⚜️🏆जागतिक चिंतन दिवस याचे औचित्य साधून भारत स्काऊट गाईडच्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा तसेच प्रवेश परीक्षा मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे संपन्न!!⚜️🏆

प्रशालेमध्ये 22 फेब्रुवारी 2026 जागतिक चिंतन दिवस याचे औचित्य साधून भारत स्काऊट्स आणि गाईड चळवळीचा इतिहास, लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल या विषयांवरती वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेसाठी एक उत्तम शिक्षिका सौ. सुषमा गजानन पाटील या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व परीक्षक होत्या. श्रीमती प्रियांका गुरव व सौ. दिपाली भावसार यांनी देखील परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाची सुरुवात स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांची प्रतिमापूजन करून झाले. सर्व गाईड्सनी गाईड प्रार्थना गायली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करून वक्तृत्व स्पर्धेत सुरुवात झाली. या वक्तृत्वांमधून विद्यार्थिनींमध्ये सदैव तत्पर राहणे, इतरांना मदत करणे, कठीण परिस्थितीत सामोरे जाणे, विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास, शिस्त, सेवा, चारित्र्यसंवर्धन असे संस्कार रुजविले जातात त्याचा हा एक छोटासा प्रयत्न. इयत्ता सहावी आणि सातवी एक गट आणि आठवी आणि नववी दोन गट यामधून तीन विद्यार्थिनींना क्रमांक मिळाले. त्यामध्ये
इयत्ता सहावी व सातवी मधून
* प्रथम क्रमांक कॅडेट श्रावणी शेडगे (जिजामाता हाऊस)
* द्वितीय क्रमांक कॅडेट अनुश्री गुजर (अहिल्या हाऊस)
* तृतीय क्रमांक कॅडेट सिया मयेकर (दुर्गावती हाऊस)

इयत्ता आठवी आणि नववी मधून
* प्रथम क्रमांक कॅडेट स्वरा केदारी (दुर्गावती हाऊस)
* द्वितीय क्रमांक कॅडेट अन्वी माने (अहिल्या हाऊस)
* तृतीय क्रमांक कॅडेट्स स्वराली देशमुख (जिजामाता हाऊस) आणि कॅडेट रचना जाधव (लक्ष्मी हाऊस)

सहभागी झालेल्या सर्व कॅडेट्सनी उत्कृष्ट असे वक्तृत्व केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. म यज्ञरामन सर उपस्थित होते सरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून त्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरिड, सीनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन गाईड कॅप्टन दिपाली आंबेकर, प्रियांका गुरव, जयश्री गरुड, दिपाली भावसार, प्रियांका राजहंस सर्व मेट्रन्स यांनी केले.

मराठी राजभाषा दिन / मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम
शनिवार दि.२८ फेब्रुवारी२०२६

शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी राजभाषा दिन कार्यक्रम उत्साहात साजरा…..
थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, तालुका मुळशी, जि. पुणे येथे शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी२०२६ रोजी प्रशालेच्या वसतिगृह मैदानावर उत्साहात सकाळी ७.४० ते ९.१५ या वेळेत संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट ऐविएन विंग कमांडंर म. यज्ञरामन सर, सिनिअर मास्टर / पर्यवेक्षक श्री. संदीप पवार सर कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सातवी अ च्या विद्यार्थिनींनी ‘ही मायभूमी, ही जन्मभूमी’ हे सामुहिक गीत सादर केले. इयत्ता ६ वी अ कॅ. दुर्वा पाटील आणि कॅ. गुंजन भादुले या विद्यार्थिनींनी ‘कविवर्य कुसुमाग्रज’ आणि ‘चला मराठी जपू या’ या विषयावर माहिती सांगितली. इयत्ता ७ वी ब तील विद्यार्थिनींनी ‘माझी मराठी शाळा’, ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. छंद वर्गातील विद्यार्थिनींनी भारुड, गवळण, पोवाडा, गोंधळ या लोकगीतांचे उत्तम सादरीकरण केले. तसेच प्रशालेतील श्री. मंगेश पाटील सर यांनी मातृभाषेचे मह्त्त्व आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती सांगितली. तसेच प्रशालेत शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ८ ते ९ या वेळेत मराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा कुलश: घेण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांक दुर्गावती कुल, द्वितीय क्रमांक जिजामाता कुल, तृतीय क्रमांक लक्ष्मी कुल आणि चतुर्थ क्रमांक अहिल्या कुल. स्पर्धेचे परीक्षण श्री. मंगेश पाटील सर यांनी केले होते. प्रशालेचे सिनिअर मास्टर /पर्यवेक्षक श्री. संदीप पवार सर यांनी कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त केले. इयत्ता ८ वी अ तील कॅ. अपूर्वा देशपांडे आणि कॅ. गाथा सोनावणे या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. इयत्ता ९ वी ब कॅ. सायली पवार या विद्यार्थिनीने आभार मानले. अशा रितीने कार्यक्रम संपन्न झाला.
प्रशालेचे कमांडंट ऐविएन विंग कमांडंर म. यज्ञरामन सर, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, सिनिअर मास्टर/पर्यवेक्षक श्री. संदीप पवार या सर्व पदाधिकाऱ्यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत असते. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन मराठी विभागाने केले होते.
मराठी राजभाषा आमची
महाराष्ट्राची शान!
भजन कीर्तन ऐकताना,
हरपते भान.

Duty Master : (Remarks & Signature) : कु. संस्कृती मंगवडे

Event Coord : सौ. सुनिता शिंदे
Senior Master : श्री. संदीप पवार
Principal : सौ. ज्योती खिरीड
Commandant : Avn विंग कमांडर एम. यज्ञरामण

आज रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी इ. 12 वी च्या कॅडेटस पहाटे लवकर उठून लवळे गावातील डोंगरावरील पांडवकालीन गणपती मंदिर व श्री. रोटमलनाथ मंदिर येथे पायी ट्रेकिंग साठी गेल्या होत्या. या ट्रेकिंग चे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. म. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार सर, एन सी सी प्रशिक्षक तेजश्री दिघे, मेट्रन कमल ताई, दिव्या ताई व प्रियांका जोडमोटे ताई यांनी केले होते.


🇮🇳 विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी 🇮🇳

आज गुरुवार दिनांक 26/02/ 2026 रोजी म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे राष्ट्रभक्त विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, श्री. महेश कोतकर, शिक्षिका सौ. दिपाली आंबेकर यांनी सावरकरांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगता मधून त्यांनी सावरकरांचा संपूर्ण इतिहास त्यांच्या जन्मापासून त्यांनी केलेले कार्य, राष्ट्रभक्ती, त्यांनी सहन केलेल्या यातना, देशावरील प्रेम, त्यांचे लेखन कविता या सर्वांचा उहापोह सादर केला. इयत्ता सहावी मधील जेनिशा शुक्ला, कृतिका कदम, रागिनी देशमुख, प्रिया काळेल, आराध्या थोरात आणि पार्थवी ठोंबरे या विद्यार्थिनींनी इंग्रजी आणि मराठी भाषेतून वक्तृत्व सादर केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन इतिहास विभाग प्रमुख सौ. दिपाली आंबवणे व इतिहास विभागातील सर्व शिक्षक यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. म. यज्ञरामन, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, सीनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. महेश कोतकर यांनी देखील वीर सावरकरांबद्दल माहिती सांगून कार्यक्रमाचा समारोप केला.

21 Feb 26 / Sat

RLMSS Special Assembly for Felicitations by Kreedabharati, Pune Chapter…

आज शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी प्रशालेत क्रीडा भारती सामान्य ज्ञान क्रीडा मंजुषा ऑनलाईन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय महामंत्री क्रीडा भारती श्री. राज चौधरी, अखिल भारतीय सहमंत्री श्री. मधुमय नाथ, नियामक मंडळ सदस्य, अखिल भारतीय योग व सूर्यनमस्कार प्रमुख श्री. चंद्रशेखर जहागीरदार, नियामक मंडळ सदस्य व अखिल भारतीय क्रीडा केंद्र प्रमुख श्री. ए. एन. अशोक, क्रीडा भारती मंत्री पुणे महानगर व अखिल भारतीय कार्यालय प्रमुख श्री. विजय रजपूत यांच्या शुभहस्ते क्रीडा भारती सामान्य ज्ञान क्रीडा मंजुषा ऑनलाईन स्पर्धा व ॲथलेटिक्स स्पर्धेतील यशस्वी कॅडेसचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. म. यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
ऑनलाईन सामान्य ज्ञान क्रीडा मंजुषा स्पर्धेतील यशस्वी कॅडेटस पुढीलप्रमाणे आहेत.
1) प्रथम क्रमांक — कॅडेट कादंबरी कड — इ.11 वी
2) द्वितीय क्रमांक — कॅडेट तेजल निखाडे — इ.10 वी ब
3) तृतीय क्रमांक विभागून
१) कॅडेट समृद्धी दौंडकर — इ. 9 वी अ
२) कॅडेट श्रद्धा फड — इ. 7 वी ब
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट श्रेया चव्हाण व कॅडेट स्नेहल देवगण यांनी केले व आभार सिनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन परिपाठ विभाग प्रमुख श्री. महेश कोतकर, क्रीडा विभाग प्रमुख हवालदार श्री. गजानन माळी व सर्व सैनिकी परिवाराने केले होते.

आज दिनांक 19 फेब्रुवारी वार गुरुवार रोजी प्रशालेमध्ये शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. लेझीम व ढोलताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. वसतिगृहातील मेस शेजारील मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वात प्रथम प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरमन सर, प्रशालेचे सिनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मंजिरी पाटील मॅडम, सौ. रेखा रायपुरकर मॅडम, सौ. सावित्री पाटील मॅडम तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. जगधने सर यांनी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच प्रशालेतील कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षकांनी व वसतिगृह विभाग प्रमुख, मेस विभाग प्रमुख, क्रीडा विभाग प्रमुख व त्या विभागातील उपस्थित सर्व सदस्यांनीदेखील (अश्वशाळा ते पाकशाळा) छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर इयत्ता दहावीच्या कॅडेट्सचा शुभेच्छा समारंभ पार पडला. कार्यक्रम पत्रिकेतील रचनेनुसार इयत्ता नववी मधील सर्व कॅडेट्सनी भाषण, पोवाडा, नाटिका सादरीकरण असा कार्यक्रम उत्तमरीत्या सादर केला. श्री. अद्वैत जगधने सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय कार्याची महती आपल्या भाषणाद्वारे सर्व कॅडेट्स पर्यंत पोहोचवली. संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी पार पडण्यासाठी वसतिगृह विभाग, मेस विभाग, सर्व मेट्रन ताई, मेट्रन इंचार्ज श्रीमती गुरव मॅडम, इतिहास विभाग, इयत्ता नववी व दहावीचे वर्गशिक्षक यांचे सहकार्य लाभले.
शिवजयंतीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरमन सर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम व सिनियर मास्टर श्री. संदीप पवार सर या सर्व पदाधिकाऱ्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

ज्ञान प्रबोधिनी पुणे आयोजित छोटे सायंटिस्ट समस्या परिहार स्पर्धा – 2026
मएसो शिक्षण प्रबोधिनी व ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने म ए सो च्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये छोटे सायंटिस्ट हा उपक्रम इयत्ता 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी राबविण्यात येतो.
विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित कृतियुक्त विज्ञान कार्यशाळेचे आयोजन दरमहा विज्ञान शिक्षकांसाठी करण्यात येते व शिक्षकांद्वारे ही सत्रे प्रशालेत घेतली जातात. शिकलेल्या संकल्पनांचे उपयोजन व दृढीकरण होण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी समस्या परिहार स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
इयत्ता आठवी व नववी साठी समस्या परिहार स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी ज्ञानप्रबोधिनी पुणे येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत आपल्या शाळेतील आठवी व नववीच्या गटातून प्रत्येकी 4 कॅडेट्स सहभागी झाल्या होत्या. Pressure संकल्पनेवर आधारित समस्या परिहार स्पर्धेत आठवीच्या गटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
1) Cdt Riddhi Girish Supekar
2) Cdt. Daksha yugendra Katore
3) Cdt. Swamini Vikram Ghadge
4) Cdt. Apurva Akshay Deshpande
तसेच इयत्ता 9 वी च्या कॅडेट्स
1) Cdt. Devika Suhas Tad
2) Cdt. Lavanya Shivkumar Mundase
3) Cdt. Krushna Amit Dhore
4) Cdt. Tanvi Atul Saraf

यांनी देखील स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
या यशाबद्दल शाळेचे कमांडंट एम. यज्ञरमण व प्रिन्सिपल सौ. ज्योती खिरीड यांनी कॅडेट्सचे अभिनंदन व कौतुक केले. शाळेच्या ATL इन्चार्ज मंजिरी पाटील व विज्ञान विभाग प्रमुख वैशाली शिंदे तसेच विषय शिक्षक श्री. मंगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Rotary international District Sustainable Environment peace Conference -2026
बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी Rotary District club 3131 व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे शाश्वत पर्यावरण व शांतता (Sustainable Environment and Peace) याविषयी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
रोटरी क्लब चे विविध पदाधिकारी, पर्यावरण तज्ञ, संशोधक यांनी नैसर्गिक पर्यावरण व जागतिक शांतता याविषयी मार्गदर्शन केले.
विविध सत्रे, शोधनिबंध सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींद्वारे शांतता परिषद कार्यक्रमात शांती संदेश व Sustainable Environment विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेत 50 शाळांमधील एकूण 550 जण सहभागी झाले होते. सर्व सहभागी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक यांचा शांतीदूत (Peace Ambassador) म्हणून सन्मान करण्यात आला.
शांतता प्रतिज्ञा (Peace oath) ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रशालेतील इयत्ता 7 वी ते 9 वी व 11 वी च्या एकूण 29 cadets शांती परिषदेत सहभागी झाल्या होत्या.
विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.
प्रशालेच्या प्राचार्या मा. सौ. ज्योती खिरीड, विज्ञान अध्यापिका, ATL प्रमुख सौ. मंजिरी पाटील व इको क्लब प्रमुख श्री. भाऊसाहेब मार्तंड यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.

07 Feb 26 / Sat /0700 hrs

⚜️ म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथील इयत्ता नववीच्या गाईड कॅडेट्स भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन ठरले अनेक बक्षीसांचे मानकरी!!⚜️

पुणे भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय व जिल्हा परिषद पुणे तसेच श्री. जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री. फतेचंद जैन विद्यालय व ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी पार पडले. दि.7 ते 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत चिंचवड येथे संपन्न झालेल्या या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात जिल्हयातून 39 शाळेतील 1048 स्काऊट-गाईड व स्काऊटर गाईडर मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. सदर मेळाव्यासाठी आपल्या प्रशालेतील इयत्ता नववीच्या एकूण 32 गाईड्स, गाईड कॅप्टन दिपाली आंबेकर, गाईड इन्स्ट्रक्टर प्रियांका गुरव यांनी सहभाग घेतला होता. मेळाव्यामध्ये संचालनाचे सादरीकरण, कवायती, योगासने, बँड कलर पार्टी, शेकोटी स्पर्धा, तंबू सजावट स्पर्धा, बिन भांड्यांचा स्वयंपाक स्पर्धा, फिजिकल डिस्प्ले स्पर्धा, शोभायात्रा अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. आपल्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेऊन उत्तुंग यश मिळवले त्यामध्ये,
१. उत्कृष्ट संचलन प्रथम क्रमांक 🏆
२. बँड कलर पार्टी द्वितीय क्रमांक🏆
३. शेकोटी स्पर्धा द्वितीय क्रमांक🏆
4. शोभायात्रा उत्तेजनार्थ अशी अनेक बक्षीसे मिळवून सन्मानाचिन्ह मिळवले.

तसेच भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय जांभोरी लखनऊ येथे संपन्न झालेली होती. त्यामध्ये आपल्या प्रशालेमध्ये मधील सहभागी गाईडचे आणि गाईड कॅप्टन चे सन्मानचिन्ह देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
प्रशालेच्या वतीने सदर मेळाव्यासाठी मार्गदर्शनाबद्दल पुणे जिल्हा स्काऊट संघटक श्री. दिगंबर करंडे व गाईड संघटक सौ. उषा हिवराळे यांचे आभार मानले.
सदर मेळाव्यासाठी प्रशालेचे एविएन एअर विंग कमांडर यज्ञ रमण, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, सीनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, गाईड कॅप्टन सौ. दिपाली आंबेकर, सुभेदार श्री. नवनाथ पवार इन्स्ट्रक्टर श्रीमती प्रियांका गुरव, इन्स्ट्रक्टर विनायक पाटील, श्री. राम दाहित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
⚜️🌹⚜️🎯🙏🎯⚜️🌹⚜️

RLMSS Bharat Scouts & Guides Contingent of the following, in a first, left for participating and competing in District Level Annual Training Camp at Pimpri, Pune.

~ Sou Dipali Suhas Ambekar – Guide Captain

~ Subedar Shri Navnath Pawar – Adm & Team Manager

~ Smt Priyanka Gurav – Guide Instructor

~ Shri Ram Dhait – Adm Asst & Transportation

~ 32 Girl Cadets of Class IX


Upon arrival at the venue, Cadets were briefed on Camp Modalities, Adm Instructions, Tent Pitching etc, got accommodated and have settled down to undergo the training.


AnandvArtA….

08 Feb 26 / Sun

Award Time…

RLMSS Bharat Scouts & Guides Contingent performed well in the Camp among 34 Schools (1100 plus participants) and were awarded with the following Three Trophies at a Grand Closing Ceremony.

⚜️Winners⚜️
~ Contingent March Past – Winners, First position

~ Camp Fire Displays – Second Position

~ Band & Colour Party – Second Position

Training ethos and committment on part of RLMSS Contingent was widely appreciated and spoken about.

Admission Queries were attended too.

You made us all proud…Keep going…

With best of our wishes,

~ The MES RLMSS Family, Pune

31 Jan 26 / Sat

Goodwill visit by Phadkes, Pune

~ Mrs Sunanda Vijaykumar Phadke, an Army Wife, Octagenerian and a Good Samaritan, alongwith her two Daughters (Australia based NRI Professionals) paid a goodwill visit to RLMSS Campus, interacted with Officials and Cadets alike expressed happiness in wanting to continue their ongoing philanthropic activities for the School.

~ Mr Samir Jadhav, the Estate Supervisor, RLMSS coordinated the visit and also briefed the visitors on various ongoing projects including CSR activities.

Thanks….Madam and Phadkes.

With best wishes,

~ The MES RLMSS Family, Pune

26 Jan 2026 / Mon

On this glorious 77th Indian Republic Day, the MES RLMSS salutes the Tricolour with unwavering pride!

Veteran Colonel Pankaj K Karvande, ASC
as the RO & Chief Guest unfurled the Tricolour – a symbol of India’s sovereignty, unbreakable unity, and indomitable fearless spirit and later addressed the gathering while inspiring the young Cadets to join Indian Armed Forces in days to come and serve.

Mrs Manjusha Karvande,
Sou Chitratai Nagarkar, Visitor RLMSS, Commandant, Principal and members of Staff and Cadets of the MES RLMSS Family, Parents, Invitees and Guests too graced the occasion,
stood shoulder-to-
shoulder in solemn tribute, united in devotion to the Motherland.

The air echoed with the soul-stirring National Anthem, Jaikaar, Samvidhan prati shapat grahan and Govt of Maharashtra protocol points followed by Ceremonial March Past (as Inter-House Drill Com), MT Displays, Vande Mataram – celebrating 150 years of the song that ignited our freedom struggle and stirs every heart with a sense of pride, loyalty and devotion to the nation.

The event culminated with the traditional Shivgarjana, group photographs and High-Tea.

Memorable.

Best of our wishes,
~ The MES RLMSS Family, Pune

Watch & Download photos from 👇 link…
https://drive.google.com/drive/folders/1FqmUJCq_OtEClWYZ908kO8sJcvICWk38?usp=sharing

सोमवार दिनांक 19 जानेवारी रोजी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान अंतर्गत शालेय तपासणी यशस्वीरित्या पार पडली भुगाव चे केंद्रप्रमुख श्री. सुनिल वाल्हेकर सर, स्वामी विवेकानंद मा. विद्यालय आसदे चे मुख्याध्यापक व मुळशी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. सतीश शिंदे सर, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय पौड चे मुख्याध्यापक श्री. संतोष भोकरे सर, माध्यमिक विद्यालय काशिग चे सहशिक्षक श्री. संजीव भामरे सर, माध्यमिक विद्यालय कुळे चे सहशिक्षक श्री. नानाभाऊ आवारी सर व म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे ज्येष्ठ लिपिक श्री. मनोजकुमार शिंदे सर यांनी ही तपासणी करून सैनिकी शाळेमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व काही सुचना ही दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम व सिनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. शै. गुणवत्ता संवर्धन अभियान समन्वयक सौ. रेखा रायपूरकर, सदस्य — श्री. अद्वैत जगधने, सौ. मंजिरी पाटील, सौ. अश्विनी मारणे, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व सैनिकी परिवाराने नियोजन केले होते.
शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर यांचे मार्गदर्शन लाभले.

‘A’ Certificate Exam of 2nd year NCC Cadets was centrally held on 18 Jan 26, (Sun) at St Vincent High School, Pune Camp.

RLMSS Contingent of 44 cadets alongwith Ms. Tejashri Dighe and Mr. Vinayak Patil reached the venue by 0830hrs.

After administrative formalities the written exam was conducted from 1030 to 1300 hrs.

Post short lunch break Practicals were conducted till 1430 hrs.

All the cadets of RLMSS did very well in the said exam.

⚜️⚜️ म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील इयत्ता आठवीच्या “गाईड” कॅडेट्सनी “रस्ता सुरक्षा अभियाना” द्वारे समाजामध्ये केली जनजागृती!

12 जानेवारी ते 17 जानेवारी 2026 ’रस्ता सुरक्षा सप्ताह’ अंतर्गत म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील इयत्ता आठवीच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी आज शुक्रवार दिनांक 16 /01/ 2026 रोजी घोटावडे फाटा, मुळशी, पुणे येथे रस्ता सुरक्षा अभियान केले. यामध्ये त्यांनी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या घोषणा दिल्या वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, हेल्मेट चा वापर करावा, ॲम्बुलन्सला वाट द्यावी, सीट बेल्ट चा वापर करावा, दारू पिऊन गाडी चालवू नये या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचे पथनाट्याद्वारे सादरीकरण केले व जनजागृती केली.
त्याचप्रमाणे “तंबाखू मुक्ती” संदर्भात विविध घोषणा देऊन तंबाखू ही शरीरासाठी किती घातक आहे. त्याच्यामुळे कुटुंबाचे नुकसान होते अशी जनजागृती केली. त्या संदर्भात विविध घोषणा दिल्या. ट्रॅफिक पोलीस यांचे काम किती महत्त्वाचे आहे त्यांच्या कामाप्रति एक कृतज्ञता म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट. एविएन एअर विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, युनिट लीडर व गाईड कॅप्टन सौ. दिपाली आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशालेतील सौ. दिपाली भावसार, रेक्टर प्रियांका गुरव, विनायक पाटील व तेजश्री दिघे यांचे सहकार्य लाभले.⚜️⚜️


आज 15 जानेवारी 2026 म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली मुळशी येथे आर्मी डे व राज्य क्रीडा दिनानिमित्त कॅडेटसनी शानदार संचलन करीत प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे नियोजन हवालदार श्री. गजानन माळी व सुभेदार श्री. नवनाथ पवार एन.सी.सी. प्रशिक्षक श्री. विनायक पाटील यांनी केले होते. यानंतर पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटु कै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त आंतरकुल क्रॉसकंट्री स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली.
ज्युनियर गट – १.५ किलोमीटर तर
सीनियर गट – ३ किलोमीटर
या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन, सिनिअर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सैन्य प्रशिक्षण प्रमुख सुभेदार श्री. नवनाथ पवार, क्रीडा विभाग प्रमुख हवालदार श्री. गजानन माळी, ड्युटी मास्टर सौ. वैशाली शिंदे व रेक्टर श्रीमती प्रियांका गुरव उपस्थित होते.
आंतरकुल क्राॅसकंट्री स्पर्धेच्या निमित्ताने इ.11 वी ची कॅडेट शौर्या उदावंत हिने ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जीवनपट उलगडून दाखविला. या क्राॅसकंट्री स्पर्धेमध्ये दुर्गावती हाऊसने एकूण 7 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. एकूण 5 गुण मिळवत द्वितीय क्रमांक संयुक्तपणे जिजामाता व लक्ष्मी हाऊस यांनी, तर 3 गुण मिळवत तृतीय क्रमांक अहिल्या या हाऊसने मिळविला.
वैयक्तिक क्रमांक
जूनियर गट –
१) प्रथम क्रमांक — कॅडेट श्रावणी शेडगे इ. 7 अ
२) द्वितीय क्रमांक — कॅडेट आराध्या कनन इ. 8 वी ब
३) तृतीय क्रमांक — कॅडेट सानवी शेट्टी इ. 6 ब
सीनियर गट-
१) प्रथम क्रमांक -: कॅडेट अनिता महतो इ. 9 वी ब
२) द्वितीय क्रमांक -: कॅडेट सई भगत इ. 9 वी अ
३) तृतीय क्रमांक -: कॅडेट स्वरा दुधाळे इ. 9 वी ब

प्रास्ताविक क्रीडा प्रशिक्षक श्री. ऋतुराज गुरव यांनी व सूत्रसंचालन पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी केले.
या क्राॅसकंट्री स्पर्धेचे संपूर्ण नियोजन क्रीडा प्रशिक्षक श्री. ऋतुराज गुरव, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, एन.सी.सी. प्रशिक्षक तेजश्री दिघे व सर्व क्रीडा प्रशिक्षक यांनी केले होते.

दिनांक 08/01//2026 रोजी
भास्करराव कर्वे स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025-26 (वर्ष 11 वे )
विषय : कनिष्ठ महाविद्यालयीन गट : (इयत्ता 11वी व 12वी)

राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथील इयत्ता अकरावीच्या चार कॅडेट्स सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर इतर शाळेतील एकूण कनिष्ठ व वरिष्ठ गट मिळून 150 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यात पुढील विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली मते व्यक्त केली
1) वाचन संस्कृती आणि जीवनमूल्ये 
2) प्रभाते मनीं राम चिंतीत जावा! 
3) भारताच्या विश्वविजेत्या  रणरागिणी
प्रशालेतील कॅडेट शौर्य उदावंत, कॅडेट अपूर्वा केंजळे, कॅडेट ऋतुजा सिंकर, कॅडेट दिव्या शिरसकर या कॅडेट्सनी सहभाग घेतला. आपल्या प्रशालेतील कॅडेट शौर्य उदावंत हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. त्याबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षिका सौ. वैशाली शिंदे व कु. निकिता जोरी यांचे अभिनंदन. शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञरामन सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम, सिनियर मास्टर श्री संदीप पवार, स्पर्धा विभाग प्रमुख सौ. वैशाली शिंदे, सौ दिपाली भावसार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती… शनिवार दि. ३ जानेवारी २०२६
प्रशालेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी…
बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी प्रशालेमध्ये परिपाठात सकाळी ७.४० वाजता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता ६ वी तील कॅ. शरयू साळुंकेने सावित्रीबाई फुले यांची माहिती सांगितली. तसेच इयत्ता ८ वी तील कॅ. दक्षा कातोरे या कॅडेट्सने ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ ही एकांकिका सादर केली. प्रशालेतील शिक्षिका सौ. दिपाली भावसार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयीची माहिती सांगितली. प्रशालेतील सिनियर मास्टर श्री. संदीप पवार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अशा रीतीने कार्यक्रम संपन्न झाला.
प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम, सीनियर मास्टर श्री. संदीप पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख सौ. सुनिता शिंदे, श्री. अद्वैत जगधने, सौ. दिपाली आंबवणे, श्री. रविराज थोरात, श्रीमती प्रियंका राजहंस यांचे सहकार्य लाभले.

Duty Master : (Remarks & Signature) : श्रीमती संस्कृती मंगवाडे
Event Coord : सौ. सुनिता शिंदे
Senior Master : श्री. संदीप पवार
Principal : सौ. ज्योती खिरीड
Commandant : Avn विंग कमांडर एम. यज्ञरामण

THE MES RANILAXMIBAI MULINCHI SAINIKI SHALA
A REPORT ON –

सावित्रीबाई फुले जयंती अहवाल २०२५-२६

M.B.Patil C institute च्या वतीने आपल्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी कॅडेट मंजिरी देऊळकर व तिची सहकारी श्रीमती दिपाली पंडित यांनी आज शनिवार दिनांक 3 डिसेंबर जेइई व नीट परीक्षेसंदर्भात इ. 11 वी च्या कॅडेटसना मार्गदर्शन केले.




म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा……….

स्नेहसंमेलन व पारितोषिक सोहळा:
बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५


म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, येथे बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० या कालावधीत प्रशालेचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा प्रशालेच्या क्रीडांगणावर उत्साहात संपन्न झाला.
म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘निनाद २०२५’ उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे, म.ए.सो. सोसायटीच्या नियामक मंडळ उपाध्यक्षा व शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, महामात्रा सौ. चित्रा नगरकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री. संदीप अमराळे तसेच प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म यज्ञरामन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, सिनियर मास्टर श्री. संदीप पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना आणि स्वागतगीताने झाली.
भारतातील थोर राण्या आणि योद्ध्या – या विषयाला अनुसरून यावर्षीच्या स्नेहसंमेलनात ‘मनोरंजन’- आंतर कुल सांस्कृतिक स्पर्धा कुलश: घेण्यात आली. अहिल्या कुल – अहिल्यादेवी होळकर, हिरकणी, राणी पद्मावती जिजामाता कुल- माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, तारा राणी लक्ष्मी कुल- राणी लक्ष्मीबाई,राणी चेन्नमा, मॅडम भिकाजी कामा दुर्गावती कुल- राणी दुर्गावती, आनंदीबाई गोपाळराव जोशी, व्योमीका सिंग, सोफिया कुरेशी. या भूमिकेत कॅडेट्सने नृत्य सादर केली.
सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रशालेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड सौ. अश्विनी पवार श्री. अद्वैत जगधने यांनी मूल्यमापन केले.
प्रशालेच्या भव्य पटांगणावर रंगीबेरंगी प्रकाशझोतात व विविध राण्या आणि योद्ध्याची पारंपरिक पोशाख परिधान करून कॅडेट्सने भारतीय संस्कृती जपत कार्यक्रम सादर केला.
सदर स्नेहसंमेलनाला प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म यज्ञरामन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात ही अटल टिंकरींग अंतर्गत ‘ निधी’ या थ्रीडी प्रिंटींग लॅब चे उद्घाटन मा.अध्यक्षा आनंदीताई पाटील आणि महामात्रा सौ. चित्रा नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्ष २०२४-२५ मधील मधील प्रत्येक इयत्ता व तुकडीतील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या कॅडेट्स , वर्ष २०२४-२५ मधील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम पाच विद्यार्थिनी व वर्ष २०२५ -२६ मधील प्रत्येक इयत्ता व तुकडीतील सर्वोत्कृष्ट कॅडेट्स तसेच विविध संस्थेद्वारे दिले जाणारे विशेष प्रावीण्य, शिष्यवृत्ती बक्षीसे यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहसंमेलन कार्यक्रम कार्यवाह सौ. सुनिता शिंदे.तसेच सहकार्यवाह सौ. दिपाली आंबवणे, सौ. मंजिरी पाटील बक्षीस वितरण प्रमख सौ. अश्विनी मारणे, श्री.महेश कोतकर यांनी सूत्रसंचालन केले. मनोरंजन स्पर्धा समन्वयक सौ. वैशाली शिंदे, सौ. दिपाली आंबेकर यांनी सूत्रसंचालन तयारी करून घेतली. विद्यार्थिनी प्रतिनिधी कॅ. श्रद्धा बडीगर, कॅ. पद्मश्री पवार तसेच ११ वी कॅडेट्सने स्नेहसंमेलन सूत्रसंचालन केले. एकूणच सर्व सैनिकी परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले आणि कार्यक्रम संपन्न झाला.

RLMSS Annual Gathering – Snehasammelan & Manoranjan – 2025

24 Dec 25 / Wed / 1700 hrs onward

Ms Smita Shewale, a popular star of the Marathi Film World graced the occasion as Chief Guest and also witnessed the first ever Inter-House Cultural Competition, Manoranjan – 2025.

Greatly executed by
Sou Sunita Shinde, Sou Deepali Ambawane – Event Coord

Sou Ashwini Marne, Shri Mahesh Kotkar, Sou Dipali Ambekar & Cadet Comperes – Endowment Anchoring and connected events

Sou Vaishali Shinde – IC Competitions (Manoranjan – 2025 inclusive)

Shri Pramod Zurmure, Shri Mangesh Patil – Audio Visual & Social Media

Members of the various organising Committees.

Prior to Annual Gathering, Sou Ananditai Mahesh Patil, Chairman RLMSS, Vice Chairman MES Governing Body inaugurated Nidhi – Animation and 3D Printing Lab at RLMSS, accompanied by Sou Chitratai Nagarkar, Visitor.

The Inaugural event marked the great initiative by Sou Manjiri Patil, ATL Manager, Dept of Science, RLMSS.

Memorable the evening turned out to be, joined by RLMSS Officials, Staff, Family Members, Invitees and Parents.

With Best wishes,
~ The MES RLMSS Family

Watch & Download photos from 👇 link…
https://drive.google.com/drive/folders/18rHa5MT9N0BjT8VOObEbAGrDzrD5CRHw?usp=sharing

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवामध्ये सहभाग

चंदीगड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव यामध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींना सहभागी होण्याचा योग आला. या फेस्टिवल मध्ये प्रशालेच्या कॅ. तनिष्का दाभोळे, कॅ. जिजा मोहिते, कॅ. प्रशंसा वानखेडे, कॅ. इंद्रजा भोसले, कॅ. समीक्षा पटणे, कॅ. ऋतुजा कापरे, कॅ. देविका ताड कॅ. वेदिका भांबुरे, कॅ. सारा चतुरे, कॅ. शर्वरी मोरे, कॅ. कार्तिकी मर्गज, कॅ. पूर्वजा खेडकर यांनी सहभाग नोंदवला.
महोत्सवामध्ये विद्यार्थिनींना विविध शास्त्रज्ञ, व्याख्याते भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, पर्यावरण व हवामान शास्त्र या विषयातील अनेक तज्ञ व्यक्तींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विविध राज्यातून आलेल्या विद्यार्थिनींशी हितगुज करण्याचे संधी मिळाली. त्यानिमित्त विद्यार्थिनींकडून भाषेचे, संस्कृतीचे आदान प्रदान करण्यात आले. महोत्सवामध्ये विविध प्रकल्प चे सादरीकरण करण्यात आले होते. त्या प्रकल्पांविषयी सखोल अशी माहिती घेण्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री श्री नायब सिंह सैनी ह्यांनी विद्यार्थिनींना महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या व विशेष मार्गदर्शन देखील केले.
त्या शैक्षणिक दौऱ्याचे यशस्वी आयोजक व्ही.व्ही.एम. समन्वयक श्रीमती मीना मालेगावकर, श्रीमती मानसी मालेगावकर, श्री. किरण बिडवे तसेच आयआयटीएम चे श्री. मनोज डोमकावळे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ. वैशाली शिंदे व श्री. शिवदास कापुरे यांनी वेळोवेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रशालेचे कमांडर मा. एअर विंग कमांडर यज्ञरामन अय्यर सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. ज्योती खिरीड मॅडम, प्रशालेचे सिनियर मास्टर श्री संदीप पवार, विभाग प्रमुख सौ मंजिरी पाटील व विज्ञान विभागातील सर्व शिक्षक यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. चंदीगड येथील पंचकुला येथे संपन्न झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा भाग होण्याचे सौभाग्य या विद्यार्थिनींना लाभले. या सहभागामुळे विद्यार्थिनींना विज्ञान विषयातील विविध क्षेत्रांतील नव्या संधींची नव्या आव्हानांची ओळख झाली. विज्ञानाने समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत हा या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.

राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली प्रशालेत गणित दिन उत्साहात साजरा
सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे प्रशालेचा वार्षिक गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत गणित दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनकार्याचा व गणितातील त्यांचे योगदान याबाबत माहिती सादर करण्यात आली. तसेच गणित दिनाचे औचित्य साधून गणित प्रश्न मंजूषा घेण्यात आली. सदर प्रश्न मंजूषा स्पर्धा ही कुलशः घेण्यात आली. प्रशालेच्या प्रत्येक कुलातील इयत्ता सहावी, सातवी, आठवी व नववीतील प्रत्येकी एक विद्यार्थिनी याप्रमाणे चार कुलांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती स्तवन व थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून करून करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संचालन इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी केले होते.
शिक्षकांसाठी गणितातील मनोरंजक कोडी विचारण्याात आली ज्यामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर श्री यज्ञरामन सर यांनी आजच्या गणित प्रश्न मंजूषा स्पर्धेचा निकाल घोषित केला. तसेच श्री यज्ञरामन सर यांनी याप्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व सर्व स्पर्धक विद्यार्थिनींचे कौतुक केले. शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गणित दिन राबवण्यात आला. प्रशालेचा गणित दिन यशस्वी होण्यासाठी शाळेतील पर्यवेक्षक श्री संदिप पवार सर, गणित शिक्षक श्री रविन्द्र उराडे, सौ रेखा रायपुरकर, सौ वैशाली शिंदे, श्री मंगेश पाटील, सौ. प्रियांका घोडके, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आज सोमवार दि. 22 डिसेंबर म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत शालेय स्नेहसंमेलन रंगीत तालीम निमित्त कासार आंबोली ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच श्री. शंकर भाऊ सुतार, उपसरपंच सौ. छायाताई भिलारे तसेच माजी उपसरपंच सौ. पूजाताई सुतार, पोलिस पाटील सौ. स्वातीताई सुतार, आशा सेविका सौ. आशाताई लांडगे, अंगणवाडी सेविका सौ. शितलताई शिंदे यांचा सन्मान शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामण सर, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे सिनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मंजिरी पाटील व सौ.रेखा रायपूरकर, सौ.वैशाली शिंदे, स्नेहसंमेलन कार्यवाह सौ. सुनिता शिंदे, उपकार्यवाह सौ. दिपाली आंबवणे व सैनिकी परिवारातील सर्व सदस्य हे उपस्थित होते.

मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी इ. 9 वी च्या कॅडेटसनी फर्ग्युसन कॉलेज येथे सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवास भेट दिली व पुस्तक पाहण्याचा आनंद घेतला. विविध उपक्रमात सहभाग घेतला, चित्रही काढली. प्रसिद्ध निवेदक श्री. सुधीर गाडगीळ सरांची ग्रेट भेट, पुस्तक महोत्सवाचे मुख्य आयोजक श्री. राजेश जी पांडे सर यांनी शिवगर्जने बद्द्ल केलेले कौतुक, म.ए.सो. नियामक मंडळ उपाध्यक्षा व सैनिकी शाळेच्या शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील मॅडम, म. ए. सो. चे पदाधिकारी श्री. गोविंद जी कुलकर्णी सर यांनी ही कॅडेटसला मार्गदर्शन केले. सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार पुस्तक महोत्सव भेटीचे आयोजन सिनियर मास्टर श्री. संदीप पवार, ज्येष्ठ शिक्षिका सौ. दीपाली आंबवणे , मेट्रन कमलताई गावित व श्री. राम दाहित यांनी केले होते.

आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी शिवसमर्थ बचतगट, ग्रामपंचायत आसदे व स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, आसदे यांच्या संयुक्त विद्यमाने विजय दिनानिमित्त सैनिकी शाळेच्या बॅंड पथकाने कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एअर कमोडोर श्री. शैलेंद्र घारपुरे सर व माजी सैनिकांना शानदार संचलन करीत मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार सिनियर मास्टर श्री. संदीप पवार, सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार, मेट्रन श्रीमती मेधाताई पाठक व श्री. राम दाहित यांनी केले होते.

आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर पंचायत समिती मुळशी शासकीय आरोग्य विभागाच्या वतीने सैनिकी शाळेतील कॅडेटसची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. सौ. ज्योत्स्ना धुमाळ, डॉ. श्री. नाझिरकर, फार्मासिस्ट सौ. मंजुषा गोसावी, एएनएम सौ. राजश्री दराडे यांनी ही तपासणी केली. याप्रसंगी सैनिकी शाळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन नगरकर सर व डॉक्टर वैदेही नगरकर मॅडम आणि सीनियर मास्टर श्री संदीप पवार सर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार मेडिकल विभाग इंचार्ज श्रीमती प्रियांका गुरव मॅडम आणि मेट्रन प्रियांका जोडमोटे, श्रीमती स्वाती हांडे यांनी केले होते.🙏


४ डिसेंबर २०२५ रोजी प्रशालेतील एअर एन सी सी आणि प्रशालेच्या कॅडेट्सकडून भारतीय नौदल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ५:३० वा. एन सी सी आणि प्रशालेच्या सर्व कॅडेटसनी मानवंदना देऊन उत्तम संचलन केले. तसेच दत्तजयंती निमित्त आदर्शगाव अंबडवेट पांढर, ता. मुळशी येथील दत्त मंदिरात पायी येणे जाणे करून सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत इ. ९ वी च्या एन सी सी च्या कॅडेट्स, ८ वी च्या स्काऊट आणि गाईड च्या कॅडेट्स आणि ११ वीच्या कॅडेट्स अशा एकूण १०९ कॅडेटसनी स्वयंसेवक म्हणून सर्व भाविकांना रांगेत शिस्तीमध्ये दर्शनासाठी सोडत गर्दीनियंत्रणाचे काम उत्कृष्टरित्या केले. एन सी सी विभाग प्रमुख थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. याचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशालेचे सिनिअर मास्टर, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, एन.सी.सी. ऑफिसर थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे, सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर व सर्व क्रीडा प्रशिक्षक आणि मेट्रन ताई यांनी केले होते. सर्व अतिथी व भाविकांनी सैनिकी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली विद्यालयाच्या गाईड कॅडेट्सचा लखनऊ मध्ये डंका !

राष्ट्रपतींना दिली सलामी : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा!

उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे दिनांक २३ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या डायमंड जुबली ग्रँड फिनाले व १९ व्या राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरीत मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील 9 गाईड कॅडेट्स नी महाराष्ट्राचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. सैनिकी शाळेसाठी अभिमानाची बाब म्हणजे कॅडेट हिंदवी तेजस गुरसाळे आणि कॅडेट समीक्षा भूषण गांधी यांनी राष्ट्रपतींना उत्कृष्ट संचलन करत सलामी दिली.
जांबोरीच्या उद्घाटनाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल हजर होते. त्यांच्या स्वागतासाठी कॅडेट आर्या विनायक पन्हाळे, कॅडेट गायत्री गिरीश रसाळ, कॅडेट लावण्या बदर यांनी सलामी दिली. तसेच शेकोटी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. समारोप समारंभाची शान वाढवत भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थित राहून सर्व स्काऊट गाईड्सना प्रोत्साहन दिले.
मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील कॅडेट समीक्षा भूषण गांधी, कॅडेट समृद्धी संदीप बलकवडे,
कॅडेट आर्या विनायक पन्हाळे, कॅडेट लावण्या नितीन बदर, कॅडेट गायत्री गिरीश रसाळ, कॅडेट शांभवी सुनील स्वामी, कॅडेट हिंदवी तेजस गुरसाळे, कॅडेट सानवी शरद मुरारी या गाईड्सनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत विविध उपक्रमांमध्ये विशेष यश मिळवले. सदर गाईड पथकाचे नेतृत्व गाईड कॅप्टन म्हणून सौ. दिपाली आंबेकर यांनी केले.
देशातील सर्व घटक राज्य व सर्व केंद्रशासित प्रदेश यातून 33 हजार स्काऊट गाईड सहभागी झाले होते. यात श्रीलंका, मालदीव, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया हेही देश सहभागी होते. गाईड्सनी कॅम्प क्राफ्ट, शेकोटी सादरीकरण, शोभायात्रा, नाईट हाईक, संचलन बँड पथक, पायोनियरिंग प्रोजेक्ट, कलर पार्टी अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला. या यशामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या सर्व गाईड्सना प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञ रामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री. संदीप पवार, गाईड कॅप्टन सौ. दिपाली आंबेकर, टीम मॅनेजर श्री. सुभेदार नवनाथ पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेच्या नियामक मंडळ उपाध्यक्षा व शाला समिती अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, महामात्रा प्रा. चित्रा नगरकर व महामात्र श्री. उमेश बिबवे यांनी अभिनंदन केले आहे.

02 Dec 25 / Tue

Class XI Cadets and Class XII Appointment Cadets (ACC & ACA) were addressed by
‘Ajinkyans’
Col Yashwantrao
Renuse (61st NDA)
&
Col Prakashrao Patil (65th NDA)

The Cadets were explained in detail about various mandatory, best practices laced with high degree of consistency and committment, which would ultimately lead them to the Entrance Gates of NDA and orher Pre-Commissioning Institutions of the Indian Armed Forces.

A few more such lectures are in the pipe-line.

Thanks….dear Colonels, for your time and concern.

jayahind…

~ The MES RLMSS Family, Pune

01 Dec 25 / Mon / 1400 hrs onward

RLMSS Contingent
(Comdt, Principal,
Shri Sandeep Pawar-Senior Master, Shri Vinayak Patil -Cdt Instr, 35 Cadets of Class XI & Shri Ram Dhait – Adm Asst)
visited
DDSS (Department of Defence and Strategic Studies), SBP Pune University and attended Gen BC Joshi Memorial Lecture by
Admiral DK Tripathi PVSM AVSM NM and Chief of the Naval Staff.

Following that Cadets had an informal interaction with
Air Vice Marshal Nitin Shankar Vaidya VSM.

Visit was well coordinated by
Shri Vinayak Patil, Cadet Instructor

Memorable…….

🙏

दिनांक 26 नोव्हेंबर 2025, वार बुधवार रोजी प्रशालेमध्ये भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाबद्दलची माहिती आणि त्याचे महत्त्व प्रशालेतील शिक्षक श्री. मंगेश पाटील सर यांनी आपल्या भाषणाद्वारे व्यक्त केले. तसेच भारताच्या संविधानाचे वाचन प्रशालेतील सर्व कॅडेट्सनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मा. प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम, प्रशालेचे पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्री संदीप पवार सर व सर्व शिक्षक उपस्थित होते.
इतिहास विभागाने या कार्यक्रमाचे सर्व आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार सर या सर्व पदाधिकाऱ्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागप्रमुख सौ. दीपाली आंबवणे व इतिहास शिक्षकांनी केले होते.


म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पुणे येथे राष्ट्रीय छात्रसेना दिवस उत्साहात साजरा
२४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रशालेतील एअर एन सी सी कॅडेट्स यांच्याकडून ७७ वा राष्ट्रीय छात्रसेना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ५:४५ वा. एन. सी. सी. आणि प्रशालेच्या सर्व कॅडेटसनी मानवंदना देऊन उत्तम संचलन केले. तसेच सायंकाळी ४:०० वाजता प्रशालेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात सूत्रसंचालक कॅडेट सायली सुधीर पवार आणि कॅडेट गायत्री अजय पाटील यांनी एन.सी. सी. ची माहिती व इतिहास सांगितला. त्याचबरोबर CATC-७१० कॅम्पमधील काही फोटो आणि व्हिडिओ यांचा एक छोटा व्हिडिओ आणि एन. सी. सी. चा प्रोत्साहनात्मक व्हिडीओ दाखवण्यात आला.
प्रशालेचे कमांडंट ए.व्ही. एन. एअर विंग कमांडर एम. यज्ञरामन यांनी एन सी सी दिनाचे महत्त्व सांगत सैन्यातील संधींची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. प्रशालेचे सिनियर मास्टर श्री संदीप पवार यांनी त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनातील एन सी सी चे अनुभव सांगितले आणि एन सी सी चे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी ड्युटी मास्टर श्री. प्रमोद झुरमुरे, रेक्टर श्रीमती प्रियांका गुरव, क्रीडा प्रशिक्षक तेजश्री दिघे हे उपस्थित होते. कॅडेट मान्या संतोष शुक्ला हिने सर्वांचे आभार मानले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील एन सी सी कॅडेट्स नी केली. एन सी सी विभाग प्रमुख ए एन ओ थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वानी एन. सी. सी. गीत गायले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

आज शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध टॅक्स कन्सल्टंट श्री. एस. एम. वझे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत प्रशालेस भेट देऊन शाळेत सुरु असणा-या विविध उपक्रमांचे कौतुक करून तसेच कॅडेटसशी संवाद साधत या उपक्रमांसाठी आवश्यक ती मदत ही करणार असल्याचे आवर्जून सांगितले. याप्रसंगी मएसो सीएसआर फंड समन्वयक श्री. रोहन दहितुले उपस्थित होते. अतिथींचे स्वागत शाळेचे सिनिअर मास्टर श्री. संदीप पवार व ज्येष्ठ शिक्षिका सौ. मंजिरी पाटील यांनी केले.

आज शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025, Trident service private limited (Cummins) यांच्या वतीने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील कॅडेटसाठी पर्यावरण या विषयाअंतर्गत हवा, पाणी आणि ध्वनी प्रदुषण या विषयांबाबत पाॅवर पाॅईंट प्रेझेंटेशन द्रारे संवाद साधून जनजागृती करण्यात आली. या कॅडेटसला तज्ञ मार्गदर्शक पियुषा शेटे, तज्ञ मार्गदर्शक श्रीमती दिपाली देवकर व श्री. सौरभ बाबर यांनी मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे समाधान केले. ज्येष्ठ शिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड यांनी प्रास्ताविक केले. सिनियर मास्टर श्री. संदीप पवार यांनी आभार मानले.


21 Nov 25 /Fri / 0600 hrs

In a First,
RLMSS Bharat Scouts & Guides Contingent

07 Cadets – Class IX
Cdt Arya Panhale
Cdt Gayatri Rasal
Cdt Hindavi Gursale
Cdt Lavanya Badr
Cdt Saanvi Murari
Cdt Sanskruti Balkawade
Cdt Samiksha Gandhi

01 Cdt – Class VII
Cdt Shambhavi Swami

Sou Dipali Ambekar – Guide Captain

Sub Shri Navnath Pawar – Team Manager

In a first,
departed for Lucknow to participate / compete in the
19th All India Jamboorie as part of State Contingent of Maharashtra (Combined with Defence Expo – 2025)

A historical milestone in the long journey of the MES RLMSS

jayahind…
jayamaharashtra…

With best of our wishes…

🙏

~ The MES RLMSS Family, Pune

आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत संस्थेचा 165 वा वर्धापनदिन व राणी लक्ष्मीबाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व कॅडेटस व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिवादन केले
वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी 10.30 वाजता प्रशालेत आयोजित करण्यात आला होता. यासाठी अतिथी म्हणून माजी विद्यार्थिनी व शाळेच्या पहिल्या राष्ट्रीय खेळाडू सायली एरंडे, (इंजिनिअर) व अभिलाषा जाधव, (आर्किटेक्ट) या उपस्थित होत्या. याप्रसंगी मंचावर प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन, प्राचार्या ज्योती खिरीड व सिनियर मास्टर संदीप पवार उपस्थित होते.

राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त शिक्षक श्री मंगेश पाटील यांनी माहिती दिली तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा आढावा व संस्थेच्या राष्ट्रीय शिक्षण या मूल्याबाबत ज्येष्ठ शिक्षक श्री महेश कोतकर यांनी माहिती दिली.

सायली एरंडे व अभिलाषा जाधव या प्रमुख वक्त्यांनी मुलींना प्रशालेचे त्यांच्या जीवनात असलेले योगदान, येथे रुजवली गेलेली शिस्त यांचे महत्त्व सांगून विद्यार्थिनींना सर्व उपक्रमात मनापासून सहभागी होण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी प्राचार्या व कमांडंट यांनीदेखील शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांप्रती आभार मानून म ए सो गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व सैनिकी परिवाराने केले होते.

सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या माजी गुणवंत विद्यार्थिनी व भारतीय वायुसेनेच्या स्काॅड्रन लीडर अपूर्वा जगन्नाथ कुलकर्णी यांनी सकाळच्या परिपाठात येऊन सदिच्छा भेट दिली. शाळेच्या कॅडेटसनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा स्तरीय हाॅर्स रायडिंग स्पर्धेतील विजयी खेळाडू कॅडेट पूर्वजा खेडकर, कॅडेट श्रावणी गायकवाड, कॅडेट अद्विका केदारी व कॅडेट पार्वती धर्माधिकारी यांचा व Inspired Award Manak जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात कॅडेट देविका ताड हिच्या प्रकल्पाची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल स्काॅड्रन लीडर अपूर्वा कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात स्काॅड्रन लीडर यांनी सांगितले की सैनिकी शाळेतील शिस्त, प्रशिक्षण व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हवाई दलात काम करणे सोपे गेले, महिलांसाठी सैन्यदलात खूप संधी वाढल्या असून त्याचा उपयोग करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनियर मास्टर श्री. संदीप पवार यांनी केले, तर आभार ज्येष्ठ शिक्षक श्री. महेश कोतकर यांनी मानले.

Scroll to Top
Skip to content