झाँसी अभ्यास दौरा दिनांक 16 जानेवारी 2020 ते 21 जानेवारी 2020 यादरम्यान झाॅंसी अभ्यासदौरा आयोजित केला होता. प्रशालेतील 10 कॅडेट्स व तीन शिक्षक हे राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र अभ्यासण्यासाठी झाँसी या ठिकाणी गेले होते. झाँसी येथे या टीमने झाँसी फोर्ट, राणी महल, ओरचा, राम राजा मंदिर या स्थळांचा अभ्यास केला. ऐतिहासिक वास्तू,ठिकाणे यांची माहिती घेतली. झाँसी संग्रहालय येथे भेट दिली. राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावरील आधारित “क्या खूब लडी मर्दानी,वो तो झाँसीवाली रानी थी| ” ही कविता झाँसी किल्ल्यावर लोकांसमोर सादर केली. सदर टीमचा निवास ३१आर्मड डिव्हीजन झाँसी येथे होता. दौर्यात विविध प्रकारचे टॅंक, गन यांचा अभ्यास केला. टँक वर बसून ऐतिहासिक सफरचा अनुभवही या टीमने घेतला. अनेक सैन्य अधिकारी विशेषत: महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हा दौरा यशस्वी करण्यासाठी मा.सतीश कुलकर्णी ( मुख्य प्रायोजक ),म.ए.सो.संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.राजीवजी सहस्त्रबुद्धे,प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ.माधवी मेहेंदळे,शाला समिती सदस्य व प्रशालेने विशेष मेहनत घेतली होती.

