M.B.Patil C institute च्या वतीने आपल्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी कॅडेट मंजिरी देऊळकर व तिची सहकारी श्रीमती दिपाली पंडित यांनी आज शनिवार दिनांक 3 डिसेंबर जेइई व नीट परीक्षेसंदर्भात इ. 11 वी च्या कॅडेटसना मार्गदर्शन केले.




म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा……….

स्नेहसंमेलन व पारितोषिक सोहळा:
बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५


म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, येथे बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० या कालावधीत प्रशालेचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा प्रशालेच्या क्रीडांगणावर उत्साहात संपन्न झाला.
म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘निनाद २०२५’ उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे, म.ए.सो. सोसायटीच्या नियामक मंडळ उपाध्यक्षा व शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, महामात्रा सौ. चित्रा नगरकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री. संदीप अमराळे तसेच प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म यज्ञरामन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, सिनियर मास्टर श्री. संदीप पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना आणि स्वागतगीताने झाली.
भारतातील थोर राण्या आणि योद्ध्या – या विषयाला अनुसरून यावर्षीच्या स्नेहसंमेलनात ‘मनोरंजन’- आंतर कुल सांस्कृतिक स्पर्धा कुलश: घेण्यात आली. अहिल्या कुल – अहिल्यादेवी होळकर, हिरकणी, राणी पद्मावती जिजामाता कुल- माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, तारा राणी लक्ष्मी कुल- राणी लक्ष्मीबाई,राणी चेन्नमा, मॅडम भिकाजी कामा दुर्गावती कुल- राणी दुर्गावती, आनंदीबाई गोपाळराव जोशी, व्योमीका सिंग, सोफिया कुरेशी. या भूमिकेत कॅडेट्सने नृत्य सादर केली.
सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रशालेच्या प्राचार्या सौ. ज्योती खिरीड सौ. अश्विनी पवार श्री. अद्वैत जगधने यांनी मूल्यमापन केले.
प्रशालेच्या भव्य पटांगणावर रंगीबेरंगी प्रकाशझोतात व विविध राण्या आणि योद्ध्याची पारंपरिक पोशाख परिधान करून कॅडेट्सने भारतीय संस्कृती जपत कार्यक्रम सादर केला.
सदर स्नेहसंमेलनाला प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म यज्ञरामन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात ही अटल टिंकरींग अंतर्गत ‘ निधी’ या थ्रीडी प्रिंटींग लॅब चे उद्घाटन मा.अध्यक्षा आनंदीताई पाटील आणि महामात्रा सौ. चित्रा नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्ष २०२४-२५ मधील मधील प्रत्येक इयत्ता व तुकडीतील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या कॅडेट्स , वर्ष २०२४-२५ मधील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम पाच विद्यार्थिनी व वर्ष २०२५ -२६ मधील प्रत्येक इयत्ता व तुकडीतील सर्वोत्कृष्ट कॅडेट्स तसेच विविध संस्थेद्वारे दिले जाणारे विशेष प्रावीण्य, शिष्यवृत्ती बक्षीसे यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहसंमेलन कार्यक्रम कार्यवाह सौ. सुनिता शिंदे.तसेच सहकार्यवाह सौ. दिपाली आंबवणे, सौ. मंजिरी पाटील बक्षीस वितरण प्रमख सौ. अश्विनी मारणे, श्री.महेश कोतकर यांनी सूत्रसंचालन केले. मनोरंजन स्पर्धा समन्वयक सौ. वैशाली शिंदे, सौ. दिपाली आंबेकर यांनी सूत्रसंचालन तयारी करून घेतली. विद्यार्थिनी प्रतिनिधी कॅ. श्रद्धा बडीगर, कॅ. पद्मश्री पवार तसेच ११ वी कॅडेट्सने स्नेहसंमेलन सूत्रसंचालन केले. एकूणच सर्व सैनिकी परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले आणि कार्यक्रम संपन्न झाला.

RLMSS Annual Gathering – Snehasammelan & Manoranjan – 2025

24 Dec 25 / Wed / 1700 hrs onward

Ms Smita Shewale, a popular star of the Marathi Film World graced the occasion as Chief Guest and also witnessed the first ever Inter-House Cultural Competition, Manoranjan – 2025.

Greatly executed by
Sou Sunita Shinde, Sou Deepali Ambawane – Event Coord

Sou Ashwini Marne, Shri Mahesh Kotkar, Sou Dipali Ambekar & Cadet Comperes – Endowment Anchoring and connected events

Sou Vaishali Shinde – IC Competitions (Manoranjan – 2025 inclusive)

Shri Pramod Zurmure, Shri Mangesh Patil – Audio Visual & Social Media

Members of the various organising Committees.

Prior to Annual Gathering, Sou Ananditai Mahesh Patil, Chairman RLMSS, Vice Chairman MES Governing Body inaugurated Nidhi – Animation and 3D Printing Lab at RLMSS, accompanied by Sou Chitratai Nagarkar, Visitor.

The Inaugural event marked the great initiative by Sou Manjiri Patil, ATL Manager, Dept of Science, RLMSS.

Memorable the evening turned out to be, joined by RLMSS Officials, Staff, Family Members, Invitees and Parents.

With Best wishes,
~ The MES RLMSS Family

Watch & Download photos from 👇 link…
https://drive.google.com/drive/folders/18rHa5MT9N0BjT8VOObEbAGrDzrD5CRHw?usp=sharing

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवामध्ये सहभाग

चंदीगड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव यामध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींना सहभागी होण्याचा योग आला. या फेस्टिवल मध्ये प्रशालेच्या कॅ. तनिष्का दाभोळे, कॅ. जिजा मोहिते, कॅ. प्रशंसा वानखेडे, कॅ. इंद्रजा भोसले, कॅ. समीक्षा पटणे, कॅ. ऋतुजा कापरे, कॅ. देविका ताड कॅ. वेदिका भांबुरे, कॅ. सारा चतुरे, कॅ. शर्वरी मोरे, कॅ. कार्तिकी मर्गज, कॅ. पूर्वजा खेडकर यांनी सहभाग नोंदवला.
महोत्सवामध्ये विद्यार्थिनींना विविध शास्त्रज्ञ, व्याख्याते भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, पर्यावरण व हवामान शास्त्र या विषयातील अनेक तज्ञ व्यक्तींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विविध राज्यातून आलेल्या विद्यार्थिनींशी हितगुज करण्याचे संधी मिळाली. त्यानिमित्त विद्यार्थिनींकडून भाषेचे, संस्कृतीचे आदान प्रदान करण्यात आले. महोत्सवामध्ये विविध प्रकल्प चे सादरीकरण करण्यात आले होते. त्या प्रकल्पांविषयी सखोल अशी माहिती घेण्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री श्री नायब सिंह सैनी ह्यांनी विद्यार्थिनींना महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या व विशेष मार्गदर्शन देखील केले.
त्या शैक्षणिक दौऱ्याचे यशस्वी आयोजक व्ही.व्ही.एम. समन्वयक श्रीमती मीना मालेगावकर, श्रीमती मानसी मालेगावकर, श्री. किरण बिडवे तसेच आयआयटीएम चे श्री. मनोज डोमकावळे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ. वैशाली शिंदे व श्री. शिवदास कापुरे यांनी वेळोवेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रशालेचे कमांडर मा. एअर विंग कमांडर यज्ञरामन अय्यर सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. ज्योती खिरीड मॅडम, प्रशालेचे सिनियर मास्टर श्री संदीप पवार, विभाग प्रमुख सौ मंजिरी पाटील व विज्ञान विभागातील सर्व शिक्षक यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. चंदीगड येथील पंचकुला येथे संपन्न झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा भाग होण्याचे सौभाग्य या विद्यार्थिनींना लाभले. या सहभागामुळे विद्यार्थिनींना विज्ञान विषयातील विविध क्षेत्रांतील नव्या संधींची नव्या आव्हानांची ओळख झाली. विज्ञानाने समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत हा या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.

राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली प्रशालेत गणित दिन उत्साहात साजरा
सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे प्रशालेचा वार्षिक गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत गणित दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनकार्याचा व गणितातील त्यांचे योगदान याबाबत माहिती सादर करण्यात आली. तसेच गणित दिनाचे औचित्य साधून गणित प्रश्न मंजूषा घेण्यात आली. सदर प्रश्न मंजूषा स्पर्धा ही कुलशः घेण्यात आली. प्रशालेच्या प्रत्येक कुलातील इयत्ता सहावी, सातवी, आठवी व नववीतील प्रत्येकी एक विद्यार्थिनी याप्रमाणे चार कुलांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती स्तवन व थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून करून करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संचालन इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी केले होते.
शिक्षकांसाठी गणितातील मनोरंजक कोडी विचारण्याात आली ज्यामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर श्री यज्ञरामन सर यांनी आजच्या गणित प्रश्न मंजूषा स्पर्धेचा निकाल घोषित केला. तसेच श्री यज्ञरामन सर यांनी याप्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व सर्व स्पर्धक विद्यार्थिनींचे कौतुक केले. शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गणित दिन राबवण्यात आला. प्रशालेचा गणित दिन यशस्वी होण्यासाठी शाळेतील पर्यवेक्षक श्री संदिप पवार सर, गणित शिक्षक श्री रविन्द्र उराडे, सौ रेखा रायपुरकर, सौ वैशाली शिंदे, श्री मंगेश पाटील, सौ. प्रियांका घोडके, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आज सोमवार दि. 22 डिसेंबर म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत शालेय स्नेहसंमेलन रंगीत तालीम निमित्त कासार आंबोली ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच श्री. शंकर भाऊ सुतार, उपसरपंच सौ. छायाताई भिलारे तसेच माजी उपसरपंच सौ. पूजाताई सुतार, पोलिस पाटील सौ. स्वातीताई सुतार, आशा सेविका सौ. आशाताई लांडगे, अंगणवाडी सेविका सौ. शितलताई शिंदे यांचा सन्मान शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामण सर, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे सिनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मंजिरी पाटील व सौ.रेखा रायपूरकर, सौ.वैशाली शिंदे, स्नेहसंमेलन कार्यवाह सौ. सुनिता शिंदे, उपकार्यवाह सौ. दिपाली आंबवणे व सैनिकी परिवारातील सर्व सदस्य हे उपस्थित होते.

मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी इ. 9 वी च्या कॅडेटसनी फर्ग्युसन कॉलेज येथे सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवास भेट दिली व पुस्तक पाहण्याचा आनंद घेतला. विविध उपक्रमात सहभाग घेतला, चित्रही काढली. प्रसिद्ध निवेदक श्री. सुधीर गाडगीळ सरांची ग्रेट भेट, पुस्तक महोत्सवाचे मुख्य आयोजक श्री. राजेश जी पांडे सर यांनी शिवगर्जने बद्द्ल केलेले कौतुक, म.ए.सो. नियामक मंडळ उपाध्यक्षा व सैनिकी शाळेच्या शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील मॅडम, म. ए. सो. चे पदाधिकारी श्री. गोविंद जी कुलकर्णी सर यांनी ही कॅडेटसला मार्गदर्शन केले. सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार पुस्तक महोत्सव भेटीचे आयोजन सिनियर मास्टर श्री. संदीप पवार, ज्येष्ठ शिक्षिका सौ. दीपाली आंबवणे , मेट्रन कमलताई गावित व श्री. राम दाहित यांनी केले होते.

आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी शिवसमर्थ बचतगट, ग्रामपंचायत आसदे व स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, आसदे यांच्या संयुक्त विद्यमाने विजय दिनानिमित्त सैनिकी शाळेच्या बॅंड पथकाने कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एअर कमोडोर श्री. शैलेंद्र घारपुरे सर व माजी सैनिकांना शानदार संचलन करीत मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार सिनियर मास्टर श्री. संदीप पवार, सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार, मेट्रन श्रीमती मेधाताई पाठक व श्री. राम दाहित यांनी केले होते.

आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर पंचायत समिती मुळशी शासकीय आरोग्य विभागाच्या वतीने सैनिकी शाळेतील कॅडेटसची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. सौ. ज्योत्स्ना धुमाळ, डॉ. श्री. नाझिरकर, फार्मासिस्ट सौ. मंजुषा गोसावी, एएनएम सौ. राजश्री दराडे यांनी ही तपासणी केली. याप्रसंगी सैनिकी शाळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन नगरकर सर व डॉक्टर वैदेही नगरकर मॅडम आणि सीनियर मास्टर श्री संदीप पवार सर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार मेडिकल विभाग इंचार्ज श्रीमती प्रियांका गुरव मॅडम आणि मेट्रन प्रियांका जोडमोटे, श्रीमती स्वाती हांडे यांनी केले होते.🙏


४ डिसेंबर २०२५ रोजी प्रशालेतील एअर एन सी सी आणि प्रशालेच्या कॅडेट्सकडून भारतीय नौदल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ५:३० वा. एन सी सी आणि प्रशालेच्या सर्व कॅडेटसनी मानवंदना देऊन उत्तम संचलन केले. तसेच दत्तजयंती निमित्त आदर्शगाव अंबडवेट पांढर, ता. मुळशी येथील दत्त मंदिरात पायी येणे जाणे करून सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत इ. ९ वी च्या एन सी सी च्या कॅडेट्स, ८ वी च्या स्काऊट आणि गाईड च्या कॅडेट्स आणि ११ वीच्या कॅडेट्स अशा एकूण १०९ कॅडेटसनी स्वयंसेवक म्हणून सर्व भाविकांना रांगेत शिस्तीमध्ये दर्शनासाठी सोडत गर्दीनियंत्रणाचे काम उत्कृष्टरित्या केले. एन सी सी विभाग प्रमुख थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. याचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशालेचे सिनिअर मास्टर, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, एन.सी.सी. ऑफिसर थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे, सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर व सर्व क्रीडा प्रशिक्षक आणि मेट्रन ताई यांनी केले होते. सर्व अतिथी व भाविकांनी सैनिकी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली विद्यालयाच्या गाईड कॅडेट्सचा लखनऊ मध्ये डंका !

राष्ट्रपतींना दिली सलामी : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा!

उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे दिनांक २३ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या डायमंड जुबली ग्रँड फिनाले व १९ व्या राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरीत मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील 9 गाईड कॅडेट्स नी महाराष्ट्राचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. सैनिकी शाळेसाठी अभिमानाची बाब म्हणजे कॅडेट हिंदवी तेजस गुरसाळे आणि कॅडेट समीक्षा भूषण गांधी यांनी राष्ट्रपतींना उत्कृष्ट संचलन करत सलामी दिली.
जांबोरीच्या उद्घाटनाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल हजर होते. त्यांच्या स्वागतासाठी कॅडेट आर्या विनायक पन्हाळे, कॅडेट गायत्री गिरीश रसाळ, कॅडेट लावण्या बदर यांनी सलामी दिली. तसेच शेकोटी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. समारोप समारंभाची शान वाढवत भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थित राहून सर्व स्काऊट गाईड्सना प्रोत्साहन दिले.
मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील कॅडेट समीक्षा भूषण गांधी, कॅडेट समृद्धी संदीप बलकवडे,
कॅडेट आर्या विनायक पन्हाळे, कॅडेट लावण्या नितीन बदर, कॅडेट गायत्री गिरीश रसाळ, कॅडेट शांभवी सुनील स्वामी, कॅडेट हिंदवी तेजस गुरसाळे, कॅडेट सानवी शरद मुरारी या गाईड्सनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत विविध उपक्रमांमध्ये विशेष यश मिळवले. सदर गाईड पथकाचे नेतृत्व गाईड कॅप्टन म्हणून सौ. दिपाली आंबेकर यांनी केले.
देशातील सर्व घटक राज्य व सर्व केंद्रशासित प्रदेश यातून 33 हजार स्काऊट गाईड सहभागी झाले होते. यात श्रीलंका, मालदीव, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया हेही देश सहभागी होते. गाईड्सनी कॅम्प क्राफ्ट, शेकोटी सादरीकरण, शोभायात्रा, नाईट हाईक, संचलन बँड पथक, पायोनियरिंग प्रोजेक्ट, कलर पार्टी अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला. या यशामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या सर्व गाईड्सना प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञ रामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री. संदीप पवार, गाईड कॅप्टन सौ. दिपाली आंबेकर, टीम मॅनेजर श्री. सुभेदार नवनाथ पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेच्या नियामक मंडळ उपाध्यक्षा व शाला समिती अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, महामात्रा प्रा. चित्रा नगरकर व महामात्र श्री. उमेश बिबवे यांनी अभिनंदन केले आहे.

02 Dec 25 / Tue

Class XI Cadets and Class XII Appointment Cadets (ACC & ACA) were addressed by
‘Ajinkyans’
Col Yashwantrao
Renuse (61st NDA)
&
Col Prakashrao Patil (65th NDA)

The Cadets were explained in detail about various mandatory, best practices laced with high degree of consistency and committment, which would ultimately lead them to the Entrance Gates of NDA and orher Pre-Commissioning Institutions of the Indian Armed Forces.

A few more such lectures are in the pipe-line.

Thanks….dear Colonels, for your time and concern.

jayahind…

~ The MES RLMSS Family, Pune

01 Dec 25 / Mon / 1400 hrs onward

RLMSS Contingent
(Comdt, Principal,
Shri Sandeep Pawar-Senior Master, Shri Vinayak Patil -Cdt Instr, 35 Cadets of Class XI & Shri Ram Dhait – Adm Asst)
visited
DDSS (Department of Defence and Strategic Studies), SBP Pune University and attended Gen BC Joshi Memorial Lecture by
Admiral DK Tripathi PVSM AVSM NM and Chief of the Naval Staff.

Following that Cadets had an informal interaction with
Air Vice Marshal Nitin Shankar Vaidya VSM.

Visit was well coordinated by
Shri Vinayak Patil, Cadet Instructor

Memorable…….

🙏

दिनांक 26 नोव्हेंबर 2025, वार बुधवार रोजी प्रशालेमध्ये भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाबद्दलची माहिती आणि त्याचे महत्त्व प्रशालेतील शिक्षक श्री. मंगेश पाटील सर यांनी आपल्या भाषणाद्वारे व्यक्त केले. तसेच भारताच्या संविधानाचे वाचन प्रशालेतील सर्व कॅडेट्सनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मा. प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम, प्रशालेचे पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्री संदीप पवार सर व सर्व शिक्षक उपस्थित होते.
इतिहास विभागाने या कार्यक्रमाचे सर्व आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार सर या सर्व पदाधिकाऱ्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागप्रमुख सौ. दीपाली आंबवणे व इतिहास शिक्षकांनी केले होते.


म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पुणे येथे राष्ट्रीय छात्रसेना दिवस उत्साहात साजरा
२४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रशालेतील एअर एन सी सी कॅडेट्स यांच्याकडून ७७ वा राष्ट्रीय छात्रसेना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ५:४५ वा. एन. सी. सी. आणि प्रशालेच्या सर्व कॅडेटसनी मानवंदना देऊन उत्तम संचलन केले. तसेच सायंकाळी ४:०० वाजता प्रशालेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात सूत्रसंचालक कॅडेट सायली सुधीर पवार आणि कॅडेट गायत्री अजय पाटील यांनी एन.सी. सी. ची माहिती व इतिहास सांगितला. त्याचबरोबर CATC-७१० कॅम्पमधील काही फोटो आणि व्हिडिओ यांचा एक छोटा व्हिडिओ आणि एन. सी. सी. चा प्रोत्साहनात्मक व्हिडीओ दाखवण्यात आला.
प्रशालेचे कमांडंट ए.व्ही. एन. एअर विंग कमांडर एम. यज्ञरामन यांनी एन सी सी दिनाचे महत्त्व सांगत सैन्यातील संधींची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. प्रशालेचे सिनियर मास्टर श्री संदीप पवार यांनी त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनातील एन सी सी चे अनुभव सांगितले आणि एन सी सी चे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी ड्युटी मास्टर श्री. प्रमोद झुरमुरे, रेक्टर श्रीमती प्रियांका गुरव, क्रीडा प्रशिक्षक तेजश्री दिघे हे उपस्थित होते. कॅडेट मान्या संतोष शुक्ला हिने सर्वांचे आभार मानले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील एन सी सी कॅडेट्स नी केली. एन सी सी विभाग प्रमुख ए एन ओ थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वानी एन. सी. सी. गीत गायले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

आज शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध टॅक्स कन्सल्टंट श्री. एस. एम. वझे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत प्रशालेस भेट देऊन शाळेत सुरु असणा-या विविध उपक्रमांचे कौतुक करून तसेच कॅडेटसशी संवाद साधत या उपक्रमांसाठी आवश्यक ती मदत ही करणार असल्याचे आवर्जून सांगितले. याप्रसंगी मएसो सीएसआर फंड समन्वयक श्री. रोहन दहितुले उपस्थित होते. अतिथींचे स्वागत शाळेचे सिनिअर मास्टर श्री. संदीप पवार व ज्येष्ठ शिक्षिका सौ. मंजिरी पाटील यांनी केले.

आज शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025, Trident service private limited (Cummins) यांच्या वतीने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील कॅडेटसाठी पर्यावरण या विषयाअंतर्गत हवा, पाणी आणि ध्वनी प्रदुषण या विषयांबाबत पाॅवर पाॅईंट प्रेझेंटेशन द्रारे संवाद साधून जनजागृती करण्यात आली. या कॅडेटसला तज्ञ मार्गदर्शक पियुषा शेटे, तज्ञ मार्गदर्शक श्रीमती दिपाली देवकर व श्री. सौरभ बाबर यांनी मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे समाधान केले. ज्येष्ठ शिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड यांनी प्रास्ताविक केले. सिनियर मास्टर श्री. संदीप पवार यांनी आभार मानले.


21 Nov 25 /Fri / 0600 hrs

In a First,
RLMSS Bharat Scouts & Guides Contingent

07 Cadets – Class IX
Cdt Arya Panhale
Cdt Gayatri Rasal
Cdt Hindavi Gursale
Cdt Lavanya Badr
Cdt Saanvi Murari
Cdt Sanskruti Balkawade
Cdt Samiksha Gandhi

01 Cdt – Class VII
Cdt Shambhavi Swami

Sou Dipali Ambekar – Guide Captain

Sub Shri Navnath Pawar – Team Manager

In a first,
departed for Lucknow to participate / compete in the
19th All India Jamboorie as part of State Contingent of Maharashtra (Combined with Defence Expo – 2025)

A historical milestone in the long journey of the MES RLMSS

jayahind…
jayamaharashtra…

With best of our wishes…

🙏

~ The MES RLMSS Family, Pune

आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत संस्थेचा 165 वा वर्धापनदिन व राणी लक्ष्मीबाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व कॅडेटस व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिवादन केले
वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी 10.30 वाजता प्रशालेत आयोजित करण्यात आला होता. यासाठी अतिथी म्हणून माजी विद्यार्थिनी व शाळेच्या पहिल्या राष्ट्रीय खेळाडू सायली एरंडे, (इंजिनिअर) व अभिलाषा जाधव, (आर्किटेक्ट) या उपस्थित होत्या. याप्रसंगी मंचावर प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन, प्राचार्या ज्योती खिरीड व सिनियर मास्टर संदीप पवार उपस्थित होते.

राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त शिक्षक श्री मंगेश पाटील यांनी माहिती दिली तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा आढावा व संस्थेच्या राष्ट्रीय शिक्षण या मूल्याबाबत ज्येष्ठ शिक्षक श्री महेश कोतकर यांनी माहिती दिली.

सायली एरंडे व अभिलाषा जाधव या प्रमुख वक्त्यांनी मुलींना प्रशालेचे त्यांच्या जीवनात असलेले योगदान, येथे रुजवली गेलेली शिस्त यांचे महत्त्व सांगून विद्यार्थिनींना सर्व उपक्रमात मनापासून सहभागी होण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी प्राचार्या व कमांडंट यांनीदेखील शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांप्रती आभार मानून म ए सो गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व सैनिकी परिवाराने केले होते.

सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या माजी गुणवंत विद्यार्थिनी व भारतीय वायुसेनेच्या स्काॅड्रन लीडर अपूर्वा जगन्नाथ कुलकर्णी यांनी सकाळच्या परिपाठात येऊन सदिच्छा भेट दिली. शाळेच्या कॅडेटसनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा स्तरीय हाॅर्स रायडिंग स्पर्धेतील विजयी खेळाडू कॅडेट पूर्वजा खेडकर, कॅडेट श्रावणी गायकवाड, कॅडेट अद्विका केदारी व कॅडेट पार्वती धर्माधिकारी यांचा व Inspired Award Manak जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात कॅडेट देविका ताड हिच्या प्रकल्पाची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल स्काॅड्रन लीडर अपूर्वा कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात स्काॅड्रन लीडर यांनी सांगितले की सैनिकी शाळेतील शिस्त, प्रशिक्षण व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हवाई दलात काम करणे सोपे गेले, महिलांसाठी सैन्यदलात खूप संधी वाढल्या असून त्याचा उपयोग करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनियर मास्टर श्री. संदीप पवार यांनी केले, तर आभार ज्येष्ठ शिक्षक श्री. महेश कोतकर यांनी मानले.

दरवर्षी प्रमाणे यंदाही कॅडेटस मध्ये उद्यमशीलता, व्यवहार ज्ञान, संवाद कुशलता वाढावी. भावी जीवनाचा दृष्टीकोण हा व्यावसायिक व्हावा या हेतूने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत दरवर्षी उद्योजक मेळावा हा उपक्रम उत्साहात राबविला जातो. यावर्षी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी शालेय सभागृहात सकाळी ११ वाजल्या पासून हा मेळावा सुरू झाला. प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन, मा. मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, शाळेचे सिनियर मास्टर श्री. संदीप पवार यांनी मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन केले. उद्योजक मेळाव्यात पणती, उटणे, भेळ, पाणीपुरी असे स्टॉल होते. कॅडेटसने रंगवलेल्या पणत्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या, चवदार पाणीपुरी व चटकदार भेळ, आयुर्वेदिक उटणे साबण व तेल यांचा सुंगध याने ग्राहक उत्साहाने खरेदी करत होते. प्रत्येक कुलाचा स्टॉल होता. व्यवहार चातुर्याची स्पर्धा कॅडेटसमध्ये रंगली होती. आपल्या कुलाची सर्वाधिक विक्री व्हावी यासाठी जाहिरात, आकर्षक भेटकार्ड व फलक लेखन केले होते. याप्रसंगी आंतरकुल स्पर्धा घेण्यात आली होती. याचे परीक्षण ज्येष्ठ शिक्षिका सौ. रेखा रायपूरकर सैन्य प्रशिक्षक हवालदार श्री. गजानन माळी व श्री. मंगेश पाटील यांनी केले होते. या उद्योजक मेळाव्याचे आयोजन श्री. अद्वैत जगधने व छंद वर्गाने केले होते. हाऊस मास्टर व हाउस सदस्यांनी अपार मेहनत घेतली. मेस विभागप्रमुख सुभेदार श्री. नवनाथ पवार, श्री. भाऊसाहेब मार्तंड आणि मेस कर्मचारी, वसतीगृहप्रमुख श्रीमती प्रियांका गुरव व मेट्रन, शाळेचे शिपाई काका, ऑफिस कर्मचारी वर्ग, सर्व सैनिकी परिवार अशा अनेकांच्या सहकार्याने उद्योजक मेळावा यशस्वी झाला. 🪔🪔🏮🏮!!!

बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी प्रशालेत दिवाळी पार्टी व ऑक्टोबर बाॅर्न कार्यक्रम उत्साहात पार पडला, ज्या कॅडेटस, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मेट्रन यांचा वाढदिवस ऑक्टोबर महिन्यात आहे त्यांचा वाढदिवस केक न कापता आपल्या संस्कृतीप्रमाणे सर्वांचे औक्षण करून पौष्टिक लाडू देऊन साजरा करण्यात आला. या सर्वांना शुभेच्छा शाळेचे सिनियर मास्टर व पीआरओ श्री. संदीप पवार यांनी दिल्या. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व दिवाळी पार्टीचे आयोजन, रांगोळी काढून पणती, दिवे लावून करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन सर, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार वसतीगृहप्रमुख श्रीमती प्रियांका गुरव व सहकारी, मेस विभागप्रमुख सुभेदार श्री. नवनाथ पवार व सर्व सैनिकी परिवाराने केले होते.

M.E.S. Rani Laxmibai mulinchi sainiki shala – ATL Lab

The 125 cadets of ATL club and Science club from class 6 to 11 and all cadets of class 6 to 8. enthusiastically attended the Viksit Bharat Buildathon 2025 (VBB Live) program organized under the Ministry of Education, Govt. Of India and Atal Innovation Mission (AIM). The event was streamed live on 13th October 2025 at 9:30 AM on YouTube at national level.
The program aimed to encourage young innovators from across the nation to Tinker, Innovate, and shape the vision of Viksit Bharat @2047. Students learned about various creative and technological ideas shared by innovators from different schools. The session inspired them to think innovatively and contribute towards building a developed India.
This national-level initiative celebrated innovation, creativity, and the spirit of progress among students. The entire program was coordinated by Atal Lab Incharge Mrs Manjiri Patil, attended by commandant Air wg cdr Yagnaraman, Principal Mrs Jyoti Khirid, Senior master Mr Sandeep Pawar, Science teachers Mrs Savitri Patil, Mr Pramod Zurmure, Mr Shivdas Kapure, Mr Mangesh Patil Science teachers along with the cadets.

All participants expressed great enthusiasm and pledged to apply their innovative ideas through future ATL activities in the school.

जागतिक आपत्ती निवारण दिनानिमित्त म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत मॉकड्रील चे आयोजन करण्यात आले होते. धोक्याचा इशारा मिळताच ताबडतोब शाळेबाहेर सुरक्षित कसे यावे याचे प्रात्यक्षिक याप्रसंगी घेण्यात आले. परीक्षेचा कालावधी असतानाही माॅकड्रील घेण्यात आली कारण आपत्ती केंव्हा व कोठेही येऊ शकते हे कॅडेटसला समजावे यासाठी या विशेष माॅकड्रील चे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेचे सिनियर मास्टर व आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख श्री. संदीप पवार, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सैनिकी परिवाराने केले होते.

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

शक्तीची आराधना, उपासना हे नवरात्रीचे महत्त्व, म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही देखील गेली दोन दशके शक्तीची उपासना करत आहे. आपल्यातील देवत्वाची, शक्तीची जाणीव व्हावी व सक्षम महिला देशाला मिळावी या उद्देशाने कार्य करणाऱ्या म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत पहिल्यांदाच नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर व प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम यांच्या प्रेरणेतून उत्सवाची सुरुवात झाली. सिनियर मास्टर संदीप पवार सर यांच्या नित्यपूजेची सेवा, श्री. महेश शिंदे यांची आरती व संबळ सेवा यामुळे सात्विक वातावरणात नऊ दिवस देवीची आरती व आराधना करण्यात आली. शाळेतील कॅडेट ने देवीच्या नऊ रूपांचे महत्त्व सांगित‌ले. या देवी कार्यासाठी कर्मचारी वर्गाने आपला आर्थिक सहयोग दिल्याने उत्सव यशस्वी झाला. देवीची मूर्ती इयत्ता १० वी अ मधील पालक श्री. हेमंत चव्हाण यांनी शाळेस भेट दिली. वसतिगृह विभाग श्रीमती प्रियांका गुरव मॅडम व त्याच्या सहकारी यांनी नियमित पूजेची तयारी केली. सुभेदार श्री. नवनाथ पवार सर व श्री. भाऊसाहेब मार्तंड सर यांच्या मेस विभागाने रोजचा नैवेद्य व प्रसाद अर्पण केला. सर्व कॅडेटस साठी भोंडला व सर्व महिला शिक्षकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन वसतीगृह विभागाने केले होते. या प्रसंगी सर्वांनी देवीची आरती करण्याचा लाभ घेतला. श्री अद्वैत जगधने व शाळेतील छंद वर्गाने ह्या उत्सवाचे आयोजन केले. कोजागिरी पौर्णिमेला देवीची उत्सव समापनाची आरती व रात्री दुग्धपान होऊन शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता केली गेली. आई जगदंबेच्या आशिर्वादाने ही उत्सव परंपरा अखंडित राहो.

दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशभरामध्ये सेवा स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या कॅडेटसनी अश्व व बॅडच्या तालावर शानदार संचलन करीत कासार आ़ंबोली गाव ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, पद्मावती माता मंदिर व विठ्ठल मंदिर येथील परिसराची स्वच्छता केली व शिंदेवाडी गावातील पद्मावती माता मंदिर, श्री. कानिफनाथ मंदिर व जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी जाऊन स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेत दोन्हीं गावांमधील ग्रामस्थ तसेच माजी सरपंच श्री. उमेश सुतार, श्री. सचिन धुमाळ, श्री. स्वप्निल शिंदे, श्री. समीर शिंदे, श्री. शेखर शिंदे यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार सिनियर मास्टर श्री. संदीप पवार, सुभेदार श्री. नवनाथ पवार, एन. सी. सी ऑफिसर सौ. राजश्री गोफणे, गाईड कॅप्टन सौ. दीपाली आंबेकर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सैनिकी परिवाराने केले होते.

ग्रामस्वच्छता अभियान
दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा’ येथील सर्व कॅडेट्स, कर्मचारी यांनी कासार आंबोली येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविले. गावातून घोषणा देत, हातात घोषवाक्य फलक घेऊन रॅली काढली. सर्वांनी कासार आंबोली ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, पद्मावती देवी मंदिर आणि विठ्ठल मंदिर या ठिकाणी स्वच्छता केली. स्वच्छते संदर्भात विविध घोषणा देऊन जनजागृती केली. स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. कासार आंबोली या गावातील मान्यवरांनी कॅडेटचे तसेच शिक्षक वृंदांचे स्वागत केले.
या कार्यक्रमांमध्ये शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री. संदीप पवार, स्वच्छ शाळा समिती प्रमुख सौ. सावित्री पाटील, गाईड कॅप्टन दिपाली आंबेकर, सर्व शिक्षक वृंद यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.⚜️⚜️

शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी नवरात्रीनिमित्त कासार आंबोली गावामध्ये म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या कॅडेटसनी अश्वासहित बॅंडच्या तालावर शानदार संचलन केले गावामध्ये जागोजागी रांगोळी काढून, तसेच अश्वांचे औक्षण करून महिलांनी स्वागत केले. याप्रसंगी पद्मावती मातेच्या मंदिरात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रशालेच्या प्रथेप्रमाणे गावचे प्रथम नागरिक म्हणून माजी सरपंच श्री. उमेश सुतार यांचा सन्मान करण्यात आला. मा. मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांनी सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्व सैनिकी परिवाराचा सत्कार करण्यात आला. या संचलनाचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनानुसार सिनियर मास्टर श्री. संदीप पवार व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश भिलारे यांनी केले.

World literacy Day was celebrated on 08 Sep 25, Mon at MP Auditorium, RLMSS with zest as organised by Pune Institute of Business Management (PIMB), Lawasa Road, Pirangut, Pune

Prof Ms Smriti Bhowmick, President, Literacy Club, PIBM along with her 40 members contingent Student Volunteers conducted the Campaign interspersed with ice-breakers, various activities, competitions and fun games for
Class X, XI ,& XII Cadets while introducing Strategic Management and financial literacy to the participants.

The Workshop was conducted under the aegis of RLMSS ATL Club as coordinated by
Sou Manjiri Patil the ATL Manager (Welcome Speech), Sou Savitri Patil, PGT Physics & Mr Mahesh Kothar, PGT English (Inaugural Speech)

Professor Mayuresh Shendurnikar of PIBM described the initiative and purpose of such collaborative activities.

PIBM PGD students conducted a general Q&A Session based on the strategy.

Cdts Priyanjana Lahane, Siddhi Wadekar and Tanvi Daundkar’s group secured first, second and third ranks respectively while Cdts Sharvari Surve and Yashika Kadam’s team were deeply appreciated for their efforts.

The event was well received and turned out to be memorable with Mr Mahesh Kotkar professing the vote of thanks and concluded with a high-tea with the Delegates.

A few more such events are in the pipe-line.

Thanks, Prof Ms Smriti Bhowmick, Prof Mr Mayuresh Shendurnikar and Team PIBM.

~ The MES RLMSS Family

Scroll to Top
Skip to content