगीता जोशी समन्वयक या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सध्याच्या काळात महिलांच्या आरोग्यविषयक अनेक समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यातीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. बऱ्याच वेळा महिलांचे याकडे दुर्लक्ष होते व काही महिला याविषयी मोकळेपणाने बोलायला, तपासणी करायला घाबरतात. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून प्रशालेने रोटरी क्लबच्या मदतीने या शिबिराचे आयोजन केले. प्रशालेतील तसेच कासार अंबोली गावातील महिलांना ब्रेस्ट कॅन्सर विषयी माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येक महिलेची तज्ञ डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी देखील करण्यात आली. कासार आंबोली गावातील तसेच सैनिकी परिवारातील एकूण 110 महिलांची तपासणी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम, वसतीगृह विभाग प्रमुख सौ. रेखा रायपूरकर, सौ वैशाली शिंदे, इस्टेट सुपरवायजर श्री. समीर जाधव, मेस मॅनेजर श्री. नवनाथ पवार व मेट्रन इन्चार्ज श्रीमती प्रियांका गुरव उपस्थित होत्या. प्रशालेतील महिला शिक्षिका, मेस मधील सर्व महिला कामगार, साफसफाई करणाऱ्या महिला कामगार, सैनिकी परिवारातील सर्व महिला, कासार आंबोली गावातील महिला, हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल येथील महिला शिक्षिका यांनी शिबिराचा लाभ घेतला.
सदर शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत संपन्न झाले.
प्रशालेचे कमांडर विंग कमांडर यज्ञरमण सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री संदीप पवार व प्रशालेतील सर्व वसतिगृह विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर संपन्न झाले.

🌳🌳🌳
आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी इयत्ता 8वी ब..
कॅडेट स्वरा ढोबळे च्या पालकांनी झेंडू, शेवंती व तुळशी ची रोपे दिली. त्यांच्या शेतातील वेगवेगळ्या रंगाची ढोबळी मिर्ची मेस मध्ये विद्यार्थिनीसाठी आणली. यासाठी वसतिगृह विभागातील प्रमुख श्रीमती. प्रियंका गुरव मॅडम यांनी विशेष प्रयत्न केला.
तसेच पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, श्री. भाऊसाहेब मार्तंड, श्री. समीर जाधव, कु. तेजश्री दिघे आणि काही विद्यार्थिनी तसेच, माळी कामगार श्री. दादा कंधारे, श्री. महाले काका व पर्यावरण क्लब मधील विद्यार्थिनी यांनी रोपे स्विकारली.

धन्यवाद… 👏🌳🌳🌳

दिनांक २३ ऑगस्ट २०२५ शनिवार रोजी इयत्ता ६ वी ते ८ वी च्या कॅडेट्ससाठी सकाळी ११ वा. ‘स्वच्छता, सुरक्षा आणि कचरा नियोजन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर व्याख्यानासाठी उद्योजक श्री. अनिल लक्ष्मण चोंधे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले.
व्याख्यानाची सुरुवात आनंदी शनिवार पासून करून त्यांनी नागरी शिष्टाचार, ओला सुका कचरा नियोजन, प्लास्टिक बंदी, प्रदूषण तसेच वैयक्तिक, वस्तीगृह आणि शाळेतील स्वच्छता या सर्व विषयांवर कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
सौ. राजश्री गोफणे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी कॅडेट हिंदवी दांगट आणि कॅडेट आभा बाजड या कॅडेट्सनी वक्त्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले.
तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सौ. सावित्री पाटील आणि सौ. राजश्री गोफणे यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेचे मा. कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञ रामन सर आणि शिक्षक वृंद हजर होते.

Jai hind…

⚜️⚜️ एक पेड माॅं के नाम!⚜️⚜️

आज आनंदी शनिवार दिनांक 23/8/ 2025 रोजी इयत्ता सहावी ते आठवी वर्गातील कॅडेट्सनी पर्यावरणाचे महत्त्व आणि स्काऊट गाईड चा उपक्रम एक पेड माॅं के नाम या उपक्रमांतर्गत काही रोपे स्वतः लावली. त्याचप्रमाणे शालेय परिसराची स्वच्छता देखील केली. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये विद्यार्थिनींनी बागकाम केले व त्याचा आनंद घेतला. पर्यावरण संरक्षण करणे किती गरजेचे आहे, खरे तर ही काळाची गरज आहे. ही संकल्पना बालचमुंच्या मनामध्ये रुजवली गेली.🙏🙏
या उपक्रमाचे नियोजन प्रशालेतील पर्यावरण प्रमुख श्री. भाऊसाहेब मार्तंड व गाईड प्रमुख सौ. दिपाली आंबेकर यांनी केले. तरी या उपक्रमासाठी कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञरामन आणि प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांचे मार्गदर्शन लाभले.⚜️🙏

गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली ता. मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुळशी तालुकास्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन मुळशीचे आमदार मा. श्री शंकर भाऊ मांडेकर यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गटनेते श्री. शांतारामदादा इंगवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भाऊ मोरे, माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सुनील भाऊ वाडकर, मुख्याध्यापक श्री. संतोष बनकर, सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांच्या उपस्थितीत झाले. मुळशी तालुक्यातील एकूण 32 शाळांमधील मुले 193 व मुली 104 मिळून एकूण 297 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अतिशय उत्साहात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून श्री. पवन कातकडे व पंच म्हणून श्री. समीर इनामदार, श्री. गणेश आंटाट, श्री. सूरज साठे, श्री. विनायक पाटील, कु. तेजश्री दिघे यांनी कामकाज पाहिले. या स्पर्धेचे आयोजन पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर व सर्व सैनिकी परिवाराने केलेले होते.
या स्पर्धेत सैनिकी शाळेच्या कॅडेटसनी उल्लेखनीय कामगिरी केली.

वयोगट 19 मुली
1) सई पोरे (सैनिकी शाळा)
2) तन्वी दौंडकर (सैनिकी शाळा)
3) शर्वरी लोणकर (सैनिकी शाळा)
4) श्रेया चव्हाण (सैनिकी शाळा)
5) ऋतुजा कापरे (सैनिकी शाळा)
(सर्व सैनिकी शाळा)

वयोगट 19 वर्षांखालील मुले

1) अरहंत राठोरे (ब्ल्यू रिझ स्कूल)
2) अर्चिसमन वडांगेकर (ध्रुव ग्लोबल स्कूल)
3) आरुष पंडित (ध्रुव ग्लोबल स्कूल)
4) ईशान मंत्री (ध्रुव ग्लोबल स्कूल)
5) इकरा त्रिपाठी (ध्रुव ग्लोबल स्कूल)

वयोगट 17 वर्षांखालील मुली

1) प्रशंसा दिवेदी (ध्रुव ग्लोबल स्कूल)
2) सुरभी दुखंडे (पेरीविंकल स्कूल)
3) अन्वेषा नाईक (श्री. श्री. रविशंकर स्कूल)
4) कार्तिकी आल्हाट (पेरीविंकल स्कूल)
5) सलोनी घोंगे (सैनिकी शाळा)

वयोगट 17 वर्षाखालील मुले

1) परम जालान (संस्कृती स्कूल)
2) अलौकिक सिन्हा (ब्ल्यू रिझ स्कूल)
3) अन्वय झेंडे (संस्कृती स्कूल)
4) अंश नायर (पवार पब्लिक स्कूल)
5) ईशान झंडू (संस्कृती स्कूल)

वयोगट 14 वर्षाखालील मुली

1) सुकन्या भुतडा (श्री. श्री. रविशंकर स्कूल)
2) अक्षया चांडक (श्री. श्री. रविशंकर स्कूल)
3) आराध्या बेलवाल (कलर्स अकॅडमी)
4) धान्वी झालवाडिया (कलर्स अकॅडमी)
5) तुलिका गंगाल (अवसरा अकॅडमी)

वयोगट 14 वर्षाखालील मुले

1) ईशान पी. वाय (ब्ल्यू रिझ स्कूल)
2) विनय सारंगेन (ब्ल्यू रिझ स्कूल)
3) विहान देशमुख (श्री श्री रविशंकर स्कूल)
4) ओम खर्डीकर (कलर्स स्कूल)
5) दर्श वशिष्ट (संस्कृती स्कूल)

या सर्व खेळाडूंची जिल्हास्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मुळशी तालुकास्तर शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील एकूण 50 कॅडेट ने सहभाग घेतला होता त्यापैकी
1) सुवर्णपदक —–18
2) रौप्यपदक —–17
3) कांस्यपदक —–08

सर्व यशस्वी कॅडेट व मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक पै. प्रतिक्षा सुतार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, क्रीडा प्रशिक्षक कु. तेजश्री दिघे, मेट्रन जयश्रीताई खरात व श्री राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…

एकूण 18 कॅडेट ला जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी शुभेच्छा…
💐💐💐

21 Aug 25

The MES RLMSS extends heartiest congratulations to

Shri Advait Sitaram Jagadhane – AJ (PGT – Geography)

&

Sou Manjiri Mahesh Patil, PGT – Science & ATL incharge of RLMSS

in having been elected as Members of Board of study of Maharashtra Textbook & Curriculum for revising Geography & Science Textbooks respectively for Secondary School level curricula based
on the latest and revised guidelines issued by SCF-2024 and NEP – 2020.

These extensive research oriented textbooks will be brought into use from the Academic Year 2026 -27 onward.

You made us proud, dear Mr AJ & Ms MP…

Many more laurels to come…

With best of our wishes,

🙏
~ The MES RLMSS Family, Pune

आज दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशालेत शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त सर्व शिक्षकेत्तर बंधू भगिनींच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला. गोकुळाष्टमी निमित्त मुलींच्या सैनिकी शाळेत आंतरकुल इंग्रजी सुविचारांची दहीहंडी घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इ. सहावीचे पालक प्रतिनिधी ॲड. सौ. स्वप्नाली साळुंखे, उद्योजक श्री. प्रदीप साळुंखे, सिनियर मास्टर श्री. शाम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मंजिरी पाटील व सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णांचे पूजन झाल्यानंतर
संगीताच्या तालावर पावसाच्या सरी झेलत इ. सहावी ते बारावीच्या सर्व कॅडेटसने दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला. दहीहंडी फोडणे स्पर्धेत जिजामाता कुलाने एकावर एक तीन थर रचत दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर सर्व कॅडेटस व सैनिकी परिवाराला दहीकाल्याचा प्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा विभागाने केले होते. श्री महादेव मगर, सुभेदार श्री. नवनाथ पवार, हवालदार श्री. गजानन माळी, श्री. विनायक पाटील, कु. तेजश्री दिघे, रेक्टर श्रीमती प्रियांका गुरव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन केले होते.

🎓⚖️आज शनिवार, दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी स्काऊट गाईड व आनंदी शनिवार अंतर्गत प्रशालेमध्ये “करियर इन लॉ” यावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. सौ. स्वप्नाली साळुंखे पालक प्रतिनिधी 6 वी तसेच सामाजिक कार्यकर्ते व बिझनेस मॅन श्री. प्रदीप साळुंखे यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे कॅडेटसना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी वकिली पेशा, त्याच बरोबर वकील होण्यासाठी कोणती तयारी करावी. तसेच या व्यवसायामध्ये कशा संधी आहेत, याचे ही महत्त्व सांगितले. वकील होण्यासाठी कोणत्या प्रवेश परीक्षा असतात, तसेच वकिली संदर्भात सर्व माहिती व मार्गदर्शन केले. मुलींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

⚜️कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे आजच्या पाहुण्यांनी मुलींनी स्वतः तयार केलेल्या “बुके” चे खूप कौतुक केले. व प्रशालेस जास्वंदीची रोपे भेट म्हणून दिली. याचा उपयोग कॅडेट्स ना नक्की होईल असेही ते म्हणाले.⚜️

या कार्यक्रमासाठी शाळेचे कमांडंट एविएन एअर विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
पाहुण्यांचे स्वागत आणि आभार मा. पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे नियोजन व परिचय सौ. दिपाली आंबेकर यांनी केले. कार्यक्रमांमध्ये ए. एन. ओ. सौ. राजश्री गोफणे, दिपाली भावसार, रेक्टर प्रियांका गुरव व मेट्रन्स यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.⚖️🎓🙏

15 Aug 25 / Fri

Marking the 79th Indian Independence Day Celebrations, Times of India, a daily of National Repute featured 6 of the NCC Cadets of Pune Group (2 each of Army, Navy and Air Force) in which

Cadet Sgt Sarisha Thorat of Class IX, an appointment Cadet of RLMSS, Pune was selected to represent and She did well in the Interctive Interview as per the details seen in the clippings…

The event was coordinated at RLMSS level by
ANO Sou Rajashree Gophane, 3 Mah Air NCC Sqn.

Thanks to Gp Hq NCC, Pune and Wg Cdr Shailendra Marathe, Commanding Officer, 3 Mah Air NCC Sqn, Pune.

With best of our wishes,

~ The MES RLMSS Family

आज 15 ऑगस्ट 2025 रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय सैन्य दलातील माजी अधिकारी मेजर श्री. गौरव दुबे (निवृत्त) यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन झाले. याप्रसंगी सौ. टिनेबा दुबे, उद्योजक श्री. महेश पाटील, शाळेच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, स्काॅड्रन लीडर श्री. गोपालकृष्णन, श्री. श्रीरंग कुलकर्णी सौ. सविता कुलकर्णी, ॲड. श्री. हरिश्चंद्र खिरीड, शाळेचे कमांडंट विंग कमांडर एविएन श्री. एम. यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, शाळेचे सीनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सुभेदार श्री. नवनाथ पवार, मंजिरी पाटील, महेश कोतकर हे उपस्थित होते. सैनिकी शाळेच्या कॅडेटस नी बॅंडच्या तालावर शानदार संचलन करत राष्ट्रीय ध्वजाला व प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. या निमित्ताने शाळेत कॅडेट्सचा पदवीदान समारंभ पार पडला. सर्व रँक होल्डर्स ला त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत रँक देण्यात आली. त्यानंतर बँडच्या पथकाचे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण झाले. या वर्षी नव्यानेच दाखल झालेल्या 6 वी च्या स्काऊटच्या कॅडेटसचे ही शानदार संचलन झाले. आपल्या मनोगतात बोलताना अतिथी श्री. गौरव दुबे यांनी आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नसून सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या आपली वाटचाल करीत आहेत, सैन्य दलामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी या बजावत आहेत आणि याचे उदाहरण म्हणजे आता सिंदूर ऑपरेशन मध्ये महिलांचे असलेले प्रत्यक्ष योगदान, यामुळे तुम्हाला आणखी संधी असल्याचे सांगितले. परेडचे नेतृत्व परेड कमांडर कॅडेट शैजल पाटील हिने केले होते.
79 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रशालेतील इयत्ता 10 वी अ ची cadet अश्विनी देवकर हिने प्रशालेतील विज्ञान अध्यापिका व मार्गदर्शक सौ. मंजिरी पाटील यांच्या सहकार्याने तयार केलेल्या आचार्य जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनावर आधारित Inventor of Wireless communication “Acharya sir Jagdish Chandra Bose”- A Tribute या पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेचे हितचिंतक मा. श्री सतिशजी कुलकर्णी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार शालेय विद्यार्थ्यांनी थोर भारतीय शास्त्रज्ञ आचार्य सर जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधन विषयक कार्याने प्रेरित व्हावे तसेच संशोधन क्षेत्रात भावी पिढीने योगदान द्यावे या उद्देशाने या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे.
पुस्तकनिर्मिती साठी म.ए.सो. आजीव मंडळ सदस्या डॉ. नेहा देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे पर्यवेक्षक सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे यांनी संयोजन केले तर श्री. रविराज थोरात यांनी तांत्रिक सहकार्य केले.
या पुस्तिकेचे वितरण मएसो च्या विविध प्रशालेतील विद्यार्थी तसेच पुणे व ग्रामीण भागातील इ.9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रशालेतर्फे करण्यात येणार आहे.
शिवगर्जनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी ब्लू रिझ स्कूल हिंजवडी येथे झालेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सैनिकी शाळेच्या कॅडेटस नी वयोगट 19 मुलींच्या गटाचे उपविजेतेपद पटकाविले. सर्व कॅडेटस, मार्गदर्शक श्री. विनायक पाटील, मेट्रन दिव्या ताई आणि राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…

DATE 13/08/2025

The ATL Session of ‘SQL and Python Programming’ is taken by Students and Faculty members Prof. Rupa Kawchale,
Dr. Ketaki Kshirsagar of VIIT College of Engineering, Kondhwa campus.

This Session includes the Basics regarding SQL database generation and use of the Python Programming language which helps us in critical coding of Websites and digital applications.
After the sessions, the Certificate of Appreciation was given to the VIIT college of Engineering team in the presence of Sau. Savitri Patil mam and Shri. Shivdas Kapure sir
This Session was Coordinated and organised by Sau. Manjiri Patil mam (incharge ATL RLMSS) in association with VIIT IEEE outreach program team incharge Prof. Dipti Pandit.
Teacher Coordinators :
“Shri. Shivdas Kapure sir
Shri. Mangesh Patil

Participation of cadets of MES RLMSS in ATL Mega Tinkering Day : Atal Innovation Mission organized Mega Tinkering Day online on 12th August 2025 from 10.00 am to 11.00 am. This activity was implemented simultaneously in all schools across the country on the same day.Mega Tinkering Day was a one-day event where students from all 10,000
ATLs will build a DIY project together, with the goal of promoting an
innovative spirit among students and creating a national highlight event. 60 cadets from classes 6th to 11th from the ATL club of Rani Lakshmibai Girls Military School participated enthusiastically. They were guided to make a Vaccum Cleaner. The cadets made a Vaccum Cleaner using the materials provided.

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतिल इयत्ता सहावी ब च्या एकूण 48 विद्यार्थिनी प्रतिवर्षा प्रमाणे ह्या वर्षी देखील सामाजिक रक्षाबंधन साठी अंबडवेट येथील कातकरी आदिवासी वस्तीमध्ये दाखल झाल्या. वस्तीत गेल्यावर विद्यार्थीनींचे स्वागत शिक्षक श्री. सुदाम पवार व सौ. मारणे मॅडम यांनी केले. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्या ज्योती खिरीड मॅडम व शिक्षकांचे स्वागत केले. वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर असा परिपाठ सादर केला. त्यानंतर श्री सुदाम पवार यांनी वस्ती शाळेची माहिती सांगितली. प्रशालेतील श्री मंगेश पाटील सर यांनी
रक्षाबंधना विषयी माहिती सांगितली. माननीय प्राचार्या मॅडम यांनी वस्तीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी वस्ती शाळेत विद्यार्थ्यांना व वस्तीत घरोघरी जाऊन राख्या बांधल्या.
पुढे अमराळेवाडी येथे विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना राख्या बांधल्या.

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन तसेच प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम यांनी मार्गदर्शन केले. श्री. मार्तंड सर, श्री. मंगेश पाटील सर तसेच राम काका, जयश्री ताई यांनी या सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रमात सहभाग घेतला. या निमित्त वस्तीतील विद्यार्थ्यांना प्रशालेकडून खाऊ वाटप करण्यात आला.

‘नारळीपौर्णिमा’ हा दिवस ‘विश्व संस्कृत दिन’ म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील प्रशालेमध्ये ‘संस्कृत दिन’ दिनांक 9 ऑगस्ट २०२५ या दिवशी साजरा करण्यात आला. प्रशालेच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनींनी ‘संस्कृतरत्नावली’ हा कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेली ‘चित्रदर्शनी’. यामध्ये इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी वेगवेगळी चित्रे व त्यांची संस्कृत नावे यांचे प्रदर्शन भरवले होते. संस्कृतरत्नावली या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी नृत्य, नाट्य आणि स्तोत्रपठण यांची प्रस्तुती केली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड या आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ही इ.१०वी व इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी सरस्वती स्तवनावर नृत्य प्रस्तुती करून केली. संस्कृत शिक्षिका प्रियांका राजहंस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
अद्वैत वेदांताचे प्रवर्तक आदि शंकराचार्यांनी अनेक स्तोत्रांची रचना केली, त्यामधील ‘अर्धनारीनटेश्वर’ या स्तोत्रावर इ. १०वी च्या विद्यार्थिनींनी नृत्य प्रस्तुती केली. सर्व उपस्थितांना आदि शंकराचार्यांची माहिती इ. ९वी मधील कॅ. चैत्राली रोकडे ने सादर केली. इ. ८वी च्या विद्यार्थिनींनी नंतर लयबद्ध पद्धतीने सादर केलेल्या पांडुरंगाष्टकम् मुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. भावपूर्ण वातावरणाला हलकेफुलके करण्यासाठी इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी पुस्तकाचा संदेश विनोदी पद्धतीने अभिनयातून दाखवला. इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी नंतर ‘गुर्वाष्टकम्’ चे गायन केले. इ.१० वी च्या विद्यार्थिनींनी सनातन संस्कृतीच्या मुख्य प्रवाहातील अशा संवाद परंपरेमधील बहुश्रुत अशा ‘उमा बटुः संवादः’ यावर चार पात्री नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इ. १०वी च्या विद्यार्थिनींनी नंतर संस्कृत मध्ये भाषांतरित झालेल्या मनोरंजक गीतांचे गायन केले. अद्यतन काळात संस्कृतचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे म्हणून इ. ८वी च्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाच्या शेवटी संकल्पगीत गायन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड त्यांनी विद्यार्थिनींना संस्कृत भाषेचे महत्व व संस्कृत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे अतिथी कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ वी च्या कॅ तन्वी सराफ व कॅ सरिषा थोरात यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कॅ पूर्वजा खेडकर ने सर्वांचे आभार मानले. संस्कृत मध्ये संपूर्णपणे सादर केलेल्या या संस्मरणीय कार्यक्रमाचे नियोजन संस्कृत विभाग प्रमुख प्रियांका राजहंस यांनी केले होते.

09 Aug 25 / Sat

~ A Lec-Dem on leading
a holistic and healthy life style practices coupled with proper dietary regulations
, all the while remaining physically fit in a Sainik School kind of environment was organised as a goodwill measure by dear Parent Volunteers Shri Sandeep Kudale & Sou Pallavi Kudale, doting Parents of Cdt Gauri Sandeep Kudale of Class VI B.

~ The session turned out to be enrichingly engaging and the Cadets had a lot to question and get clarified.

~ Shri Vinayak R Patil, Cadet Instructor coordinated the Lec-Dem so efficiently and turned it to of great success…

Thanks…and with Best wishes,

🙏
~ The MES RLMSS Family, Pune

गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशालेत lion club चे सदस्य मा. बी. बी. कुलकर्णी, lion चे अध्यक्ष मा. दाबके, lion सौ. सीमा दाबके, lion श्री. ठोसर यांनी सदिच्छा भेट दिली. प्रशालेला भेट देण्यासाठी या सर्वांनी १२१ पुस्तके आणली होती. lion सौ. सीमा दाबके यांनी इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. याप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम, सिनिअर मास्टर श्री. नांगरे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. जगधने उपस्थित होते.

August 8, 2025

An initiative by Indian Council of Medical Research (ICMR) & Department of Health Reseach (DHR) who organised a nationwide programme “SHINE” – Science, Health and Innovation for Nextgen Explorers.

ICMR Director General and DHR Secretary Dr Shri Rajiv Bahl described the initiative as a ‘unique opportunity to ignite curiosity, foster innovation and inspired the next generation of Health Researchers.’

RLMSS Contingent of Class IX, X & XI Cadets had a great learning value attending the Seminar and Descriptve Audio Visual Sessions.
ATL in charge Mrs.Manjiri Patil coordinated and planned the event in association with Vidnyan Bharati – Paschim Maharashtra.
Shri Pramod Zurmure & Sou Vaishali Shinde of RLMSS participated in the event at ICMR- National Institute of Virology, Pashan, Pune.

08 Aug 25 / Fri

~ An initiative by Indian Council of Medical Research (ICMR) & Department of Health Reseach (DHR) who organised a nationwide programme “SHINE” – Science, Health and Innovation for Nextgen Explorers.

~ ICMR Director General and DHR Secretary Dr Shri Rajiv Bahl described the initiative as a ‘unique opportunity to ignite curiosity, foster innovation and inspired the next generation of Health Researchers.’

~ RLMSS Contingent of Class IX, X & XI Cadets had a great learning value attending the Seminar and Descriptve Audio Visual Sessions.

~ Shri Pramod Zurmure & Sou Vaishali Shinde of RLMSS coordinated the event participation at ICMR- National Institute of Virology, Pashan, Pune and did their best.

With thanks to ICMR, DHR and all….and best wishes….

~ The MES RLMSS Family

~ RLMSS Contingent of Class XI & XII Cadets, trained by Shri Advait Jagadhane, IC Hobby Clubs of RLMSS participated in the

‘Amrutprabha Annual Group Song Competition’

held on 05 Aug 25 by and at the Rastapeth Education Society Auditorium, in the memory of Svarayogini Dr Prabha Atre of the famous Kirana Gharana.

~ The Contingent did very well and bagged the third position competing musically among various other Schools of repute, in and around Pune.

~ In a solemn ceremony held
on 06 Aug 25, they were awarded with the Plaque and Certicates through the hands of Airveteran Air Marshal Pradeep K Bapat and were lauded for their committed conduct and performance.

~ Sou Vaishali Shinde of RLMSS planned and coordinated the training and visit while Sou Jayashreee Garud, Ms Divya Fale and Shri Ram Dhait rendered the Adm support.

Memorable an experience.

Thanks, also to Mr Pravin Supe of the foundation.

With Best of our wishes,

~ The MES RLMSS Family

03 Aug 25 /Sun

Shri Sharda Mutt, Pune conducted a solemn ‘yuvati shibir’, Youth Retreat For Girls as a daylong Workshop, covering various aspects of life skills, morals and ethics aimed toward holistic improvement and social reformation.

Class XI Cadets of RLMSS attended the workshop, while their conduct, demeanour and participation including the traditional shivgarjanA recital were all well appreciated by one and all.

Ms Priyanka Gurav of RLMSS coorditated the visit and ensure a smooth and expeditious conduct of the RLMSS Contingent in the most desirable manner.

A few more such events are in pipe-line.

With best of our wishes and heartfelt thanks, also to Ms Deepika Datar, the Event Coord.

~ The MES RLMSS Family

१ ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती याचे औचित्य लक्षात घेऊन, प्रशालेत वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. चार कुलांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता सहावी, सातवी, आठवी व नववी वर्गातील विद्यार्थिनींनी अहिल्या, जिजामाता, लक्ष्मी व दुर्गावती या कुलातून सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी भारतीय क्रांतिकारक, भारतीय समाज सुधारक, भारतीय गौरवशाली कथा, भारतीयांनी अभिमान वाटेल अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या गोष्टी असे विषय देण्यात आले होते. अंगावर रोमांच उठतील असे विषय विद्यार्थिनींनी मांडले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. श्याम नांगरे (सिनियर मास्टर) व अद्वैत जगधने (सीनियर शिक्षक) यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे नियोजन वैशाली शिंदे स्पर्धा विभाग प्रमुख, तसेच प्रशालेतील इतिहास विभागाने केले होते.

01 Aug 25 / Fri

Ms Pooja S Jog,
MA B Ed (Eng), Principal RLMSS,
after having rendered a successful and happening second tenure, handed over charge to the new incumbent,

Ms Jyoti Khirid
MA B.Ed (Eng)

who assumed the appointment on promotion to the post of Principal.

In a solemn Staff Meet chaired by Dr Umeshji Bibave, Visitor RLMSS, the handing over / taking over Ceremony was befittingly conducted by Shri Shyam Nangare, the Senior Master.

Shri Sandeep Pawar, IC Mil Trg, Supervisor & PRO,

Ms Manjiri Patil (Dept of Science), ATL Manager

&

Mr Gajanan Patil (Dept of Eng)

expressed their thanks and wishes to both the incoming and outgoing Principals.

And…
The family welcomes Ms Khirid and wishes her a satisfying and successful tenure at RLMSS.

On 02 Aug 25,

a special assembly for Staff and Cadets was held to bid farewell to the outgoing and welcome the incoming Principal….

The following Staff and Cadets expressed their memories of happy learning times spent with Ms Pooja S Jog and welcomed the new incumbent & Adv Shri Harishchandra Khirid, dear husband of Ms Jyoti H Khirid, Principal RLMSS.

~ Shri Advait Jagdhane
~ Hav Shri Gajanan Mali
~ Ms Priyanka Gurav
~ Shri Ajit Shendkar
~ Cdt Vishakha Bhandari (XII)
~ Cdt Samiksha (X)
~ Cdt Yashasvi Padhve (X)
~ Cdt Samiksha Rathod (VII)

Cdts Shraddha Badiger (XII) Cadet Culturals Captain & Cdt Padmashree Pawar (XII) Culturals Vice Captain moderated the event so well.

With best of our wishes,
~ The MES RLMSS Family

⚜️ म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे मुळशी तालुका स्काऊटर गाईडर उजळणी वर्ग व तंबाखू मुक्त कार्यशाळा उत्साहात संपन्न… ⚜️
आज दि. २८/०७/२०२५
जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग पुणे, भारत स्काऊट्स आणि गाईड्स, जिल्हा कार्यालय पुणे गटशिक्षणाधिकारी कार्यालय मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय एक दिवसीय स्काऊटर व गाईडर युनिट नोंदणी व उजळणी वर्ग आणि तंबाखूमुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली, तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे संपन्न झाला.

कार्यशाळेचे उद्घाटन मुळशी तालुका गटशिक्षणाधिकारी तथा सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट मा. श्री. दत्तात्रय भालेराव यांच्या शुभ हस्ते झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर करंडे (जिल्हा संघटक – स्काऊट), श्रीमती उषा हिरवाळे (जिल्हा संघटक – गाईड), श्रीमती सुनेत्रा वेदपाठक (जिल्हा प्रशिक्षण समुपदेशक गाईड, पुणे), डॉ. जयश्री सारस्वत, प्रभारी विस्तार अधिकारी मा. श्री. सोपान ठकोरे, प्रशालेच्या प्राचार्या पूजा जोग, पर्यवेक्षक संदीप पवार, विषयतज्ञ श्री. प्रदीप आखाडे, कार्यालयीन कर्मचारी विनोद उमाप, तंबाखू मुक्त अभियान मार्गदर्शक श्री. उमाकांत क्षीरसागर, श्री. सोमनाथ लांडे, श्री संजय बनसोडे व सौ. सारिका बेल्हेकर शिक्षण विभागाचे सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक इ. मान्यवर उपस्थित होते.
स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पावेल व विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनानंतर स्काऊट गाईड प्रार्थनेने उजळणी वर्गाची सुरुवात झाली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींचे सैनिकी शाळा प्राचार्या पूजा जोग मॅडम व पर्यवेक्षक संदीप पवार हस्ते करण्यात आला.

या उपक्रमात मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा तसेच खाजगी शाळांतील स्काऊटर व गाईडर शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न शाळा व युनिट नोंदणी प्रक्रिया, स्काऊट-गाईड चळवळीची तत्त्वे व कार्यपद्धती यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन यांच्या मार्गदर्शनानुसार गाईड प्रमुख सौ. दिपाली आंबेकर, प्रियांका हजारे, प्रियांका राजहंस, सौ. दिपाली भावसार, श्रीमती. प्रियांका गुरव, सौ. जयश्री गरुड व मेट्रन्स, यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयातून संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व सुरळीत पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक स्काऊट गाईड श्री. दिगंबर करंडे, सूत्रसंचालन सौ. दिपाली आंबेकर यांनी केले. तर आभार श्री. संदीप पवार यांनी मानले. राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्स्फूर्त कौतुक करत, अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
⚜️👍🌹👆⚜️👍🌹👆⚜️

26 Jul 25

As part of Kargil Vijay Divas – 2025 Celelebrations, Aseem. Foundation, Pune organised several events for School Children.

RLMSS Contingent comprising

Cdts Priyanjana Lahane & Sakshi Panda of Class X, trained by Shri Mahesh Kotkar, Dept of English participated in the Elocution event while the RLMSS Choir of

Cdts
~ Sharanya Sumbekar (Captain)
~ Tanaya Suhas Gaikwad (Vice Captain)
~ Swara Gawas
~ Shruti Ravindra More
~ Saanvi Sharad Murari
~ Parvati Sunil Dharmadhikari
~ Tulsi Vinod Giram
~ Sahasra Yogi
~ Gatha Sonwane

as trained by Shri Mangesh Patil, Dept of Mathematics performed an energetic group song.

The Cadets could also meet and interact with Senior Officials of Aseem Foundation and their beloved Senior
Sqn Ldr Priyanka Oswal, an Ex Cadet of RLMSS.

The event was well coordinated by Sou Vaishali Shinde, Dept of Mathematics, RLMSS while Shri Mangesh Patil performed the task of Contingent Manager.

With heartfelt thanks and regards,

~ The MES RLMSS Family, Pune

26 Jul 25
Cadets of Class XII and ATL Club Volunteers of Class X visited

Symbiosis Skills & Professional University, Kiwale Campus, Pune, followed by Symbiosis Medical College for Women, Lawale Campus.

They were conducted inside the Campus by Dr Abhijeet Datar of School of Defence Technology.

Cadets were fortunate to interact and to be addressed by Maj Gen Viney Handa (Retd), Director, School of Defence Technology who gave the Cadets the insight and career related options in the field of Defence Technology.

Dr Ganesh V Lohar of the School took the contingent around the State of the Art SSPU Skill Centre and briefed them on various technical aspects of cut-out models, work stations and alike.

RLMSS ATL Club Members could strike a chord for their future sessions and out-reach programmes and were spoken to by Dr Suvarna Deshpande, Director, Business Development.

The event was well planned, arranged and executed by Shri Sandeep Pawar, IC Mil Trg, Supervisor & PRO RLMSS,
Sou Manjiri Patil, ATL Manager, Dept of Science (Sec)
&
Sou Savitri Patil, Dept of Physics (HSc)

The visits turned out to be memorable and enriching.

With heartfelt thanks and regards,

The MES RLMSS Family, Pune

आज 26 जुलै, कारगिल विजय दिवस, म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन, सुभेदार नवनाथ पवार व हवालदार गजानन माळी यांचे औक्षण करून शुभेच्छा पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कॅडेट साक्षी पांडा व कॅडेट निरंजना लहाने यांनी कारगिल युद्धाविषयी माहिती सांगितली. तर हवालदार श्री. गजानन माळी ज्यांनी कारगिल युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेला, त्यांनी आपले युद्धातले प्रत्यक्ष रोमांचक अनुभव सांगितले. समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे नियोजन सैन्य प्रशिक्षण विभाग व सैनिकी परिवाराने केले होते.

Kargil Vijay Divas wishes…

RLMSS held a Special Assembly on 26 Jul 25 to mark the occasion of KVD….

Hav Shri Gajanan Mali so beatifully brought out certain facts and figures as during the conflict he was a live witness to the operations while having been posted to an Aviation Unit at Drass.

He enlightened the Cadets with the entire chronology and outcome of the conflict, lessons learnt and remembered the Bravehearts of Operations Vijay, Safed Sagar and allied happenings..

Cdts Priyanjana Lahane & Sakshi Panda of Class X as trained by Mr Mahesh Kotkar spoke in detail about the great chivalry and sacrifices made by men and women in Uniform…

Cdt Sharanya Sumbekar lead RLMSS Choir as trained by Mr Mangesh Patil presented a high energy number ‘neelE ghODE’…

The event was well planned, arranged and executed by Shri Sandeep Pawar, IC Mil Trg & PRO RLMSS.

With Best wishes,

MES RLMSS Family, Pune

19 July 2025

Workshop was arranged for class XI as ATL activity. Honorable speakers Dr. Nidhi Jain, assistant professor, Engineering Science and Mrs Urvashi Bhat, assistant professor, E & TC. Both are from Bharati Vidyapeeth College of Engineering, Lavale, Pune.
In this Workshop they focused on How cadets can create, invent and then innovate their thoughts. How to develop various qualities within us, like being curious and finding solutions for the problem. Think out of box, learn something, unlearn it and then relearn it.
This session was attended by Sou Savitri Patil, Mr Pramod Zurmure, Mr Shivdas Kapure and organized by ATL coordinator Mrs Manjiri Patil.

Title of the Activity: One-Day Workshop on “Web Start: Empowering Young Minds Through Innovation”
Date & Day: 18 th July 2025, Friday
▪ To introduce school students to the fundamentals of web designing.
▪ To promote digital creativity and innovation among young learners.
▪ To provide hands-on experience using beginner-friendly tools like Google Sites.
▪ To foster collaboration and mentorship between engineering students and school
students.
About the Activity:
The workshop was conducted as part of the ATL (Atal Tinkering Lab) initiative for
students of Grades 9 to 12 at Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala. Organized in
association with the ED (Entrepreneurship Development) Cell and the Institution’s
Innovation Council (IIC) of PES Modern College of Engineering, Pune,
the event aimed
to ignite interest in web technologies among school students.
A team of enthusiastic engineering students facilitated the hands-on workshop on
Web Designing Basics using Google Sites. A total of 41 cadets of ATL club participated in the event and were divided into 10 groups, each led by a dedicated student mentor.
Participants learned to create basic websites, explore practical applications of web
design, and understand the significance of digital presence in modern times. The
interactive session encouraged creativity, collaboration, and confidence in using
digital tools.

Outcomes of the Workshop:
▪ Students gained foundational knowledge in web designing.
▪ Each group successfully created a basic functional website using Google Sites.
▪ Encouraged peer learning and collaboration through group-based tasks.
▪ Strengthened mentoring and leadership skills among engineering student
volunteers.
Name of Student Coordinators: Shruti Bachal, Dipali Hirave, Neha Desai, Aditi Rathee, Shrey Doshi, Computer science Dept. Modern college, Pune.

Name of Staff Coordinator: Prof. Siddhant K. Kolase, Mrs. Manjiri Patil – ATL incharge

21 Jul 25 / Mon

Commandant and Principal of RLMSS visited Symbiosis Skills & Professional University, Kiwale, Pune.

They met Maj Gen Viney Handa (Retd)
Dir, School of Defence Technology and discussed on future studies and Career Prospects for the Cadets of RLMSS in Defence Sector.

They also visited the Skills Centre at the University Campus and were briefed by
Dr Ganesh V Lohar about various Modules and Automation related installations which are being taught to the students.

The visit turned out to be professionally enriching and informative in our efforts to turn the opportunity beneficial for the Cadets of RLMSS in days to come.

With thanks and best wishes,

~ The MES RLMSS Family

19 Jul 25 / Sat

We had the proud privilege of hosting
Wing Commander (Dr) S Srinidhi
JD-Aerospace Safety (Ornithology Cell)
as part of our ongoing Motivational Visits and Lectures being arranged under the aegis of RLMSS ATL Club.

The Visiting Officer interacted with the Cadets and addressed them while sharing some valuable insights into the safety measures and good practices required to be adopted by the Cadets and Staff and impressed upon spreading enhanced Aerospace Safety awareness among the inmates as the School Premises comes under the Local Flying Area of Air Force Station Lohgaon, Pune which has ongoing and continuous Flying activities, including commercial aviation ones.

He also visited Cadets Mess, Hostel and surrounding areas and expressed his satisfaction over the environment friendly measures adopted by the School.

The Wing Commander’s interactive visit and message to the Cadets and Staff marked one of the important and memorable events which RLMSS witnessed.

The visit was well coordinated by Sou Manjiri Patil, IC ATL and Scientific Projects, RLMSS.

Cadets Abhashree and Tanvi Daundkar of Class XI did well with the compering and Event Management.

Thanks….

With best wishes,

~ The MES RLMSS Family, Pune

17 Jul 25
In an official function held at Office of the District Sports Officer, Pune



Shri Sandeep Pawar, IC Mil Trg & PRO RLMSS alongwith
Shri Mahadev Magar, PET & Sports Coord, RLMSS were felicitated for their continued and dedicated services being rendered towards organising and conducting Schools Level Sports & Games Competitions over the years.

Their contribution in the field of Sports & Games was mentioned as noteworthy.

Thanks dear Mr Sandeep Pawar & Mr Mahadev Magar.

With best wishes,

~ The MES RLMSS Family

– 17 Jul 25

Today we had the renowned Classical Violinist & Mahamahopadhyay Guru Shri Pt Atul Kumar ji Upadhye, Dir. Violin Academy Pune visiting us along with Shri Ajay ji Parad, a Composer, Music Producer, Trainer and a Good Samaritan.

It was a surprise show up….we discussed on possible musical training and career based possibilities for our Cadets.

Shri Advait Jagdhane of RLMSS, IC Chhandvarg coordinated the visit and modalities.

Thanks…Pandit ji..& Ajay Parad ji…

🙏

~ The MES’s RLMSS Family

Scroll to Top
Skip to content