मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील तीन छात्रांच्या पोस्टरला प्रथम क्रमांक ….

लक्ष्य फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कारगिल विजय रजत महोत्सवा’च्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ‘पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन’मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील कॅ. सिया बच्छाव, कॅ. साक्षी बोंडगे, कॅ. गायत्री जोशी या छात्रांनी बनविलेल्या पोस्टरला प्रथम क्रमांक देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमात लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. अनुराधा प्रभूदेसाई व अन्य मान्यवरांच्या अनुभव कथनातून प्रत्यक्ष कारगिल युद्धाचा थरार विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला. पुण्यातील विविध शाळांमधील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील १०४ छात्रांचा त्यामध्ये समावेश होता.

Scroll to Top
Skip to content