TERRE OLYMPIAD Award Ceremony…


TERRE 🌳🌳OLYMPIAD
दिनांक : ९ जानेवारी २०२६ रोजी

पुणे येथे आयोजित TERRE OLYMPIAD Award Ceremony मध्ये आपल्या प्रशालेला सर्वाधिक सहभाग हा पुरस्कार मिळाला. प्रशालेतील ४३० विद्यार्थिनींनीही परीक्षा दिली दिली होती. सदर पुरस्कार माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री मा. श्री. प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीचे ज्ञान वाढवण्यासाठी सुरू केलेली एक ही अनोखी परीक्षा आहे. शालेय अभ्यासक्रमात अनेक परीक्षा होत असल्या तरी, TERRE OLYMPIAD परीक्षा खूप लोकप्रिय आहे. कारण ती विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात काहीसा दिलासा देते. मोबाईल ॲपद्वारे शिकण्याची संकल्पना या ऑलिम्पियाडमध्ये दिसून येते. विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या अभ्यासक्रमापलीकडे जाऊन शिकावे आणि ‘चौकटीच्या बाहेर’ विचार करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी टेरे ऑलिम्पियाडच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. प्रशालेमध्ये पर्यावरणाचे अनेक उपक्रम चालू आहेत त्यामध्ये परसबाग, सांडपाणी व्यवस्थापन, डी-कंपोस्ट, औषधी वनस्पती, रोप वाटिका, सौर ऊर्जा हे उपक्रम कार्यरत आहेत.

Scroll to Top
Skip to content