Camp Shaurya May 2025

Day 3 (05 May 25 – Monday)

Morning Flag hoisting
Report
Hat yoga
Drill moments
Wall climbing
Rifle shooting
Roop mallalhamb
Obstacles
Indian martial art
Trekking
Physical examination
Medical examination
Art and craft
SSB training
Skating
Archery
Chess
Indoor games
Science quiz

Camp Shaurya May 2025

Day 3 (05 May 25 – Monday)

Morning Flag hoisting
Report
Hat yoga
Drill moments
Wall climbing
Rifle shooting
Roop mallalhamb
Obstacles
Indian martial art
Trekking
Physical examination
Medical examination
Art and craft
SSB training
Skating
Archery
Chess
Indoor games
Science quiz

Camp Shaurya May 2025

Day 2 (Sunday)

Morning Flag hoisting
Report
Hat yoga
Drill moments
Wall climbing
Rifle shooting
Roop mallalhamb
Obstacles
Indian martial art
Trekking
Physical examination
Medical examination
Art and craft
SSB training
Skating
Archery
Carrom
Indoor games
Science quiz
Bhajan program
Horse riding

Camp Shaurya May 2025

Day 2 (Sunday)

Morning Flag hoisting
Report
Hat yoga
Drill moments
Wall climbing
Rifle shooting
Roop mallalhamb
Obstacles
Indian martial art
Trekking
Physical examination
Medical examination
Art and craft
SSB training
Skating
Archery
Carrom
Indoor games
Science quiz
Bhajan program
Horse riding

Day 1

Camp cadets registration
Kit distribution
Campus visit
Introduction of instructors
Captain appointments

Camp cadets registration

Kit distribution

 

 

 

RLMSS Camp Shaurya (SSB-I)

This unique, completely residential SSB /NSB / AFSB Training Camp started today at RLMSS Campus to train Girl Candidates aspiring to join Indian Armed Forces and serve as a Commissioned Officer…

The uniqueness is that, it provides opportunity for RLMSS Cadets to interact and co-train with other such outside school aspirants and ensure a balanced and systematic approach to face SSB while having the taste of a Military Academy life and schedule here.

Well coordinated by Shri Sachin Jadhav, PGT Maths, RLMSS.

Great going.

With best of our wishes,

~ The MES’s RLMSS Family

आज गुरुवार दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त प्रशालेत ध्वजवंदन, शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन सर यांच्या हस्ते झाले. शाळेचे पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्याम नांगरे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय मनोगतात देश रक्षणाची जबाबदारी ही सैन्याबरोबर सामान्य नागरिकांची देखील आहे हे सांगितले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, पर्यवेक्षक व पीआरओ संदीप पवार, कॅडेटस, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सैनिकी परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा व सैन्य विभागाने केले होते.

Every year to commemorate the Birth Anniversary of Dr.B R Ambedkar and provide equal opportunity to all ATL schools celebrates Community day by inviting community students from Non ATL schools.
The main objective of ATL (Atal Tinkering Lab) Community Day is to extend the impact of ATL programs beyond the school walls by engaging children from nearby non-ATL schools and the local community in tinkering and innovation. It aims to introduce these children to the philosophy of ATL and foster a culture of creativity.
ATL Community Day aims to reach more children, including those who may not have access to formal ATL education, by inviting them to participate in tinkering and innovation activities.
Igniting curiosity and creativity:
The day provides an opportunity for children to explore their curiosity, creativity and imagination through hands-on tinkering and innovation activities.
Fostering 21st-century skills:
ATL Community Day aims to introduce children to 21st-century skills like design thinking, computational thinking, and adaptive learning.
ATL community day Event 1 was celebrated in ATL lab of RLMSS on Thursday, April 24, 2025.
Students of age group 5 to 15 from staff colony of RLMSS were invited for the event.
Following activities were conducted in the event:
1. Introduction of community day
2. ⁠DIY kit model making and model presentation – team of Parents and Children
3. ⁠Toy making by using paper cups and groupwise competition.
4. ⁠Introduction to 3D printing technology with demonstration of 3D printed objects.
Students were divided into 2 groups and allotted groupwise and individual tasks.
ATL incharge Mrs Manjiri Patil introduced and addressed the session.
Cadets of RLMSS’s ATL club from class 9 guided the participants about 3D printing and volunteered them.
The participants enjoyed the science fun activity of making paper cup flyers and participated in race of maximum distance flying.
The winners are :
Group 1 (class 2 to 6)

1) Shivansh Ramlal shinde
2) Kimaya Mahesh Kotkar
3) Aayush Kisan Rajguru
Group 2 (Class 7 to 10)
1) Anagh Pramod Zurmure
2) Pavani Gajanan Patil
3) Suryen Suhas Ambekar
The event truly encouraged collaboration between the local community to create a shared learning.
Participants enjoyed a lot and shared learning by showcasing the creativity.
Definitely this event provided a platform for ATL students to showcase their projects and innovations to a wider audience.
The event celebrated the spirit of innovation and creativity, recognizing the contributions of students, teachers, and mentors.

The chief guest of the event Hon. Commandant of RLMSS Air wing commander Yagnaraman sir interacted, guided and awarded the participants with participation certificates and prizes.
Principal Smt. Pooja Jog, Senior Master Mr. Shyam Nangare and PRO Mr. Sandeep Pawar greeted the students with best wishes.
ATL incharge Mrs Manjiri Patil planned and coordinated the event.
Science committee members Mrs. Savitri Patil, Mrs. Vaishali Shinde, Mr. Shivdas Kapure, Mr. Mangesh Patil, Mrs. Aarti Joshi and members of RLMSS family puts in their best effort to make the event more successful.

‘म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत ‘क्रांतिस्फूर्ती’ हस्तलिखित व आर्ट वॉलवरील नागरी शिष्टाचारासंबंधी पोस्टर्सचे अनावरण’ करण्यात आले.
स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग, संघर्ष, त्यांच्या धैर्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्‍वास घेऊ शकतो. त्यांचे कार्य, योगदान यांचे संकलन करून म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या कॅडेटसनी हस्तलिखित तयार केले आहे. एकूण 46 स्वातंत्र्य सैनिकांचा समावेश आहे. त्याचे नाव ‘क्रांतिस्फूर्ती’ असे आहे. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यावरील चित्र कॅडेट समृद्धी सावंत हिने काढलेले आहे. त्याचे अनावरण शाळेचे कमांडंट एविएन. विंग कमांडर एम. यज्ञरामन आणि मुख्याध्यापिका पूजा जोग यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्याम नांगरे, पर्यवेक्षक व पीआरओ संदीप पवार व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कॅडेट उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सावित्री पाटील व सहकारी यांनी केले होते.

आज गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट, पुणे या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता संवर्धन अभियान 2024 – 25 चा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेने 500 ते 1000 पर्यंत विद्यार्थी संख्या या गटात मुळशी तालुकास्तर व पुणे जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मा. डाॅ. भाऊसाहेब कारेकर सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. नंदकुमार सागर सर व इतर मान्यवर यांच्या हस्ते तालुकास्तर व जिल्हास्तर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना सैनिकी शाळेच्या कॅडेट शैजल पाटील, कॅडेट भक्ती मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व सैनिकी परिवार. या दुहेरी यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे व शाला समितीचे सर्व पदाधिकारी, शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन सर यांनी अभिनंदन केले.

~ As part of ongoing Military Training (SSB Modules), today (17 Apr 25) Class XII Cadets were tested for their SSB Components, aimed toward selecting them for Cadet Appointments (14 posts) for the Academic Year 2025 – 26

~ The event was well coordinated by Shri Sandeep Pawar, IC Military & Sports Training and PRO, RLMSS.

~ On 15 Jun 25, when the School would reopen after Summer Vacation, the list of selected Cadets would be declared and they would formally assume their Appointments.

Great going…

With best of our wishes,

~ The MES’s RLMSS Family

आज सैनिकी प्रशालेत पंचायत समिती मुळशी आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र सुतारवाडी यांच्या वतीने इ.6 वी ते इ.9 वी च्या कॅडेटस ना जे.ई. (मेंदू-ज्वर) लस देण्यात आली. डॉ. श्रुती उरकुडे, आरोग्य सेविका श्रीमती एम. एम. क्षीरसागर व श्रीमती पी. एस. पोवार यांनी ही लस दिली. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट व प्राचार्या यांच्या मार्गदर्शनानुसार मेडिकल इंचार्ज व प्रभारी रेक्टर श्रीमती प्रियांका गुरव, मेट्रन श्रीमती प्रतिभा चव्हाण व श्रीमती जयश्री खरात यांनी केले होते.

म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे माजी (निवृत्त) गुणवंत क्रीडा शिक्षक व रोल बॉल या खेळाचे जनक श्री राजू दाभाडे सर यांनी आज त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त प्रशालेस क्रीडा साहित्य भेट दिले. साठवा वाढदिवस असल्याने एकूण 60 शाळांना ते हे साहित्य वाटप करणार आहेत ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. श्री राजू दाभाडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शालेय पदाधिकारी व कॅडेटस. 💐💐💐💐💐

१४ एप्रिल – म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून झाली. ज्येष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने यांनी बुद्ध वंदना म्हटली. त्यानंतर प्रशालेतील शिक्षिका सौ. मंजिरी पाटील यांनी ‘हीच आमची प्रार्थना’ म्हटली व त्यांच्या समवेत सर्व कॅडेटसनेही म्हटली. इयत्ता अकरावीची कॅडेट समिक्षा केळगावकर हीने डॉ. बाबासाहेबांविषयी तिचे विचार व्यक्त केले. प्रशालेतील शिक्षक श्री. शिवदास कापुरे यांनी डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर सांगितला तसेच श्री. अद्वैत जगधने यांनी बाबासाहेबांचे वेळेचे नियोजन, अभ्यास, करुणा, सामाजिक बांधिलकी, स्व-जाणीव, देशभक्ती इ. वेगवेगळ्या गुणांचे उदाहरणासह महत्व सांगितले. प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन सर यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावर असणारे महत्व समजावून सांगितले. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील परिपाठ विभागाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. गजानन पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती पूजा जोग, प्रशालेचे पर्यवेक्षक व पी आर ओ श्री. संदीप पवार तसेच प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मेट्रन्स व सैनिकी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत इ.6 वी व इ.11 वी ची नवीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा झाली यात इ.6 वी कॅडेट व इ.11 वी कॅडेटसनी लेखी परीक्षा दिली आहे. शारीरिक क्षमता चाचणी व वैद्यकीय तपासणी ही दि. 3 ते 10 मे रोजी शौर्य कॅंप मध्ये होणार आहे.

आज सोमवार दिनांक – 07/04/2025 रोजी सैनिकी शाळेत व्यक्तीमत्व विकास विभागाकडून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात रामजन्माने करण्यात आली. मा. मुख्याध्यापिका, सर्व महिला शिक्षिका व वसतीगृह महिला कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यानंतर 8 वी च्या कॅडेटसनी संपूर्ण रामायण नृत्यातुन सादर केले तसेच 6 वी अ च्या कॅडेटसनी रामभजन गायले. याचे मार्गदर्शन सौ. श्रेया दिघे यांनी केले होते. 9 वी अ आणि ब च्या विद्यार्थीनींनी रामरक्षा व हनुमान चालीसा पठण केले. याचे मार्गदर्शन श्री. अद्वैत जगधने व सौ. सुनीता शिंदे यांनी केले होते. कार्यक्रमात श्री. संदीप पवार, श्री. अद्वैत जगधने, सौ. आरती जोशी, श्री. मंगेश पाटील, कु. प्रियांका राजहंस, कु. प्रियांका हजारे, सौ. राजश्री गोफणे, सौ. स्वाती शेवडे, व मेडिकल इंचार्ज श्रीमती प्रियांका गुरव या शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गीत रामायणातील काही गीतांचे सादरीकरण केले. सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे यांनी श्रीरामनवमीचं महत्व तसेच श्रीराम आधुनिक काळाशी कसे जोडले आहेत हे सांगितलं. तसेच कमांडट सरांनी कार्यक्रमाचा शेवट त्यांच्या सुमधुर गीताने केला. हा कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडावा यासाठी सर्व कॅडेट्स नी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे नियोजन कौन्सिलर सौ. श्रेया दिघे यांनी केले होते. या कार्यक्रमाला शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक व पीआरओ श्री. संदीप पवार व सैनिकी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

आज प्रशालेत गुढी पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला ज्येष्ठ शिक्षक श्री. महेश कोतकर यांनी गुढीपाडवा सणाचे महत्त्व सांगितले. शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन व प्राचार्या श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन मेडिकल इंचार्ज श्रीमती प्रियांका गुरव, ज्येष्ठ सेवक श्री. अजित काका शेंडकर व सैनिकी परिवाराने केले होते.

शनिवार दिनांक 29 मार्च रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत इ.12 वी च्या कॅडेटस चा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल चे माजी कमांडंट व आठारे पब्लिक स्कूल चे प्राचार्य कर्नल एस. एस. जोशी (निवृत्त), श्रीमती कविता जोशी, शाला समितीच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्याम नांगरे व पालक उपस्थित होते. इ.6 वी ते इ.12 वी च्या कॅडेटस नी शानदार संचलन करीत प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. याप्रसंगी स्वॉर्ड ऑफ ऑनर चा बहुमान स्कूल कॅप्टन व परेड कमांडर कॅडेट प्रार्थी म्हात्रे हिला तर उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून स्कूल स्पोर्टस कॅप्टन कॅडेट ऋतुजा पाचपांडे ला मिळाला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना कर्नल एस. एस. जोशी यांनी देशाच्या संरक्षण दलात महिलांसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध होत आहेत, त्याचा फायदा या कॅडेटस ला होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी आतापासूनच सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगताना या दीक्षांत समारंभात सहभागी असणाऱ्या सर्व कॅडेटचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन व प्राचार्या पूजा जोग यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक संदीप पवार, सुभेदार नवनाथ पवार, हवालदार गजानन माळी, क्रीडा शिक्षक महादेव मगर, अक्षय मांडगे व सैनिकी परिवारातील सदस्यांनी केले होते.

रविवार दिनांक 23 मार्च रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत इ.6 वी ते इ.11 वी साठी प्रवेश प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. इ.6 वी — 107, इ.7 वी — 56, इ.8 वी — 53, इ.9 वी –33 व इ.11 वी — 61 एकूण 310 कॅडेटसनी लेखी परीक्षा दिली. याप्रसंगी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन यांनी सैनिकी शाळेचे महत्व सांगितले. प्राचार्या श्रीमती पूजा जोग यांनी सैनिकी शाळेचा दिनक्रम व नियम समजावून सांगितले तर श्री. वैभव शिंदे यांनी स्पर्धा परीक्षांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे यांनी मानले. प्रवेश प्रक्रियेचे नियोजन शाळेचे कमांडंट व प्राचार्या यांच्या मार्गदर्शनानुसार सौ. अश्विनी मारणे, श्री. अद्वैत जगधने व सर्व सैनिकी परिवाराने केले होते.





















 

आज मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी प्रशालेत आंतरकुल क्रीडा व सैन्य प्रशिक्षण अंतर्गत वर्षभरात विविध अशा एकूण 30 स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात शिवगर्जना होऊन झाली.  कॅडेटसना मेडल्स व प्रमाणपत्र शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, प्राचार्या श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक व PRO श्री. संदीप पवार, सर्व ज्येष्ठ शिक्षक, सैन्य प्रशिक्षक, रेक्टर व मेडिकल इंचार्ज यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. आंतरकुल स्पर्धा ही चार कुलांमध्ये घेण्यात आली.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.

1) प्रथम क्रमांक — दुर्गावती 149 गुण

2) द्वितीय क्रमांक — जिजामाता 143 गुण

3) तृतीय क्रमांक — अहिल्या 131 गुण

4) चतुर्थ क्रमांक — लक्ष्मी 111 गुण

कमांडंट ट्राॅफी व बॅनर पटकावण्याचा मान दुर्गावती कुलाने पटकावला. 💐💐

या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, एन.सी.सी. प्रशिक्षक ए.एन.ओ. सौ. राजश्री गोफणे, सुबेदार श्री. नवनाथ पवार, हवालदार श्री. गजानन माळी, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे, क्रीडा प्रशिक्षक श्रीमती आस्था हिरानी, स्कूल कॅप्टन कॅडेट प्रार्थी म्हात्रे यांनी केले होते. सूत्रसंचालन स्कूल स्पोर्ट्स कॅप्टन कॅडेट नम्रता राऊत व कॅडेट ऋतुजा पाचपांडे यांनी केले होते.

 

आज शुक्रवार दिनांक 14 मार्च वसतिगृहात धुलिवंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. इ.6 वी ते 11 वी च्या कॅडेटसनीं एकमेकींना नैसर्गिक रंग लावत धुलिवंदन साजरे केले. या कार्यक्रमाचे नियोजन मेडिकल इंचार्ज श्रीमती प्रियांका गुरव, ड्युटी मास्टर सौ. दीपाली आंबवणे, रेक्टर श्रीमती मनिषा धिवार व सर्व मेट्रन ताई यांनी केले होते.

राष्ट्रीय विज्ञान दिन
प्रतिवर्षीप्रमाणे शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न झाला.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात Science February हा उपक्रम राबविण्यात आला.
भारतीय ज्ञान परंपरेची ओळख करून देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसन व दृढीकरण करण्याच्या उद्देशाने विज्ञान विभागातर्फे 1 फेब्रुवारी 2025 पासून हा उपक्रम राबविण्यात आला.
दररोजच्या परिपाठामध्ये विज्ञान सुविचार, विज्ञान कोडे, संशोधन कथा, भारतीय शास्त्रज्ञांची माहिती, विज्ञान संकल्पनेवर आधारित वर्गश: प्रश्न, आजचे मुलद्रव्य व संकल्पनेवर आधारित वैज्ञानिक कृती व प्रयोग करून दाखवण्यात आले. हा उपक्रम विज्ञान छंद मंडळातर्फे घेण्यात आला. इयत्ता सहावी ते अकरावीच्या विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या. या उपक्रमाची सांगता म्हणून शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्रशालेतील सर्व विज्ञान शिक्षकांनी परिपाठ सादर केला. यामध्ये विज्ञान सुविचार, विज्ञान कथा, विज्ञान कोडी, विज्ञानाच्या कृती व प्रयोग विज्ञान शिक्षकांनी करून दाखवले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कुलश: सायन्स मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. सायन्स मॅरेथॉनचे स्वरूप पुढीलप्रमाणे
Round 1- 8 Science Riddles
Round 2- Concept explaining
Round 3 -Visual round
Round 4-Hands on Activity
Round 5-Run Stick Run
Round 6-Puzzle
सायन्स मॅरेथॉन दुपारी 2.15 ते 4 या वेळेत संपन्न झाली. इयत्ता सहावी ते आठवीच्या अहिल्या, जिजामाता, लक्ष्मी व दुर्गावती अशा एकूण 12 विद्यार्थिनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या. यामध्ये दुर्गावती कुल विजेत्या ठरला.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती पूजा जोग व सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विज्ञान शिक्षक सौ. मंजिरी पाटील, सौ. सावित्री पाटील, श्री. प्रमोद झुरमुरे, सौ. वैशाली शिंदे, कु. प्रियांका हजारे, श्री. शिवदास कापुरे , श्री. मंगेश पाटील व सौ. आरती जोशी सर्व विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थिनींना उत्तम असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन विज्ञान विभागातर्फे करण्यात आले.


८ मार्च – जागतिक महिला दिन म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत दैनंदिन परिपाठात साजरा करण्यात आला. सदर दिवसाचे औचित्य साधून परिपाठ सादर करणाऱ्या इयत्ता सातवीच्या कॅडेट्सनी संपूर्ण परिपाठ महिला दिनाशी संबंधित विषयावर सादर केला. सदर परिपाठात कॅडेट वेदश्री खडके हिने दिनविशेष सांगताना जागतिक महिला दिन व इतर आजचे दिनविशेष सांगितले तसेच कॅडेट श्रद्धा लोखंडे हिने महिलांविषयी असलेले कोडे विचारले नंतर कॅडेट त्रिवेणी लाड हिने वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक असलेल्या महिलांविषयीचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले तसेच कॅडेट गायत्री आबंदे हिने आजी, आई, मावशी, मामी, आत्या, बहीण या वेगवेगळ्या नात्यांची संबंधित असलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या!
कुटुंब सांभाळण्यापासून ते देशसेवेपर्यंत आज वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. अशाच महान असलेल्या तसेच आजच्या पिढीला प्रेरणादायी असलेल्या महिलांविषयीची माहिती कॅडेट यशस्विनी माने हिन सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनपट विद्यार्थिनीसमोर गोष्टी रुपात सांगितला तसेच कॅडेट राजनंदिनी चौधरी हिने पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे जीवन व कर्तुत्व विषयी माहिती सांगितली.
महिला दिनाचे निमित्त साधून समुपदेशन विभागांतर्गत इयत्ता आठवी अ ची कॅडेट द्राक्षायनी शिंगे हिने ‘मर्दानी’ ह्या चित्रपटातील एक गीत घेतले की, ज्यामध्ये अन्यायाला वाचा फोडण्याच्या स्त्रीच्या स्वभावाविषयी वर्णन केले आहे यावर एक नृत्य सादर केले. तसेच तसेच प्रशालेतील चित्रकला विभागातर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या क्षेत्रात असलेल्या महिलांचे चित्र काढून ते आर्ट वालला प्रदर्शित करण्यात आले.
प्रशालेतील शिक्षक श्री अद्वैत जगधने यांनी महिला वेगवेगळ्या भूमिका कशा बजावत असतात याविषयी माहिती सांगितली तसेच महिला दिन का साजरा करतात? याचे कारण यानिमित्ताने शोधण्याचे आवाहन कॅडेटसला दिले. नंतर शाळेतील पर्यवेक्षक व PRO श्री संदीप पवार यांच्या हस्ते प्रशालेतील महिला शिक्षिकांना गुलाब पुष्प व भेटकार्ड देऊन सन्मानित करण्यात आले तसेच प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन यांच्या हस्ते प्रशालेच्या प्राचार्या पूजा जोग मॅडम तसेच इतर महिला शिक्षिकांना पुष्पगुच्छ, भेट कार्ड व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे प्रशालेतील परिपाठ विभागाने केले होते.

शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून DANA इंडिया टेक्निकल सेंटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी श्री. शौनक दिघे – सॉफ्टवेअर हब प्रमुख, श्री. महारुद्र जंगम – ऍडमिन ऑफिसर, टेक्निकल टीमचे श्री. नवजीत वर्मा, सौ. मंजुश्री पाटील, श्री. निलेश मोरे, कु. प्रज्ञा देशपांडे यांनी प्रशालेस भेट दिली व इयत्ता 6 वी ते 9 वी च्या ATL क्लब च्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
विज्ञान म्हणजे काय, दैनंदिन जीवनातील विज्ञान, तंत्रज्ञानाचे सामाजिक समस्या सोडविण्यासाठी उपयोजन, पर्यावरणीय समस्या व जागतिक आव्हाने, दैनंदिन जीवनापलीकडील विज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
निश्चितच विद्यार्थिनींमध्ये संशोधनविषयक दृष्टी विकसन, प्रेरणा व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती,पर्यावरणपूरक जीवशैलीविषयक जागृतीसाठी कार्यशाळा दिशादर्शक ठरली.
प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले व औपचारिक संवाद साधला.
कार्यक्रमाचे नियोजन इस्टेट मॅनेजर श्री. समीर जाधव व ATL इन्चार्ज सौ. मंजिरी पाटील यांनी श्री. महारुद्र जंगम यांच्या सहकार्याने केले.

आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, प्राचार्या श्रीमती पूजा जोग यांनी सावरकरांच्या प्रतिमेस हार घालून पूजन केले. प्रशालेतील शिक्षकांनी तसेच विद्यार्थिनींनी प्रतिमेचे फुले वाहून पूजन केले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी सावरकरांची विविध गीते सादर केली. त्याचप्रमाणे सावरकरांच्या कविता देखील सादर केल्या. दरवर्षी मालतीताई आठवले यांजकडून इयत्ता ८ वी तील दोन सर्वोत्तम कॅडेट्सना स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे ग्रंथ तसेच रोख रक्कम दिली जाते. ती बक्षिसे यावर्षी इ. ९ वी तील गुणवंत कॅडेट विधी वर्पे व कॅडेट दक्षिता डुंबरे यांना मिळाली. त्यांचा रोख पारितोषिक व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. सावरकरांचे जीवन चरित्र प्रशालेतील शिक्षक श्री. मंगेश पाटील यांनी सर्वांसमोर उलगडून दाखवले. प्राचार्य जोग मॅडम यांनी यावेळेस सावरकरांचे चरित्र सर्व विद्यार्थिनींनी आवर्जून वाचले पाहिजे व त्यांच्याप्रमाणे देशभक्तीचे गुण अंगिकारले पाहिजे असे सांगितले. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने सर यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

शनिवार दिनांक 1 मार्च रोजी प्रशालेत क्रीडा भारती तर्फे क्रीडा ज्ञान ऑनलाइन परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष श्री. विजय पुरंदरे सर, अखिल भारतीय कार्यालय प्रमुख श्री. विजय रजपुत सर, प्रशालेचे कमांडेंट विंग कमांडर श्री. म. यज्ञरामन सर, प्राचार्या श्रीमती पूजा जोग या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्र प्रचार प्रमुख श्रीमती अनुजा दाभाडे मॅडम यांनी केले, आभार पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील पुढील कॅडेटसना ऑनलाइन क्रीडा ज्ञान परीक्षेतील यशाबद्दल मेडल देऊन गौरविण्यात आले.
1) प्रथम क्रमांक – कॅडेट सई पोरे
2) द्वितीय क्रमांक – कॅडेट वैदेही भोंडे
3) तृतीय क्रमांक – कॅडेट धनश्री हंगिरकर
शाळेतील कॅडेटच्या अधिकाधिक सहभागाबद्दल, उत्कृष्ट कामगिरी बद्दल शाळेला ही सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या,
1) कॅडेट श्रावणी नलावडे
2) कॅडेट श्रावणी केदारी
या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन सैनिकी परिवाराने केले होते.

२७ फेब्रुवारी २०२४
मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम

भाषा संवर्धन पंधरवडा :-

“मराठी भाषेचा प्रचार व प्रसार” या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरून ” मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” शासन परिपत्रकानुसार-

प्रशालेत सोमवार दिनांक १४ जानेवारी २०२५ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान उपक्रम राबविण्यात आले.

सोमवार दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी परिपाठात प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने सर यांनी मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा याबाबत मार्गदर्शन केले.

अभिवाचन उपक्रम :-

१६ जानेवारी इ.११ वी कु. अदिष्ठी काळे हिने अच्युत गोडबोले यांचे ‘मुसाफिर’ या पुस्तकाचे अभिवाचन केले. १७ जानेवारी इ.११ वी कु. सर्वज्ञा गांजाळे हिने बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘शिवचरित्र’ या पुस्तकाचे वाचन केले.

१८ जानेवारीरोजी इ.११ वी कु. स्वराली ठेलकर हिने शरद तांदळे यांचे अंत्रप्रेन्यूअर या पुस्तकाचे अभिवाचन केले. २० जानेवारी रोजी इ.११ वी कु. सिद्धी वाडेकर हिने माझा प्रवास या पुस्तकाचे अभिवाचन केले. २१ जानेवारी कु. समिक्षा आगवणे हिने ‘पानिपत’ या पुस्तकाचे अभिवाचन केले.

पुस्तक परीक्षण :-

२२ जानेवारी रोजी इ. ८ वी तील कु. सारा चत्तुरे हिने स्वामी विवेकानंदांचे जीवन विचार या पुस्तकातील विचार व्यक्त केले. २३ जानेवारी रोजी इयत्ता ९ वी अ कु. अद्विका केदारी हिने महाभारताचे रहस्य या पुस्तकातील विचार व्यक्त केले. २४ जानेवारी रोजी प्रशालेच्या अध्यापिका सौ. वैशाली शिंदे यांनी ‘अग्निपंख’ हे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र या पुस्तकाचे पुस्तक परीक्षण केले.

हस्ताक्षर स्पर्धाः-

व्हीनस ट्रेडर्स तर्फे, मराठी आणि इंग्रजी विषयासाठीच्या सोमवार दि. १३ जानेवारी २०२५ रोजी इयत्ता ६ वी ते ९ वी च्या विद्यार्थिनींच्या हस्ताक्षर स्पर्धा घेतली.

स्पर्धा दोन गटात घेतली इ. ६ वी ते ७ वी गट आणि इ.८ वी ते ९ वी गट हस्ताक्षर स्पर्धा

इयत्ता ६ वी ते ७ वी गट विजेत्या विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे

प्रथम क्रमांक कु. अपर्णा कैलास भोरडे इ.७ वी अ

द्वितीय क्रमांक कु. संनिधी गोवर्धन पुजारी इ. ७ वी ब

तृतीय क्रमांक कु. तनिष्का राहुल सस्ते इ.७ वी ब

गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी राजभाषा दिन कार्यक्रम उत्साहात साजरा…..

थोर साहित्यिक वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७फेब्रुवारी ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली तालुका मुळशी जि. पुणे येथे गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशालेच्या बहुउद्देशीय सभागृहात उत्साहात सकाळी ७.४० ते ९.१५ या वेळेत संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडेंट विंग कमांडर एम. यज्ञरमन, प्राचार्या श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी २० कवितांचे तालासुरात काव्यगायन केले. तसेच इयत्ता ६ वी अ तील कॅ. श्रुतिका घिवारे विद्यार्थिनींनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती सांगितली आणि इयत्ता ६ वी अ च्या विद्यार्थिनींनी जीवन हे निसर्गाने दिलेले एक अनमोल वरदान आहे हे ‘बहुमोल जीवन’ या कवितेचे कृतियुक्त गायन केले. इ.९ वी अ कॅ. कार्तिकी निंबाळकर या विद्यार्थिनींनी आभार प्रदर्शन केले.

प्रशालेचे कमांडेंट विंग कमांडर एम. यज्ञरमन, प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार या सर्व पदाधिकाऱ्यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत असते.

या कार्यक्रमाचे सर्व नियोजन मराठी विभागाने केले होते.

मराठी राजभाषा आमची
महाराष्ट्राची शान !
भजन कीर्तन ऐकताना,
हरपते भान.

Date – 28 feb. 2025
Interhouse Swimming Competition
Venue – VJS Fitness Club, Baner, Pune.
A) 4 × 50 M. Relay
1) Ahilya House
2) Durgawati House
3) Jijamata House
4) Laxmi House
B) 50 M. Senior
1) Ahilya House
2) Jijamata House
3) Durgavati House
4) Laxmi House
C) 25 M. Junior
1) Laxmi House
2) Ahilya House
3) Durgavati House
4) Jijamata House
D) Championship points
1) Ahilya House — 19
2) Durgavati House — 11
3) Jijamata House — 09
4) Laxmi House — 09
Championship winner —
Ahilya House
💐💐💐💐💐

52 Cadets Participants this Event.

Thanks for Valuable Support –
Subedar Shri. Umesh Ghadge Sir,
Coach Supriya Newale Madam,
Coach Harshada Sonwane Madam,
Metron Laxmi Tai…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Coordination Shri Sandeep Pawar,
Guidance —
Commandant AVN Wing Commander M. Yagnaraman Sir
&
H. M. Pooja Jog Madam.

दरवर्षीप्रमाणे शाळेमध्ये शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहामध्ये पार पडला. या उत्सवाचे नियोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी केले होते. कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा, पोवाडा, गोंधळी गीत, नाट्यप्रसंग सादर करण्यात आले. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक तथा शिव व्याख्याते मा. श्री विजय खुटवड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवला. या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववीने केले होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे कमांडंट श्री यज्ञ रमण सर, मा. मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व सैनिकी परिवार उपस्थित होता. या प्रसंगी ब्रह्मांड संस्थान सामाजिक राष्ट्रसेवा, पुणे या संस्थेचे सदस्य मा. चारुहास रेडकर (निवृत्त BSNL class one officer) यांनी शिवरायांचे मावळे यांच्या ९ प्रतिमा तसेच ५५० जीवन ज्ञान पुस्तिका प्रदान केल्या. तसेच शिव व्याख्याते श्री विजय खुटवड यांचे व्याख्यान आयोजित केले. छत्रपती शिवरायांच्या आरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही इयत्ता आठवीच्या वर्गाचा विद्याव्रत समारंभ दिनांक 16 फेब्रुवारी 2025, रविवार रोजी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत प्रशालेच्या बहुउद्देशीय सभागृहात मंगलमय वातावरणात संपन्न झाला. विद्याव्रत संस्कार म्हणजे विद्यार्थ्यांच्या माहितीत भर घालणे व त्यांची कौशल्य वाढविणे ही शिक्षणाची सामान्य कल्पना आहे. यांच्या जोडीला विद्यार्थ्यांची वृत्ती घडविणे आणि त्यांच्यामध्ये प्रेरणा जागृत करणे यांची भर घातली म्हणजे शिक्षणाची कल्पना अधिक समृद्ध होते. कौशल्य वाढविण्यासाठी सराव करावा लागतो. तर माहिती आत्मसात करण्यासाठी उजळणी करावी लागते. त्याचप्रमाणे वृत्ती घडविण्यासाठी मनावर आणि बुद्धीवर संस्कार व्हावे लागतात व प्रेरणा जागरणासाठी विद्यार्थ्यांना ध्येयदर्शन घडवावे लागते. शिक्षणाची ही चारही अंगे एकमेकांवर अवलंबून आहेत. स्वतःचे व्यक्तिमत्व पूर्ण विकसित करून ते कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या आणि ईश्वराच्या चरणी अर्पित करायचे आहे अशी मनोवृत्ती घडवण्यासाठी विद्याव्रत संस्कार आहे.

यावर्षीच्या विद्याव्रत संस्कार समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख आचार्या म्हणून माननीय डॉ. श्यामाताई घोणसे (संत नामदेव अध्यासन प्रमुख प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) तसेच श्रीमती प्रितीलक्ष्मी यज्ञ रामन या व्रतार्थींना शुभ आशीर्वाद देण्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, प्राचार्या श्रीमती पूजा जोग, सीनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, PRO व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
सदर विद्याव्रत संस्काराची सुरुवात प्रारंभिक व्याख्यानाने झाली होती. सदरचे प्रारंभिक व्याख्यान हे प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती पूजा जोग यांनी घेतले. त्यानंतर इतर व्याख्याने प्रशालेतील शिक्षकांनी घेतली. शारीरिक विकसन- श्री भाऊसाहेब मार्तंड, मानसिक विकसन – सौ पियुषा सामंत व सौ श्रेया दिघे, बौद्धिक विकसन- मंगेश पाटील आत्मिक विकसन- कु. प्रियांका राजहंस, राष्ट्रअर्चना – सौ राजश्री गोफणे तसेच पोथी वाचन सराव व वाचन कु. प्रियांका राजहंस व सौ. श्रेया दिघे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गजानन पाटील, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्राचार्य श्रीमती पूजा जोग, पाहुण्यांच्या परिचय श्री श्याम नांगरे व आभार श्री. भाऊसाहेब मार्तंड यांनी मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमाविषयी विद्यार्थिनी मनोगतामध्ये कॅडेट देविका ताड व कॅडेट सई भेलके तसेच सौ माधवीताई माने व श्री अतुलजी सराफ यांनी कार्यक्रमाविषयीचे मत पालक म्हणून मनोगतातून व्यक्त केले.

Date of Event: 17/02/2025 & 18/02/2025
Robotics is shaping the future of technology, and introducing young minds to this field can spark creativity and innovation. The IEEE VIIT Student of electronics department successfully organized 2 day workshop offering students a hands-on learning experience in robotics and embedded systems.
Cadets from class 8 th and 9 th participated in the workshop. During the session, students explored hardware assembly, sensors, and coding using Arduino IDE. They worked on ultrasonic sensor testing, chassis assembly, movement control, and obstacle detection robots, gaining practical skills with each task.
The Robotics Workshop by IEEE VIIT Student Branch provided students with hands-on experience, enhancing their technical skills, problem-solving abilities, and confidence in technology. Pravin Gawande Sir and Anup Ingale Sir mentored IEEE members guiding them in effectively conducting the sessions. Their support ensured smooth execution and enriched the learning experience. The workshop received great feedback from students, teachers, and the principal, who appreciated the engaging and practical approach. The enthusiasm of the students highlighted the impact of such initiatives in sparking an interest in robotics and innovation.
The two-day Robotics Workshop organized by the IEEE
The workshop aimed to introduce students to the fundamentals of robotics, providing them with both theoretical knowledge and practical exposure to robot building, sensor integration, and Arduino programming.

On Day 1, the workshop began with a theory session covering the basics of robotics, its real-world applications, and an introduction to the components of an obstacle detection bot. The session helped students understand how robots are used in various fields, from automation and industrial applications to smart systems and artificial intelligence. In the practical session, students were divided into teams and assigned mentors who guided them step by step. Each team explored how an obstacle detection bot functions, conducted sensor testing, and gained hands-on experience in assembling basic robotic systems.

On Day 2, students were introduced to Arduino coding basics, where they learned about syntax, logic, and programming concepts essential for controlling robots. The practical session encouraged active learning, as students were given the freedom to dismantle and reassemble their bots from scratch, reinforcing their understanding of robotic components, connections, and programming logic. The workshop created an engaging and collaborative environment, allowing students to learn by doing rather than just observing. Their enthusiasm and curiosity were evident throughout the sessions, as they actively participated in discussions, asked insightful questions, and applied their learning. Over two days, they explored real-world applications, assembled and coded their own obstacle-detection bots, and gained insights into line-follower robots. Their active participation, curiosity, and problem-solving mindset made the workshop highly engaging and impactful. Beyond technical skills, the event fostered creativity, teamwork, and critical thinking, making learning both accessible. This initiative inspired young minds to delve deeper into robotics and innovation, paving the way for future learning and .
Students expressed excitement about the hands-on experience, particularly in assembling and coding their obstacle detection bots and learning about line follower robots. They appreciated the opportunity to work with real robotic components, which enhanced their understanding of automation and problem-solving while sparking their curiosity to explore more advanced concepts. Teachers praised the interactive approach and the enthusiasm displayed by students, emphasizing the importance of such workshops in introducing young minds to practical applications of technology.
Faculties of VIIT college Dr. Pravin Gawande and Dr. Anup Ingle accompanied the team and guided the cadets.
Commandant Mr. Yagnaraman sir. Principal Smt.Pooja Jog and ATL incharge Mrs. Manjiri Patil welcomed the team and communicated with cadets.
Science teachers Mr.Mangesh Patil and Mrs. Aarti Joshi participated in the workshop.

आज दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सैनिकी शाळेत अश्वमोहिमे चे उत्साहात स्वागत करण्यात आले. कात्रज येथील शिवसृष्टीतील गंगासागर तलावाच्या प्रतिरूपासाठी रायगड किल्ल्यावरून जलकुंभ हा अश्वांवरून म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे आणण्यात आला होता. यात सैनिकी शाळेची इ.8 वी ची कॅडेट पूर्वजा खेडकर हिने सहभाग घेतला. या अश्व मोहिमेचे प्रमुख व शाळेचे मुख्य अश्व प्रशिक्षक श्री. गुणेश पुरंदरे यांच्या नेतृत्वाखाली ही अश्वमोहिम काढण्यात आली होती. या अश्व मोहिमेचे स्वागत प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, पर्यवेक्षक संदीप पवार व सर्व सैनिकी परिवाराने केले होते.

शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सैनिकी शाळेत आपत्ती व्यवस्थापन विभागाअंतर्गत आग प्रतिबंधक उपाययोजना याबाबत विश्वदीप इंटरप्राइझेस चे तज्ञ मार्गदर्शक सौ. सीमा कोंडे जगताप व श्री. संदीप कुडले यांनी आगीचे विविध प्रकारांची माहिती दिली व आग कशी विझवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व कॅडेटस कडून प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. कमांडंट सरांच्या मार्गदर्शनानुसार सुभेदार श्री. नवनाथ पवार व इस्टेट मॅनेजर श्री. समीर जाधव यांनी केले होते…

ग्रीन क्लब तर्फे आपल्या प्रशालेमध्ये मेथी लागवड केली होती. आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रीन क्लबच्या सर्व विद्यार्थिनींनी मेथी व कोथिंबीर काढणी केली व आपल्या शिक्षक संकुलात मेथीची विक्री केली. तसेच क्रीडा शिक्षकांनी सुद्धा मेथी घेतली. हे करताना विद्यार्थिनींना फार आनंद झाला. विद्यार्थिनींनी स्वतः विक्री केली.
आज या ऍक्टिव्हिटी साठी अद्वैत जगधने सर, थोरात सर, गजानन पाटील सर, मार्तंड सर, प्रियंका गुरव मॅडम या सर्वांनी हातभार लावला व मेथी काढण्याचा आनंद घेतला.
👏🏾👏🏾🌳🌳

आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी इ.12 वी चा शुभेच्छा समारंभ शालेय सभागृहात उत्साहात पार पडला. शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन सर, प्राचार्या श्रीमती पूजा जोग, पालक प्रतिनिधी सौ. सविता भेगडे, यांच्या हस्ते विद्यार्थिनी प्रतिनिधींना पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या व पेपर ला जाताना गणपती स्तोत्र म्हटल्या नंतर मा. प्राचार्या श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक संदीप पवार, वर्गशिक्षक प्रमोद झुरमुरे, प्रियांका हजारे, इंग्रजी विषय शिक्षक महेश कोतकर, सर्व शिक्षक, सर्व वस्तीगृह विभाग यांनी कॅडेटस ला दही-साखर देऊन शुभेच्छारुपी आशीर्वाद दिले.

शनिवार दि. 08/02/2025 रोजी प्रशालेत म. ए. सो. चे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक, मा. सौ. सुधा नाईक, महर्षी कर्वे संस्थेच्या Vision School मधील प्राचार्या, स्टाफ व काही निवडक मुली यांनी भेट दिली. सैनिकी शाळेचा दिनक्रम, सैनिकी शाळेतील विविध उपक्रम, त्याचबरोबर सैनिकी शाळेत चालणारे सैनिकी प्रशिक्षण अनुभवण्यासाठी त्यांनी प्रशालेस भेट दिली. सुरुवातीस सर्व पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. प्रशालेचे कमांडंट श्री.एम. यज्ञरमण व प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग यांनी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा पाहुण्यांना परिचय करून दिला. त्यानंतर सर्वांना प्रशालेचा परिसर दाखविण्यात आला. त्यानंतर आलेल्या सर्व मुलींनी घोडेस्वारी, रायफल शूटिंग, आर्चरी, ट्रेकिंग या ऍक्टिव्हिटीज मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच Vision school मधील आलेल्या सर्व शिक्षिका यांनी देखील सर्व ऍक्टिव्हिटी मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्वांनी दुपारी मेस मध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. ATL Lab, Physics, Chemistry, Biology, Maths lab, ग्रंथालय या ठिकाणी सर्वांनी भेट देऊन माहिती घेतली. या भेटीचे संपूर्ण नियोजन सैनिकी परिवाराने केले होते.

आज रविवार दिनांक 9 फेब्रुवारी इ.9 वी च्या एकूण 80 कॅडेट ने सकाळी 5.30 वाजता शिवगर्जना झाल्यानंतर सैनिकी शाळा ते पिरंगुट टेकडीवरील ऐतिहासिक शिवकालीन तुळजाभवानी मंदिरापर्यंत पायी जाऊन येऊन ट्रेक पूर्ण केला, मंदिर परिसरात असणाऱ्या लांब उडी, ट्रेनिंग रोप चा आनंद घेतला, या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. म. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, मेट्रन मेधाताई, श्री. राम काका, श्री. जयेश दादा यांनी केले होते.

आज म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सकाळी 5.30 वाजता शालेय सभागृहात इ.6 वी ते 9 वी व 11 वी घ्या एकूण 398 कॅडेटसनी प्रत्येकी 13 या प्रमाणे एकूण 5174 सूर्यनमस्कार घातले तर सकाळी 7.30 वाजता शालेय राजपथावर इ.6 वी ते इ.12 वी च्या एकूण 532 कॅडेटसनी प्रत्येकी 13 या प्रमाणे एकूण 6916 व 34 शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी 352 सूर्यनमस्कार घातले. एकूण सूर्यनमस्कार संख्या 12,442 झाली. इ.9 वी ची कॅडेट अनया कदम हिने रथसप्तमी व सूर्यनमस्काराचे महत्व समजावून सांगितले. मा. प्राचार्या पूजा जोग यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक संदीप पवार, योग प्रशिक्षिका प्रिती वाळके, ए.एन.ओ. राजश्री गोफणे, क्रीडा शिक्षक महादेव मगर, सैन्य प्रशिक्षक अक्षय मांडगे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले होते.

आज रविवार दिनांक 2 फेब्रुवारी इ.8 वी च्या एकूण 80 कॅडेट ने सकाळी शिवगर्जना झाल्यानंतर सैनिकी शाळा ते पिरंगुट टेकडीवरील ऐतिहासिक शिवकालीन तुळजाभवानी मंदिरापर्यंत पायी जाऊन येऊन ट्रेक पूर्ण केला. मंदिर परिसरात असणाऱ्या लांब उडी, ट्रेनिंग रोप चा आनंद घेतला. आदिशक्ती मोफत पोलिस भरती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष पोलिस निरीक्षक श्री. संतोष जी भुमकर सर यांनी कॅडेटस ला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. म. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, मेट्रन भाग्यश्री ताई, लक्ष्मीताई, श्री. राम काका, श्री. जयेश दादा यांनी केले होते.

Scroll to Top
Skip to content