स्वा.विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी दिनांक 26 फेब्रुवारी 2020 रोजी प्रशालेत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासार आंबोली गावचे उपसरपंच मा.सचिन धुमाळ हे होते. याप्रसंगी इयत्ता आठवीतील मुलींनी स्वा.सावरकर यांच्या जीवनावरील प्रसंग सादर केले. स्वा.सावरकर लिखित ‘ जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे ‘हे काव्य गायले. स्वा. सावरकर लिखित कविता म्हटल्या. श्रीमती मालतीताई आठवले यांच्या तर्फे स्वा.सावरकर पुण्यतिथी ला इयत्ता आठवीतून प्रथम व द्वितीय क्रमांकांना रोख रक्कम रुपये 1000/- प्रत्येकी व सावरकर ग्रंथ भेट दिले जातात. ते पुरस्कार यावर्षी प्रथम क्रमांक कु.आश्विनी धुमाळ व द्वितीय क्रमांक कु.ईश्वरी लेकुरवाळे यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमासाठी इतिहास विभागाने तयारी करून घेतली होती.

