मंगळवार दिनांक– १५ ऑक्टोबर २०२४
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’म्हणून साजरा केला जातो. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे. तसेच वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. अशा या वाचनाचे महत्त्व सांगणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी प्रशालेमध्ये वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रशालेत सकाळी ७.४० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता ७ वी अ च्या विद्यार्थिनींनी ‘माझी मराठी’, ‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ या कवितांचे काव्य गायन सादर केले. प्रशालेचे शिक्षक श्री. महेश कोतकर सर यांनी विद्यार्थिनींना आपल्या प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले. इयत्ता ७ वी अ तील कॅ. दुर्वा परळीकर या विद्यार्थिनींने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती मनोगतातून व्यक्त केली. तसेच सौ. शिंदे सुनिता यांनी बोधपर गोष्टीचे अभिवाचन केले. प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती जोग मॅडम यांनी आपल्या जीवनात वाचन किती महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याला किती समृद्ध करणारे असते हे सांगितले. इयत्ता सातवी अ आणि ९ वी ब मधील मधील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅ. साक्षी पंडा, कॅ. रेवती पवार या विद्यार्थिनींनी केले. कॅ. श्रुतिका पानमंद या विद्यार्थिनींने आभार मानले. तसेच दुपारी विद्यार्थिनींनी ग्रंथालयात विविध पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती जोग मॅडम, प्रशालेचे मा. ऐविएन विंग कमाण्डर म. यज्ञरामन सर, सिनियर मास्टर श्री. नांगरे सर, पर्यवेक्षक श्री. पवार सर हे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणेच पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मराठी विभागाचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले.







