पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्चं माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2024 – 25 साठी पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळामध्ये गुणवत्ता संवर्धन शाळा तपासणी अभियान राबविण्यात आले.
या अंतर्गत शालेय स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तर या तीन टप्प्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.
हे अभियान शालेय विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे .
गुणवत्ता संवर्धन अभियानाचा प्रमुख उद्देश शालेय निरीक्षण व पर्यवेक्षणा द्वारे पारंपरिक व आधुनिक बाबींचा शालेय शिक्षण वाटचालीत समावेश व्हावा या दृष्टीने वर्तमान व आधुनिक निरीक्षण, तपासणीच्या पद्धतीचा समावेश करणे तसेच गुणवत्तेचे संवर्धन करण्यासाठी क्षमता वृद्धिंगत करणे, उणिवा दूर करणे, शिक्षक व शाळेचे कार्य परिचित करून देणे, शाळा विकासासाठी आवश्यक घटकांचे पुनरावलोकन करून अद्ययावत राहणे, शाळातील उत्तम व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आदानप्रदान करणे हा आहे.
सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी तालुकास्तरावरील शाळा तपासणी पथकाने भेट देऊन शाळातपासणी केली.
भूगाव केंद्रातील पथकात केंद्रप्रमुख मा. श्री. म्हाळस्कर, चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालय बावधन चे मुख्याध्यापक मा. श्री. भरत मारणे, पिरंगुट हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री. गोवेकर, कार्यालयीन अधीक्षक मा. श्री. रमेश शेलार, माध्यमिक विद्यालय भूगाव येथील तज्ञ् शिक्षक श्री. सैद, महात्मा फुले विद्यालय लवळे येथील तज्ञ् शिक्षक श्री. विवेक देशमुख यांनी शाला तपासणी केली.
गुणवत्ता संवर्धन अभियानाशी संबंधित भौतिक सुविधा, प्रशासन विषयक, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, मुख्याध्यापक कर्तव्ये, शालेय विभाग, गुणवत्ता संवर्धन व विशेष उपक्रम या 6 विभागा अंतर्गत पाहणी करून गुणदान केले व अभिप्राय नोंदवला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग यांचाही पथकात समावेश असून केंद्रातील अन्य शाळांची तपासणी त्यांनी केली.
प्रशालेचे कमांडंट एअर विंग कमांडर मा. श्री. यज्ञरमण, मुख्याध्यापिका. मा. श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे व श्री. संदीप पवार, यांनी उपस्थितांचे स्वागत केले व गुणवत्ता संवर्धन अभियानातील विभागांबाबत विस्तृत माहिती दिली.
संगणक निदेशक सौ. अश्विनी मारणे यांनी तांत्रिक सहकार्य केले, लिपिक श्री. मनोज शिंदे यांनी कार्यालयीन व विज्ञान अध्यापिका सौ. मंजिरी पाटील यांनी विभागश: नियोजन केले.
सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर सहकारी व सैनिकी परिवाराचे सहकार्य लाभले.
एकूणच विचारातून विकासाकडे झेपावण्यासाठी गुणवत्ता संवर्धन अभियान निश्चितच महत्त्वपूर्ण आहे.

RLMSS Air NCC Contingent

02 Jan 25 (Thu)

‘We the Cadets of National Cadet Corps, do solemnly pledge….’

49 Cadets of 3 Mah Air NCC Sqn of RLMSS, alongwith their Instructor ANO Sou Rajashree Gophane left this morning for Gp HQ, Pune to undergo the thrilll and experience of a 10 Days CAT Camp.

Great a start of the New Year…

With Best wishes….

~ The MES’s RLMSS Family

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 ते 8.00 या कालावधीत प्रशालेचे स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ शाळेच्या क्रीडांगणावर उत्साहात साजरे झाले.

म. ए. सो. शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेचे महामात्र डॉ. श्री उमेश बिबवे, स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सिद्धी आडवणकर, फिल्म मेकर श्री. रश्मिन महागावकर तसेच प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म यज्ञरामन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन पार पडले.
भारतीय संस्कृती व सभ्यता – विविधतेत एकता या विषयाला अनुसरून स्नेहसंमेलनात भारतातील विविध राज्य-प्रदेश व त्यांची संस्कृती, परंपरा यांचे दर्शन प्रशालेच्या विद्यार्थिनींनी संबंधित राज्यातील पारंपारिक सामूहिक तसेच एकल नृत्याद्वारे सादर केले.
सदर स्नेहसंमेलनाला प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म यज्ञरामन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा जोग यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
प्रशालेच्या भव्य पटांगणावर रंगबेरंगी प्रकाशझोतात व विविध राज्यातील पारंपरिक पोशाख परिधान करून विद्यार्थिनींनी उत्कृष्टरित्या भारतीय संस्कृती, परंपरा व सभ्यतेचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभाद्वारे झाली. म. ए. सो. शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, शाळेचे महामात्र डॉ. श्री उमेश बिबवे, स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सिद्धी आडवणकर व श्री. रश्मिन महागावकर यांच्या हस्ते प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. वर्ष 2023-24 मधील प्रत्येक इयत्ता व तुकडीतील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थिनी, वर्ष 2023-24 मधील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम पाच विद्यार्थिनी व वर्ष 2024-25 मधील प्रत्येक इयत्ता व तुकडीतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी तसेच विविध संस्थेद्वारे दिले जाणारे विशेष प्रावीण्य, शिष्यवृत्ती बक्षीसे यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

10 Dec 2024

Ms Ankita Kudtarkar, a PhD Research Student of Jnana Prabodhini’s Institute of Psychology, Pune (JPIP), affiliated to Savitribai Phule Pune University, being guided Dr. Anagha Lavalekar carried out Cognitive abilities, scientific interests, and Atal Tinkering Lab modules based Psychological Testing on 15 Dec 24 (Sun), at RLMSS premises.

This study aims to assess the impact of Atal Tinkering Lab activities on 9th-grade Students’ cognitive abilities (creativity, critical thinking, and problem-solving) as well as their scientific interest.

Data collection procedure of 23 Cadets of ATL Club from class 9 was successfully completed.

The activity was well recieved by all participating Cadets. A few more sittings are in pipe-line.

Sou Manjiri Patil, IC ATL of RLMSS coordinated the successful conduct of the event.

आज 16 डिसेंबर 2024 राष्ट्रीय सर्वांगीण ग्राम विकास संस्था, शिवसमर्थ बचत गट व पौड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 16 डिसेंबर विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यात म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या कॅडेटसनी बॅंड च्या तालावर शानदार संचलन करीत प्रमुख अतिथींना मानवंदना दिली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय वायुसेना निवृत्त विंग कमांडर श्री. अविनाश मुठाळ सर यांनी व उपस्थित मान्यवरांनी सर्व कॅडेटस चे कौतुक केले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन सर, प्राचार्या श्रीमती पूजा जोग मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक श्री. संदीप पवार व सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार व मेट्रन जयश्री ताई यांनी केले होते.

आज दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी दत्तजयंती निमित्त आदर्शगाव अंबडवेट पांढर, ता. मुळशी येथील दत्त मंदिरात इ. 11 वी व इ. 9 वी च्या एकूण 64 कॅडेटस ने ड्रिल ड्रेस मध्ये स्वयंसेवक म्हणून गर्दीनियंत्रणाचे काम उत्कृष्टरित्या केले, याचे नियोजन शाळेचे कमांडंट मा. एम यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, एन.सी.सी. ऑफिसर ए.एन.ओ. सौ. राजश्री गोफणे, सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार, हवालदार श्री. गजानन माळी, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे व मेट्रन स्वाती ताई यांनी केले होते. सर्व अतिथी व भाविकांनी सैनिकी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले…
🙏🙏

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या इ. 11 वी च्या कॅडेटस ने म.ए.सो. सिनियर काॅलेज, क्रीडा भारती, पुणे महानगर व क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वयोगट 19 मुली च्या स्पर्धेत इयत्ता 11 वी च्या दोन्ही संघांनी फायनल मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले प्रथम रोख पारितोषिक 3000/- रु. व ट्राॅफी द्वितीय क्रमांक 2000/-रु. व ट्राॅफी प्राप्त‌, म.ए.सो. च्या एकूण 14 संघानी भाग घेतला होता, विजयी संघाचे, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर, मेट्रन श्रीमती प्रतिभा चव्हाण मॅडम, श्री. राम काका सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

10 Dec 2024

RLMSS hosted the Contingent of Indian Naval Bike Expedition – 2024 – Ride of The Marakkars, on their return leg to Mumbai.
The Team led by
Commodore D Sengupta from the Western Naval Command gave an interactive insight into the cause & purpose of the expedition while inspiring the Cadets to join Indian Navy and be a winner for ever.
Lt Cdr Vishal Nair briefed the Cadets about the Technical Expertise of the Indian Navy and how to go about preparing to join the Indian Navy.
The team also had representation of officers from the Indian Army and Indian Air Force promoting Tri-Service Synergy.
‘The Ride of Marakkars’ Team of the Indian Navy left an indelible impression on the minds of young Cadets, Staff and officials of RLMSS alike making the visit an important milestone in the journey of the MES’s RLMSS Family.

jayahind…

आज रविवार दिनांक 8 डिसेंबर सकाळी 5.30 वा इ. 11 वी च्या 56 कॅडेट बाप्पूजी बुवा मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर फेज 1 हिंजवडी येथे पायी ट्रेकिंग साठी गेल्या होत्या मा. कमांडंट एअर विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार सर श्रीमती प्रियांका गुरव मॅडम व कमलताई यांनी नियोजन केले होते.

ATL – IoT workshop
The two-days IoT workshop was organized by the IEEE VIIT Student Branch at RLMSS on December 2nd and 3rd, 2024, was a resounding success, engaging students from 7th to 9th grades. The workshop had been focused on providing them with hands-on experience with IoT projects featuring sensors, Arduino boards, and online simulation tools such as TinkerCAD. Students gained a solid understanding of the concept of IoT, exploring how everyday objects can be connected to the internet to collect and exchange data.
The workshop highlighted various applications of IoT across different industries, showcasing how this technology is transforming sectors such as healthcare, agriculture, smart cities, and more. In addition, participants were introduced to the Blynk IoT application, which allows for easy development of IoT solutions. The basics of Artificial Intelligence (AI), Machine Learning (ML), and computer networks were also covered, providing a well-rounded perspective on how these technologies interconnect.
The projects not only reinforced theoretical concepts but also empowered the students to experience the outcomes of their learning. By the end of the workshop, the students shared insightful thoughts on the real-life applications of the projects they worked on, demonstrating their understanding of IoT’s practical implications. Organized by IEEE, the event aimed to inspire and prepare young minds for the evolving landscape of IoT technology. The workshop’s success was marked by the active participation of IEEE members, who recognized the significance of this learning opportunity for both academic and professional growth.
Participants gained valuable expertise related to IoT, coming away with plenty of ideas for solving everyday problems using IoT applications. They learned how Arduino works, and by working with various sensors, they grasped their functionality and importance. The team also focused on effective teamwork, overcoming challenges, and communicating with each other to address questions and concerns. One of the biggest challenges we faced was completing all the projects within a tight time frame, but the satisfaction reflected in each student’s face motivated us to push through. Everyone enjoyed the workshop, shared their ideas, and even presented problem statements that sparked engaging discussions. In conclusion, the two-day IoT workshop was a remarkable journey filled with insightful discussions, hands-on learning experiences, and collaborative problem-solving. Participants were exposed to cutting-edge technologies, including AI, ML, and the basics of coding. Throughout the workshop, we witnessed a shared enthusiasm for exploring the vast potential of IoT in various industries, making it a truly enriching experience for all involved.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पुणे येथे भारतीय नौदल दिवस उत्साहात साजरा
बुधवार ४ डिसेंबर २०२४ रोजी प्रशालेतील एअर एन सी सी आणि प्रशालेच्या कॅडेट्सकडून भारतीय नौदल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ६:०० वा. एन सी सी आणि प्रशालेच्या सर्व कॅडेटसनी मानवंदना देऊन उत्तम संचलन केले. तसेच सायंकाळी ४:०० वाजता सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात सूत्रसंचालक कॅडेट चिन्मयी संदीप देसले आणि कॅडेट समिक्षा विठ्ठल जाधव यांनी भारतीय नौदलाची माहिती व इतिहास सांगितला. त्याचबरोबर भारतीय नौदलाचा प्रोत्साहनात्मक व्हिडीओ दाखवण्यात आले. कॅडेट नेहा प्रविण पाष्टे हिने सर्वांचे आभार मानले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील एन सी सी कॅडेट्सनी केली. एन सी सी विभाग प्रमुख थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शाळेचे सर्व पदाधिकारी, सैन्य प्रशिक्षण विभाग, क्रीडा विभाग ,वसतीगृह विभाग, व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवार दिनांक ०३/१२/२०२४ रोजी वर्तमानपत्र सकाळ NIE अंतर्गत शाळेतील एन सी सी च्या १०० कॅडेट्ससाठी ‘रस्ता सुरक्षा जागरुकता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सकाळ तर्फे श्रीमती गीतांजली थोरात मॅडम (RTO मास्टर ट्रेनर) यांनी कॅडेटना व्याख्यानातून रस्ता सुरक्षा म्हणजे काय? त्यासंबंधी घ्यावयाची सावधगिरी, रस्त्यावरील चिन्हांची ओळख इ. विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी प्रतिज्ञा म्हंटली. कॅडेट्सना प्रमाणपत्र आणि माहिती पुस्तिका देण्यात आल्या. २ कॅडेट्सनी आपला अभिप्राय व्यक्त केला. याप्रसंगी सकाळचे समन्वयक श्री. सुजित जाधव उपस्थित होते. तसेच प्रशालेचे सीनिअर मास्टर श्री श्याम नांगरे सर, प्रशालेचे PRO श्री. संदीप पवार सर, एन सी सी प्रमुख थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे उपस्थित होते.

आज रविवार दिनांक 01 डिसेंबर इ.10 वी च्या कॅडेटने पायी ट्रेकिंग सकाळी 5.30 ते 8.30. या वेळात शाळा ते बाप्पूजी बुवा मंदिर, विठ्ठल मंदिर येथे उत्साहात पार पूर्ण केले, मा. कमांडंट विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार सैन्य शिक्षक हवालदार श्री. गजानन माळी मेट्रन स्वाती ताई, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी नियोजन केले होते.

“NovBorn” Birthday Celebrations…

💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🙏🙏🙏🙏🙏

नानक-साई सेवा ट्रस्ट आयोजित रक्तदान शिबीर व जाहीर व्याख्यान, आकुर्डी येथे २६ नोव्हेंबर २०२४ रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या ५५ कॅडेट्सकडून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली.

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि निष्पाप नागरिकांना मानवंदना देऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उपस्थित माजी सैनिक आणि आपल्या शाळेच्या कॅडेट्सकडून शाहिद जवानांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष – मा. डॉ. श्यामा घोणसे, प्रमुख पाहुणे- म.ए.सो. नियामक मंडळ उपाध्यक्षा मा. सौ. आनंदीताई पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कॅडेट्सना उत्तम संचलनाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते- शाळेचे कमांडंट मा. एअर विंग कमांडर एम. यज्ञरामन सर यांनी ‘देशाची अंतर्गत सुरक्षा ही नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले. एन. सी. सी प्रमुख थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कॅडेट्सच्या परेडची तयारी करुन घेतली. तसेच कार्यक्रमास मेट्रन प्रियांका ताई आणि राम काका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कॅडेट्सनी शिवगर्जना दिली. आणि वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित सर्वांनी कॅडेट्सचे कौतुक केले. कार्यक्रमानंतर तेथील गुरुद्वारामध्ये कॅडेट्सना ट्रस्टद्वारे लंगरचे आयोजन करण्यात आले.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पुणे येथे राष्ट्रीय छात्रसेना दिवस उत्साहात साजरा
२५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रशालेतील एअर एन सी सी कॅडेट्स यांच्याकडून ७६ वा राष्ट्रीय छात्रसेना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ६:०० वा. एन. सी. सी आणि प्रशालेच्या सर्व कॅडेटसनी मानवंदना देऊन उत्तम संचलन केले. तसेच सायंकाळी ४:०० वाजता प्रशालेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात सूत्रसंचालक कॅडेट तेजल आनंदा निखाडे आणि कॅडेट स्वरा दिनेश गवस यांनी एन. सी. सी ची माहिती व इतिहास सांगितला. त्याचबरोबर एन. सी. सी चा प्रोत्साहनात्मक व्हिडीओ दाखवण्यात आला.
प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन यांनी कॅडेट्सची एन. सी. सी आणि सैन्यदलासंबंधी प्रश्नमंजुषा घेतली तसेच सैन्यातील संधींची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. कॅडेट अनया अनिकेत कदम हिने सर्वांचे आभार मानले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील एन सी सी कॅडेट्स नी केली. एन सी सी विभाग प्रमुख थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शाळेचे सर्व पदाधिकारी, सैन्य प्रशिक्षण विभाग, वस्तीगृह विभाग व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

आज रविवार दिनांक 24 नोव्हेंबर इ.12 वी च्या कॅडेटने पायी ट्रेकिंग सकाळी 5.30 ते 8.30 या वेळात शाळा ते बाप्पूजी बुवा मंदिर, विठ्ठल मंदिर येथे उत्साहात पार पूर्ण केले, मा. कमांडंट विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, मेट्रन लक्ष्मी ताई, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी नियोजन केले होते.

दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला १६४ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त प्रशालेत मोठ्या जल्लोषात मएसो वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. तसेच राणी लक्ष्मीबाई यांची जयंती देखील साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांच्या व राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत, सरस्वती पूजन करून सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रशालेचे शिक्षक गजानन पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. इयत्ता दहावीतील कॅडेट गिरीजा जोगळेकर हिने संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची माहिती दिली. इयत्ता नववीच्या वर्गातील कॅडेट श्रद्धा पवार हिने संस्थेचे दुसरे संस्थापक लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांची माहिती दिली तर इयत्ता आठवीतील कॅडेट शिवांजली ढगे हिने संस्थेचे तिसरे संस्थापक वामन प्रभाकर भावे यांची माहिती दिली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग यांनी संपूर्ण संस्थेचा व्याप-विस्तार व इतर शाखा यांची माहिती देत मनोगत व्यक्त केले. संस्थेचे ब्रीदवाक्य, नव्याने संस्थेत उभ्या होत असलेल्या शिक्षणाच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्रशालेचे कमांडर विंग कमांडर एम यज्ञरामन यांनी मुलींच्या सैनिकी शाळेच्या निर्मितीत संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. ‘देशसेवेसाठी प्रशालेच्या कॅडेट जातात तेव्हा संस्थेला विद्यार्थिनींचा अभिमान वाटतो’ असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचा समारोप मएसो गीताने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता अकरावीची कॅडेट सिद्धी वाडेकर व सेजल पाटील हिने केले.

Infosys springboard – Maker lab on wheels
VIIT कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोंढवा व Infosys कंपनी यांच्या सहकार्याने…
दिनांक 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यान म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत Infosys springboard – Maker lab on wheels या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड द्वारे राबवण्यात येणारा मेकर लॅब हा एक अभिनव उपक्रम आहे.
21 व्या शतकातील जीवनकौशल्ये व STEM शिक्षणाची अनुभूती देणे, नाविन्यपूर्ण संस्कृतीची ओळख करून देणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसन, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती, सहयोग गुण वृद्धिंगत करणे या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या मोठ्या बसमध्ये विद्यार्थिनींनी वैज्ञानिक संकल्पनांचा प्रात्यक्षिक व कृतींद्वारे अनुभव घेतला तसेच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कोडींग, प्रोग्रामिंग तंत्रज्ञानाची ओळख Maker lab on wheels च्या माध्यमातून झाली.
एका बॅच मध्ये 20 विद्यार्थिनी याप्रमाणे प्रत्येक batch चे 1 तासाचे सत्र बस मध्ये घेण्यात आले .
प्रत्येक दिवशी 4 batches मध्ये 80 विद्यार्थिनी याप्रमाणे चार दिवसांमध्ये इयत्ता 6वी ते 9वी च्या सर्व 320 विद्यार्थिनीनी सहभाग घेतला.
1) प्रत्येक विद्यार्थिनीला 1 टॅब देऊन maker app द्वारे संकल्पना स्पष्टीकरण करण्यात आले
2) smart board च्या वापराने तज्ञांनी व्हिडिओ व ऍनिमेशन द्वारे संकल्पना स्पष्ट केली.
3) विविध किट्स चा वापर करून विद्यार्थिनींनी टॅब वरील मार्गदर्शक सूचनांच्या साहाय्याने दिलेला टास्क पूर्ण केला व prototyping, coding केले .
5) संकल्पना प्रत्याभरणासाठी टॅबवर ऑनलाईन चाचणी दिली .

अटल टिंकरिंग लॅब व NEP 2020 नुसार शालेय विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित STEM शिक्षणाची दृष्टी Maker lab on wheels उपक्रमातून निश्चितच विकसित होण्यास मदत झाली.

InnoVision – 2024 – The Big Idea

Grand Finale at Christ University, Lawasa (16 Nov 24)

~ ‘The Warriors Team’ of RLMSS (Class XI Cadets) presented an innovative theme on

Safety of Fighter Pilots and Ejection Seat Mechanism

and were widely appreciated for their skills.

~ Cdts Arya Kore, Sarvadnya Ganjale & Vrinda Pardeshi (all from Class XI) as defenders did a great job and made us all proud.

The Contingent had…

~ Class XI Cadets
~ Ms Priyanka Hazare – Coord
~ Sub Navnath Pawar – Mil Instr
~ Shri Samir Jadhav – Estate Manager
&
Shri Ram Dhait for transportation.

Memorable….

Well done, Rani Laxmis…

~ The MES’s RLMSS Family

Date – 26 oct. 2024

मंगळवार दिनांक– १५ ऑक्टोबर २०२४
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’म्हणून साजरा केला जातो. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे. तसेच वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. अशा या वाचनाचे महत्त्व सांगणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी प्रशालेमध्ये वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रशालेत सकाळी ७.४० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता ७ वी अ च्या विद्यार्थिनींनी ‘माझी मराठी’, ‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ या कवितांचे काव्य गायन सादर केले. प्रशालेचे शिक्षक श्री. महेश कोतकर सर यांनी विद्यार्थिनींना आपल्या प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले. इयत्ता ७ वी अ तील कॅ. दुर्वा परळीकर या विद्यार्थिनींने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती मनोगतातून व्यक्त केली. तसेच सौ. शिंदे सुनिता यांनी बोधपर गोष्टीचे अभिवाचन केले. प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती जोग मॅडम यांनी आपल्या जीवनात वाचन किती महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याला किती समृद्ध करणारे असते हे सांगितले. इयत्ता सातवी अ आणि ९ वी ब मधील मधील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅ. साक्षी पंडा, कॅ. रेवती पवार या विद्यार्थिनींनी केले. कॅ. श्रुतिका पानमंद या विद्यार्थिनींने आभार मानले. तसेच दुपारी विद्यार्थिनींनी ग्रंथालयात विविध पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती जोग मॅडम, प्रशालेचे मा. ऐविएन विंग कमाण्डर म. यज्ञरामन सर, सिनियर मास्टर श्री. नांगरे सर, पर्यवेक्षक श्री. पवार सर हे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणेच पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मराठी विभागाचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले.

On Saturday, 19 October 2024, a lecture on “Nagari Shishatachar” (Civic Etiquette) was organized for students, teachers, and the entire RLMSS family, featuring guest speaker Mrs. Shalaka Gotkhindikar.

Mrs. Gotkhindikar effectively conveyed valuable lessons on:

– Inculcating values and preserving culture
– Developing effective communication skills
– Cultivating courage and resilience
– Fostering innovative personalities
– Importance of following rules for personal growth

The session concluded with a question answer session.

The program was anchored by Cdt Aagrata Chaudhary and Cdt Akshayani Mane of Std. 12th.

The event was organized under the guidance of Commandant Avn Wg Cdr M Yagnaraman and Principal Mrs. Pooja Jog, with coordination by Mrs. Savitri Patil.

The entire MES’S RLMSS family attended the program.

This lecture aimed to instill civic sense and etiquette among the students and military personnel, promoting holistic development and responsible citizenship.

आज ११ ऑक्टोबर २०२४ रोजी म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली येथील शाळेत विजयादशमी खंडेनवमीच्या निमित्ताने शाळेचे कमांडंट विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, मुख्याध्यापिका सौ. पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सर्व शिक्षक – शिक्षिका यांच्या हस्ते शस्रपूजन करण्यात आले. त्यानंतर इ. 9 वी व इ. 11 वी च्या कॅडेटने पिरंगुट येथील सनशाईन प्लाझा ते गोळे आळी, पवळे आळी येथे शानदार असे संचलन केले. याप्रसंगी पवळे उद्योग समूहाच्या डायरेक्टर संगिता ताई पवळे, पिरंगुटचे माजी सरपंच श्री. ज्ञानेश्वर पवळे, माजी सरपंच सौ. सुरेखाताई पवळे, माजी उपसरपंच श्री. दीपक गोळे, माजी उपसरपंच श्री. महेश वाघ यांच्या उपस्थितीत अश्वाचे पूजन करण्यात आले, त्यानंतर बॅंडच्या तालावर सुंदर संचलन केले, भैरवनाथ मंदिरासमोरील शिवस्मारका समोर कॅडेटसनी शिवगर्जना म्हटली. सर्व पिरंगुट ग्रामस्थांनी संचलनाचे उत्साहात स्वागत करून विजयादशमी च्या शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, ज्येष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने, श्री. भाऊसाहेब मार्तंड, श्री. महादेव मगर, व सर्व सैनिकी परिवाराने केले होते.

08 Oct 24 (Tue)

~ The day started with a Ceremonial Parade at RLMSS Sports Ground.

~ The evening started with screening of the Air Force Song in a special assembly held at MP Auditorium (HQ MTW).

~ The Cadets were introduced to the History and Legacy of the Indian Air Force, various types of aircraft, operations and missions etc.

~ Relevant information and achievements by Air NCC Component of Maharashtra Directorate were shared too.

~ Air Force Day Parade held at Air Force Station Tambaram and a magnificent Flypast held at Marina Beach, Chennai were also video shown to the audience.

~ All the events were well coordinated and conducted by
ANO TO Sou Rajashree Gophane of Air Sqn NCC, RLMSS.

~ ACC Cdt Prarthi Mhatre of Class XII commanded the Ceremonial Parade while Cdts Advika Kedari, Anuja Pagar, Gargi Bhilare and Nandini Dhas did the event compering.

~ RLMSS Officials, Members of the Staff and Famiilies were present and enjoyed watching the events. Cdt Shrutika Panmand did the vote of thanks…

jayahind…

वार्षिक सादरीकरणाच्या ‘नागरी शिष्टाचार‘ या विषया अंतर्गत प्रशालेत स्वच्छता सप्ताह साजरा केला. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्री निमित्त पद्मावती देवी मंदिर, कासार आंबोली येथे संध्याकाळी 8.15 वा. ‘स्वच्छतेचा जागर’ हे पथनाट्य सादर करण्यात आले. समुपदेशन विभागामार्फत ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठावो’ हा नृत्य नाट्य प्रकार व भारुड सादर करण्यात आले. यामध्ये इयत्ता 9 वी आणि 11 वी च्या विद्यार्थिनींनी त्याचे विविध गुण-कौशल्ये दाखवली…

आनंदी शनिवार व ATL community involvement उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी आनंददायी शनिवार व ATL community involvement उपक्रमांर्गत इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान खेळणीद्वारे सहज शिक्षण या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेत करण्यात आले होते. ATL community involvement द्वारे तालुक्यातील विविध शाळांमधील विदयार्थ्यांना समूह शाळेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व विज्ञान प्रसाराद्वारे विज्ञान विषयक रुची निर्माण व्हावी या उद्देशाने सैनिकी शाळेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. विज्ञान भारती चे सदस्य व नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई येथे 30 वर्षे विज्ञान समन्वयक म्हणून कार्यरत असलेले मा. श्री. विठ्ठल रायगावकर व त्यांचे सहकारी मा. श्री. सुनिलजी चांदोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधनक्षेत्रातील योगदान, विविध विज्ञान कृती उपकरणे, प्रयोग व खेळणीद्वारे विज्ञानविषयक संकल्पना व दैनंदिन जीवनातील विज्ञान याविषयी प्रमुख अतिथींनी मार्गदर्शन केले.
काही कृती विदयार्थ्यांनी स्वतः केल्या तर प्रयोग सादऱीकरणामध्ये विविध शाळांतील विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
कार्यशाळेसाठी मुळशी तालुक्यातील 11 निमंत्रित शाळांपैकी 8 शाळांमधील इयत्ता 6 वी ते 8 वी च्या एकूण 275 विद्यार्थी व 22 विज्ञान शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनी कॅडेट शिवांजली ढगे व कॅडेट देविका ताड यांनी केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय ATL incharge सौ. मंजिरी पाटील तर आभार विज्ञान विभाग प्रमुख सौ. वैशाली शिंदे यांनी मानले. प्रशालेचे कमांडंट एअर विंग कमांडर (निवृत्त) यज्ञरमण सर व मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग मॅडम यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे व श्री. संदीप पवार तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यशाळेविषयी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत 2 विद्यार्थी व
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेवाडी येथील शिक्षिका सौ. अश्विनी पवार व संस्कार स्कूल पिरंगुट येथील शिक्षिका कोल्हे मॅडमनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप विज्ञान गीताद्वारे करण्यात आला.


ATL One Day Workshop on “Python Programming for Beginners”

We are delighted to announce the successful completion of the “Python Programming for Beginners” workshop on 5th of October 2024, under ATL lab activity for students from grades 9 to 11. The primary focus of this engaging event was a hands-on workshop on basic Python Programming.

This was conducted by engineering students from PES Modern college of Engineering, in association of ED & IIC cell. A total of 44 enthusiastic girls participated, divided into 11 groups, each guided by a dedicated mentor. Throughout the workshop, students were introduced to the basics of python programming. They explored the applications of these technologies in real-world scenarios, gaining practical insights and valuable skills.
The active participation and enthusiasm displayed by every student made the workshop a memorable and enriching experience, interactive session helped a lot to foster creativity and innovation among students.
This event was coordinated by Mr.Ravindra Urade member of school ATL committee.

आज 2 ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा गांधी जयंती व स्वच्छता सप्ताह निमित्त आज वसतीगृह स्वच्छता करून घेण्यात आली.

तसेच आज श्रीमती प्रियंका गुरव मॅडम यांनी हॉस्टेल मध्ये इयत्ता सहावी व सातवी च्या मुलींना वैयक्तिक स्वच्छता या विषयी व्याख्यान दिले.

29 Sep 24 / Sun

RLMSS Contingent as part of
Mulshi Taluka ESM Raising Day‘ Celebrations organised at Bhukum, Pune.

Greatly organised and well received…

Thanks…dear Shri Anil Chondhe (Dir, Shreeram Security Services, Bhukum) & Parent Volunteer RLMSS

The RLMSS Contingent :

~ Shri Sandeep Pawar – IC Mil Trg, PRO & Team Manager

~ Shri Sachin Jadhav – Duty Master

~ Sub Shri Navnath Pawar – Mil Instr

~ Shri Akshay Mandage – Cadet Instr

~ Sou Anita Pande – Girl Cadet Instructor

~ Cdt Divija Marne – Acdemy Band Master

~ Cdt Radhika Chavan – Nishan Senior Cadet (Jijamata – The Vauhini House)

~ Band Contingent & Nishan Toli Cadets

~ Shri Ram Dhait – Transport services

Keep going….

Best wishes from…
🙏
The MES’s RLMSS Family

Happy Teachers Day wishes..

~ Here at RLMSS Pune, Appointment Cadets along with their Classmates of Class XII, started the ‘Role play’ of RLMSS Officials (Commandant, Principal, Senior Master, Supervisor, Teachers and all Instructors)

~ Literally, the
Academy routine was fully overseen / run by them today.

(A training activity to inculcate and nurture certain leadership traits and skills which they already have / had exhibited )

~ The mid-day celebrations had Sou Pratibhatai Shaligram, Retd Faculty, RLMSS as the Chief Guest wherein Dr Ms Nehatai Deshpande, Visitor RLMSS and Dr Dattatraya Naik of MES too graced the occasion.

~ The event was befittingly planned and executed by Sou Savitri Patil, Shri Pramod Zurmure & Ms Priyanka Hazare, the Faculties of RLMSS. That special lunch is the icing on the cake…

Good You are…dear Class XII…

Proud of You…our future Ranilakshmis…

Best of our wishes….
~ The MES’s RLMSS Family

‘Role play’ is the act of imitating the character and behaviour of someone who is different from yourself, for example as a training exercise. Group members have to communicate with each other through role-play. 2. verb. If people role play, they do a role play.


31 Aug 24 (Sat)
Community Service by RLMSS NCC Contingent
(3 Mah Air Sqn NCC)

~ As part of NCC Training and Social Responsibilty,

NCC Cadets of RLMSS undertook Community Service at Sri Padmavati Devalayam premises and Vitthal Rukmini Devalayam premises, Kasar Amboli, Pune. They helped the locals in traffic management while creating awareness of a happy coexistence and living in a clean and pollution free environment.

~ The event was befittingly organised by ANO TO Sou Rajashree Gophane of RLMSS with due assistance extended by Shri Sandeep Pawar, PRO and Shri Mangesh Patil, Asst Teacher RLMSS. Sarpanch Mrs. Priti Shinde and social activist Mr. Dattatraya Sutar were present and given good wishes to cadets.

National Sports Day Celebrations @ RLMSS…

29 Aug 2024 (Thu) / 1600 hrs onward

~ National Sports Day Celebrations at Camp Shaurya Ground, RLMSS, commemorating birth anniversary of the Legendary Indian Hockey Wizard & Olympian Padmabhushan Maj Shri Dhyan Chand ji.

~ The solemn celebrations also marked the Inaugural Ceremony of Inter House Military Training & Sports Championship -2024-25.

~ Cadet Organisers rose to the occasion. Academy Sports Captain Cdt Namrata Raut administered the oath while Shri Sandeep Pawar. IC Mil Trg & Sports, Coord and PRO RLMSS alongwith the team of Instructors conducted the event in the most befitting manner.

~ Shri Mahadev Magar conducted the Inaugural League Match (Basketball) between Jijamata and Durgavati Houses in which Durgavati House emerged winner.

~ RLMSS Authorities and members were in presence to witness the celebrations and match.

तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत प्रशालेचे यश…

आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी, ध्रुव ग्लोबल स्कूल नांदे येथे झालेल्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची उल्लेखनीय कामगिरी.
1) Cdt- ओजस्वी बोबडे – ‌8th – प्रथम क्रमांक.
2) Cdt- वंशिका खरात – 11th – द्वितीय क्रमांक.
3) Cdt- आर्य माने – 10th – द्वितीय क्रमांक.
4) Cdt- सलोनी घोंगे – 9th – द्वितीय क्रमांक.
5) Cdt- नागप्रणवी भास्कारायणी – 12th – तृतीय क्रमांक.
6) Cdt- आत्मजा गोनते – 10th – चतुर्थ क्रमांक.
7) Cdt- सई पोरे – 11th – पाचवा क्रमांक.
8) Cdt- स्वामींनी पोतदार – 8th – पाचवा क्रमांक
यांची जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

💐सहभाग घेतलेल्या कॅडेट💐

9) Cdt-अनुष्का तिडके- 6th
10) Cdt-मानसी जाधव – 9th
11) Cdt-श्रावणी कोल्हे -11
12) Cdt-समीक्षा जाधव – 9th
13) Cdt-तृप्ती धायबर – 11th
14) Cdt-पूर्वा भापकर – 9th
15) Cdt-अनन्या साळुंखे – 9th
16) Cdt-चिन्मयी देसले – 9th
17) Cdt-वैभवी केंजळे – 9th
17) Cdt-पायल रोंगटे – 9th
18) Cdt-श्रेया तळेकर – 9th
19) Cdt-आर्या कोरे – 11th
20) Cdt-वेदिका भांबुरे – 8th
21) Cdt-तृप्ती धायबर – 11th

मार्गदर्शक योग प्रशिक्षक प्रिती वाळके, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार व क्रीडा प्रशिक्षक ऋतुजा कापसे, सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

गोपाळकाला व दहीहंडी उत्सव

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत क्रीडा विभागाच्या वतीने गोपाळकाला व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, पाणी विरहित दहीहंडीचा आनंद सैनिकी शाळेच्या कॅडेटसनी घेतला.



आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत सामाजिक रक्षाबंधन…

आनंदायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत (इ. 8 वी A/B) शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी, म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, येथील विद्यार्थिनींनी कातकरी वस्तीमध्ये जाऊन सामाजिक रक्षाबंधन साजरे करत मुलांना खाऊ वाटप केले. विद्यार्थिनींनी या वस्तीतील प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांना राख्या बांधल्या तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. कातकरी वस्तीतील या उपक्रमात जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ शिक्षक सुदाम राजाराम पवार यांनी विशेष सहकार्य केले होते. प्रशालेच्या विद्यार्थिनींना कातकरी वस्तीतील विद्यार्थी, त्यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती याबद्दल माहिती सांगितली. तसेच प्रशालेतील रक्षाबंधन याविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती सांगितली.
प्रशालेच्या अध्यापिका दिपाली आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना बोधकथा सांगितली. प्रत्येक घरात जाऊन विद्यार्थिनींनी भेट दिली. कार्यक्रमाचे आभार भाऊसाहेब मार्तंड यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुनीता शिंदे, मंगेश पाटील व राम घाईत हे सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी एकूण ८१ विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या पद्धतीने सामाजिक रक्षाबंधन हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

दिव्यांग बांधवांना राखी बांधताना आपल्या मुली सोबत त्यांच्यासाठी खाऊ न्यायला विसरल्या नाही…

भर पावसात मुलींना कातकरी वस्ती, मतिमंद शाळा तसेच वृक्षांना रक्षाबंधन केले. सैनिकी परिवारातील मेस, security, माळी कामगार सर्वांना राख्या बांधून बंधुत्वाचे नाते जपले.

प्रशालायाः संस्कृतदिनसमारोहः

दिनाङ्क २६ ऑगस्ट सोमवासरे अस्माकं प्रशालायाः संस्कृतविभागे संस्कृतदिनसमारोहः उपलक्ष्ये नृत्यनाट्याञ्जलिः कार्यक्रमः सञ्जातः। अस्मिन् कार्यक्रमे मुख्यातिथिरूपेण अस्माकं प्रशालायाः कमांडन्ट एअर विंग कमांडर यज्ञरामन् महोदयः आगम्य छात्राः मार्गदर्शनं अकरोत्। कार्यक्रमे प्रशालायाः मुख्याध्यापिका पूजा जोग महोदया, वरिष्ठाचार्यः श्याम नाङ्गरे, पर्यवेक्षकः सन्दिप पवार महोदयः तथा च सर्वे शिक्षकाः उपस्थिताः आसन्।
कार्यक्रमस्य आरम्भः सरस्वतीवन्दनाद्वारा सञ्जातः। कार्यक्रमस्य प्रास्ताविकं भाषणं प्रियाङ्का राजहंस महोदया कृतवती। संस्कृतभाषायाः उत्तमः भाषामाध्यमः सुभाषितम् अस्ति इति उक्तवती। सरस्वतीवन्दनानन्तरं छात्राः तुकाराममहाराजस्य ‘ पद्मनाभा नारायणा ‘ अभङ्गम् नृत्य तथा च गान् प्रकारेण प्रस्तुतीकृताः। तदनन्तरम् आदिशङ्कराचार्य विरचितः ‘कालभैरवाष्टकम् ‘ अगायन्। तदनन्तरम् ‘अमृतवाणी संस्कृतभाषा ‘ गीतम् अगायन्। तदनन्तरम् छात्राः ‘ भगवत् नर्तिकीयम् ‘ नाम संस्कृतलघुनाटिकायाः प्रस्तुतिम् अकुर्वन् । सम्पूर्ण कार्यक्रमस्य नियोजनं संस्कृतविभागस्य नवमी कक्षायाः छात्राः कृतवत्याः। सर्वे संस्कृतछात्राः कार्यक्रमे सहृदयं सोत्साहं सहभागम् अकुर्वन्।

19 Aug 24 (Mon)

‘RLMSS sArvajanik rakshAbandhan & Thanksgiving Ceremony’

~ In a first of this kind,
the event started happily with the Cadets traditionally welcoming the Sub-Staff of RLMSS (Hostel, Mess, Security and Maint Staff) and Shri Bhausaheb Martand, Teacher presented the welcome note and set the mood.

~ Shri Shyam Nangare, the Senior Master presented a short speech and a traditional song while Shri Advait Jagadhane, Teacher, presented a well- crafted speech on the relevance and importance of rakshAbandan, it’s societal contributory upliftment.

~ Principal and Commandant extended their goodwishes while Shri Sandeep Pawar, Supervisor and PRO extended the Thanksgiving message to all concerned.

~ Cadets and Staff indulged in the traditional and emotional ‘rAkhi tying’ and sought Blessings.

~ A sense of happiness and emotional high prevailed which was enhanced by a traditional light refreshment honouring the Staff and their ‘ShrAvaN sOmvAr upvAs’. All the members of ‘The MES’s RLMSS Family’ enrichingly shared happy moments and continued with the routine.

हर घर तिरंगा उपक्रम…

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा उपक्रम ध्वजारोहण समारंभ पहिला दिवस मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, ता. मुळशी, जि. पुणे येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सैनिकी शाळेच्या मुलींनी शानदार संचलन करुन राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. आपल्या मनोगतात श्रीमती पूजा जोग यांनी सांगितले की भारतीय लष्करातील जाज्वल्य देशप्रेमाचा आविष्कार व असामान्य कर्तृत्वाचा आलेख याचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे. मुलींसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या असून त्या संधीचा लाभ मुलींनी घ्यावा, विशेषतः सशस्र सेनादलात भाग घेऊन देशाची सेवा करावी असे ही सांगितले याप्रसंगी पर्यवेक्षक श्री श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, या कार्यक्रमाचे आयोजन, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले होते, या प्रसंगी सैनिकी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते, यानिमित्ताने कासार आंबोली गावामध्ये शानदार संचलन करीत सैनिकी शाळेच्या कॅडेटस नी विविध घोषणा देत तिरंगा रॅली काढली. शाळेचे पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी “हर घर तिरंगा” या उपक्रमाचे महत्व सांगून सर्वांना तिरंगा ध्वजाची शपथ दिली. याप्रसंगी कासार आंबोली ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रिती शिंदे, ग्रा.पं. सदस्या सौ. माधुरी धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिल शिंदे व श्री. सागर धुमाळ यांनी संचलनाचे स्वागत केले. सर्व अतिथी मान्यवर व पालकांनी विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे आवर्जून कौतुक केले.
14 ऑगस्ट 2024, हर घर तिरंगा अभियान दुसरा दिवस. शाळेच्या मैदानावर सुभेदार श्री. नवनाथ पवार यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन झाले, त्यानंतर शानदार संचलन करीत कॅडेसनी ध्वजाला सलामी दिली.

Scroll to Top
Skip to content