दि. १० जानेवारी २०२४ रोजी म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट , रोटरी इंटरनॅशनल जिल्हा 3131 व व्हलकन टेक्नॉलॉजीज यांच्या सामाजिक बांधिलकी च्या वतीने सैनिकी शाळेला ला ४ स्मार्ट टीव्ही , २ यु.व्ही प्लांट्स आणि ५ ओपन जिम चे साहित्य देण्यात आले याचा उद्घाटन समारंभ व्हल्कन टेक्नॉलॉजी चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजेश जी मिश्रा तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा व शाळा समिती अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, श्री. अमोल गावडे ,श्री. रवींद्र घेवडे ,श्री. कल्पेश गुप्ता, रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट चे अध्यक्ष श्री. विपिन घाटे, श्री. निरंजन मथुरे, श्री. संतोष चिपळूणकर, श्री. पवनदीप सिंग, श्री. हरेंद्र देशपांडे, श्री. प्रशांत अक्कलकोटकर, सौ. माधुरी घाटे, सौ. दिपाली मथुरे, सौ. दिपाली देशपांडे, माजी मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडला, आपल्या अतिथी मनोगतात श्री. राजेश मिश्रा यांनी जी शाळा देशकार्यात प्रत्यक्ष सहभागी आहे अशा शाळेला भविष्यात नक्कीच मदत करू असे आश्वासन दिले, तर अध्यक्षीय भाषणात सौ. आनंदी पाटील यांनी मुलींना भविष्यात देशसेवेच्या खूप संधी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले होते.

दिनांक 27 ते 30 डिसेंबर 2023 रोजी सारंगखेडा येथे झालेल्या चेतक फेस्टिव्हल राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील कॅडेट इ. 9 ब ची श्रावणी केदारी हिने Gold medal 1, Silver Medal 1, Bronze medal 1 अशी एकूण 3 तर 9 वी ब च्या कॅडेट श्रावणी नलावडे हिने Silver Medal 1, Bronze Medel 1 अशी 2 मेडल पटकावली, कॅडेट संस्कृती रणदिवे 9 ब हिने सहभाग घेतला, या कॅडेटस ना अश्व प्रशिक्षक श्री. गुणेश पुरंदरे सर यांनी मार्गदर्शन केले, या तिघींचे, त्यांचे पालक व श्री. गुणेश पुरंदरे सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली येथे मुलींसाठी स्वच्छता गृहाचे लोकांर्पण.
शनिवार, दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी आश्वारोहण मैदानाजवळ नुकत्याच उभारण्यात आलेल्या स्वच्छता गृहाचे लोकांर्पण करण्यात आले. सदर स्वच्छतागृह नव्हिओ शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड व टिम फॅब फौंडेशन यांच्या माध्यमातून बांधण्यात आले. यासाठी रोटरी क्लब पुणे कॅम्प यांनी सहकार्य केले. यावेळी रोटरी क्लब पुणे कॅम्प यांचे श्री प्रदीप खेडेकर,कर्नल (नि.) शुक्ला व पांडे साहेब तसेच मेजर सौ. पांडे मॅडम दोनही कंपनीचे देणगीदार, शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, प्रशांलेचे 12 वी चे कॅडेट्स उपस्थित होते. सदर स्वच्छतागृहा मध्ये कॅडेट्स साठी युरीनल्स, लॅट्रिन व चेंजिंग रूम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा. आपली शाळा नेहमीच विविध कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात अग्रेसर असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे या वर्षी स्नेहसंमेलनाचा विषय शिव-वंदना असा होता. स्नेहसंमेलन दिनांक २२ डिसेंबर रोजी संध्या. ४ ते ७ या वेळेत शालेय क्रीडांगणावर संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेची माजी विद्यार्थिनी मा. संतोषी जालिंदर थोरात (सहा. अभि. जलसंपदा विभाग महा. राज्य) या लाभल्या होत्या तर म.ए.सो. नियामक मंडळ उपाध्यक्ष व प्रशालेच्या शालासमिती अध्यक्षा मा. आनंदीताई पाटील ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
NINAD Flex-1
Ninad Invitation 2023-1
22 Dec 2023

या प्रसंगी विविध गुणदर्शन कार्यक्रमात शिवाजी महाराजांना गाणं-स्वरुप वंदन सादर करण्यात आले. विविध प्रकारे प्रशालेस मदत करणाऱ्या दात्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रशालेची Endowment prizes प्रदान करण्यात आली. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र दैवत छत्रपती शिवरायांच्या शिवराज्यभिषेकाला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत, या गोष्टींची जाणीव ठेऊन आपल्या cadets नी उत्स्फूर्तपणे महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य, नाट्य कार्यक्रम आज सादर केला. महाराज प्रत्येकाच्या मनामनांत कसे आहेत हेच Cadets च्या देहबोलीतून आपण अनुभवले. Cadets ची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्था तसेच प्रशाला पदाधिकारी मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य यामुळे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, ता. मुळशी येथे ” 16 डिसेंबर विजयदिन ” कार्यक्रम उत्साहात पार पडला, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मेजर जनरल अजय पाल सिंग (निवृत्त) यांना सैनिकी शाळेच्या कॅडेटस नी शानदार संचलन करीत मानवंदना दिली. याप्रसंगी बोलताना मेजर जनरल अजय पाल सिंग यांनी आज महिलांना सशस्त्र सेना दलात भरपूर संधी उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

On 16th December 2023 (Sat), “Vijay Divas” was celebrated with fervor and enthusiasm at MES Rani Laxmibai Girls’ Military School, Kasar Amboli, Mulshi. Guard of Honour was presented to Maj Gen Ajay Pal Singh VSM, the Chief Guest. Speaking on the occasion, the General appealed to the Cadets to take advantage of the varied career opportunities available in the Armed Forces.

.

.

.

.

उरवडे ग्रामपंचायत व राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेचा शिवसमर्थ बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 16 डिसेंबर विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण जी गोखले (निवृत्त) यांना व माजी सैनिकांना सैनिकी शाळेच्या कॅडेटस नी शानदार संचलन करीत मानवंदना दिली, सैनिकी शाळेच्या शानदार संचलन व बॅंड पथकाच्या प्रात्यक्षिकांने सर्व प्रमुख अतिथी, माजी सैनिक व उरवडे ग्रामस्थ भारावून गेले होते या शानदार संचलनाचे नेतृत्व स्कूल कॅप्टन कॅडेट मुग्धा पाटे व बॅंड पथकाचे नेतृत्व कॅडेट कृपा घरत हिने केले होते. याप्रसंगी सैनिकी शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.

The same evening, in another program organised at Urwade, to felicitate Ex-servicemen by Urwade Gram Panchayat in association with Shiv-Samarth Bachat Gat of Rashtriya Sarvangin Gramvikas Sanstha, the Chief Guest was Air Marshal Bhushan G Gokhale (Retd), President, Maharashtra Education Society. Cadets of RLMSS to participated with their splendid performance led by School Cadet Captain Cdt Mugdha Pate and the Band was led by Cdt Krupa Gharat. RLMSS Officials too were present and felicitated by the organisers on this solemn occasion.

दि. 12 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता, आपल्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी, शैक्षणिक वर्ष 2009 च्या बॅच ची कॅडेट श्वेता लक्ष्मीकांत फडतरे, असिस्टंट प्रोफेसर, PDEA’s सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड, पुणे. हिने इयत्ता 11वी व 12वी तील विद्यार्थिनींसोबत फार्मसी मधील करिअर या विषया संदर्भात संवाद साधला. तसेच तिने तिचे शाळेतील शिकत असतांनाचे जीवनानुभव सांगितले.
Ex Cdt Ms Shweta Phadtare (2009 Batch)

एअर मार्शल नारायण मेनन यांनी सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींशी साधला संवाद …

दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली येथे एअर मार्शल नारायण मेनन PVSM UYSM AVSM यांनी सपत्नीक सदिच्छा भेट दिली व प्रशालेतील विद्यार्थिनींशी संवाद साधला.
प्रशालेतील विद्यार्थिनींनी एअरमार्शल एन. मेनन यांना मानवंदना दिली व औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
एअर मार्शल नारायण मेनन यांनी आपल्या मार्गदर्शनात 1965 व 1971 च्या युद्धाचे अनुभव सांगितले. युद्धजन्य कठीण परिस्थितीत नेतृत्व कौशल्य व योग्य निर्णयक्षमता यांच्या जोरावर आपण कसे यश मिळवू शकतो, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांची अत्यंत समर्पक शब्दात उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेचे सर्व पदाधिकारी आणि सैनिकी परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्य प्रशिक्षण विभागाने केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या शाला समिती महामात्रा श्रीमती नेहा देशपांडे आवर्जून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या इयत्ता बारावीच्या कॅडेट्स सृष्टी वाघमोडे व हिंदवी खासबागे यांनी केले.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पुणे येथे राष्ट्रीय छात्रसेना दिवस उत्साहात साजरा….

२८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रशालेतील एअर एन सी सी कॅडेट्स यांच्याकडून ७५ वा राष्ट्रीय छात्रसेना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी १२.३० वा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ३ महा एअर स्क्वाड्रन एन सी सी चे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अभिजित खेडकर यांना एन सी सी छात्रसैनिकांकडून मानवंदना देण्यात आली. प्रशालेतील बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात कॅडेट्सनी एन सी सी ची माहिती व इतिहास सांगितला. तसेच सार्जंट जान्हवी गायकवाड आणि कॉर्पोरल गिरिजा जोगळेकर यांनी त्यांचा ५ आर डी सी सिलेक्शन कॅम्पचा अनुभव सांगितला. त्याचबरोबर एन सी सी चा प्रोत्साहनात्मक व्हिडीओ दाखवण्यात आला.
प्रमुख पाहुणे ३ महा एअर स्क्वाड्रन एन सी सी चे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अभिजित खेडकर यांनी कॅडेट्सना सैन्यातील संधींची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. कार्यक्रमास त्यांचा पत्नी सौ रूपाली खेडकर सुद्धा उपस्थित राहिल्या व कॅडेट्सचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेकडून एअर युनिटला २५ खुर्च्या भेट देण्यात आल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील एन सी सी कॅडेट्स नी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट खुशी ओसवाल आणि कॅडेट राधिका चव्हाण यांनी केले. एन सी सी विभाग प्रमुख थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले आणि सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास शाळेचे सर्व पदाधिकारी, सैन्य प्रशिक्षण विभाग व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


District level Archery Competition…

U/17 indian bow
Rudra yenpure 10 th silver
Vaibhavi shelar 10 th. Bronze
Siddhi navale 10 th. 4 th

U/19 indian bow
Anuradha aiwale 12 th. Gold
Hitaishi bhagwati 12 th. Bronze

U/17 Fita bow
Shreya jadhav 10 th. Gold

U/19 compound bow
Samruddhi taur 9 th. Gold
Saee purohit. 10 th. Silver
Samruddhi navale. 10 th. Bronze

सोलापुर येथे झालेल्या विभागस्तरीय आर्चरी स्पर्धेत म. ए . सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या दोन विद्यार्थिनी राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड
समृद्धी तौर 3rd
सई पुरोहित 4th
यांना मार्गदर्शन गौरव सर यांनी केले सर्व विद्यार्थिनी आणि गौरव सर यांचे खूप खूप अभिनंदन💐💐

Athletics

राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत पुढील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले
द्वितीय क्रमांक वयोगट(14 वर्षाखालील मुली)
1)स्वरा दुधाळे 4×100
2) वैभवी भोईटे 4×100
3) गिरीजा पाटेकर 4×100
4) श्रावणी बिरादार 4×100
5) आदिती कळमकर 4×100

तृतीय क्रमांक वयोगट(14 वर्षाखालील मुली)
1) स्वरा दुधाळे (400 मीटर धावणे)
2) कीर्ती गुरव (गोळा फेक)
3) वैभवी केंजळे (उंचवडी)

प्रथम क्रमांक(17 वर्षाखालील मुली)
1)श्रिया वायकर 400 मीटर धावणे
2) शर्वरी शितोळे (हॅमर थ्रो)
3) वृषाली इंगळे (अडथळा शर्यत)

द्वितीय क्रमांक वयोगट(17 वर्षाखालील मुली)
1)दूर्वा गायकवाड (भालाफेक)
2) तनिष्का लायगुडे (हॅमर थ्रो)
3) रिया डोळस (अडथळा शर्यत)
4) प्रीती मारणे 3000 मीटर धावणे
5) प्रीती मारणे (पाच किलोमीटर चालणे)

तृतीय क्रमांक वयोगट(17 वर्षाखालील मुली)
1) तनिष्का जायगुडे (थाळीफेक)
2) समृद्धी कलाने (पंधराशे मीटर धावणे)
3) श्वेतांबरी काळभोररीले 4×100
4) भोसले ऐश्वर्यारीले 4×100
5) भंडलकर श्रावणीरीले 4×100
6) जोगळेकर गिरिजारीले 4×100
7)कृष्णाली इंगळेरीले 4×100
8) प्रणाली बापकर (लांब उडी)
10)दिशा धनवे (उंच उडी)

प्रथम वयोगट(19 वर्षाखालील मुली)
1) पल्लवी ठाकूर (थाळीफेक)
2) तनवी दसपुते (800 मीटर)
3) दूर्वा गोरे रिले 4×100 धावणे
4) मृणाल घोगरेरिले 4×100 धावणे
5) मुग्धा पाटेरिले 4×100 धावणे
6) पल्लवी ठाकूर रिले 4×100 धावणे
7)सायली गावडेरिले 4×100 धावणे
8) स्नेहल भिलारेरिले 4×400 मीटर धावणे
8) तन्वी दशपुतेरिले 4×400 मीटर धावणे
10) मधुरा बर्डेरिले 4×400 मीटर धावणे
11) अंकिता रानवडेरिले 4×400 मीटर धावणे
12) प्रीती मारणेरिले 4×400 मीटर धावणे

दुतीय क्रमांक( वयोगट 19 वर्षाखालील मुली)
1)श्रावणी धायगुडे 200 मीटर धावणे
2) मधुरा बर्डे (1500 मीटर धावणे)
3) मृणाल घोगरे (400 मीटर धावणे)

तृतीय क्रमांक वयोगट(19 वर्षाखालील मुली)
1)शर्वरी धायगुडे(1500मीटर धावणे)
2)श्रुतिका भोसले (गोळा फेक)
3) दूर्वा गोरे (100 मीटर धावणे) त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रशिक्षक श्री. मंगेश भालेराव सर यांचे अभिनंदन🙏🙏

अॅथलेटिक्स सर्व विजयी खेळाडू, सहभागी खेळाडू, मंगेश सर ,मगर सर, मेधा ताई,राम काका,अश्वशाळा ते पाकशाळा यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐💐👍👍
मा.जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे बालेवाडी येथे या स्पर्धा घेण्यासाठी पाठपुरावा केला होता त्याला यश येऊन आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर मुलींना तालुका स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल क्रीडा विभागाचे ही मनःपूर्वक आभार🙏

जिल्हा क्रीडा परिषद शालेय जिल्हा स्तर अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये वयोगट 19 च्या 4 ×100 मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक पटकावल्याने या संघाची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे या स्पर्धेतील सहभागी खेळाडू पुढीलप्रमाणे. १)मुग्धा पाटे -१२ वी
२)दुर्वा गोरे — ११ वी
३)मृणाल घोगरे –११ वी
४) पल्लवी ठाकुर — १२ वी
५) सायली गावडे – १२ वी.
U19 लांब उडी — तृतीय क्रमांक
1)मुग्धा पाटे
U-19 तिहेरी उडी प्रथम क्रमांक
1) मुग्धा पाटे
U-17 रिले 4×400 द्वितीय क्रमांक
1) श्रेया वायकर इयत्ता अकरावी
2) वैभवी ठोंबरे इयत्ता दहावी
3) अनुष्का मुंडे इयत्ता दहावी
4)भक्ती तापकीर इयत्ता दहावी
5)शार्वी चव्हाण इयत्ता दहावी
भालाफेक U-19 द्वितीय क्रमांक
1) दीक्षा गावडे इयत्ता अकरावी
सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे मंगेश भालेराव सर यांचेही मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐

बॉक्सिंग

आज झालेल्या शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थिनी संपादन केले 1. 1st place

Under 17
Rudra Konde
Sara Jadhav
Gauri Chinchure
Pranali Vigve
Sanskruti Kadam
Shaijal Patil
Gargi Gosavi
Dnyaneshwari Chandere
Nutan Rajput

Under 19
Shrusti Pawar
Dhanashree Ingale
Shruti Khole
Krupa Gharat
Koushiki deshpande
Nishita Hajare

2nd Place

Under 17
Shrushti Mandekar
Druvi Chavan
Samruddhi Kamble
Anushka Mazire
Bhakti Nanavre
Tanishka Tangde

Under 19
Durva Chavan
Astha Mane

3rd place

Under 17
Trisha Tapkir
Divya Sonavane

Under19
Ishika Vartak
Hindavi Khasbage.

Rifle Shooting
District level Rifle Shooting competition

Under 14

Dyuti Jaani (Silver)
ShreyaTalekar(Bronze)
Urvi Kulkarni (lV)

Under 17

Mukti Patel (Silver)
Divyanka Gurkha(lV)

Under 19

Gayatri Nakade (Gold)
SanskrutiShinde(Silver)
Sanika Patil (Bronze)

Coach : Hav Gajanan Mali sir

आज झालेल्या जिल्हा क्रीडा परिषद शालेय जिल्हा स्तर अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये वयोगट 19 च्या 4 ×100 मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक पटकावल्याने या संघाची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे या स्पर्धेतील सहभागी खेळाडू पुढीलप्रमाणे.
१)मुग्धा पाटे -१२ वी
२)दुर्वा गोरे — ११ वी
३)मृणाल घोगरे –११ वी
४) पल्लवी ठाकुर — १२ वी
५) सायली गावडे – १२ वी.

2) मुग्धा पाटे — लांब उडी — तृतीय क्रमांक

सर्व यशस्वी व सहभागी खेळाडू , मार्गदर्शक — श्री .मंगेश भालेराव सर ,रेणुका गावित ताई यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.. 💐👍

वुशू

आज जगदंबा हाॅल, जामखेड ता.अहमदनगर येथे झालेल्या शालेय वुशू स्पर्धेत इ.12 वी अ ची कृपा घरत हिची अमरावती येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे,तसेच पुढील विद्यार्थिनींनी ब्राॅंझमेडल मिळविले आहे. 1) धनश्री इंगळे — १२ वी ब.
2)सानिका भास्कर — ११ वी अ
3) गौरी चिंचुरे — १० वी ब

सहभाग
१) श्रावणी खोपडे ११ वी अ
२) संस्कृती कदम — १० वी अ
सर्व यशस्वी व सहभागी खेळाडू, मार्गदर्शक,कु.साक्षी चक्रवर्ती ताई,रेणुका ताई गावित ,रामकाका, अश्वशाळा ते पाकशाळा सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व कॅडेट कृपा घरत ला शुभेच्छा… 💐💐👍👍

अथलेटिक्स

आज रविवार दि.22/10/2023 रोजी श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल बालेवाडी, पुणे येथे विभागस्तरावरच्या अथलेटिक्स स्पर्धा संपन्न झाल्या.…
त्यामध्ये आपल्या
म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा मुळशी कु. मुग्धा पाटे या मुलीने तिहेरी उडी(Triple Jump)विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे…… तिची “चंद्रपूर” येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे……👍👌💐
यशस्वी खेळाडू अन पालक, यांचे खुप खुप अभिनंदन….
🚩🚩🚩🏃🏻‍♀️💐💐💐

आर्चरी

अमरावती येथे झालेल्या ZP SCHOOL STATE level
सई पुरोहित आणि समृद्धी तौर या दोघांना आर्चरी मध्ये
टीम silver medel मिळाले
हार्दिक अभिनंदन …..✌️✌️👍

सैनिकी विरांगणांनी केला भारतीय वायूसेना दिवस उत्साहात साजरा….

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार अंबोली, पुणे येथे ९ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रशालेतील एअर एन.सी.सी. कॅडेट्स यांच्याकडून ९१ वा भारतीय वायुसेना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेतील मैदानावर सकाळी ६ .१५ वा. भारतीय वायुसेना दिनानिमित्त एअर एन.सी.सी. ने उत्कृष्ट संचलन केले. आणि दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७.४० वा. प्रशालेतील बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात कॅडेट्सनी भारतीय वायुसेनेची व त्यातील एयरक्राफ्ट्स ची माहिती व इतिहास सांगितला. तसेच Commbined Annual Training Camp -७१६ चा अनुभव सांगितला आणि उपक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ दाखवण्यात आले. त्याचबरोबर भारतीय वायुसेनेचा प्रोत्साहनात्मक व्हिडीओ आणि एअर शो दाखवण्यात आला.
उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी सर यांनी सर्व कॅडेट्सना भारतीय वायुसेने मधील विविध संधी व त्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केले. आणि सध्या सुरु असलेल्या इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाच्या स्थितीची माहिती दिली.
एन.सी.सी. विभाग प्रमुख थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आणि कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, सैन्य प्रशिक्षण विभाग, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

‘एक तारीख एक तास’ श्रमदान या उपक्रमांतर्गत सैनिकी शाळेच्या वीरांगणाचे स्वच्छता अभियान….
दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी शालेय परिसरात स्वच्छता केली. सहावी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी कासार आंबोली गावातील पद्मावती मंदिर, विठ्ठल मंदिर परिसर व जिल्हा परिषद शाळा परिसर स्वच्छ केला. यावेळी स्वच्छतेविषयी असलेल्या जनजागृती विषयक घोषणा देण्यात आल्या व घोषवाक्य दर्शविण्यात आली.या निमित्ताने स्वच्छतेविषयी विद्यार्थिनींनी गावात जनजागृती केली व स्वच्छतेचा मंत्र दिला व स्वच्छतेची शपथ दिली. गावकरी व नागरिक आपण राहत असलेला परिसर स्वच्छ ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त केली. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही कासार-अंबोली या गावातच असल्याने व पद्मावती मंदिर हे ग्रामदैवत असल्याने हा परिसर स्वच्छतेसाठी निवडला होता. प्रशालेत शिकत असलेल्या विद्यार्थीनी बहुतांश शहरी भागातल्या आहेत. या उपक्रमामुळे त्यांना ग्रामीण जीवनाची ओळख झाली. या कार्यक्रमासाठी कासार आंबोलीचे सरपंच श्री.उमेश सुतार माजी सरपंच श्री.सचिन धुमाळ , सर्व ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी श्री.निकम साहेब, ग्रामविकास अधिकारी श्री.क्षीरसागर भाऊसाहेब,आशासेविका सौ.आशाताई लांडगे, सैनिकी शाळेच्या कॅम्पस डायरेक्टर सौ.गितांजली बोधनकर, पर्यवेक्षक श्री.संदीप पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले .

सैनिकी शाळेत गणेशोत्सव उत्साहात साजरा
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रशालेच्या दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आनंदात व मोठ्या जल्लोषात गणेश उत्सवाची सुरुवात झाली. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या देखाव्याची आरास तयार करण्यात येते, यावर्षी देखील प्राचीन गुहा तसेच प्राचीन वस्तू व वास्तू यांच्या देखावाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी केला. प्राचीन गोष्टीचे जतन व संवर्धन करणे हा या देखावा मागचा हेतू होता. आधुनिक काळात जगत असताना आपली संस्कृती कशी जपावी हा विद्यार्थिनींना देखावाच्या माध्यमातून दिलेला संदेश होता.
सदर गणेशोत्सवाची नियोजनाची व तयारीची जबाबदारी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनीकडे देण्यात आली होती. विद्यार्थिनींनी उपलब्ध असलेल्या साहित्याचा तसेच वर्तमानपत्राचा रद्दीचा लगदा तयार करून गुहा तयार केली आणि लेण्यांची भिंतीचित्र यांचे प्रदर्शन भरविले होते.
पहिल्या दिवशी श्रीची प्रतिष्ठापना परंपरेप्रमाणे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी इयत्ता नववीतील कॅडेट मुक्ती पटेल व कॅडेट आर्या निपसे यांचा हस्ते झाली. सायंकाळी खेळ व नृत्य या करमणुकीच्या कार्यक्रमाचे विद्यार्थिनींनी नियोजन करून उत्तमरीत्या सादर केला.
दुसऱ्या दिवशी पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत गणपतीची आरती करून विसर्जन मिरवणूक द्वारे दीड दिवसाचा गणपतीची सांगता झाली.
सदर गणेशोत्सव नियोजन व यशस्वीरित्या होण्यासाठी प्रशालेचे पदाधिकारी कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी म. ए. सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींचे रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेच्या कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर यांनी क्रीडा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. अध्यक्षीय मनोगत शाळेचे उपमुख्यद्यापक श्री. अनंत कुलकर्णी यांनी उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम खेळ याचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगितले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री. संदीप पवार सैन्य प्रशिक्षक विभाग प्रमुख श्री. गजानन माळी, श्री. बाळासाहेब चव्हाण क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशालेचे एकूण 553 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅडेट वैभवी शिंदे हिने केले, तर आभार प्रदर्शन कॅडेट अक्षयनी माने हिने केले.

म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली ता.मुळशी च्या इयत्ता ९ वी च्या ५० विद्यार्थिनी ,शाळेचे पदाधिकारी व शिक्षक यांनी सुतार वाडी येथील आदित्य प्रांगण संस्कार प्रतिष्ठान मधील मतिमंद मुलांच्या शाळेतील दिव्यांग मुलांना राखी बांधून खाऊ वाटप करत सामाजिक बांधिलकी चा संदेश दिला, दिव्यांग बालकांच्या चेह-यावरचा आनंद पाहून व त्यांच्यामध्ये असणाऱ्या विविध क्षमता पाहून सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनी भारावून गेल्या, या प्रसंगी संस्कार प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री.उल्हास केंजळे, मुख्याध्यापक श्री.मच्छिंद्र जाधव, सैनिकी शाळेच्या कॅंपस डायरेक्टर सौ.गीतांजली बोधनकर, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री.संदीप पवार, सौ.मंजिरी पाटील, श्री.महेश कोतकर, श्री.प्रमोद झुरमुरे, श्री.भाऊसाहेब मार्तंड हे शिक्षक उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड व काही दिव्यांग विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गाऊन सर्वांची मने जिंकली, या कार्यक्रमाचे नियोजन सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुवर्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षकांनी केले होते.

लक्ष्य फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कारगिल विजय रजत महोत्सवा’च्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ‘पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन’मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील कॅ. सिया बच्छाव, कॅ. साक्षी बोंडगे, कॅ. गायत्री जोशी या छात्रांनी बनविलेल्या पोस्टरला प्रथम क्रमांक देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमात लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. अनुराधा प्रभूदेसाई व अन्य मान्यवरांच्या अनुभव कथनातून प्रत्यक्ष कारगिल युद्धाचा थरार विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला. पुण्यातील विविध शाळांमधील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील १०४ छात्रांचा त्यामध्ये समावेश होता.

बुधवार दि. २६ जुलै २०२३ रोजी प्रशालेमध्ये दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेमध्ये १२ वी च्या सिनियर कॅडेट्स यांनी कारगिल डे / विजय दिवस या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सूत्रसंचालनासोबतच बासरी वादन, नृत्य, देश भक्तीपर गीत व नाटिका या माध्यमातून कॅडेट्स यांनी आपली देश प्रेमाची भावना व्यक्त केली. सदर कार्यक्रम सैन्य प्रशिक्षण विभागातर्फे सादर करण्यात आला. कार्यक्रमानंतर पाऊस खूप असल्याने कॅडेट्सना LOC कारगिल चित्रपट दाखविण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सैन्य प्रशिक्षण विभागाचे हवालदार गजानन माळी व बाळासाहेब चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सैनिकी परिवार उपस्थित होता.

म. ए. सो. अटल टिंकरिंग लॅब समिती द्वारे संस्थेच्या अटल टिंकरिंग लॅब असणाऱ्या शाळांमधील विज्ञान व सामाजिक शास्त्र शिकवणाऱ्या विषय शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम प्रशाला मयूर कॉलनी, कोथरूड येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी म. ए. सो. च्या बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम प्रशाला, शिरवळ इंग्रजी माध्यम प्रशाला, वाघीरे विद्यालय, सासवड, रेणाविकर विद्यालय, नगर व सैनिकी शाळेतील निवडक अध्यापकांनी सहभाग नोंदवला.

कार्यशाळेचे उदघाटन संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा मा. आनंदीताई पाटील यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी म. ए. सो. चे सहसचिव मा. श्री. सुधीरजी गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सचिनजी आंबर्डेकर, नियामक मंडळ सदस्य व म.ए.सो. अटल टिंकरिंग लॅब समिती अध्यक्ष मा. श्री. विजयजी भालेराव व म . ए. सो. अटल टिंकरिंग लॅब समिती समन्व्यक मा.डॉ. दत्तात्रय नाईक व मा. डॉ. नेहा देशपांडे उपस्थित होते.सर्व मान्यवरानी अटल लॅब बाबत शाळांची भूमिका, कार्यवाही व अपेक्षित कार्यस्वरूप याबाबत प्रशिक्षणार्थिंनींना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत रोबोकार्ट टेकनॉलॉजिज चे तज्ञ प्रशिक्षकांनी Arduino coding, Agri tech kit Digital &analog signals, Tinkercad व Remote XY अँप याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. सर्व शाळांमधील सहभागी प्रशिक्षणार्थिनींनी आपल्या शाळेत उपलब्ध असणाऱ्या किट्सचा / साहित्याचा वापर करून विविध prototype तयारी केले व गटानुसार तयार केलेल्या prototype चा उपयोग, प्रकल्प नाव इ. बाबत सादरीकरण केले. या कार्यशाळेत प्रशालेतील ATL इन्चार्ज श्री. अनंत कुलकर्णी, विज्ञान विभाग प्रमुख सौ.मंजिरी पाटील, अटल समिती सदस्य सौ. सावित्री पाटील, श्री. प्रमोद झुरमुरे, श्री. रवींद्र उराडे व सामाजिक शास्त्र विषय शिक्षक श्री. गजानन पाटील उपस्थित होते. Soil moisture sensor coding, Arduino connections व programming, यावर आधारित समजोपयोगी प्रकल्प याबाबत सादरीकरण प्रशालेच्या सहभागी शिक्षकांनी केलेकार्यशाळेचे नियोजन सैनिकी शाळा तर संयोजन बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम प्रशालेने केले.

दि. १७ जुलै २०२३ रोजी प्रशालेमध्ये परिपाठ वेळेत दीप अमावस्या साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रशालेचे अध्यापक श्री. महेश कोतकर यांनी या दिनाचे महत्व विद्यार्थिनींना समजाऊन सांगितले.

तसेच प्रशालेच्या वसतिगृहात देखील दीप अमावस्या साजरी केली गेली. वसतिगृहात दिव्यांची पूजा करण्यात आली. वर्ग ६ च्या सर्व मुली, कॅप्टन, मेट्रन, मेट्रन ईंचार्ज श्रीम. गुरव मॅडम व श्रीम. मेहता उपस्थित होत्या. सर्वांनी प्रार्थना म्हटली. स्कूल कॅप्टन मुग्धा ने दीप अमावस्या बद्दल माहिती सांगितली. मुलींनी त्यांच्या घरी होणाऱ्या पूजनाची माहिती दिली.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी – या परीक्षेचा निकाल दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पाच विद्यार्थ्यांनी पात्र झाल्या आहेत. पात्र विद्यार्थिनींची नावे पुढील प्रमाणे –
१) मुक्ती ईश्वर पटेल = 222 / 300
२) आर्या अमित निपसे = 188 /300
३) गिरिजा हेमंत जोगळेकर = 170 / 300
४) जानवी रुपेश गायकवाड = 156 / 300
५) श्रावणी विलास नलावडे = 150 / 300

ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये २ विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
१) आर्या अमित निपसे
२) मुक्ती ईश्वर पटेल

सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व पदाधिकारी या सर्वांचे अभिनंदन.

570 cadets of our school witnessed launching of chandrayaan… Live streaming… A very exciting moment for us.

दि. ११ जुलै २०२३ रोजी परिपाठात जागतिक लोकसंख्या दिन या विषयी प्रशालेचे अध्यापक, भूगोल विभाग प्रमुख श्री. अद्वैत जगधने यांनी माहिती सांगितली. मानवाची उत्पत्ती, प्रजाती, राहणीमान आणि मानवाची उत्क्रांती या विषयी सरांनी मोलाची माहिती विद्यार्थिनींस सांगितली. लोकसंख्या आपत्ती कि संपत्ती या विषयी सरांनी आपली भूमिका मांडली.

आपल्या प्रशालेची विद्यार्थिनी कॅडेट गीता गणपत धनवडे, इयत्ता नववी (ब) हिची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (Asia Book of Records) या आशिया खंडातील अतिशय मानांकित असणाऱ्या पुस्तकामध्ये रेकॉर्डची नोंद झाली आहे. सायन्स विषयामध्ये कॅडेट गीता गणपत धनवडे हिने आशिया खंडामध्ये सर्वात कमी वयात म्हणजेच अकरा वर्षे पाच महिने पाच दिवस या छोट्याशा कालावधीमध्ये केलेल्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संशोधनाची दखल घेऊन रेकॉर्डची नोंद या पुस्तकात करण्यात आली आहे. कॅडेट गीता गणपत धनवडे हिने आतापर्यंत वेगवेगळ्या संशोधनामध्ये, विभागामध्ये वीस अवॉर्ड्स मिळविले आहेत. यातील पोलिसांसाठी केलेले संशोधन विशेष उल्लेखनीय आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये उल्लेखनीय आणि भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींची नोंद या पुस्तकामध्ये ठेवली जाते.

तसेच गीताच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India Book of Records) मध्ये दखल घेऊन नोंद करण्यात आली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या पुस्तकांमध्ये तसेच वेबसाईट वरती आणि सुदर्शन टी.व्ही. वरती सदरील बातमी प्रसारित झाली आहे.

दिनांक 11 जुलै 2023 रोजी शाळेच्या ए.टी.एल. वर्कशॉप या कार्यक्रमांमध्ये डॉ.दत्तात्रय नाईक (महान संशोधक आणि शास्त्रज्ञ) आणि डॉ. नेहा देशपांडे (लाईफ टाईम मेंबर म.ए.सो.) यांचे शुभ हस्ते कॅडेट गीता गणपत धनवडे हिचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

सदरील प्रोजेक्टसाठी ए.टी.एल. इन्चार्ज आणि उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी आणि सायन्स विभाग प्रमुख सौ. मंजिरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सैनिकी परिवारातर्फे कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, प्राचार्या सौ. सुवर्णा कांबळे, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, विज्ञान विभाग प्रमुख सौ. मंजिरी पाटील, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार आणि श्री. श्याम नांगरे यांनी कॅडेट गीताला शुभेच्छा दिल्या.

कॅडेट गीता गणपत धनवडे हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा … !!

दिनांक ११ जुलै ते १३ जुलै २०२३ रोजी प्रशालेत अटल कार्यशाळा घेण्यात आली. दिनांक ११ जुलै रोजी बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रमुख अतिथी दत्तात्रय नाईक, नेहा देशपांडे होते रितिक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थीनींना Electronic components, timer bot, LED sensor, digital scale, traffic light, याच बरोबर coding विषयी मार्गदर्शन करण्यात आले. Arduino वापरून प्रोग्रामिंग द्वारे ट्रॅफिक लाईट चे मोडेल विद्यार्थिनींनी कडून करून घेण्यात आले. या कार्यशाळेमध्ये प्रशालेतील विद्यार्थीनी स्वतः प्रात्यक्षिक करुन इतर विद्यार्थिनींना ही त्याबद्दल माहिती देतील असा उद्देश होता. यावेळी प्रशालेच्या कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, प्राचार्या सौ.सुवर्णा कांबळे व उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्व विकास केंद्र पुणे मार्फत दिनांक २७ जून आणि १० जुलै २०२३ रोजी इयत्ता सहावी, सातवी आणि अकरावी करिता नवीन वातावरणाशी जुळवून घेणे आणि त्यातून स्व विकास साधणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या मुख्य समन्वयक गिरीजा लिखिते मॅडम त्याचसोबत केंद्राचे तज्ञ प्रशिक्षक स्मिता लोकरे मॅडम, सुरेखा नंदे मॅडम, गायत्री वाणी मॅडम, प्रशालेच्या समुपदेशक सौ पियुषा सामंत आणि सौ श्रेया श्रीगोंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सत्र पार पडले.

प्रशालेतील विद्यार्थिनींनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काढलेली चित्र आर्टवॉलवर दिनांक ८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित करण्यात आली. विद्यार्थिनींच्या चित्रकलेला व्यासपीठ मिळावे यासाठी या आर्टवॉलची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थिनींना चित्रकलेची प्रेरणा मिळावी म्हणून अधूनमधून निवडक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रदेखील या आर्टवॉलवर प्रदर्शित करण्यात येतात.

दि. ७ जुलै २०२३ रोजी प्रशालेचा २६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रशालेच्या शालासामिती अध्यक्षा मा. डॉ. माधवी मेहेंदळे उपस्थित होत्या. प्रशालेच्या निर्मितीपाठी संस्थेची भूमिका सांगून, शाळेतील जास्तीत जास्त मुलींनी येथील विविध सोयी सुविधांचा उपयोग करून घेत आपली प्रगती साकारावी असे उद् गार डॉ. मेहेंदळे यांनी काढले. या प्रसंगी प्रशालेतील कॅडेट्स च्या रँक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. या निमित्ताने प्रशालेच्या विद्या दैनंदिनीचे प्रकाशन देखील करण्यात आले.

दि. ४ जुलै २०२३ रोजी पौड, ता. मुळशी येथे शिक्षक आमदार मा. श्री. जयंत आसगावकर यांनी सैनिकी शाळेची ऍथलेटिक्स राष्ट्रीय खेळाडू कॅडेट मुग्धा पाटे हिचा सत्कार केला व शाळेला शिक्षक आमदार निधीतून प्रिंटर भेट दिला, प्रिंटर स्विकारताना पर्यवेक्षक श्री.संदीप पवार राष्ट्रीय खेळाडू कॅडेट मुग्धा पाटे.

दिनांक ३ जुलै २०२३ रोजी शालेय परिपाठात गुरुपौर्णिमा साजरी केली. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेचे महात्म्य पटवून दिले. विद्यार्थिनींनी प्रशालेतील सर्व शिक्षकांना स्वतः तयार केलेले बुकमार्क भेट दिले. कार्यक्रमाचे सर्व संचालन विद्यार्थिनींनीच केले होते. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कॅम्पस डिरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री.संदीप पवार आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

रविवारी दिनांक २, ९ व २३ जुलै २०२३ रोजी प्रशालेत हॉबी क्लबचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यात स्कल्पचर, वारली पेंटिंग, रांगोळी, आर्ट अँड क्राफ्ट, ड्रॉईंग, फिल्म क्लब अशा विविध ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या. सदर उपक्रम दर रविवारी घेतले जातात. उपक्रम यशस्वी होण्यासाठी हॉस्टेल विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले. उपक्रमांचे समन्वयक श्री महादेव मगर सर आहेत.

Shaurya Military Training, Adventure and Admission Camp – 2023 RLMSS….

Glimpses of –
Orientation to SSB Techniques, Medicals and a lot of field activities….
& Guest Lecture by Maj Smita Verma (Retd.)

ATL – Community Day 14 April – 2023 @ RLMSS

MES RLMSS ATL : Our Evolving Inclusive community outreach

ATL community day was celebrated in our school as per the call given by AIM Niti Aayog. This was celebrated on 13th April, 14th April and 15th April 2023.
On the first day of Celebration 13 April the interaction with community workers was organised in school.
The cadets interacted with sweepers, drainage cleaners, security guards, gardeners , electricians, plumbers, and washermen about their work profile and the problems faced during their work. One of the cadet Geeta dhanawade from standard 8 made a group and prepared and presented a gadget for disposal of the garbage which was one of the problems told by the sweepers like Used sanitary pads, stained dirty clothes, excreta of animals,etc
This interaction was an eye opener and created awareness about their responsibility to maintain a clean environment in their surroundings.
On the 2nd day of the program 14th April 2023 – the birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar was celebrated with the children of community workers and teachers who reside in the school premises. Children enjoyed the program ‘fun with science projects’.

They were invited to see and learn the wonders of technology.They were given DIY kits, lago blocks and magnets and were asked to identify any problem and make solutions prototype models with it.
On 15th April around 25 students from Zilla Parishad schools of shindewadi and sutharwadi villages who were deprived and interested in learning new technology were invited. They were trained and mentored to get hands on experience like various activities such as “Do-it- yourself”, design thinking and introduction to 3D printing they were guided and mentored by school children of class 11 science stream.
The young inventors were built with ideas and made many designs using chart paper, LED bulbs and pencil cells.
It was interesting and opened a new horizon for them.
The educational and cultural bridges which have been * witness with our rural neighbours will be further enhanced in the time to come unity. This yearly event becomes a celebration of the spirit of unity in diversity.
‘Vasudhaiva kutumbakam’

A wonderful Passing Out Parade of RLMSS Pune in its all new and revised format…happened great here on 28 March 2023

‘Do so well – All the Best’ – for the Passing out March in Slow Time was performed and walked for the first time…

Shri Mitesh ji Ghatte, the RO & Chief Guest along with Sou. Dr. Madhavi ji Mehendale, Chairman SMC RLMSS graced the occasion and did the honors….vAh…

Great job by Ex Hav Shri Gajanan Mali – IC Mil Trg & Event Coord and Ex Hav Shri Balasaheb Chavan – Mil Inst & my Man Friday…

Felt so happy and immensely thankful..





https://www.youtube.com/live/Glnt6ovdzzU?feature=share

तरुणाईच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणारा युवा चेतना दिन

लष्करी वेशात शिस्तबद्ध संचलन करत मान्यवरांना दिलेली मानवंदना, रिदम योगाद्वारे झालेले एकाग्रतेचे दर्शन, कराटे आणि अश्वारोहणातून दिसलेले धाडस, धनुर्विद्या आणि रायफल शूटिंगमुळे दिसून आलेली अचूकता, रोप मल्लखांबामुळे साधलेली लवचिकता, लेझमीच्या खेळातून साधलेली सांघिक भावना, मार्शल आर्टसच्या प्रशिक्षणातून झालेली स्वसंरक्षणाची तयारी बघून अचंबित झालेले प्रेक्षक असे दृश्य आज बघायला मिळाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिना’च्या कार्यक्रमात. विद्या आणि बळाच्या आधारे आपण जग जिंकू शकतो, जगात वंदनीय ठरू शकतो हा संदेशच मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या साहसी प्रात्यक्षिकांमधून या वेळी दिला आणि स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला समर्थ भारत निर्माण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हे दाखवून दिले.

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या विविध शाखांमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करतात. यावर्षी मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचीच मने जिंकली.

मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी २०२३) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक हे होते. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर या प्रमुख अतिथी म्हणून तर समर्थ भारत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुहास क्षीरसागर या वेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. संस्थेचे मा. उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे सर्व निर्बंधांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत व बंदिस्त जागेत मैदानी प्रात्यक्षिकांशिवाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांसह अतिशय उत्साहात पार पडला.

प्रमुख वक्ते श्री. सुहास क्षीरसागर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या कार्याची महती विशद केली. ते म्हणाले की, महापुरूषांचे आयुष्य दीपस्तंभासारखे असते. एखाद्या विचाराचा ध्यास घेणे म्हणजे काय हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून शिकायला मिळते. भारतीय जीवन पद्धती ही वेदांतावर आधारित आहे हे त्यांनी जगाला सांगितले. त्याग हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे, आपली संपत्ती इतरांना उपयोगी पडली तरच जीवनात सुख आणि शांतता लाभू शकते, स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विचार करण्याची शिकवण भारतीय संस्कृती देते, हे स्वामीजींनी जगाला पटवून दिले. आपल्या देशातील जनता स्वत्व विसरली आहे, भारताची जगभर कुचेष्टा सुरू आहे, त्यामुळे आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी स्वामीजींनी देशभर प्रवास केला. मन, बुद्धी आणि मनगट बळकट असेल तरच जग जिंकता येते हे त्यांनी समजावून सांगितले. आजच्या पिढीने देखील आपल्या क्षमता ओळखण्याची गरज आहे कारण तीच यशाची गुरुकिल्ली आहे.

श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर विद्यार्थ्यांना मर्गदर्शन करताना म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले कुटूंब, गुरूजन आणि शाळा-महाविद्यालय यांचा पाठिंबा असणे अनिवार्य असते. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मला टेबल टेनिस खेळाच्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता आले. त्याचबरोबर खेळामुळे मला काही महत्वाचे गुण शिकायला मिळाले ते म्हणजे ध्येय निश्चिती, सांघिक भावना, कठोर परिश्रम आणि अपयश पचवण्याची क्षमता. त्यामुळे सातत्याने कठोर परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी युवा चेतना दिनाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. तर श्री. विजय भालेराव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

या वेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांचा परिचय प्रा. शैलेश आपटे यांनी करून दिला.

मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतील शिक्षिका श्रीमती शिरीषा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

A world of science’ revealed through experiments at MES Rani Lakshmibai Mulinchi Sainiki School

Kasar Amboli, 14 October 2022.

A ball floating in the air without any support, and watching the collision of the same ball with another ball next to each other, were some of the experiments amazed the audience present in the multipurpose hall of the school. Bernali’s principle of air velocity, the reflection of light in different mediums through the thyroscope and the law of momentum conservation when the oscillating Newton’s cradle collides with each other, Electromagnetic induction by means of Various concepts such as magnetic attraction were explained to the children through interesting experiments.
‘Atal Tinkering’ laboratory of M. E. S Rani Lakshmibai Mulinchi Sainiki Shala had organized a workshop on ‘The Joy Learning Science Through Experiments’ before the ‘Science Vachan Prerna Divas’.
Along with 378 girls cadets from Sainiki school, more than 150 students from various schools like Vidya Bhavan English Medium School, Sanskar School, Heritage International School, Elite International School and Sudarshan Vidyamandir participated in the workshop. Former Professor Shri. Bhagwan Chakradev who dedicated his life for the science exploration was the main guide and Mr. Keshavrao Deshpande along with Mr. Vijay Patil assisted him in the experiments.
Through this programme, the complex concepts of science were presented to the students in a very interesting manner and connected with their daily life. Sainiki School implemented an innovative concept of ‘Science Vachan Prerna Divas’ on Saturday 15th October by reading the various concepts presented in the programme. Sainiki School always organizes such programmes for the overall development of the rural students in its surrounding areas. On this occasion, the Sainiki School intends to bring all these schools together using the concept of ‘Cluster School’.
Mr. Ravindra Chaudhary, Cluster Head of Urawade Cluster , Mrs. Suvarna Kamble, Principal of Sainiki School, Commandant Mr. M. Yagyaraman were present for this programme. The programme was organized by ATL Head of the Department Mr. Anant Kulkarni and Head of Science Department Mrs. Manjiri Patil under the mentorship of Campus Director Mrs. Geetanjali Bodhankar . Mr. Anant Kulkarni, Vice Principal of the school thanked everyone and concluded the programme.

विजयादशमी संचलन ……. @ कासार अंबोली by RLMSS

शारदीय नवरात्रौत्सवाने आपणा सर्वांच्या जीवनात एकप्रकारचा आनंदोत्सव ओसांडून वाहतो असतो. या निमित्ताने, मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारअंबोली, येथे सोमवार दि.०३ ॲाक्टोबर २०२२ रोजी दु.३.०० ते ५.०० या वेळात सामाजिक भोंडला प्रशालेत आयोजित करण्यात आला. कौटुंबिक स्नेहमेळावा, मैदानावर गरबा, भेटीगाठी व चहापान असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते. बऱ्याच मैत्रिणींच्या या कार्यक्रमामुळे भेटीगाठी झाल्यात.

गुरुवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली ता. मुळशी, जि. पुणे,
संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ‘हर घर झेंडा’ या उपक्रमांतर्गत कासार आंबोली गावामध्ये ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांसमवेत प्रभात फेरी काढून जनजागृतीपर पत्रके वाटून आणि घोषणा देत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींच्या घोष पथकाने लोकांना जागृत करण्यासाठी वातावरण निर्मिती केली आणि विद्यार्थिनिंनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला…
हातात घेतलेले फलक लोकं उत्साहाने वाचत होते आणि उपक्रमाविषयी माहिती घेत होते.
प्रभात फेरीची सुरुवात प्रशालेच्या परिसरातून सुरू होऊन ग्रामपंचायत कासार आंबोली गावाच्या प्रांगणात सांगता झाली.
सदर कार्यक्रमास गावाचे सरपंच कुमार रणजित गायकवाड, उपसरपंच स्वप्नील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, उपस्थित होते.
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक अद्वैत जगधने, सुनीता शिंदे, भाऊसाहेब मार्तंड, रविराज थोरात, महादेव मगर तसेच प्रशालेतील हॉस्टेल विभागाच्या प्रियंका गुरव, शितल मार्तंड आणि प्रशालेचे सेवक पोपट कणगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top
Skip to content