आविष्कार – घरगुती विज्ञान प्रयोग उपक्रम
रौप्य महोत्सवी वर्ष ( २०२१ – २२ ) निमित्ताने……
प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाप्रित्यर्थ दि.१३ ऑगस्ट पासून या उपक्रमाची सुरुवात इ.६ वी ते ९ वी च्या विद्यार्थिनींसाठी करण्यात आली. अनुभव व कृतीतून आनंददायी विज्ञान शिक्षण, दैनंदिन जीवन व विज्ञान संकल्पना यांची सांगड घालून मुलभूत कौशल्य विकसन करण्याच्या हेतूने या उपक्रमाची सुरुवात विज्ञान विभागातर्फे करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत इ.६ वी ते ९ वी च्या विज्ञान पाठ्यपुस्तकावर आधारित महत्त्वाच्या संकल्पना विचारात घेऊन विविध आॅनलाइन तज्ञ मार्गदर्शनपर कृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.या कृतीकार्यशाळांमध्ये घरातील सहज उपलब्ध साहित्याचा वापर करून विविध प्रयोग तज्ञ मार्गदर्शकांनी दाखवले व विद्यार्थिनींनी देखील स्वत: करून पाहिले. तसेच रोजच्या जीवनातील वापर करीत असलेल्या विविध वस्तू, पदार्थ कृती यामध्ये असलेल्या विज्ञान संकल्पना देखील सांगण्यात आल्या. वर्गश: विज्ञान अध्यापकांनी काही संकल्पनांवर आधारित घरगुती प्रयोग विद्यार्थिनींना स्वत: करून दाखवले.
उपक्रमाच्या कार्यवाहीसाठी विविध संकल्पनांच्या विभाजनानुसार विद्यार्थिनींचे गट 1 – ६वी ,७ वी ( Aspirants) व गट २
८ वी,९वी(Creative minds) याप्रमाणे करण्यात आले होते.
- तज्ञ मार्गदर्शनपर कार्यशाळांचे नियोजन पुढीलप्रमाणे :
| अनु.क्र. | दिनांक | संकल्पना | तज्ञ मार्गदर्शक |
| 1. | 13 ऑगस्ट | इ.6 वी, 7वी – ध्वनी – Sound | श्री.दीपक आडगावकर- मराठी विज्ञान परिषद , पुणे. |
| 2. | 13 ऑगस्ट 21 | इ.8 वी, 9 वी – बल,दाब Force & Pressure | दीपक आडगावकर- मराठी विज्ञान परिषद , पुणे. |
| 3. | 25 ऑगस्ट 21 | इ.6 वी, 7वी – चुंबकत्व | अपेक्षा वैद्य – अगस्त्य फाउंडेशन |
| 26 ऑगस्ट 21 | इ.8 वी, 9 वी – प्रकाश | अपेक्षा वैद्य – अगस्त्य फाउंडेशन | |
| 4. | 5 सप्टेंबर 21 | Digital kids zone – घरगुती विज्ञान प्रयोग राष्ट्रीय स्तर कार्यशाळा इ.6 वी ते 9 वी | Indian institute of Science, Bengaluru |
| 5. | दि.6 सप्टेंबर | Kitchen Chemistry इ.6 वी ते 9 वी | Science innovation centre बारामती येथील project coordinator श्री.अमित जाधव व सौ.शितल तावरे |
| 6 | दि.14 सप्टेंबर | इ.6 वी, 7वी -स्थितिक विद्युत – Static electricity | IUCAA पुणे येथील Science outreach programme coordinator श्रीमती सोनल थोरवे |
| 7. | दि.15 सप्टेंबर | इ.8 वी, 9 वी विद्युत चुंबकत्व – Electromagnetism | IUCAA पुणे येथील Science outreach programme coordinator श्री.रुपेश लबडे |
| 8. | दि.24 सप्टेंबर | आॅनलाइन विज्ञान प्रदर्शन मार्गदर्शनपर कार्यशाळा | अपेक्षा वैद्य – अगस्त्य फाउंडेशन |
विज्ञान अध्यापकांनी घेतलेल्या कृतीकार्यशाळा :
गट 1 – प्रकाश , घनता , बल ,दाब, भौतिक व रासायनिक बदल
गट 2 – उष्णता , ध्वनी , आम्ल व आम्लारी ,रासायनिक अभिक्रिया
- उपक्रमाचे स्वरूप व केलेली कार्यवाही :
- दर आठवड्याला दोन सत्रांचे आयोजन – ठरवलेल्या संकल्पनेवर आधारित घरगुती साहित्य वापरून प्रयोग दाखवण्यात आले.
- एका आठवड्यात पूर्ण झालेल्या संकल्पनेवर विद्यार्थिनींना स्वत: प्रयोग करण्यासाठी वर्गाच्या ग्रुपवर IISER पुणे सायन्स activity सेंटर च्या व्हिडिओ लिंक्स पाठवण्यात आल्या .
- या व्हिडिओ मधील प्रत्येक संकल्पनेवर आधारित ३ ते ५ कृती स्वत: करून निरीक्षणे विद्यार्थिनींनी नोंदविली व निष्कर्ष काढले.
- या प्रयोंगाव्यतिरिक्त अन्य साहित्य वापरून समान संकल्पना स्पष्ट करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग व कृती काही विद्यार्थिनींनी केले. नवीन प्रयोगांची निर्मिती केली.
- विद्यार्थिनींनी केलेल्या कृतीच्या नोंदी नोंदवहीत केल्या, प्रयोगांचे व्हिडिओ तयार केले.
- या माहितीचे संकलन करण्यासाठी प्रत्येक संकल्पनेवर आधारित गूगल फॉर्म मध्ये व्हिडिओ व फोटो अपलोड करून अभिप्राय नोंदवला.
- उपक्रमाचे अंतिम टप्प्यातील नियोजन :
- अगस्त्य फाउंडेशन च्या सहकार्याने गुरुवार दि३० सप्टेंबर २०२१ रोजी विद्यार्थिनींनी केलेल्या निवडक घरगुती विज्ञान प्रयोगांचे online विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
- उपक्रमात सर्व सहभागी विद्यार्थिनींना इ – सहभाग प्रमाणपत्र दिले.

