
– Online –
इ. 11 वी व इ. 12 वी च्या विद्यार्थ्यांनी आणि पालक यांच्यासाठी सोमवार दि. 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वा. मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
*विषय- विद्यार्थिनींसाठी एक सुवर्णसंधी – NDA*
*व्याख्याते- लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर*
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्राचार्या डॉ. .सुलभा विधाते मॅडम यांनी केले. श्री प्रमोद झुरमुरे सर यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले.
*व्याख्याते लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर* यांनी slideshow द्वारे मुलींना सैन्यदलाबद्दल व सैन्यातील प्रवेशाचे विविध मार्ग याचे उत्तम मार्गदर्शन केले. त्यांनी सैन्यदलामध्ये सध्या कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांबद्दल सांगितले. ले. कर्नल ब्राह्मणकर सरांनी NDA साठी लागणारे वय उंची याबद्दल देखील सविस्तर मार्गदर्शन केले. NDA च्या लेखी परीक्षेची तारीख, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप , या परीक्षेचा अभ्यासक्रम याबद्दल देखील मार्गदर्शन केले. लेखी परीक्षेनंतर SSB interview, medical exam, Training, Joining तसेच उच्च शिक्षणासंबंधी माहिती देखील सांगितली. त्यांनी
मुलींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची
उत्तरे दिली व त्यांच्या सर्व शंका दूर केल्या. शेवटी त्यांनी मुलींना व प्रशालेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. मानसी भाटे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. मिळालेल्या माहितीचा मुलींना खूप उपयोग होणार आहे हे त्यांनी सांगितले व त्यांनीही शाळेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सावित्री पाटील मॅडम यांनी केले.