कॅडेट रिद्धी गिरीश सुपेकर हिच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेस 25 औषधी वनस्पती व बागकाम साहित्य भेट…

आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या प्रशालेतील इयत्ता आठवी ब या वर्गातील कॅडेट रिद्धी गिरीश सुपेकर हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींमध्ये पर्यावरणाविषयी रुची निर्माण व्हावी या उच्च हेतूने प्रशालेस श्री व सौ प्रणाली गिरीश सुपेकर यांनी 25 औषधी वनस्पती व बागकाम साहित्य भेट म्हणून दिले.
साहित्य स्वीकारण्यासाठी प्रशालेच्या इयत्ता आठवी ब वर्गातील कॅडेट्स, मा मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री श्याम नांगरे, ज्येष्ठ शिक्षक श्री अद्वैत जगधने, सौ मंजिरी पाटील, श्री भाऊसाहेब मार्तंड, श्री रविराज थोरात व श्री मंगेश पाटील हे उपस्थित होते.

Scroll to Top
Skip to content