अभ्यास कौशल्य सत्र…@ RLMSS

आज दिनांक – 13/04/25 रोजी शाळेच्या व्यक्तिमत्व विकास केंद्राकडून 9 वी आणि 11 वी च्या कॅडेटसाठी अभ्यास कौशल्य सत्र घेण्यात आले. पुढच्या वर्षी या कॅडेटस ची 10 वी आणि 12 वी असल्यामुळे मानसिक ताण न घेता अभ्यासाचे नियोजन कसे करावे हे सांगण्यात आले. अभ्यास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. मेमरी टेकनिक, स्टडी टिप्स मुलींना दिल्या. कृतिखेळ आणि गटचर्चा युक्त असे 4 तासाचे सत्र घेण्यात आले. हे सत्र व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या सौ. गिरीजा लिखिते, सौ. स्मिता लोकरे, सौ. शुभा कुलकर्णी, सौ. गायत्री वाणी, सौ. पूनम पाटील, सौ. संध्या फणसाळकर, या समुपदेशकांनी घेतले. या सत्राचे आयोजन शालेय समुपदेशक सौ. श्रेया दिघे यांनी केले होते.

Scroll to Top
Skip to content