प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त , १५ दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत, बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ४.३० ते ५.३० या वेळात वाचू आंनदे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. १५ ऑक्टोबर रोजी डॉ.ए. पी. जे.कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शाळेत वाचू आंनदे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
*’वाचू आनंदे‘*
या ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात कु. ईरा खाडीलकर हिच्या सरस्वती स्तवनाने झाली. मा. प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमांचा हेतू स्पष्ट केला. सौ. रेखा रायपूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
वाचनाचा हातखंडा असण्याऱ्या श्रीमती गौरी लागू मॅडम यांनी वाचनाची मुलींना ओळख व्हावी, मुलींना चांगल्या साहित्याच्या वाचनाची गोडी लागावी आणि त्याच बरोबर शाळेत अभ्यासासाठी असलेल्या विविध विषयांचे त्यांचे आकलन अधिक वाढावे या दृष्टीकोनातून ‘वाचू आनंदे’* या पुस्तकातील काही संवाद वाचून दाखवले. सुरुवातील त्यांनी वाचू आंनदे या पुस्तकाविषयी माहिती सांगितली. या पुस्तकाचे संपादक माधुरी पुरंदरे नंदिता वागळे यांनी केले आहे. या पुस्तकातील काही लेखकांचे संवाद त्यांनी मुलींना वाचून दाखवले .
श्रीपाद माटे यांची गणू हलवाईची गोष्ट, प्रल्हाद अत्रे यांची ठोकळ्याच्या चित्राची कथा, द. मा. मिराजदार यांची विनोदी कथा – बाबाचा अभ्यास, जयंत नारळीकर यांची चंद्राची सफर असे अनेक संवाद लागू मॅडम यांनी त्यांच्या शैलीत वाचून दाखवले .वाचताना आवाजातील चढउतार कसा असावा, हे त्यांनी त्यांच्या वाचनातून सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या महामात्रा सौ.चित्रा नगरकर मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अद्वैत जगधने यांनी केले.