शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून DANA इंडिया टेक्निकल सेंटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी श्री. शौनक दिघे – सॉफ्टवेअर हब प्रमुख, श्री. महारुद्र जंगम – ऍडमिन ऑफिसर, टेक्निकल टीमचे श्री. नवजीत वर्मा, सौ. मंजुश्री पाटील, श्री. निलेश मोरे, कु. प्रज्ञा देशपांडे यांनी प्रशालेस भेट दिली व इयत्ता 6 वी ते 9 वी च्या ATL क्लब च्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
विज्ञान म्हणजे काय, दैनंदिन जीवनातील विज्ञान, तंत्रज्ञानाचे सामाजिक समस्या सोडविण्यासाठी उपयोजन, पर्यावरणीय समस्या व जागतिक आव्हाने, दैनंदिन जीवनापलीकडील विज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
निश्चितच विद्यार्थिनींमध्ये संशोधनविषयक दृष्टी विकसन, प्रेरणा व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती,पर्यावरणपूरक जीवशैलीविषयक जागृतीसाठी कार्यशाळा दिशादर्शक ठरली.
प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले व औपचारिक संवाद साधला.
कार्यक्रमाचे नियोजन इस्टेट मॅनेजर श्री. समीर जाधव व ATL इन्चार्ज सौ. मंजिरी पाटील यांनी श्री. महारुद्र जंगम यांच्या सहकार्याने केले.












